रोज सकाळी मी साधारण पाच किलोमिटर चालतो. त्यातले तिन किलोमिटर मी मजेत चालतो व शेवटचे दोन किलोमिटर अक्षरशः शरीर ढकलत पार करतो. पण देवराईत शिरलो की किती चाल होते ते समजतच नाही. अॅप कधी सहा किमी दाखवते तर कधी सात. दोन तास अगदी दोन मिनिटांसारखे निघून जातात. मात्र पायाखाली पहात चालायचे म्हटले की तासाला विस फुट इतकी चाल मंदावते. गवताच्या इवल्या इवल्या पानांखाली एक विश्व सुखेनैव नांदत असते. येथे अव्याहतपणे धावपळ सुरु असते. या पानांखाली कोण घर बांधत असतो, कोण शिकार करत असतो तर कुणी शिकार होत असतो, कुणाचे प्रीयाराधन चाललेले असते तर कुणी मध, पराग वगैरे गोळा करण्यात गुंग असते. प्रत्येकजण कशात ना कशात मग्न असतो. हे सगळे पाहीले की थक्क व्हायला होतं. या गवताखाली यांचे विश्व बहरत असते तर तृणपात्यांवर सकाळी सकाळी दवबिंदूचा असा काही नजारा असतो की विचारु नका. एखाद्या जवाहीऱ्याच्याही दुकानात इतक्या नजाकतीने मांडलेले हिरे नसतील एवढी दौलत येथे पाना पानांवर विखुरलेली असते. प्रत्येक पान अगदी हिरेजडीत झालेले असते. त्यामुळे येथे पाऊल टाकायला मला नेहमीच भिती वाटते. इतर वेळी झपझप चालत असताना आपल्या पावलांखाली किती जणाचे जीव, कष्ट चिरडले जात असतील असे वाटून जाते. “उन्हे होश तक ना आया, मेरी लुट गयी जवानी” काहीसा असाच प्रकार होत असावा. आपण टाकलेली दोन चार पावले या कृमी किटकांना अगदी मातीत मिळवत असतील आणि त्याची आपल्याला जाणीवही होत नसेल. मी जेवढे जास्त बारकाईने या जगाकडे पाहीले तेवढे मी काळजीपुर्वक पाऊल टाकायला लागलो. या लहानग्यांचे हे लहानसे विश्व पाहीले की मला एक शेर आठवतो. अगदी समर्पक अशा ओळी आहेत.
रख कदम फूंक-फूंक कर नादान
जर्रे-जर्रे में जान है प्यारे।
(Camera: Canon EOS 60D, Nikon Coolpix P900, Sony PJ410)
या भागातील किटकांची आणि फुलपाखरांची नावे मला माहीत नाहीत. त्यामुळे जाणकारांनी नावे सांगावीत.
हे कवडी फुलपाखरु
प्रचि: १
प्रचि: २
प्लेन टायगर
प्रचि: ३
हे नेहमी दिसते पण नाव माहीत नाही.
प्रचि: ४
नाव माहीत नाही.
प्रचि: ५
प्रचि: ६
यातील एका फुलपाखराला सोंड नाहीए.
प्रचि: ७
हे फुलपाखरु जमीनीवर जास्त वावरताना पाहीले आहे.
प्रचि: ८
प्रचि: ९
हे काही चतूर. अजुनही वेगळ्या रंगाचे व आकाराचे आहेत. फोटो मिळाला की येथे देईन.
प्रचि: १०
.
प्रचि: ११
प्रचि: १२
गुलाबी चतूर. शशांकदांनी याचे नामकरण व्हॅलेंटाईन चतूर असे केले आहे.
प्रचि: १३
प्रचि: १४
प्रचि: १५
हा नाकतोडा आकाराने गव्हाच्या दाण्यायेवढा आहे.
प्रचि: १६
प्रचि: १७
हा डास आहे का?
प्रचि: १८
प्रचि: १९
मोळी किडा
प्रचि: २० अ
हे किड्याचे घर आहे की शिकारीसाठी जाळे आहे ते माहीत नाही. गवताच्या पानाच्या आधाराने गवताच्या मुख्य काडीच्या भोवती हे गोळा केलेले आहे. आकार एक सेंटीमिटर असेल.
प्रचि: २० ब
प्रचि: २१
प्रचि: २२
.
हे काही कोळी आहेत.
प्रचि: २३
प्रचि: २४
प्रचि: २५
प्रचि: २६
हे या कोळ्याचे डोळे आहेत का?
प्रचि: २७
हा जरा वेगळा आणि खुप छोटा कोळी आहे.
प्रचि: २८
प्रचि: २९
दबा धरुन बसलेला कोळी.
प्रचि: ३०
प्रचि: ३१
बोरीच्या कोवळ्या पालवीत विश्रांती घेत असलेला कोळी.
हा रंगाने जरा वेगळा असलेला कोळी.
प्रचि: ३२
प्रचि: ३३
हा कोळी कॅमेऱ्यात येणे जरा अवघड होते. खुपच लहान आकार आहे याचा.
प्रचि: ३४
सुरवंट.
प्रचि: ३५
प्रचि: ३६
काही माशा.
प्रचि: ३७
प्रचि: ३८
प्रचि: ३९
प्रचि: ४०
प्रचि: ४१
गोगलगायी
प्रचि: ४२
प्रचि: ४३
काही लेडी बिटल. शशांकदांनी याचेही नामकरण केले आहे. बाई पिटंल.
