दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास? हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2019 - 15:57

दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?

हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.

पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.

एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.

यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.

मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.

माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकासद्रोही आणि देशद्रोही तर नाहीच नाही.>> एकदम मान्य.
पण प्रत्येक निर्णय घेताना जमा आणि खर्च अशा दोन बाजू असतात.
सिप्झ- कुलाबा अशी मेट्रो जरूरी आहे हा निर्णय पूर्वीच शास्त्रीय अभ्यास करून घेतला गेला आहे. तसे जर का असेल तर ती मेट्रो होण्यासाठी आवश्यक जागा जी कुठली असेल तर ती द्यावी लागेल. ती आवश्यक खर्चाच्या बाजूत पडेल . मग ती आरे असो वा इतर कुठलिही.

>>हा संघर्ष 'मेट्रो हटाओ ' ह्यासाठी नाही, तर ' आरे बचाओ' ह्यासाठी आहे हे ढळढळीत सत्य लोक नाकारीत आहेत. <<
वरवर "आरे बचाओ" असं दिसत असलं तरी पर्यायी जागांचा निर्णय समितीने (सं: भिडेबाईंचा लेख) फिजीबलिटी स्टडि नंतर निकालात काढलेला असल्याने विरोध मेट्रोलाच होत आहे, असं तुम्हाला अजुन वाटत नाहि का?...

भिडेबाईंचा निर्णय काही नवीन नाही. आरे बचाव ला हे मुद्दे वेळोवेळी तोंडावर फेकण्यात आले आहेत. आता ते सविस्तर वाय्रल झाले आहेत इतकेच. त्यामुळे नवीन लोकांचे डोळे दिपतात . प्रथमपासूनच विरोध होता. त्याची दखल न घेता काम पुढे रेटण्यात आले आहे. आणि आता इतके पुढे गेल्यावर रद्द कसे करायचे हा नेहमीचाच साळसूद बचाव चालू आहे. त्यांच्या पत्रकात डोळे दिपून जाण्यासारखे काही नाही. विरोध सगळ्या मेट्रो प्रकल्पांना नाही. पाठिंबा आरे बचावला आहे. ते पत्रक इतके लांबलचक आहे की इथे त्याचा प्रतिवाद करणे शक्य नाही. आरे बचाओ वाद्यांनीही ते वाचले आहे, किंबहुना ते वाचायचीही गरज नव्हती. मुद्दे जुनेच आहेत. म्हणून विरोध कायम आहे.

वृक्षतोड होऊ नये असे मलाही वाटते, पण पर्याय नाही असेही मला वाटते.

वृक्षतोड नको म्हणून पेटीशनवर 80,000 सह्या पण प्रत्यक्ष चर्चा करायला बोलावले तेव्हा फक्त 300-400 जण जात असतील तर पर्यावरण प्रेम बेगडी म्हणायला हवे. 1 दिवसही, खरे तर अर्धा दिवसही काढता येत नाही, यांच्या लढाया हे लढणार फक्त फेसबुक व ट्विटरवर.

असो.

मुंबई मेट्रोच्या एम डी अश्विनी भिडे यांची मुलाखत. वर का नको हे सगळ्यांनी लिहिलेय, खाली का हवे हे वाचा आणि मग शक्य असेल तर प्राप्त परिस्थितीत चांगले व वाईट काय हे ठरवा. -

https://www.metrorailnews.in/exclusive-interview-of-mmrc-md-ashwini-bhide/

वृक्षतोड नको म्हणून पेटीशनवर 80,000 सह्या पण प्रत्यक्ष चर्चा करायला बोलावले तेव्हा फक्त 300-400 जण जात असतील तर पर्यावरण प्रेम बेगडी म्हणायला हवे.
>>>>

