मी तुझ्यापाशी प्रत्येक भेद मोकळा केला. मनमोकळेपणे तुला आमच्यातले वाद, संघर्ष, भांडणं, विकोपाचे प्रसंग सांगीतले, त्याच्या आवडी-निवडी , आमचे खाजगी क्षण तुझ्यावर विश्वास ठेउन तुला सांगीतले. आणि तू ......!!! त्याचा असा गैरफायदा घ्यावास? त्याच्याशी सुत बांधुन मला फितूर व्हावस? त्याच्या कानात गरळ ओकून माझ्यापासून त्याला तोडुन, परस्पर लाटावस? काहीच नीतीमत्ता नाही का ग तुला चांडाळणी?
.
अगं पण तूच तर म्हणालीस ना तो तुला आवडत नाही, रागराग येतो त्याचा. मी तर फक्त तुझ्या भल्याकरता त्याला जाउन सग्गळं सांगीतलं. आता तो माझ्यावर लट्टू झाला तर माझा काय दोष? शोना!!! शोना!!! उगी उगी राणी, तुलाही तुझ्या "लायकीचा" मिळेलच गं. लग्नाला मात्र यायचं बर्का.
.
- सॉरी यात रहस्य काहीच नाही. फक्त दाखविलेला एक मानवी स्वभावाचाकंगोरा (Opportunism)
- स्पर्धेत ही कथा धरु नये. मी आधी कथा लिहीली व मग स्पर्धेचे नियम वाचले
शशक - फितुरी
Submitted by सामो on 14 September, 2019 - 15:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रेमात आणि युद्धात फितुरी
प्रेमात आणि युद्धात फितुरी क्षम्य असते
हाहाहा गुड वन!
हाहाहा
गुड वन!
छान
छान
ठाकठीक
ठाकठीक
बोकलत, आसा धन्यवाद. आसा असे
बोकलत, आसा धन्यवाद. आसा असे होते बरं का. काही मुली/बायका त्या फितूर पार्टीसारख्या असतात.
काही मुली/बायका त्या फितूर
काही मुली/बायका त्या फितूर पार्टीसारख्या>>>>पण मुळात दोघातले प्रॉब्लम तिस-याला सांगायचेच कशाला????
आदू तुमचे अगदी बरोबर आहे. हेच
आदू तुमचे अगदी बरोबर आहे. हेच चुकलेले आहे.
च्च..बिचारी.. कशाला गेली
च्च..बिचारी.. कशाला गेली मैत्रिणीशी बोलायला!

एमी
मैत्रीणी मन मोकळं करायलाच
मैत्रीणी मन मोकळं करायलाच असतात ना... अर्थात पारख केल्याशिवाय मैत्री करणं आणि खाजगी आयुष्य शेअर करणं चुकीचंच.
अशीच एक कथा माहेरमध्ये वाचली
अशीच एक कथा माहेरमध्ये वाचली होती, खूप छान होती. एका मराठी दिग्दर्शिकेच्या आयुष्यातही असंच घडलं होतं आणि तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता, नंतर ती त्या सगळ्यातून कशी बाहेर पडली हे तिने स्वतः चतुरंगमध्ये लिहिलं होतं.
सामो तुम्ही छान लिहिलं आहे.
>>आत्महत्येचा प्रयत्नही केला
>>आत्महत्येचा प्रयत्नही केला होता>>
बाप रे!
शुचिमामी, मायबोलीवर स्वागत.
शुचिमामी, मायबोलीवर स्वागत.
ट्रेनचा डब्बा आणि प्रियकर गेला तर रडत बसू नये. एक गेला तर दुसरा येईलच, असं कुणीतरी म्हटलं आहे. (म्हणजे मीच).
आमिर खान म्हनजे उपाशी बोका का
आमिर खान म्हनजे उपाशी बोका का
हाहाहा उपाशी बोका धन्यवाद!!
हाहाहा उपाशी बोका
धन्यवाद!! मस्त वाक्य आहे ते!!