चंद्रावर भारतीय पाउल पडते पुढे..... चांद्रयान लाइव्ह वॉच.

Submitted by अश्विनीमामी on 6 September, 2019 - 12:36

आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.

https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.

मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.

भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.

तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिण ध्रुवावर एलियन्स असतात. ते त्यांच्या जवळ जाणारे सगळे पाडून टाकतात.

इस्राएलच्या मोसादच्या एजंटला तो चंद्रावर गेला होतातेव्हा आयएम दृक नी सांगितलं.

moon 3.jpg
---
एलियन्स नाही, पण आपल्या गणेशोत्सवात समांतर विश्वातून एक अंतराळवीर आलाय.
त्याला तुमच्या मदतीची गरज आहे. १५ तारखेपर्यंत वेळ आहे मदतीसाठी!
तुम्ही करणार का त्याची मदत? मग इथे भेट द्या https://www.maayboli.com/node/71285

ज्या विषयात आपला स्वतःचा काहीच अभ्यास नसेल त्या विषयात अकलेचे तारे तोडणे ह्या शत मूर्ख पना म्हणतात .
चांद्रयान वर एवढ्या साऱ्या कमेंट आल्यात त्यातील थोडक्या स्वतःच्या बुध्दीची वापर करून ,काही कमेंट मीडिया रिपोर्ट वर आधारित .
तर काही मूर्ख पणाच्या आणि ठराविक विचारांनी प्रेरित आहेत .

दक्षिण ध्रुवावर एलीयन्स असतात. ते त्यांच्या जवळ जाणारे सगळे पाडून टाकतात.

इस्राएलच्या मोसादच्या एजंटला तो चंद्रावर गेला होतातेव्हा आयएम दृक नी सांगितलं

बरोबरे. चंद्रावर गेल्यावर आपणच एलियन्स, आपल्या गाड्या आपल्याला जरी गोंडस वाटल्या तरी त्यांना एलीयन्सच्या गाड्या गोंडस वाटायचे कारण नाही. मोसाद एजेंट तिथून जिवंत परत आला याबद्दल त्याने सत्यनारायण पूजा घातली असेन ना? . Light 1

चीन च्या चंद्र मोहिमेचे नाव chang E आहे ते त्यांच्या देवाचे नाव आहे प्राचीन संस्कृती प्रमाणे त्या ना त्यांच्या संस्कृतीचा पूर्ण अभिमान आहे .
आपल्या चंद्र मोहिमेचे नाव हिंदू देवते वरून ठेवले असते तर ह्या देशाच्या संस्कृती विषयी कसलाच अभिमान नसलेल्या मूर्ख लोकांनी आकाश डोक्यावर घेतले असते आणि bjp chya नावाचा शिमगा केला असता

योगायोगाने त्रिविक्रम हे वामन ह्या पाचव्या अवताराचे दुसरे नाव आहे. त्यामुळे वरील कमतरताही पूर्ण होते!
ता. क. सुनिधी, दादर येथील मध्य आणि पश्चिम रेल वे जोडणाऱ्या प्रमुख पुलावर असणारे प्रसाधनगृह आतून भयानक अवस्थेत आहे सध्या.

मोसाद एजेंट तिथून जिवंत परत आला याबद्दल त्याने सत्यनारायण पूजा घातली असेन ना? . Light 1

>>

नै ओ सब्बाथला पार्टी दिलेली फक्त. तेव्हाच ग्रूटन सांगितलं.
मी बोललो त्याला सत्यनारायण घाल, त म्हणाला पुढच्यावेळी क्षरीसागरात जाऊन आल्यावर घालेल म्हणे.

ताक: दादर माहीम चर्चगेट काय घेऊन बसलात, आखी मुंबईच दुर्गंधीयुक्त आहे!!
Rofl

आता आरे कापल्यावर अजून भर पडेल!!!

हा पण अस मुर्खासारखे बडबडले की bjp ला नुकसान होत हे नव्हतं माहीत .
अशा बुध्दी हिन पोस्ट नी bjp चे नुकसान होत असत तर विरोधी पक्षांची अशी केविलवाणी अवस्था नसती झाली .
जेवढा आंधळा विरोध जास्त तेवढं bjp पक्ष मजबूत होत जातोय अशी खरी परिस्थिती आहे .

मी बोललो त्याला सत्यनारायण घाल, त म्हणाला पुढच्यावेळी क्षरीसागरात जाऊन आल्यावर घालेल म्हणे>>>>

चालेल, फक्त प्रसाद थोडा इकडे पण पाठवा म्हणजे भरून पावले.

सुनिधीने तिचा प्रसाधन गृहाचा अनुभव सांगितला. तो चांगला असल्यामुळे वर काही वाईट प्रसाधनगृहांचेही अनुभव सांगितले जात आहेत. सुनिधी परत भारतभेटीवर येईपर्यंत दादर स्टेशनचा ब्रिज टिकुदे एवढीच प्रार्थना.

'तो प्रसाधनगृहाचा अनुभव चांगला असल्याने वाईट अनुभव मांडले जात आहेत' असे नव्हे. हेतूचा विपर्यास नको व्हायला. सुनिधी यांनी दादरचा उल्लेख केला आहे म्हणून दादरची सद्यस्थिती वस्तुस्थिती म्हणून लिहिली.
इतरत्रही अनेक उदाहरणे आहेत पण मूळ प्रतिसादात दादर होते तेव्ह्ढ्याविषयीच लिहिले आहे.

