Submitted by मीन्वा on 8 February, 2008 - 03:44
'त्यां'नी मशिदीशेजारी घरं बांधली
आणि मंदिराशेजारी यांनी
आपापल्या परमेश्वराच्या रक्षणाची
जबाबदारी, पेलू लागले दोघेही
मग एके दिवशी
मंदिर नव्हतं...
मशिद नव्हती...
नव्हते दोघांचेही काही भाईबांधव
पण..
दुसर्या दिवशी पुन्हा,
लाल रंगाने नक्षीकाम केलेल्या गालिचावर,
'ते' नमाज पढताना दिसले...
कुणासमोर.....?
'हे' प्रार्थना करताना दिसले...
कुणाची.....?
***************************
'त्यां'नी जबाबदारी घेतली होती
'ती'च्या रक्षणाची,
मग अर्थात 'यां'नीही....
मग एके दिवशी
'त्यां'नी 'ती'ची अब्रू लूटली...
म्हणून 'यां'नीही 'ती'चीच...
कर्तव्यपूर्ती...!?
****************************
गुलमोहर:
शेअर करा
शहारे
मिनू
परीणामकारक
शहारे आले वाचताना
सुधीर
जबरदस्त!
जबरदस्त लिहिली आहेस मीनू. ताकदीची कविता.. थोड्या शब्दात थेट परिणाम!
आवडली.
सॉलिड आहे
मीनू, सॉलिड लिहिलंय एकदम........
'आपापल्या परमेश्वराच्या रक्षणाची
जबाबदारी, पेलू लागले दोघेही' हे वाचून गंमत वाटली.
हादरले
मिनु.. तुझ्या कवितेने अक्षरशः हादरवुन टाकले...
जबरा.... हॆट्स ऒफ़ !
जबरा.... हॆट्स ऒफ़ !
बाप रे! एवढच सुचतय बघ सध्या !
बाप रे! एवढच सुचतय बघ सध्या !
खासच .... विशेष लक्षवेधी आहे
खासच .... विशेष लक्षवेधी आहे हे काव्य
सस्नेह
देवनिनाद
सहज! भेदक, आणि परिणामकारक!!
सहज! भेदक, आणि परिणामकारक!!
क्या बात है!
क्या बात है!
मीनू, कविता सॉलीड आहे एकदम.
मीनू, कविता सॉलीड आहे एकदम.
काटा आला अंगावर
काटा आला अंगावर
कर्तव्यपूर्ती.. ? >> जबरीच!
कर्तव्यपूर्ती.. ? >>
जबरीच!
धन्यवाद!
धन्यवाद!