ऑक्टोबर महिन्यापासून २०१९चे नोबेल पुरस्कार जाहीर होऊ लागतील. संपूर्ण संशोधक जगताचे त्याकडे लक्ष असते. ते पुरस्कार सन्मानाचे असतात. पण त्यापूर्वीच सप्टेंबरमध्ये एक अनोखे लक्षवेधी पुरस्कार दरवर्षी दिले जातात. त्यांचे नाव शीर्षकात दिलेच आहे.
आता वळतो या Ig- नोबेल पुरस्कारांकडे. १९९१ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये हे पुरस्कार अमेरिकेत दिले जातात. मार्क अब्राहम या संपादकाने हा अनोखा उपक्रम चालू केला. हा गृहस्थ एका शास्त्रीय विनोदाच्या मासिकाचा संपादक आहे. हे पुरस्कार उपरोधिक हेतूने दिले जातात. त्यासाठी १० संशोधने निवडली जातात, जी किरकोळ किंवा विचित्र प्रकारची असतात ! या पुरस्कार-संस्थेचे ब्रीदवाक्य असे आहे:
' ही संशोधने लोकांना प्रथमदर्शनी हसवतात पण नंतर विचार करायला लावतात !'
'Ig नोबेल' मधील Ig चा अर्थ आहे 'ignoble' (अज्ञानी).
संशोधन शाखा व निकष:
एकूण १० शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. त्यापैकी ६ शाखा या खऱ्या नोबेलप्रमाणेच आहेत. याव्यतिरिक्त जीवशास्त्र, अभियंत्रिकी , व्यवस्थापन अशा काही शाखा निवडल्या आहेत. यासाठी सादर करायची संशोधने ही विनोदी, विचित्र किंवा काही अनपेक्षित निष्कर्ष काढलेली असावी लागतात. पुरस्काराचा हेतू असा असतो. संशोधक जगतात बऱ्याचदा अतिसामान्य दर्जाचे शोधनिबंध 'पाडले' जातात. त्यांचा लायकीपेक्षा जास्त गाजावाजा केला जातो आणि काहींचे ढोल उठसूठ बडवले जातात. या सगळ्यावर उपरोधिक टीका करणे हा। Ig नोबेल चा खरा उद्देश आहे.
मात्र या वरवर विनोदी वाटणाऱ्या उपक्रमाला एक आशेचीही किनार आहे. कधीकधी अशा एखाद्या विचित्र वाटणाऱ्या संशोधनातूनच खऱ्या उपयुक्त संशोधनाला चालना मिळालेली आहे. एक उदाहरण तर अचंबित करणारे आहे. Sir Andre Geim यांना २००० साली Ig-नोबेल दिले होते. पुढे २०१०मध्ये त्यांनाच पदार्थविज्ञानात खरेखुरे नोबेल प्राप्त झाले !! असे हे एकमेव उदाहरण आहे.
पुरस्कार वितरण:
हे सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठात केले जाते. विजेत्यांना माजी खऱ्या नोबेल विजेत्यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातात. त्यानंतर विजेत्यांना १ मिनिटात भाषण करायची संधीही दिली जाते. एकूणच या समारंभात हास्यविनोद आणि टिंगलटवाळी यांची रेलचेल असते.
आता हे सर्व वाचल्यावर वाचकांना उत्सुकता लागली असेल की असली अजब संशोधने नक्की कुठली असतात त्याची. नुकतेच यंदाचे हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तेव्हा त्यातल्याच काहींची ही झलक. फक्त संशोधन-विषय लिहितो; कोणाला मिळाला याला काही आपल्या दृष्टीने महत्त्व नाही.
२०१९ चे पुरस्कार:
१. रसायनशास्त्र: ५ वर्षाचे मूल एक दिवसात अर्धा लिटर लाळ तयार करते.
२. अभियांत्रिकी:
बाळांचे लंगोट बदलायच्या यंत्राचा आराखडा.
३. वैद्यकीय: a)पिझ्झा खाण्याने माणसाला मृत्यूचा प्रतिबंध करता येतो.
b) पुरुषाचे डावे अंडाशय उजव्यापेक्षा अधिक गरम असते.
