दिल पुकारे आरे आरे विरुद्ध मुंबईचा मेट्रो विकास?
हे प्रकरण नक्की आहे तरी काय?
विकासाच्या नावाखाली आरे येथे मोठी वृक्षतोड होणार. मुंबईची फुंफ्फुसे निकामी करणार. त्याविरोधात चला पेटीशन साईन करूया म्हणून उत्साहात मी सुद्धा माझे वृक्षप्रेम आणि त्याहून कांकणभर जास्त असे मुंबईप्रेम दाखवत त्याला समर्थन दिले. माझ्यासोबत चार लोकांना जबरदस्ती द्यायला लावले.
पण आता आरेला कारे करत बातमीची दुसरी बाजू काही अभ्यासू लोकं समोर घेऊन येत आहेत. आरे वाचवा म्हणणारयांवर बेगडी पर्यावरणप्रेमीचा शिक्का मारला जात आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी वृक्षतोड किती गरजेची आहे हे सांगत आहेत.
त्यात आज सकाळीच एक बातमी कानावर आली की या विकांताला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबईतील उच्चशिक्षित विकासप्रिय नागरिक मेट्रो समर्थनासाठी जमणार आहेत.
बर्रं बातमीसोबत सोबत एक भावनिक आवाहन होते,
तुमचा एक तास वसई-कल्याण च्या लोकलमधून पडणाऱ्याचा जीव वाचवू शकतो.
एकंदरीत दोन्ही बाजूंनी मला भावनिक करून टाकले आहे.
यात माझे एक सूक्ष्म निरीक्षण असेही आहे की मित्रयादीतले भाजप समर्थक मेट्रो झिंदाबाद टीमकडून उतरले आहेत तर सरकार विरोधक आरे बचाव गटात सामील आहेत.
आणि जेव्हा असे एखाद्या विषयात राजकारण येते तेव्हा काय खरे आणि काय खोटे हे जाणून घेणे माझ्यासाठी अवघड होते.
मायबोलीचर्चेत नेहमीच चांगली आणि योग्य माहीती मिळते हा आजवरचा अनुभव म्हणून मुद्दाम ईथे हे विचारतोय.
माझे वैयक्तिक मत म्हणाल तर आपण विकासाच्या रस्त्याने विनाशाकडे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मी मेट्रोला वा विकासाला विरोध करतोय. विनाश असा ना तसा आज ना उद्या होणारच आहे. तर त्याआधी विकास उपभोगून घेतलेला काय वाईट
Submitted by हीरा on 14
Submitted by हीरा on 14 September, 2019 - 19:42 Submitted by हीरा on 15 September, 2019 - 09:08 >> दोन्ही छान पोस्ट आणि माहीती.
हीरा, चांगली माहिती.
हीरा, चांगली माहिती.
>>>>>>>>>>> मेट्रो १ म्हणजे
>>>>>>>>>>> मेट्रो १ म्हणजे अंधेरी - घाटकोपर (पुढे वेसावे घाटकोपर ) हा मार्ग अत्यंत गरजेचा होता, त्याला जनविरोध फारसा झाला नाही आणि रिलायन्सने तो उचलून धरला त्यामुळे फार विलंब न होता पूर्ण झाला. <<<<<<<<<<
असहमत !!
मुंबई मेट्रो व दुबई ईथली मेट्रो चे काम एकाच वर्षात सु रु झाले २००६ साली, २००९ साली सप्टेंबर मध्ये ९ तारखेला त्यांनी काम पुर्ण करुन मेट्रो धावु लागली. ह्या वर्षी ०९ / ०९ / २०१९ ला दुबई मेट्रोला १० वर्षे पुर्ण झाली. मुंबई मेट्रो १ ला सुरु व्हायला २०१४ उजाडावे लागले.
दुबई मुंबई ईतकच गर्दी असलेल ठिकाण आहे. दुबई मेट्रो मुंबई मेट्रो१ च्या कैक पटीने मोठी असुन त्यात वेगवेगळ्या लाईन्स धावत असतात.
