"रुचकर मेजवानी"-पाककृती स्पर्धा-३ (मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.)

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

cooking show banner 2.jpg
******
पाककृती क्रमांक ३ : आज्जीचा खाऊ: विस्मरणात गेलेल्या घरगुती रेसिपीज.
आता रॉकिंग- शॉकिंग अस सगळं झालेलं आहे. पण याबरोबरच आपण आपली संस्कृती विसरता कामा नये. म्हणून इथे आपण, आपल्या आज्जीच्या जमान्यात केल्या जाणाऱ्या पदार्थांच्या आठवणींना उजाळा देऊया. तयार करुया विस्मरणात गेलेले \ हल्ली खूप क्वचितच केले जाणारे काही पदार्थ. नियम- साखरेचा वापर न करता तयार केलेले गोड पदार्थ. साखरेला पर्यायी घटक वापरू शकता.

स्पर्धेचे नियम :
१) एक आयडी एका विषयाची कितीही प्रवेशिका देऊ शकेल.
२) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप
सदस्य-नोंदणीकरता २ सप्टेंबर ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
३) 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
४) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
५) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"रुचकर मेजवानी - {आज्जीचा खाऊ} - {तुम्ही केलेल्या पदार्थाचे नाव} - {तुमचा आयडी}"
६) प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
७) प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
८) पाककृती शाकाहारी असावी आणि अल्कोहोलचा वापर नसावा. तसेच जो घटक घेऊ नये, असे सांगितले आहे, तो घटक अजिबात घ्यायचा नाही. बाकीचे घटक तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता.
९) पाककृती स्व:त तयार केलेली असावी. आणि पूर्वप्रकाशित नसावी.
१०)'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही प्रेमळ विनंती.
११) प्रवेशिका ०२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१९ या वेळेत पाठवता येतील.
१२) या स्पर्धेचे परीक्षण संयोजक मंडळ करणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
! गणपती बाप्पा मोरया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही मिलेनियल जनतेची आजी दिसते Wink . जरा जुन्या पिढीच (आणि काही मिलेनियल्सच ही) बालपण आजी सोबत साखरेसाठी रेशनच्या रांगेत उभे रहाण्यात गेलं. गूळाचा-काकवीचा खमंगपणा चांगला पण तो कधीही मिळायचा- गावाकडून येता जाता कोणी ढेप घेवून येई. सहकारी साखर कारखान्यांमुळे ६०-७० दशकात साखर बर्‍यापैकी सहज मिळू लागली. परवडेल अशी साखर दुकानात मिळणे नवलाई होते. पोरांना सणासुदीचे गोडधोड हवे म्हणून ती माऊली उन्हातही २-२ तास दुकानासमोर रांग लावत असे. मग अर्धा तास रेशनवाल्याने वाण्यापेक्षा साखर जाड दिली का बारीक ह्यावर तिचा तिच्या सुनांसह सुखसंवाद चालत असे. कुठली साखर कुठे वापरायची याची चर्चा. सारण करायचं, लाडू करायचे तर साखर कशी हवी, पाक कसा कसा हवा - कच्चा, एकतारी, पक्का, गोळीबंद की अजून काही ह्याचा 'फाडफाड पाककला' किंवा 'सिरप १०१' असा तास दोन तासाचा वर्ग चालायचा. दगडाला म्हणायचं गौर पण खरी गौर ती साखर... वर्षभरात ३ दिवस मनोभावे खायची.

तीनही स्पर्धांचे नियम वेगवेगळे आहेत...
कृपया लिंक वरील नियम एकदा पाहून घ्यावे, ही विनंती.