४. अर्थशास्त्र: चलनी नोटांच्या हाताळण्यातून रोगजंतूंचा प्रसार होतो.
५. शांतता: आपल्याला शरीराचा कुठला भाग खाजवायला सर्वात जास्त आवडते? त्याचे उत्तर आहे पायाचा घोटा.
आता अंग खाजणे आणि शांतता यांचा काय संबंध, असे प्रश्न इथे गैरलागू असतात !
दोन वर्षांपूर्वीचे एक संशोधन तर खरेच विनोदी आहे.
ते असे:
उंदराचे २गट :
एकाला कॉटनचे ' कपडे' तर दुसऱ्याला पॉलिस्टरचे घातले.
मग त्या दोन गटांच्या लैंगिक क्षमतेची तुलना केली !
….
भन्नाट कल्पना आणि अशक्य कोटीतले संशोधन यांना या उपक्रमात पूर्ण मुभा असते.
वरील यादी वाचता वाचता तुमची ह ह पु वा झाली असणार याची मला खात्री आहे ! किंबहुना तोच तर या उपक्रमाचा उद्देश आहे.
जर आपण गेल्या २८ वर्षांतील या पुरस्कारांच्या यादीवर नजर टाकली तर आपल्याला एक जाणवेल. बरीचशी संशोधने ही गंमतजम्मत स्वरूपाची आहेत. काहींत थोडेफार तथ्य आहे पण त्यांकडे निव्वळ निरीक्षण म्हणून पाहिले जावे. उठसूठ कुठल्याही सामान्य निरीक्षणाला शोधनिबंधाचा दर्जा देता कामा नये, हेच या उपक्रमातून सूचित होते.
तर असे हे गमतीदार अज्ञान-पुरस्कार. या उपक्रमातून प्रचलित संशोधनातील काही अपप्रवृत्तीना छान चिमटे काढले जातात. यातून बोध घेऊन संशोधकांनी खरोखर गरज असलेलेच संशोधन करावे हा संदेश दिलेला आहे. संशोधन विश्वातील एरवी गंभीर असलेल्या वातावरणावर असे उपक्रम विनोदाची पखरण करतात आणि सामान्य माणसालाही घटकाभर हसवतात.
**********************
छान माहिती आणि लेख
छान माहिती आणि लेख
ऐसा भी होता है |
ऐसा भी होता है |
Discovery Science चे Science of stupid आठवले.
भारीच !
भारीच !
एकाला कॉटनचे ' कपडे' तर दुसऱ्याला पॉलिस्टरचे घातले.
मग त्या दोन गटांच्या लैंगिक क्षमतेची तुलना केली !
>>>>
अगदी LOL ☺️
धन्यवाद कुमार सर. छान नवीन
धन्यवाद कुमार सर. छान नवीन माहिती दिलीत. आपल्याकडील पिएचडी संशोधन कर्त्यांच्या संशोधन अहवालांची लांबलचक हेडींग आणि विषय वाचले की असे पुरस्कार या लोकांना दिले पाहिजे असे वाटते. :-))
वरील सर्वांचे आभार !
वरील सर्वांचे आभार !
Science of stupid >>>> धन्यवाद माहितीबद्दल.
पिएचडी संशोधन कर्त्यांच्या संशोधन अहवालांची लांबलचक हेडींग आणि विषय>>>>
खरे आहे. ते वाचून सामान्य माणूस भंजाळून जातो खरा. त्यांच्या दृष्टीने ते योग्य असेलही.
भारीच की! मस्त माहिती.
भारीच की!
मस्त माहिती.
छान व माहीतीपूर्ण लेख .Ig
छान व माहीतीपूर्ण लेख .Ig नोबेल पुरस्काराविषयी याआधी कधीच ऐकले नव्हते.
रोचक!
रोचक!
भारीच! हे माहित नव्हते.
भारीच! हे माहित नव्हते.
+१ अॅमी!!
+१ अॅमी!!
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
हा प्रकार जेव्हा मी बातम्यांत वाचला तेव्हा रोचक वाटला. म्हणून हे स्फुट लिहिले.