मग याची विरोधी बाजू असणारया लोकांना बोलावले तर किती जणं जातील असे वाटते?
अर्थात यात राजकीय स्वार्थ असेल तर ट्रक भरून माणसे नेली जातील ती गोष्ट वेगळी.
सोशलसाईटवर विरोध करणारे सुद्धा यूट्यूबवर सई स्वप्निल शाहरूखचे चित्रपट बघायचे सोडून, ईतर उचापतींतून वेळ काढून चर्चा वाचतात, आपले मत बनवतात, ते मांडतात ते काय निव्वळ टाईमपास म्हणून? मुळात लोकांनी आपले कामधंदे सोडून धरणे देत बसले तरच सिरीअस प्रकरण समजायचे हा निकष का? एखाद्या मुलीवर बलात्कार झाला की मेणबत्त्या घेऊन जाणारया लोकांनाही असेच टोमणे मारले जातात. अरे मग काय रोज टोळ्या बनवून गस्त घालत फिरायचे का?

२०० हेक्टर्सवर जिजामाता उद्यानातले प्राणिसंग्रहालय येऊ घातले आहे
<<<
अरे देवा.. मग राणीबाग बंद करणार का, पेंग्विनसह? आणि तेथील झाडांवरही कुर्हाड का?

बोन ऑव्ह कन्टेन्शन इझ नॉट द ट्रीज ऑन द ग्राउन्ड. इट इझ द ग्राउन्ड अन्डर द ट्रीज. हे आंदोलन 'वृक्ष वाचवा 'पेक्षा 'आरे वाचवा' असे अधिक आहे. (खरेतर बोन हा शब्द इथे निदान पर्यावरणवाद्यांसाठी गैरलागू आहे कारण हे लोक हाडके चघळणार्‍यांपैकी नाहीत.)
प्रत्यक्ष चर्चेच्यावेळी हजारो लोकांनी जायचे नसते. अशा वेळी फक्त दहापंधरा निवडक आणि सांगोपांग माहिती असणारे, वकीली भाषेत मुद्दे मांडू शकणारे लोक जातात. बाकीचे समर्थक असतात. आता समर्थकांतसुद्धा प्रकार असतात. खरेखुरे आणि ज्ञान व संयम असलेले, खरेखुरे पण फारसे ज्ञान नसलेले, ज्ञान असलेले पण व्यक्त करू न शकणारे, ज्ञानी पण भडकू, मीडिया सांभाळणारे, प्रत्यक्ष फील्ड सांभाळणारे, निदर्शने आयोजित करणारे, लॉजिस्टिक्स सांभाळणारे वगैरे. दुसरे काही चमको वालेसुद्धा असतात. काही पीअर प्रेशर म्हणून सामील होतात. काही तर चक्क पेड ट्रकलोड्स असतात. तर ते असो. सुप्रीम कोर्टात याचिका गुदरली गेली आहे. त्यासाठी ढीगभर कागदपत्रे तयार केली आहेत. आणि आर्ग्युमेंट्स तयार आहेत. आणि ती विकीलिंक्सवर आधारित नाहीत. उलट या आर्ग्युमेंट्सच्याच लिंक्स बनतील आणि रेफरन्स म्हणून वापरल्या जातील. गवर्नमेंट सीम्स टु बी इन द मूड ऑफ सप्रेसिन्ग द मूवमेंट बाय हुक ऑर क्रुक. इन्शाल्ला, आय आम कीपिन्ग माय फिन्गर्स क्रॉस्ड.

हीरा, केवळ कारशेडला किती जागा लागेल? बाकी काही बांधकाम नाही. तेवढीच जागा वापरायला परवानगी मिळाली तर प्रश्न सुटेल का दोन्ही बाजूंनी? कारण अधिक विरोध हा उर्वरित जागेचा गैरवापर होईल या विचाराने होत आहे असे मला चर्चा वाचून वाटले.