युनिस आजोबा, दुबईचं क्षेत्रफळ
युनिस आजोबा, दुबईचं क्षेत्रफळ ४१०० वर्ग किमी. लोकसंख्या ३१ लाख
मुंबईचं क्षेत्रफळ ६०३ वर्ग किमी. लोकसंख्या किती ते माहीत असेलच तुम्हांला.
आरे दूध डेअरीला काही नाही ना
आरे दूध डेअरीला काही नाही ना होणार?
>>>>>>>>> युनिस आजोबा, दुबईचं
>>>>>>>>> युनिस आजोबा, दुबईचं क्षेत्रफळ ४१०० वर्ग किमी. लोकसंख्या ३१ लाख
मुंबईचं क्षेत्रफळ ६०३ वर्ग किमी. लोकसंख्या किती ते माहीत असेलच तुम्हांला. <<<<<<<<<<<<
बिन्डोक प्रतिसाद !!
(No subject)
आरे दूध डेअरीला काही नाही ना
आरे दूध डेअरीला काही नाही ना होणार? >>> अगदी अगदी. बाकी काही झाले तरी बोक्याला दूध मिळालेच पाहिजे. (झाडे गेली खड्ड्यात, तिथे स्मशानभूमी झाली तरी आम्हाला मुंबईत घरे मिळालीच पाहिजेत, या स्टाईलने वाचावे.)
मुंबई मूळ शहर जे सात बेटानी
मुंबई मूळ शहर जे सात बेटानी बनले होते .
Colaba, वरली,माहीम etc .
आणि मुंबई उपनगर .
लोकसंख्या वाढीचा वेग मुंबई शहरात जास्त नाही पण उपनगरात जास्त आहे .
मुंबई महानगर area मध्ये ठाणे,मुंबई,आणि रायगड हे तीन जिल्हे.
येतात आणि ह्या सर्वांचा एकमेकाशी संबंध आहे .
तो जवळ जवळ ४३०० sq किलोमीटर आहे .
.
असे सुद्धा भारतात सर्व सावळा गोंधळ आहे .
भारतील एक सुद्धा शहर अंतर राष्ट्रीय दर्जाचे नाही .
फक्त लोकसंख्येत आपला हात पकडायची जगात कोणत्या राष्ट्राची हिम्मत नाही .
मोकळ्या जागा ,मैदाने,गार्डन,दोन बिल्डिंग मधील अंतर,,गटारे आणि त्याची साइज ,पाणी पुरवठा ,कोणत्याच बाबतीत भारतीय शहर जागतिक दर्जाची नाहीत त्यात मुंबई सुद्धा आलो .
पुणे तर मुंबई पेक्षा अस्ताव्यस्त वाढले आहे गल्ली सारखे रस्ते आणि बरच काही.
दुबई अंतर राष्ट्रीय दर्जाचे शहर आहे त्याची तुलना कुठे मुंबई शी करताय .
कुठे राजा भोज...... ही म्हण आहे ना आपल्याकडे
राजेश आजोबा, तुम्ही पालघर
राजेश आजोबा, तुम्ही पालघर जिल्हा विसरलात.
यांचं क्षेत्रफळ मोजायचं तर लोकसंख्यापण मोजायला लागेल बघा.
भरत अजुन आजोबा च्या वयात नाही
भरत अजुन आजोबा च्या वयात नाही गेलो मी .
तुमचे वय ३० असेल तर मला काका म्हणू शकतो आजोबा नाही
तुमच्या अगाध ज्ञानामुळे आणि
तुमच्या अगाध ज्ञानामुळे आणि अधिकार, दरारायुक्त शब्दांमुळे तुम्हांला आजोबाच म्हणणे योग्य आहे.
झाडांवर प्रेमाचे नाटक करणारे
झाडांवर प्रेमाचे नाटक करणारे लोक भंपक आहेत , जिथे हे रहातात , तिथेही कधीतरी झाडेच होती, ह्यांच्या खापर पणजोबांनी कधीतरी तिथे प्लॉट पाडून तिथले झाड पाडून जागा एन ए केली असणार
आता हे लोक इतरांना झाड पाडायला विरोध करतात.