प्रचि: ४४
प्रचि: ४५
प्रचि: ४६
प्रचि: ४७
प्रचि: ४८
प्रचि: ४९
आणि हा आहे देवराईचा जवाहीरखाना. देवराईवर रोज अशी हिऱ्या मोत्यांची पखरण होते.
प्रचि: ५०
प्रचि: ५१
प्रचि: ५२
प्रचि: ५३
प्रचि: ५४
प्रचि: ५५
प्रचि: ५६
प्रचि: ५७
प्रचि: ५८
प्रचि: ५९
प्रचि: ६०
प्रचि: ६१
जागा अत्यंत कमी असल्याने मी फोटोंची साईज आणि क्वालीटी बरीचशी कमी केली आहे. 7 MB चा फोटो मी 40KB इतका लहान करुन येथे टाकला आहे. जर फोटो व्यवस्थित दिसत नसतील मी सगळे फोटो रिप्लेस करेनच. तोवर हेच चालवून घ्या ही विनंती.
वरील कोळी आणि फुलपाखरांची नावे समजली तर नक्की सांगा.
@ सिद्धी काही महिन्यापूर्वी
@ सिद्धी काही महिन्यापूर्वी घाणेरीवर लेख आला होता चतुरंग मध्ये. पहा
https://www.loksatta.com/nisarga-sanvedana-news/article-about-gita-ramas...
घाणेरी स्थानिक नसली तरी
घाणेरी स्थानिक नसली तरी फुलपाखरांची आवडती वनस्पती आहे
घाणेरीला आम्ही गुलतुरा म्हणतो
घाणेरीला आम्ही गुलतुरा म्हणतो व माझ्या लहानपणापासून मी पहात आहे.
https://www.google.com/url?sa
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://en.m.wikipe...
शालीदा tnx.
शालीदा tnx.
ऋतुराज - tnx तो लेख वाचते.
अमर ९९, Zygogramma bicolorata
अमर ९९, Zygogramma bicolorata च्या माहितीबद्दल खूप धन्यवाद
Adults and larvae are used as a form of biological pest control in India in order to control invasive Parthenium hysterophorus .
हे वाचून आनंद झाला
धन्यवाद ऋतुराज जी.
धन्यवाद ऋतुराज जी. किटकांमध्ये मित्र किटक आणि शत्रू किटक आहेत. त्यांची माहिती खूप मनोरंजक आहे. लेडी बर्ड बिटल या मित्रकिटका सारखाच दिसणारा एक किटक आहे. पण तो मित्र किटक नाही.
धन्यवाद शाली iphone न
धन्यवाद शाली iphone न म्हटल्याबद्दल!
पण कॅमेरा कुठलाही असला तरी फोटो काढण्याचे कौशल्य महत्त्वाचेच! आणि ते तुमच्याकडे भरपूर आहे. __/\__
शाली, अतिशय सुरेख फोटो आहेत.
शाली, अतिशय सुरेख फोटो आहेत. देवमाणसं तुम्हाला भेटत असतातच, पण देवराई तर निव्वळ अप्रतिम.
अप्रतिम फोटो, खुप सुंदर .
अप्रतिम फोटो, खुप सुंदर .
Apratim photos... Seriously
Apratim photos... Seriously great skill dada
मस्त फोटो
मस्त फोटो
खूप छान☺️
खूप छान☺️
मस्त फोटो सगळे.
मस्त फोटो सगळे.
प्राचीन, कॅलक्यूलेटर,
प्राचीन, कॅलक्यूलेटर, कांदापोहे, VB, आदि सगळ्यांचे खुप धन्यवाद!
थँक्यू म्हणायला देखील खुप स्क्रॉल करावे लागतेय म्हणून कंटाळा केला उत्तर द्यायला. माझाच धागा आहे म्हणून बरे!
वा...खुप मस्त आलेत फोटो....
वा...खुप मस्त आलेत फोटो....
शालिदा...कधी जमलं तर कास पठारला भेट द्या ...तिथे अजुन विविधता कॅमेरात कैद करता येईल...तुम्हाला..
सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये गेलात तर अजुनच छान...
प्र.चि. ४ रंग कुणाचे कुणी
प्र.चि. ४ रंग कुणाचे कुणी चोरले.
प्र.चि. ५१-५३ मोत्यांची माळ...
अमेझिंग, कित्ती सुंदर
अमेझिंग, कित्ती सुंदर
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
तिन्ही भाग छान आहेत,
तिन्ही भाग छान आहेत,
शाली भाऊ, काय कमाल फोटो काढले
शाली भाऊ, काय कमाल फोटो काढले राव तुम्ही मस्तच
दिल गार्डन गार्डन हो गया
प्रचि: ४ --> ह्याचे नाव "Common Jezebel" आहे पण मराठीत ह्याला इतक्यात अगदी समर्पक असे नाव दिले आहे "हळदी कुंकू"
प्रचि: ७ --> मेल - फिमेल जोडी आहे, मेटींग सुरु आहे
प्रचि: २० ब --> स्पिटलबग
प्रचि: २७ --> नाही ते डोळे नाहीत, ती पाठीवरील false image आहे, जेणे करून त्याच्यावर हल्ला करणाऱ्याला वाटेल कि डोळे आहेत
रनिंग करताना मला दिसलेले हे
रनिंग करताना मला दिसलेले हे
"हळदी कुंकू"
धन्यवाद मध्यलोक!
धन्यवाद मध्यलोक!
अगदी सुरेख टिपलय फुलपाखरु.
हेऽ हेऽऽ मला वाटलेच ते डोळे नसावेत.
हळदीकुंकू फुलपाखराला स्वैरिणी देखील म्हणतात.
Pages