छान, नवीन माहिती मिलाली
छान, नवीन माहिती मिलाली
भन्नाट कल्पना आणि अशक्य
भन्नाट कल्पना आणि अशक्य कोटीतले संशोधन
इंटरेस्टिंग ! माहिती अगदीच
इंटरेस्टिंग ! माहिती अगदीच वरवर माहीत होती, त्यामुळे लेख आवडला. छान विषय निवडलात.
रोचक माहीती आहे.
रोचक माहीती आहे.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
हा धागा वाचल्यावर एका मित्राने खालील माहिती दिली.
या धर्तीवर हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्याकडे २००९ मध्ये सुरु झालेले 'सुवर्ण केळे ' पुरस्कार आहेत. ते
सर्वोत्कृष्ट वाईट सिनेमा, दिग्दर्शक, नट, नटी वगैरे वगैरेंसाठी दिले जातात !
Interesting!!
Interesting!!
सुवर्ण केळे>>>>>
सुवर्ण केळे>>>>>
फारच विनोदी प्रकार आहे. नाव पण भारीच !
असेच आणखी काही खूपच भन्नाट
असेच आणखी काही खूपच भन्नाट आणि विनोदी पुरस्कार असतील तर ते वाचायला आवडेल !
असेच आणखी काही खूपच भन्नाट
असेच आणखी काही खूपच भन्नाट आणि विनोदी पुरस्कार असतील तर ते वाचायला आवडेल !
बहीण मला नेहमी म्हणायची की
बहीण मला नेहमी म्हणायची की तिच्या मुलाला ढुंxx खाजवायला पण वेळ मिळत नाही ! माझ्या सुपीक डोक्यात एक भन्नाट आयडिया आली होती. सुईंग मशीनला कापड पुढे पुढे सरकरवणारी एक दातेरी वस्तू असते तिला इलेक्ट्रिक मोटार जोडून खाजवण्याचे यंत्र तयार करावे ! म्हणजे माझ्या भाच्याला पटकन खाजवता येईल ! जमलं तर प्रोडक्शन काढून कमाई पण करता येईल ! मला इंजीनियरिंग मधला नोबेल पुरस्कार मिळेल का ?
बहीण मला नेहमी म्हणायची की
बहीण मला नेहमी म्हणायची की तिच्या मुलाला ढुंxx खाजवायला पण वेळ मिळत नाही ! माझ्या सुपीक डोक्यात एक भन्नाट आयडिया आली होती. सुईंग मशीनला कापड पुढे पुढे सरकरवणारी एक दातेरी वस्तू असते तिला इलेक्ट्रिक मोटार जोडून खाजवण्याचे यंत्र तयार करावे ! म्हणजे माझ्या भाच्याला पटकन खाजवता येईल ! जमलं तर प्रोडक्शन काढून कमाई पण करता येईल ! मला इंजीनियरिंग मधला नोबेल पुरस्कार मिळेल का ?
मामू
मामू
कल्पना भन्नाट आहे. तुम्ही २०२० च्या Ig साठी पाठवू शकता ! ☺️
https://en.m.wikipedia.org
https://en.m.wikipedia.org/wiki/Golden_Raspberry_Awards
ह्या अवॉर्डस मधला हाही एक प्रकार!
लेखाचा विषय मजेशीर आहे.
लेखाचा विषय मजेशीर आहे.
गोल्डन केला अवार्ड्स :-))
मजेशीर माहिती. गोल्डन केला अ
मजेशीर माहिती. गोल्डन केला अॅवॉर्ड्स मध्ये केआरके ने काहीतरी गोंधळ घातला होता (त्याला अर्थातच 'देशद्रोही' चित्रपटातील अभिनयासाठी सुवर्ण-केळे मिळाले होते), त्यावरून त्या बक्षिसाची माहिती पब्लिकला झाली असं पुसट आठवतंय.
केआरके >> हा कोण बुवा ?
केआरके >> हा कोण बुवा ?
मला फक्त एस आर के माहीत आहे.
भन्नाट
भन्नाट
फारच रोचक माहिती!
फारच रोचक माहिती!
मला फक्त एस आर के माहीत आहे.
मला फक्त एस आर के माहीत आहे. >> के आर के म्हणजे कमाल आर खान. हे व्यक्तिमत्व माहित नसलेलंच बरं आहे!
Pages