झाडावर इतके प्रेम आहे , तर तुम्हीही तुमच्या पणजोबाची चूक सुधारा, तुमचेही घर पाडून तिथे झाडे लावा
ब्रिटिश लोकांनी वसलेलं मुंबई
ब्रिटिश लोकांनी वसलेलं मुंबई शहर खूप सुंदर होते आणि आज सुद्धा सरस आहे सीएसटी , चा भाग ,मलबार हिल,
राणीचा नेकलेस
ह्या सर्व ठिकाणी
योग्य साईज् चे फूट पथ
आहेत ,building मध्ये
योग्य अंतर आहे,
मोकळी भव्य मैदाने . आहेत
आणि सीएसटी रेल्वे स्टेशन ते एवढे भव्य आहे की त्या ब्रिटिश लोकांनी बांधले आहे की आताच्या सर्व स्टेशन पेक्षा अतिशय भव्य आहे त्या स्थानकाचे आयुष १०० वर्षाचे वर आहे तरी आताची गर्दी सहन करण्याची क्षमता आहे
>>>>>ब्रिटिश लोकांनी वसलेलं
>>>>>ब्रिटिश लोकांनी वसलेलं मुंबई शहर खूप सुंदर होते <<<<<
हाच फरक आहे ! ब्रिटीश आणी भ्रष्ट काॅंग्रेस मध्ये !!!
ब्रिटीशांनी हा विचार नाही केला की आजची गरज भागवु. मुंबई ला ईतक्या मोठ्या टर्मानसची काय गरज ? दोन फलाट बांधु. छपराची सुद्धा गरज नाही.
ब्रिटीशांनी ९० वर्षांत ९४,००० किमीची रेल्वे बांधली. स्वातंत्र्यानंतर भ्रष्ट
काॅंग्रेसने ६५ वर्षांत ९,००० किमी.
मुंबईत तर कित्येक वर्षे सेना
मुंबईत तर कित्येक वर्षे सेना भाजपचं आहे ना ?
युनिस आजोबा, चर्चगेट आणि व्ही
युनिस आजोबा, चर्चगेट आणि व्ही टी दोन्ही स्टेशनांचा ती बांधून झाल्यावर काही दशकांनी विस्तार केला गेला.
स्वतःची बिलकुल विचार क्षमता
स्वतःची बिलकुल विचार क्षमता नसणारे आनि व्हॉट्स ऍप आणि बाकी ऍप वर जे ज्ञान उजळले जाते .
त्याच्या जोरावर
काही बिनडोक लोकांना
काँगेस मुळे देश सुधारला हा साक्षात्कार होतो
त्या ज्ञान च्या जोरावर ही लोक काही प्रश्न उपस्थित करतात आजोबा कडे गाडी होती का आता तुमच्या कडे आहे .
आजोबा,वडील,टीव्ही बघायचे का आता tv आहे .
म्हणजे काँग्रेस मुळे देश सुधारला हे त्यांना सांगायचे असते ..
इंडस्ट्रियल क्रांती झाली आणि सर्व देशातील नागरिकांचे जीवन मान उंचावले फक्त भारताचे नाही .
उलट बाकी जगाच्या तुलनेने भारत मागासच राहिला .
हे ह्या मूर्ख लोकांना माहीत नसते .
ह्यांचा एकच प्रश्न आजोबा कडे टीव्ही होता का तुमच्या कडे आहे
तो काँग्रेसस मुळे .
हे आंधळे मूर्ख असतील पण जनता नाही
आता कसं! राजेश आजोबांचा छान
आता कसं! राजेश आजोबांचा छान सूर लागला.
युनिस आजोबा, चर्चगेट आणि व्ही
युनिस आजोबा, चर्चगेट आणि व्ही टी दोन्ही स्टेशनांचा ती बांधून झाल्यावर काही दशकांनी विस्तार .
१ ते ६ प्लॅटफॉर्म ब्रिटिश कालीन आहेत सीएसटी चे आणि बाकीचे भारत सरकारने बांधले आहे त
गळती लागते पावसात त्यांना .
स्थानक भोवती असणारी योग्य रचना .
हे सुध्दा विचारात घ्या
अरेरे! आजोबांना एक विधान मागे
अरेरे! राजेश आजोबांनी युनिस आजोबांना खोटं ठरवलं.
