चंद्रावर भारतीय पाउल पडते पुढे..... चांद्रयान लाइव्ह वॉच.

Submitted by अश्विनीमामी on 6 September, 2019 - 12:36

आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.

https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.

मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.

भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.

तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी अजून भारतासारख्या गरीब लोकं असलेल्या लोकांच्या देशानं चांद्रयान वगैरेंच्या भानगडीत का पडाव असलं विचारत नाहीये कोणी!!

एखादी गोष्ट ठाऊक नसताना तिची 'सत्यता ठाऊक नाही' असे प्रतिपादन करणे, याला अफवा पसरवणे म्हणत नाहीत. >>>>

एखादी गोष्ट ठाऊकच नाही तर ती अजून 10 ठिकाणी कशाला पसरवायची? नक्की ठाऊक होईपर्यंत थांबा. ज्यांनी तुम्हाला सांगितले ते उद्या खरेखोटेही सांगतील. माहीत नसतानाही पसरवायची जी उर्मी असते त्यालाही अफवाच म्हणतात. असो.

तरी अजून भारतासारख्या गरीब लोकं असलेल्या लोकांच्या देशानं चांद्रयान वगैरेंच्या भानगडीत का पडाव असलं विचारत नाहीये कोणी! >>>

मंगळयानाच्या वेळेस विचारून विचारून कंटाळले.

विक्रम शी कॉन्टॅक्ट होई पर्यंत खर्च आणि देशाची गरिबी ह्या विषयी इथे तरी कोण्ही बोलणार नाही .
पण विक्रम शी संपर्क स्थापित झाला की रडत राव खर्चाचा हिशोब काढतील सध्या खुशीत आहेत म्हणून गप्प आहेत

ह्या गरीब देशाला कंप्यूटर हवाच होता कशाला? लाखो लोक अर्धपोटी असत. तरी नशीब आत्महत्या नव्हते करीत फारशा. सगळे सल्ले आणि विरोध डावलून उगीच आणला आपण कंप्यूटर.

नाट्यछटा नावाचा एक प्रकार असतो. त्यात समोरच्याचे संवाद आपल्या सोयीने ठर वून आपणच बोलायचे असतात. तोच प्रकार इथे चाललाय.
चंद्रयान २ चा खर्च ९७८ कोटी
स्टॅच्यू ऑफ युनिटीचा खर्च २९८९ कोटी
मोदी १ - सरकारने जाहिरातींवर केलेला खर्च ५२०० कोटी

चांद्रयान ,सरदार पटेल ह्यांचे स्मारक .
आणि नियोजित छत्र पतींचे स्मारक .भारत रत्न dr बाबासाहेबांचे स्मारक,ह्या गोष्टी अमूल्य आहेत पैस्यात त्याची तुलना होवूच शकत नाही

तरी अजून भारतासारख्या गरीब लोकं असलेल्या लोकांच्या देशानं चांद्रयान वगैरेंच्या भानगडीत का पडाव असलं विचारत नाहीये कोणी!!>> अस कस? झाल की म्हणून न्युयॉर्क टाइम्सने दिलेल्या बातम्यात, भारतातले अमुक टक्के लोक दारिद्रयरेषेखाली आहेत याचा चान्द्रयानच्या सबधित बातमित उल्लेख आहेच.

धागाच्या विषय काय...... इथे चाल्लय काय?

विषय चंद्रयान| ठेवा त्याचे भान||
बाळगा अभिमान | इस्रोचा तो||

चंद्रयान २ चा खर्च ९७८ कोटी
स्टॅच्यू ऑफ युनिटीचा खर्च २९८९ कोटी
मोदी १ - सरकारने जाहिरातींवर केलेला खर्च ५२०० कोटी >>>
>>> वरील सर्व खर्चात पार white colored ते साफ सफाई करणार्‍यांपर्यंत अनंत लोकांना मिळालेली एम्प्लॉयमेंट पण आहे हे विसरु नये.

ते मुर्त्या पुतळे वगैरे लैच फालतुपणा हाय. कावळे शी शी करतात त्यांवर अन हे एकमेकांचे डोके फोडतात Wink

उगा पैशे बरबाद!!

