सोळा आण्याच्या गोष्टी- नाय समजली - बोकलत

Submitted by बोकलत on 11 September, 2019 - 05:47

तो हुशार होता. शाळेत पहिला यायचा. मास्तर त्याच्या बुद्धिमतेवर एव्हडे खुश असायचे कि रोज एक पारले चॉकलेट न विसरता द्यायचे. मोठा झाल्यावर तो एव्हडा हुशार झाला कि देशोदेशीचे शास्त्रज्ञ त्याचाशी चर्चा करायला उंबरठा झिजवायचे, पण आज विचार करून त्याचं डोकं तापलं होतं. कुकर डोक्यावर ठेवला असतात तर त्याचपण तीन शिट्या झाल्या असत्या. कितीतरी वेळ तो तसाच बसून अर्थ लावण्याचा असफल प्रयत्न करत होता. पोळ्या लाटायला येत नाही म्हणून बायको तुडवणार होती, पण घरी विराजमान झालेला बाप्पा आणि पाहुण्यांच्या वर्दळीमुळे वाचला.
विचार करून तो शेवटी थकला. मोबाईल बाजूला सारून स्वतःशीच पुटपुटला
' नाय समजली, जाऊ दे हाबचा प्रतिसाद आल्यावरच काय ते कळेल.'

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol परफेक्ट :thumbs up:

मी पण गोष्ट कळली नाही की हाब करतील एक्सप्लेन असा विचार करून शांतपणे वाट बघते Wink

Lol परफेक्ट :thumbs up:

मी पण गोष्ट कळली नाही की हाब करतील एक्सप्लेन असा विचार करून शांतपणे वाट बघते >>+११

ही आवडलीच !!

वा Lol

वा Lol

हे असे होण्याचे दोन लॉजिकल एक्सप्लेनेशन देता येतील.

माझ्या मते,
कथा लिहिणारे सगळे आयडी हाबचे डुप्लिकेट आयडी आहेत त्यामुळे कथांचे अर्थ हाबला आधीच माहित होते.
किंवा
समांतर विश्वातून आलेली व्यक्ती हाब आहे आणि समांतर विश्वात मायबोली गणेशोत्सव तिथी प्रमाणे ह्यावर्षी दोन आठवडे आधी असल्याने हाबला सगळ्या कथांचे अर्थ आधीच माहित होते.

मी पण गोष्ट कळली नाही की हाब करतील एक्सप्लेन असा विचार करून शांतपणे वाट बघते>>>अगदी अगदी हाब आणि हाआ दोघे मस्त एक्सप्लेन करून संगतात

कडक!! Lol

असे पन असू शकते न कि त्यांच्या कडे रिकामा टायिम फार आहे Light 1 >>>>> चर्रप्स, नुसता रिकामा वेळ असून चालेल का? खरंच? नाही, मी म्हणते कारण माझ्याकडे पण आहे, तरी मला बऱ्याच कथा प्रतिसादातून समजून घ्याव्या लागताहेत. Happy
( सॉरी तुमचं नाव नीट टाईप करता येत नाहीए. )

असे पन असू शकते न कि त्यांच्या कडे रिकामा टायिम फार आहे >>>

माज्याकडबी रिकामा टायीम लै है, पर चारचारदा वाचूनबी शेवटी हाबचा प्रतिसाद वाचल्याबिगर ट्यूब पेटत नाय... कालपास्न तर शीर्षक, गोष्ट आन हाबचा प्रतिसाद सगळंच डोसक्यावरनं जायाला लागलंया... Sad Sad

नाही समजली.
हडळीच्या आशिकाचा प्रतिसाद आल्यावरच काय ते कळेल.

Pages