आता कुलाब्याची रेल्वे का ,कधी, कोणी गायब केली तेपण सांगा.
शिवसेनेच्या आरेत इंग्रजांचे
शिवसेनेच्या आरेत इंग्रजांचे चर्चगेट अन काँग्रेसचे वाशी
हे म्हणजे ते कुठल्या तरी इंजिनला कुठलीतरी बोगी असा पुलं चा जोक झाला.
असो, राम मंदिर स्टेशन मुंबईत बांधल्याबद्दल भाजपा व सेनेचे अभिनंदन.
https://en.m.wikipedia.org/wiki/Ram_Mandir_railway_station
साक्षात पर्णकुटी! अहाहा, किती मनोहर
काँग्रेस आणि सीएसटी चा काही
काँग्रेस आणि सीएसटी चा काही संबंध नाही
हं, बरं, वाशीला जातो
हं, बरं, वाशीला जातो
वृक्षतोड म्हटले नक्कीच नको
वृक्षतोड म्हटले नक्कीच नको वाटते. मुंबईतली भयानक गर्दी त्याहुन नको वाटते. अजुनही मुंबईत जेव्हा ५-८ दिवस रहाते तेव्हा लोकलने मैत्रीणीबरोबर (आता तर कन्याही असते) किंचीत गर्दी कमी असते तेव्हा फिरतो कारण रिक्षाने भयंकर वेळ लागतो. गर्दीच्या वेळेस मात्र लोकलचा विचारही करत नाही. तर मुद्दा हा की, साधनाने दिलेला लेख वाचला. त्यात जवळजवळ ५ लाख झाडांपैकी ३ हजार झाडे कापली जातील व त्याबदली त्याहुन जास्त झाडे लावायच्या जागापण ठरवल्या गेल्यात, बहुतेक लावायला सुरुवात पण झाली आहे (हे नक्की आठवत नाहीये), व या मुळे वाहने कमी होऊन ते प्रदुषण कमी होईल. हे मुद्दे विरोध करणार्यांनी विचारात घेतले का? की केवळ नावडते सरकार आहे म्हणुन ‘जास्त’ विरोध होतोय का? उत्तर इथे लिहिले नाही तरी चालेल, स्वतःलाच विचारा. मुंबाईतली गर्दी अजुन कमी कशी होईल यावर दुसरे उपाय काय? दुसरीकडे रोजगार निर्माण करणे हे बेष्टच पण कंपन्यांनी त्यांची ऑफीस तिकडे खोलायला पण हवीत जे एक प्रचंड प्रोजेक्ट आहे व कधी अजुन जास्त अंमलात येईल माहिती नाही. पुणे, बंगलोर तर वाढून संपले असेल. नाशिक, सोलापुरचे काय झाले माहिती नाही, खुपखुप वर्षापुर्वी ऐकले होते तिथे काही होईल. त्यामुळे सध्या हा विचार बाजुला ठेऊनच आहे त्यात जगणे सोपे करायचा विचार करावा लागणार ना?
हीरा म्हणताहेत कुलाबा ते सीप्झ गरज नाही. पण त्या मार्गामधे कोणती स्टेशन्स येतात? तिथुन येत असतील का लोंढे? मुंबईत खराच असा भाग, दिशा आहे का कि जिथे लोंढे वहात नाहीत? सरकारने हा विचार केला नसेल का?
निसर्गाची अपार हानी तर झालेली आहेच , पुण्याबाहेरचे हिरवे भाग तर उजाड केलेत. (कोणी ते लिहायची गरज नाही) ..
इथे काहीनी लिहिल्याप्रमाणे आपण पण घरं घेतलीच की अशाप्रकारे.
आम्ही उपरे त्यामुळे गर्दीपण कमी व्हावी व झाडे पण वाचावी असेच वाटते.
भरत, खबरदार मला आजी म्हणाल तर.