हीराशेठ, मी वर विचारलेला प्रश्न रिफ्रेज करतो. नियोजीत (आतातर चालु अवस्थेतला) प्रकल्पाकरता पर्यायी जागा, या बाबतीत केलेला तौलनीक अभ्यास वरच्या मुलाखतीतहि आला आहे. कांजुरमार्ग त्यातल्यात्यात योग्य पण तिथल्या जमिनीचं अ‍ॅक्विझिशन, डेवलपमेंट इ. करता लागणारा वेळ आणि त्याचा होणारा ओवरऑल इंम्पॅक्ट सक्सेस फॅक्टर्सवर (उदा: प्रोजेक्ट कॉस्ट, आरओआय, सोशो-एकनामिक वॅल्यु वगैरे) आणि कांजुरला कारशेड हलवल्यामुळे होणारे फायदे, या सगळ्याचा ताळमेळ कुठे बसतोय का?..

खरं सांगायचं तर आरे जंगलतोड करून तिथे कारशेड बनवणं हे अत्यंत धोकादायक आहे, रात्री मेट्रो पार्क करून ठेवली चुकून दरवाजा उघडा राहिला आणि त्यात एखादा बिबट्या चढला तर?? मग आता जे बोलताहेत तिथे कारशेड बनवा तेच मोदींच्या नावाने खडे फोडतील कि तिथे कशाला बनवली कारशेड. तसेच मी सखोल अभ्यास करून अनेक पॉईंट्स काढले आहेत ते हळूहळू इथे मांडत जाईन.

झाडांवर प्रेमाचे नाटक करणारे लोक भंपक आहेत , जिथे हे रहातात , तिथेही कधीतरी झाडेच होती, ह्यांच्या खापर पणजोबांनी कधीतरी तिथे प्लॉट पाडून तिथले झाड पाडून जागा एन ए केली असणार

आता हे लोक इतरांना झाड पाडायला विरोध करतात.

झाडावर इतके प्रेम आहे , तर तुम्हीही तुमच्या पणजोबाची चूक सुधारा, तुमचेही घर पाडून तिथे झाडे लावा.

पांडवानीही खांडव वन नष्ट करून इंद्रप्रस्थ उभारले होते, मनुष्यप्राणी काहीही कुठेही बांधेल तर इतर सजीवांना त्रास होतोच , म्हणून तर नव्या वास्तूत जाताना वास्तुशांत करतात , वास्तुशांत , उदकशांत इ विधी हे गेलेल्या आत्म्याना शांत करायला करतात , वास्तुशांत म्हणजे जेवणाची पार्टि नव्हे रे शिंच्यानो..

// इति श्री लिंबू गुरुजीकृत वास्तू अध्यायम संपूर्णम//

३०० हेक्टर म्हणजे ७०० एकर जमीन .
एवढी मोठी जमीन कार शेड साठी लागते का ?.
मुंबई उपनगरीय गाड्यांचे मेट्रो च्या
तुलनेने खूप मोठे नेटवर्क आहे त्यांच्या कार शेड नाही लागली ७०० एकर जागा.
अशा मेट्रो मध्ये किती ट्रेन असणार आहे त.
५० chya आताच संख्या असेल .
Car शेड chya नावाखाली त्या जमिनीचे व्यापारीकरण करायचे हाच कुटील हेतू आहे असं वाटतं .
मुंबई चे परोम भाग्य आहे की संजय गांधी उद्यान आणि आरे सारखी विपुल वनसंपदा ह्या शहराला मिळाली आहे .अशी वनसंपदा असलेले हे भारतातील कदाचित जगातील सुधा एकमेव शहर असेल .
शहराची फुफुस आहेत ती
त्या जागेवर अमाप पैसा कमवून ते इंग्लंड अमेरिकेत स्थायिक होतील आणि मुंबई कर भोगतील त्याची फळे

>>>>>Car शेड chya नावाखाली त्या जमिनीचे व्यापारीकरण करायचे हाच कुटील हेतू आहे <<<< अस गृृृृहीत धरुन प्रकल्पाला विरोध करणे बरोबर नाही. शेवटी हा सरकारी प्रोजेक्ट आहे.
आणी समजा पुढे जमिनीचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न झाला तर तेंव्हा सुद्धा विरोध करता येईलच की !!

