Submitted by avdhut on 12 September, 2019 - 15:10
ती हो म्हणाली. शेवटी त्याच्या दबाबाला व प्रभावाला नमली. "आताच भेट" नंबर वेगळाच होता पण आवाज तिचाच होता.
"घाट प्रारंभ" .. पाटीकडे र्दुलक्ष करत त्याने कारचा वेग वाढवला. गाडी काढतांना घाराजवळ उभा नीळा शर्ट तिच्या भावासारखा का वाटला?
तो विचार झटकुन तो बाहेर पाहु लागला. "धोक्याचे वळण" .. उतरता रस्ता पुढे एकदम वळतो. दरीपासुन रोखायला फ़क्त एक मोडका कठडा.
वेग कमी करण्यास त्याने ब्रेकवर दवाब टाकला. खरररर.. आवाज. लागण्याचा प्रयत्न करुन ब्रेकचे पेडल सरळ तळाला लागले.
तो फ़ार वेगात वळला. कारने स्वत: भोवती गिरकी घेतली व लाकडी कठडा तोडुन ती दरीत लुप्त झाली.
नीळ्या शर्टने र्दुबीण खाली ठेवली. ताईच्या लग्नाला आता अडथाळा नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हम्म.
हम्म.
छान
छान
चांगली जमलेय
चांगली जमलेय
समजलीपण. जमलीपण.
समजलीपण. जमलीपण.
सिनेमा मध्ये विलनने एखाद्या
सिनेमा मध्ये विलनने एखाद्या चांगल्या पात्राच्या गाडीचे ब्रेक ती गाडी पार्क्ड असतांना मुद्दाम फेल केलेले दाखवतात त्यावरून सुचली का?
पण रिअल लाईफ मध्ये असे होत नाही! म्हणजे एकदाही ब्रेक न दाबता ७०-८० च्या स्पीडला जाता येत नाही. स्टिक शिफ्ट (अगदी ऑटोमॅटिक सुद्धा) गाडी पहिल्या गिअरमध्ये टाकतांनाच तिचा ब्रेक दाबावा लागतो. घाटापर्यंत पोचायला ट्राफिक शून्य असे समजले तरी निदान ४-५ वेळा गिअर बदलण्यासाठी ब्रेक दाबावा लागेल.
सांगायच विसरलो. कार व गोष्ट
सांगायच विसरलो. कार व गोष्ट फ़ार जुनीआहे. आताची कार तर लगेच ईंजीन लाईट लावायची.
गोष्ट फ़ार जुनी आहे. >>> कार
गोष्ट फ़ार जुनी आहे. >>> कार ऑटोमॅटिक होती का? की क्लच, गिअर, ब्रेकवाली होती?
व्वा, मस्तच.
व्वा, मस्तच.