नवी मुंबई बांधून मुंबईतली
नवी मुंबई बांधून मुंबईतली गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मुंबईतले काही घाऊक खरेदीविक्रीबाजारही वाशी येथे थोड्याश्या सक्तीने स्थलांतरित केले गेले होते. त्यासाठी माण खुर्द पासून पनवेलपर्यंत हार्बर रेल्वेचा विस्तार केला गेला आणि वाशी खाडीवर पूल बांधून महामार्गही तयार केला गेला. पण मुंबईकरांनी मुंबई, दादर, भायखळे येथून बाहेर पडून डोंबिवली, ठाणे कल्याण गाठले आणि त्यांची घरे गाळे म्हणून व्यापार्यांनी घेतली. नव्या मुंबईत बहुतांशी परप्रांतीयांनी सदनिका घेतल्या. ही तीस चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट.
सुनिधी, प्रश्न फक्त ३००० झाडांपुरता मर्यादित नाहीय. तो खूप क्षुल्लक करून रंगवण्यात येतो आहे. प्रश्न आहे, ३०० हेक्टर+२०० हेक्टर +++...अशा लचक्यांचा. अवाढव्य पश्चिम रेल्वेचे मुख्य ऑफिस चर्चगेटला एका छोट्या जागेत आहे. बाकी कचेर्या छोट्या आणि विकेंद्रित आहेत. आता मेट्रोसाठी २५-३० मजली टॉवर बांधायचा आहे. कार शेड वेगळीच . हॉटेल्स, करमणूक सगळे तिथे येणार आहे. कर्मचार्यांसाठी रस्ते, उपाहारगृहे तर हवीच. निवासस्थानेसुद्धा बांधतील. २०० एकरांवर प्राणि संग्रहालय येणार आहे. संजय गांधीअरण्यात मर्यादित मुक्तप्राणिसंचार असताना त्याच्या इतके जवळ बंदिस्त प्राणी ठेवणे योग्य नाही. प्राण्यांचा गंध दूरवर पोहोचतो आणि दूरच्या प्राण्याला कळतो. या प्राण्यांचा मुक्त संचार आरे भागात सुरू होण्याचा धोका आहे.
सुदैवाने काही वनस्पतीप्रेमी आणि तज्ज्ञ यांनी पदराला खार लावून आणि देहाला कष्ट देऊन आरे र्येथील फ्लोरा आणि फॉना यांचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण करून ठेवले आहे.
प्रश्न नुसता जमिनीवरच्या झाडांचा नाही; तर झाडांखालच्या जमिनीचा आहे. आणि म्हणून अर्थातच लाखमोलाचा आहे.
मूळ प्रश्न आरे हे हरितक्षेत्र आहे हे मान्य करण्याचा आणि ते ना- विकास- क्षेत्र जाहीर करण्याचा आहे. आरे आणि संजय गांधी अरण्यात वने आहेत म्हणून तुळशी आणि विहार तलावांत पाणीसाठा आहे.
ब्लॅक इथे
ब्लॅक कॅट इथे
ब्रिटिश आणि भारतीय असा फरक आहे .
काँग्रेस,bjp ,शिवसेना आणि बाकी खोगीर भरती ह्याचा संबंध नाही .
ब्रिटिश कालीन मुंबई
आणि भारतीय लोकांच्या राज्यात वसलेली मुंबई जमीन अस्मानाचा फरक आहे
कुठल्या तरी इंजिनला कुठलीतरी
कुठल्या तरी इंजिनला कुठलीतरी बोगी असा पुलं चा जोक झाला.
नेमका जोक कुणाला आठवतो का ?
{ब्रिटिश आणि भारतीय असा फरक
{ब्रिटिश आणि भारतीय असा फरक आहे .
काँग्रेस,bjp ,शिवसेना आणि बाकी खोगीर भरती ह्याचा संबंध नाही .}
राजेश आजोबा, ते युनिस आजोबा ब्रिटिशांनी बांधलेलं आणि कॉंग्रेसने बांधलेलं अशी तुलना करताहेत बघा.
त्यांना सांगा हे.
ब्रिटिश कालीन मुंबई
ब्रिटिश कालीन मुंबई
आणि भारतीय लोकांच्या राज्यात वसलेली मुंबई जमीन अस्मानाचा फरक आहे
हा फरक लोकसंख्येमुळे पडला आहे, नैतर चार गुंठे जागा घेऊन लाल चिर्याचे घर बांधून बाजूला साठ फुटी रोड ठेवला तर मला थोडेच नको आहे ?
Pages