पुढे जमिनीचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न झाला तर तेंव्हा सुद्धा विरोध करता येईलच की !! >>> जब्बरद्स्त टाळ्या घेणारे वाक्य. नर्मदा धरण. बुलेट ट्रेन्साठीचे भू संपादन याला केलेल्या विरोधाचे काय झाले महोदय?

पुण्यामधे पौड फाटा ते बालभारती तसेच वनाज ते पंचवटी असे बोगदे असेच पर्यावरणाबाबत असलेल्या वादंगाने लटकलेले आहेत. माझ्या मते हे बोगदे न झाल्याने होणारे वायू प्रदूषण , वाया जाणारा वेळ व इंधनाचा अतिरिक्त खर्च पहाता असे प्रकल्प होउ न देणे अत्यंत चुकिचे आहे.

विकीकाका,
टेकड्यांखालून बोगदे करायला जमणार नाहीये म्हणजे काळ्या पाषाणामुळे प्रचंड खर्चिक ठरणार आहे, त्यामुळे टेकडी फोडून, झाडे तोडूनच रस्ते बनवण्याचे घाटत आहे. पुण्यात तरी ह्याची अजीबात आवश्यकता नाही. वायू प्रदूषण, वाया जाणारा वेळ व इंधनाचा अतिरिक्त खर्च ह्यावर आळा घालण्याकरता रस्ते आणि फ्लाय ओव्हर ह्या पेक्षा कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणेच गरजेचे आहे. लोकांनी ती वापरणे गरजेचे आहे. अधिकाधिक पुणेकर ती वापरतील तरच ती नीटपणे चालवली जाण्याची गरज राज्यकर्त्यांना वाटेल.

विद्यमान सरकार निवडून यायच्या आधीपासूनच जाहीरनाम्यापासूनच विकासाचे वचन देऊन निवडून आल्याकारणाने विकासाकरता ते कटीबद्ध असणार. राजकारणाची सद्यस्थिती पाहता, सध्या ह्याला पाठिंबा देणारे उद्या सत्तेतून पायउतार झालेच तर विरोधही करू शकतात आणि विरोध करणारे पाठिंबा देतील. कदाचित दोघे मिळून पर्यावरणवाद्यांना विकासाचे म्हणजेच देशाचे शत्रू म्हणूनही रंगवतील. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज आपल्या दाराशी येऊन ठेपले आहे तरीही त्याचे गांभिर्य कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना अथवा अनुयायांना नाही.
सध्या मुंबईवर असलेला मनुष्यभार पाहता प्रशासन व्यवस्था कितीही कार्यक्षम असली / केली तरी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस ती पुरी पडू शकणार नाही.

त्यामुळेच गरजेचे आहे नुसता विरोध करण्यापेक्षा शाश्वत विकासाचे प्रारुप कसे तयार करता येईल. सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर पर्यावरण पूरक सकारात्मक प्रभाव पाडणारी माणसे सर्वच पक्षांमधे असायला हवी. (सहज आठवलेलं उदाहरण म्हणजे पुण्यात राष्ट्रवादी मधे असलेल्या वंदनाताई चव्हाण) एकटेदुकटे सुटे सुटे विकास दर्शक निर्णय घेण्यापेक्षा समष्टीचे समग्र भान ठेवून निर्णय घेतले जायला हवे त्याकरता जनतेचेही प्रबोधन व्ह्यायला हवे. वैयक्तिक पातळीवर देखिल जीवनमान / रहाणीमान पर्यावरण पूरक असायला हवे. हे होणे शक्य होताना दिसत नाही.

हीरा,
अनेक उत्तम प्रतिसाद.
तुमचे प्रतिसाद मानवाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने कितीही सुयोग्य आणि कळकळीचे असले तरी ते अरण्यरुदन ठरणार आहे; लिहिल्यावर जाणवले की अरेच्चा खरेतर आता अरण्य उरणारच नाहीये पण त्यामुळे इतर माणसे ते ऐकतील आणि काही कार्यवाही होईल असे नाही तुमच्या म्हणण्याकडे कोणीही लक्ष देणार नाही.