प्राचीन मंदिर , बुध्द लेणी,pyramid,गुहेत सापडलेलं हस्त लिखित ,मम्मी ,आणि किती अशा प्राचीन गोष्टी होत्या म्हणून आपण मानवाची प्राचीन रिती रिवाज ,संस्कृती ,त्या वेळच्या बुध्दी मान व्यक्ती ह्यांच्या विषयी शिकलो.
नाहीतर कृष्ण,राम, बुध्द,येसू,अल्ला हे आता माहीत सुद्धा नसते पडले

चंद्रयान २ चा खर्च ९७८ कोटी
स्टॅच्यू ऑफ युनिटीचा खर्च २९८९ कोटी
मोदी १ - सरकारने जाहिरातींवर केलेला खर्च ५२०० कोटी
Submitted by भरत. on 14 September, 2019 - 10:55
>> भरत, उदय कुणाकडे मोदी सरकार आल्यापासून कर्जाची आकडेवारी आहे का? कर्ज आणि त्यावरील व्याज यावर अर्थसंकल्पात आलेल्या रुपयातून किती टक्के हिस्सा खर्च होतो हे कुणीतरी सांगा.

<< >> भरत, उदय कुणाकडे मोदी सरकार आल्यापासून कर्जाची आकडेवारी आहे का? >>
------ अमर माझ्याकडे अशी आकडेवारी नाही आहे... पण सहजगत्या मिळायला हरकत नाही. पण जेव्हा मिळेल तेव्हा खरीच आहे याची खात्री करा. आजकाल फेरफार खूप होतात. अडचणीची वाटणारी आकडेवारी लपवली जाते, तोड- फोड करुन सादर केली जाते. मागच्या सरकारची प्रगती नव्या सुधारित फॉर्म्युलाने जास्त उजळ दिसत असेल तर.... प्रगती मोजण्याचे परिमाण तपासा.

चांद्रयान / मंगलयान अशा मोहिमांवर खूप / प्रचंड खर्च होतो... पण चांगली गोष्ट आहे. सरकारने विज्ञानासाठी आणि अशा प्रयोगांसाठी होणार्‍या खर्चात वाढ केली तर खूप आवडेल.

सर्व जण भांडून संतुष्ट झाले असतील तर परत मूळ विषयावर थोडी फार चर्चा करू या .
अवांतर विषयाला मध्ये मध्ये वेळ दिला जाईल निराश होवू नये

>>>>चंद्रयान २ चा खर्च ९७८ कोटी
स्टॅच्यू ऑफ युनिटीचा खर्च २९८९ कोटी
मोदी १ - सरकारने जाहिरातींवर केलेला खर्च ५२०० कोटी <<<<<
मोदी सरकारने पैसे खर्च केले व स्मारक उभारले...
पण काॅग्रेसने फक्त .....
मंगलयान: ७४० कोटी
काॅमनवेल्थ घोटाळा: ७०,००० कोटी
कोल गेट घोटाळा: १.८६ लाख कोटी
२ जी घोटाळा: १.७० ट्रिलीयन
अगुस्ता वेस्टलॅड घोटाळा: .......
अजुन बरेच आहेत .......

मायला! एक रस्ता धड नाही ग्रामीण भागात. विक्रम आपटल्याचा मला फार आनंद झाला आहे. >>> हे वाचून वाईट वाटले. केवळ भारताचाच विचार न करता संपूर्ण मानव जातीसाठी असे वैज्ञानिक प्रयोग करणे जरुरीचे आहे.

मोदीकाका तिथं बसल्यामुळे फेल गेलं. मागे राजीवकाका बसले होते तर पीएसएलव्ही पण असंच आपटलं होत म्हणे.

होगवर्टमधल्या पोशन्स मास्टर प्रमाणे ही पोस्ट पण इस्रोसाठी धोकादायक असावी!

Screenshot_20230823-182002.jpg
इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे आणि अवकाश संशोधनाला उत्तेजन देणाऱ्या सर्व पंतप्रधानांचे या अभिमानास्पद क्षणासाठी आभार.
सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन.... Happy

चांद्रयान मोहिमेचा महत्वाचा टप्पा यशस्वी पार पडल्याबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन.

भारत स्वातंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरु यांनी विज्ञानाची कास धरली होती म्हणून आपण आज विज्ञान क्षेत्रात येथ वर पोहोचलो आहे. आजच्या यशांत त्यांनी दाखविलेल्या दूरदृष्टीचा वाटा फार मोठा आहे.

योजनेला प्रोत्साहन दिल्याबद्दल मोदी आणि सहकार्‍यांचे अभिनंदन.

Pages