ह्म्म. सरकार देतं पण लोक पुन्हा खराबच करुन ठेवतात. दुर्दैव.
माफ करा, हा विषय इथे आला.

१३५ कोटी लोक. कुठे, कायकाय पुरं पडणार. Sad

विक्रमा, पाव रे. बोल. चंद्रावरची रात्र सुरु होईल.

डोक्यावर पडलेले सगळे भाजपात भरलेत असे वाटणाऱ्यांसाठी -

https://www.moneycontrol.com/news/politics/pm-modis-presence-at-isro-cou... >>मागे एकदा एक सॅटेलाइट का काहीतरी लाँच केला. प्रत्यक्ष बघायला पंतप्रधान राजीव गान्धी हजर होते. लाँच केल्या केल्या तो त्यांच्यासमोरच खाली पडला. तेव्हा काय त्या रागांचा वाइट पायगुण आड आला असं म्हणायचं का? असा प्रतिप्रश्न पत्रकार विचारत नाहीत, फक्त कॉग्रेसवाल्यांना. म्हणून बोलणारे काही ही बोलतात. आणि छापणारे छापतात. धन्य ती पत्रकारिता!

डोक्यावर पडलेले सगळे भाजपात भरलेत असे वाटणाऱ्यांसाठी -
<<
लिन्क वाचायची गरज नाही. तुमचा आयडी पुरे आहे. अन तुमचाही

चांद्रयान ची चर्चा चालू आहे प्रसाधनगृह कुठून आल
<<
त्यांनी सब्यपने सांगितलं.

प्रसाधनग्रुहात कराञची कामे भाजप्ये इथे ओपनली करू लागलेत म्हणून त्यानी साग्तितल Wink

अशा बुध्दी हिन पोस्ट नी bjp चे नुकसान होत असत तर विरोधी पक्षांची अशी केविलवाणी अवस्था नसती झाली
<<
EVM.

an ED चा डाव.

Evm विषयी कोर्टात याचिका दाखल करण्यास
टाळले का जातंय.
एकदाच काही तरी निकाल लागेल ना .
पण evm हॅक होत नाही असा निकाल कोर्टातच झाला तर विरोधी पक्षांना जनतेचा पाठिंबा नाही हे सिद्ध होईल आणि ते परवडण्यासारखे नाही .
म्हणून फक्त मीडिया मध्ये स्टेट ment देत आहेत .
Evm मुळे हरणाराच आहे अशी 100%,0खात्री त्यांना आहे तर उमेदवार काय फक्त लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष उभा करत आहे का निवडणुकी मध्ये .

अहो तुमच्यासाठी स्पेशल धागा बनवुन दिलाय. तिकडे जाऊन काय तो वाद घाला. आणि प्रतिसाद देतांना धाग्यांची नाव वाचण्याची सवय पाडा जरा.

<<देवाने कामात लक्ष घालायच्या आधीच आपण बातमी सर्वत्र पसरवणे याला अफवा पसरवणे म्हणतात.>>
नाही. एखादी गोष्ट ठाऊक नसताना तिची 'सत्यता ठाऊक नाही' असे प्रतिपादन करणे, याला अफवा पसरवणे म्हणत नाहीत. मात्र ठाऊक नसताना ती सत्यच आहे असे भासवणे याला अफवा पसरवणे म्हणतात.

चांद्रयानच्या पार्श्वभूमीवर, जेएफ केनेडींनी टेक्सास येथे १९६२ साली केलेले जगप्रसिद्ध भाषण पाहण्याचा मोह आवरू शकलो नाही. योगायोग म्हणजे कालच्या १२ तारखेलाच या भाषणाला तब्बल ५७ वर्षे पूर्ण झाली. इथे या भाषणाची साडेतीन-चार मिनिटांची संपादित आवृत्ती आहे:

https://www.youtube.com/watch?v=th5A6ZQ28pE

अतिशय रोचक असे हे भाषण आहे. आधी पाहिले नसेल तर जरूर पहा. मानवी इतिहासाच्या पन्नास हजार वर्षाच्या इतिहासाची पन्नास वर्षात मांडणी केली असता कधी काय घडले याचे सुरेख विवेचन अध्यक्षांनी केले आहे. हा राजकीय नेता बोलतोय कि 'नासा'चा कोणी प्रवक्ता असा प्रश्न पडतो. किती उमदा नेता होता हा. अमेरिकन्स अजूनही या नेत्याची हत्या पचवू शकलेले नाहीत. व्हिडीओखालील प्रतिसाद वाचण्यासारखे आहेत. एकदोनवेळा व्हिडिओ पाहिला कि त्यांचे ते शब्द कानात घुमत राहतात... वी चूज टू गो टू द मून, वी चूज टू गो टू द मूऽऽन, वी चूज टू गो टू द मूऽऽन" त्यांचे हे शब्द नंतर 'नासा'ने खरे करून दाखवले. पण ते पाहायला केनेडी मात्र जिवंत राहिले नाहीत.

Pages