सोळा आण्याच्या गोष्टी - कावळे - मामी

Submitted by मामी on 5 September, 2019 - 00:39

संध्याकाळ होत आलीये. आई अजून घरी आली नाहीये. मी केव्हाची तिची वाट बघतोय. खूप भूक लागलीये.
मी बाहेर डोकावतो. अचानक समोरच्या झाडावरचे कावळे कर्कश्श्य कावकाव करत उडून कोणावर तरी झडप घालतायत.
बापरे! भीतीच वाटतेय. चुपचाप घरात बसतो.
पण भुकेचं काय?
जावं का एकटं बाहेर? पटकन काहीतरी खायला घेऊन यावं का?
पण...
आई म्हणालीये ना अजून मी लहान आहे, एकट्यानं बाहेर जाणं धोक्याचं आहे.
भूक.. भूक.. भूक..
बाहेर डोकावून तर बघू ...
मी बाहेर डोकावतो ... अजून थोडा डोकावतो... अजून थोडा डोकावतो
अरेरे पडलो.
आता ते सगळे हल्ला करणारे कावळे माझ्याच दिशेनं येताहेत आणि ते उडाल्यावर मला त्या रस्त्यावर आईची पिसं पडलेली दिसताहेत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह मामी !!!
बादवे हे कावळे घाबरतात तरी कोणाला? एकदा तर मी पाहिले होते की एका मोठ्या घारिला त्रास देत होते.

>>बादवे हे कावळे घाबरतात तरी कोणाला? एकदा तर मी पाहिले होते की एका मोठ्या घारिला त्रास देत होते.>> घुबड, घारी, अन्य पक्ष्यांची उडू पहाणारी पिल्ले सर्वांना त्रास आहे कावळ्यांचा. मांजर, मुंगुस खालून जाताना तर कावकाव विचारु नका.

Pages

Back to top