******
पाककृती क्रमांक २ : हॅव अ सिप्प: टेस्टी मॉकटेल्स.
रॉकिंग रोल्स खाऊन पोटोबा तृप्त झाला, आता 'तृष्णा' जागृत होणार! नाही का ? तर या तृष्णेला तृप्त करण्यासाठी पेय सुद्धा लागणार.यासाठी 'हॅव अ सिप्प' हा प्रकार आहे. यामध्ये तुम्ही टेस्टी मॉकटेल्स बनवायचे आहे.
नियम- कोल्डड्रिंक्स चालेल. फळे हा मुख्य घटक वापरून तयार केलेल्या गोड रेसिपी.
स्पर्धेचे नियम :
१) एक आयडी एका विषयाची कितीही प्रवेशिका देऊ शकेल.
२) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप
सदस्य-नोंदणीकरता २ सप्टेंबर ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
३) 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
४) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
५) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"रुचकर मेजवानी - {हॅव अ सिप्प} - {तुम्ही केलेल्या पदार्थाचे नाव} - {तुमचा आयडी}"
६) प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
७) प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
८) पाककृती शाकाहारी असावी आणि अल्कोहोलचा वापर नसावा. मुळ घटक अनिवार्य आहे. बाकीचे घटक तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता.
९) पाककृती स्व:त तयार केलेली असावी. आणि पूर्वप्रकाशित नसावी.
१०)'स्पर्धेसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित पाककृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही प्रेमळ विनंती.
११) प्रवेशिका ०२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१९ या वेळेत पाठवता येतील.
१२) या स्पर्धेचे परीक्षण संयोजक मंडळ करणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
! गणपती बाप्पा मोरया!
1) फळांचे तयार रस ( टेट्रापॅक
1) फळांचे तयार रस ( टेट्रापॅक मध्ये उपलब्ध असणारे ज्यूस) चालतील का?
2) टेस्ट मेकर म्हणून तयार बाटली बंद पदार्थ (उदा व्हिनेगर, काही सॉस) चालतील का?
होय. फळांचे ज्यूस चालतील
होय. स्व्:त बनवलेले फळांचे ज्यूस चालतील.
टेट्रापॅक मध्ये उपलब्ध असणारे ज्यूस - चालणार नाहीत.
टेस्ट मेकर म्हणून व्हिनेगर, काही सॉस चालतील.
- पण पुर्ण पदार्थामध्ये फक्त त्याचाच समावेष नसावा. स्वःत बनवलेले काही घटक सुद्धा असणे अनिवार्य आहे.
मॉकटेल मध्ये 2 किंवा जास्त
मॉकटेल मध्ये 2 किंवा जास्त फळांचे रस, टेस्टमेकर यांचे मिश्रण च असणार ना? त्यात स्वतः काय घटक बनवणार?
फारतर लिंबू चिरून मी रस काढला,
किंवा फळांच्या फोडी बारीक कापून घातल्या वगैरे इतकेच करता येईल,
Any way , प्रयत्न करून पाहतो, नियमात बसतंय का सांगा
मॉकटेल मध्ये 2 किंवा जास्त
मॉकटेल मध्ये 2 किंवा जास्त फळांचे रस, टेस्टमेकर यांचे मिश्रण च असणार ना?
- बरोबर. फळांचे रस घरी बनवता येतात. ते वापरावे.
या स्पर्धेची अंतिम मुदत
या स्पर्धेची अंतिम मुदत रविवार १५ सप्टेंबर २०१९ रात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ओ संयोजक , प्लीज परत एकदा
ओ संयोजक , प्लीज परत एकदा नियमांचा विचार कराल का?
रेडीमेड ज्युस चालावा. मॉकटेल मध्ये चालायला पाहिजे. तस झाल तर मग सोडा , फँटा वगैरे पण वापरता येणार नाही. कारण तेही रेडीमेड . तुम्ही जे म्हणताय (फ्रेश ज्युस वापरून) ते स्मुदी होईल मॉकटेल नाही.
नुस्त मॉकटेल अस केलत तर आम्हाला बरं पडेल. मी पायनॅपल चा तयार ज्युस वापरून रेसीपी टाकणार होते. माझी बाद होईल कि रेसीपी अशान असा पण स्वार्थी विचार आहे यामागं. प्लीज विचार करा.
एकदा पिनरेस्ट वर बघा प्लिज
एकदा पिनरेस्ट वर बघा प्लिज मॉकटेलच्या रेसीपीज.
सीमाताई कृपया आपली रेसिपी आपण
सीमा आणि सिम्बा यांनी सुचवल्या प्रमाणे, बहुतेक स्पर्धकांना मॉकटेल्स बनवण्यासाठी अडचणी येत आहेत. की फळांचे तयार ज्युस वापरावे का?
- तर यावर उपाय म्हणून आम्ही नियमांमध्ये बदल करत आहोत.
आपण तयार ज्युस किंवा घरी तयार केलेले फळांचे ज्यूस दोन्ही वापरु शकता.
- कृपया अजुन काही अडचणी येत असतील तर, आम्हाला कळवा, त्यानुसार विचार करून सगळ्यांना सोयिस्कर असे बदल जरूर केले जातील.
- आपल्या सगळ्यांच्या आवडत्या, मा.बो. गणेश उत्सव- पाककृती स्पर्धेमध्ये, आपण जास्तीत जास्त सहभाग घ्यावा ही अपेक्षा.
सिम्बा, सीमा यांनी कळल्यामुळे
यासाठी तुनळी चां वापर होऊ शकतो.