इतका कडवटपणा चांगला नाही पण काही काही वेळा वाटते की जितक्या लवकर मानवजात नष्ट होईल तर बरे ! पृथ्वीला आणि इतर सजीवसृष्टीला मोकळेपणाने श्वास तरी घेता येईल.

प्रतिसाद जरा लांबडा आणि विस्कळीत झाल्यासारखा वाटतोय पण भावना समजून घ्या.

इतका कडवटपणा चांगला नाही पण काही काही वेळा वाटते की जितक्या लवकर मानवजात नष्ट होईल तर बरे ! पृथ्वीला आणि इतर सजीवसृष्टीला मोकळेपणाने श्वास तरी घेता येईल.>>>
हा कडवटपणा नाही, सत्यवचन आहे.

पर्यावरणवाद्यांनी (मी कुठल्याही संस्थेत दाखल नाही तरी यात मोडतो असे म्हणता येईल) स्वतःला पर्यावरणवादी म्हणवण्यापेक्षा आणि पर्यावरण वाचवा म्हणण्यापेक्षा स्वतःला मानववादी म्हणायला हवे आणि मानवजात वाचवा असे म्हणायला हवे. तर कदाचित जास्त लोक लक्ष देतील.

कारण आपल्याला वाचवायचे स्वतःलाच आहे पर्यावरण वाचले नाही तर पृथ्वीला शून्य फरक पडेल, पण मानवजात मात्र नष्ट होईल, सर्वात नाजूक मानवजात आहे आधी ती नष्ट होईल. स्वतःला चालता फिरता येत नसूनही पृथ्वीभर कसं पसरायचं, आणि बस्तान बांधायचं हे वनस्पतींना माहीत आहे, पृथ्वीवर परत सृष्टी बहरेल आजच्या मानवाशिवाय.

झाडं तोडली जाण्याच्या सहापट झाडं आरे अणि संगांपार्क मध्ये लावण्याचं प्रयोजन असुनहि हा पर्यावरणाला धोका आहे असं म्ह्टलं जातंय. कदाचित या लावलेल्या झाडांवर आम्हि येणार नाहि, घरटी बांधणार नाहि असं पक्ष्यांनी/किड्या-मुंग्यांनी/फुलपाखरांनी ठरवलं असेल - निषेध म्हणुन. विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांचं पुरेसं समाधान्/स्पष्टिकरण होउनहि विरोध चालुच राहिला तर त्या विरोधाला काहि अर्थ रहात नाहि. माझ्यामते तरी सकारात्मक कार्याला विरोध हि वृत्ती अरण्यरुदन नसुन झारीतल्या शुक्राचार्यांची स्थिती दर्शवते...

हर्पेन, सहकंप कळला, जाणवला. भावनाही पोचल्या. अनेक वेळा आभार.
निलुदा, आपलेही आभार. राजेश188 आपले तर विशेष आभार .
आपण सर्व आणि इतर अनेक सहविचारी मिळून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करू या . (इतक्या मन:पूर्वक प्रतिसादानंतर ' घेssऊ हातांत हात' हे आठवावं याहून दुसरी आयरनी कोणती असू शकेल ? पण यावर माझं वर्शन : घेssऊ हातांत हात, घाssलू आरे घशात ... वगैरे) असो. आपण आपला खारीचा वाटा उचलत राहायचं. एमेन .

झाडं तोडली जाण्याच्या सहापट झाडं आरे अणि संगांपार्क मध्ये लावण्याचं प्रयोजन असुनहि हा पर्यावरणाला धोका आहे असं म्ह्टलं जातंय.
>>>
पुढचे दोन दात तोडूया.. आणि बदल्यात दाढेच्या बाजूला चार लाऊया असे तर नाही ना होत आहे..

हर्पेन - सहमत आहे.

