सोळा आण्याच्या गोष्टी – भीती – स्वप्ना_राज

Submitted by स्वप्ना_राज on 11 September, 2019 - 02:05

जाग आली तेव्हा किती वाजलेत ते तिने पाहिलं नाही. पडल्या पडल्या तिचं लक्ष खिडकीकडे गेलं आणि ती दचकली. पडदे बंद होते पण बाहेरून येणाऱ्या प्रकाशात त्यांच्यावर एक सावली पडली होती. खिडकीबाहेर कोणीतरी उभं होतं.

गरज पडते तेव्हा हा रामजी कुठे असतो काय माहित. वॉचमनला फोन लावायला तिने नाईट टेबलकडे हात नेला आणि भीतीची एक थंड लहर तिच्या सर्वांगावर फिरली. घश्याला कोरड पडली. दरदरून घाम फुटला.

बेडशेजारी नाईट टेबल नव्हतं. त्याचा एक पाय मोडला म्हणून संध्याकाळीच तिने रिपेअर करायला दिलं होतं. म्हणजे ती लोणावळ्याच्या बंगल्यात नव्हती. बांद्र्यातल्या आठव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये होती.

आणि तिथल्या बेडरूमच्या खिडकीबाहेर उभं रहाणं कोणाही माणसाला शक्य नव्हतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी Happy

छान!

Bapre...

भारी