सोळा आण्याच्या गोष्टी - आनंद - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 15 September, 2019 - 09:09

कपडे चढवताना तिने त्याला खुषीत डोळा मारला .
“मजा आली ! ”
तिच्या या वाक्यावर तो चमकला. एक धंदेवाली असं म्हणते ?...
त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तीच पुढे म्हणाली , “प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा असं माझं तत्व आहे. जग दुःखाने भरलेलं आहे . आपण का दुःखी व्हायचं ? हे काम करताना पैसाही मिळतो . पण मी त्या कामाचाही आनंद लुटते –मनापासून ! इतर पोरींसारखं नाही “…
ती एक कॉलेजतरुणी होती , ऐश करण्यासाठी पैसा मिळवायला हे काम करणारी.
खच्च्यॅक !
तिच्या मानेतून लालभडक रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या .
त्याचा चाकू तिच्या मानेत रुतला होता. तिच्या डोळ्यात अविश्वासाची भावना होती.
तो सीरिअल किलर म्हणाला , “ तुझ्यासारख्या रांडांना गाठून त्यांना खलास करण्यात मलाही आनंद मिळतो- मनापासून ! कळलं?” …

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सामो+११११
बिपिनदा, सॉरी पण ही कथा तुमच्या आधीच्या कथांपेक्षा काहीतरीच वाटली..

<<< आला दिवस अन प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा असं माझं तत्व आहे. जग दुःखाने भरलेलं आहे; पण मग आपण का दुःखी व्हायचं ? हे काम करत असताना पैसाही मिळतो . पण मी त्या कामाचाही आनंद लुटते –मनापासून >>>
हे विचार पटले. नेहमीपेक्षा जरा वेगळी कथा आहे.

तसं म्हटलं तर धंदेवालीत आणि माझ्यात काही फार फरक नाही.
फरक इतकाच की ती शरीर विकते आणि मी बुद्धी. आणि जास्त अनुभवानंतर माझा रेट वाढतो आणि तिचा कमी होतो.

सामो
मन्या
मी तुमच्या प्रतिसादाचा आदर करतो

आता कथा संपादित करून पुन्हा टाकली आहे
कृपया पाहावी