<< स्वतःला पर्यावरणवादी म्हणवण्यापेक्षा आणि पर्यावरण वाचवा म्हणण्यापेक्षा स्वतःला मानववादी म्हणायला हवे आणि मानवजात वाचवा असे म्हणायला हवे. तर कदाचित जास्त लोक लक्ष देतील.
कारण आपल्याला वाचवायचे स्वतःलाच आहे पर्यावरण वाचले नाही तर पृथ्वीला शून्य फरक पडेल, पण मानवजात मात्र नष्ट होईल, सर्वात नाजूक मानवजात आहे आधी ती नष्ट होईल. स्वतःला चालता फिरता येत नसूनही पृथ्वीभर कसं पसरायचं, आणि बस्तान बांधायचं हे वनस्पतींना माहीत आहे, पृथ्वीवर परत सृष्टी बहरेल आजच्या मानवाशिवाय.>>

------- पृथ्वीला काहीही फरक पडणार नाही हे मान्य.

जास्तित जास्त लोकांना सोबत घेण्याचे महत्व जाणतो. मानवतावादी असे म्हटल्याने केवळ मानवांसाठीच हा लढा आहे असे वाटेल. पर्यावरणवादी या शब्दामधे समस्त मानव, वनस्पती - प्राणी, आणि सभोवतालचा परिसर असे सर्वच अंतर्भुत आहेत. पर्यावरणवाद हा थोडा व्यापक आणि सर्वसमावेशक शब्द आहे असे मला वाटते. अर्थात शेवटी मानवालाच लढायचे आहे...

काही वनस्पतींना पण हानी पोहोचणार आहेच.

जास्त लोकांनी लक्ष द्यावे असे वाटत असेल तर... तुमच्या माझ्या सारख्यांनी लोकांशी संवाद साधायला हवेत. शाळेत/ कॉलेजात/ जिथे संधी मिळेल तिथे चर्चा करायला हवी.... थोडक्यात लोकांना शिक्षण देणे महत्वाचे आहे. आपल्याकडे अजून ११ वर्षे आहेत...

स्वारगेट निगडी हिंजेवाडी नाशिक फाटा- चाकण
मेट्रो प्रकल्प
ओछी थशे सामान्य यात्रियों नी भागदोड
पुणे मेट्रो हवे जशे
निगडी अने चाकण सुधी

मशेश किसनराव लांडगे

मेट्रो चा खर्च केंद्र आणि राज्य मिळून करणार आहेत त्यात राज्याचा हिस्सा जास्त आहे .
त्या मुळे मेट्रो ही राज्य सरकारच्या अंतर्गत असली पाहिजे केंद्राच्या नाही .
आणि ह्या विषयावर कर्नाटका मध्ये मोठे आंदोलन सुद्धा झाले होते .
वरील भरत ह्यांच्या पोस्ट मध्ये जे गुजराती मध्ये पोस्टर दिसत आहे आणि ते पोस्टर लावणारा नगर सेवक मराठी आहे .
ह्याचा अर्थ माझ्या मते तळवे चाटणे म्हणतात त्या प्रकारचा आहे .
ह्याचा वर मोदी नी च व्यक्त झाले पाहिजे होते त्यांची किंमत अजुन वाढली अस्ती इथे

मुंबईच्या परिघाच्या आतली झाडे तोडून, वने नाहीशी करून ती मुंबईबाहेर न्यायची यामुळे फिट्टंफाट होते का? आपल्या अंगणातली झाडे, गोठ्यातली गुरे उचलून ती दुसरीकडे जगवायची याचा आपल्या स्वत:ला काय उपयोग? आणि एकगठ्ठा दाट जंगल असणे आणि भरपाई म्हणून इकडे दहा तिकडे वीस अशी संख्या किंवा टार्गेट गाठणे, यात झाडे तोडल्यामुळे उघड्या पडलेल्या जमिनीला आणि परिसराला काय फायदा होतो? अशा पाच दहा झाडांच्या " राई"त पक्षीप्राणी फिरकतील का? जमिनीची धूप थांबेल का? पुरेसा ओलावा निर्माण होऊन ढग आकर्षित होतील काय? घनदाट आणि विरळ यातला फरक आपल्याला समजेनासाच झालाय का?

Pages