Submitted by बिपिनसांगळे on 7 September, 2019 - 14:09
नवरा बायको कशावरूनही भांडतात. पण त्याचं अन तिचं कशावरून बिनसलं हे कळलं, तर तुम्हाला गम्मतच
वाटेल.
तिला टीव्हीवरच्या मालिका बघून तसलेच दागिने घालावेसे वाटत .’ लाडकी बायको’ ही तिची सध्याची जाम आवडती मालिका होती . एके दिवशी- मालिका चालू असताना तो आला. त्या दिवशी लाडकीने लांब मंगळसूत्र घातलं होतं. डिझायनर !
ती म्हणाली ,” अहो, मलाही असंच मंगळसूत्र हवं. नवऱ्याचं प्रेम जेवढं जास्त तेवढं मंगळसूत्र लांब असतं !”
तो हसत म्हणाला, “अस्सं ? मग तर तुला गळ्याला घट्ट बसेल एवढंसच मंगळसूत्र करायला हवं !”
त्यावर ती अशी काही रुसली म्हणताय.
शेवटी तो रुसवा काढायला त्याला ते लांब मंगळसूत्र करावंच लागलं . तेव्हा कुठे तिच्या प्रेमाची लांबी जागेवर आली.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कल्पना चांगली आहे (बहुतेक?)
कल्पना चांगली आहे (बहुतेक?)
टीव्ही मालिका बघून तसले दागिने-कपडे मागणाऱ्या बायकोमुळे वैतागलेला नवरा...
छान प्रयत्न
छान प्रयत्न
अजून नीट मांडू शकला असतात
कपाळावर हात मारणारी बाहुली.
कपाळावर हात मारणारी बाहुली.
यात काय रहस्य होतं?
महाश्वेता,
महाश्वेता,
वारसदार चा भाग कधी येणार?
टीव्ही मालिका बघून तसले
टीव्ही मालिका बघून तसले दागिने-कपडे मागणाऱ्या बायकोमुळे वैतागलेला नवरा...
>>>> म्हणून त्याने तिला मारून टाकले का?
> म्हणून त्याने तिला मारून
> म्हणून त्याने तिला मारून टाकले का? >
• वैतागून मारून टाकू शकतो किंवा
• मेली तर बरं होईल असं वाटून कशाकशा पद्धतीने मारू शकतो याचे प्लॅन बनवणे हा त्याचा विरंगुळा खेळ असू शकतो. खरोखरच मारायची हिंमत नसल्याने.
ओके
ओके
महाश्वेता-
महाश्वेता-
यात काय रहस्य होतं?
प्रश्न बरोबर आहे . नवरा बायको का भांडले ? एवढंच साधं रहस्य यात आहे . सगळ्या गंभीर शशक . म्हणून मुद्दाम ही लाईट मूड ची लिहिली
ॲमी
ॲमी
अगदी साधी , नवरा बायकोची , त्य्यांच्या साध्याशा भांडणाची गोष्ट लिहिली आहे . बायकांच्या हट्टांची , दागिन्यांच्या आवडीची .
त्यामध्ये काही वेगळा अर्थ अभिप्रेत नाही . सगळ्या निगेटिव्ह कडे झुकणाऱ्या कथा नकोत म्हणून लिहिली
पण वाचक गोंधळू शकतो , म्हणून आत्ता बदल केला आहे ..
रहस्य काही नाही . फक्त ते का भांडले एवढंच रहस्य .
पण आपण कथेचा आवर्जून विचार केलात हे मला आवडलं
आपला आभारी आहे
कथा आत्ता संपादित केलेली आहे
कथा आत्ता संपादित केलेली आहे .
वाचकांना ती सरळ साधी वाटेल अशी अपेक्षा
धन्यवाद
आधीची कथासुद्धा चांगली होती
आधीची कथासुद्धा चांगली होती कि बिपिनदा..