Submitted by कटप्पा on 10 September, 2019 - 17:03
आज चिंगी चा पाचवा वाढ़दिवस. सर्व मित्र मैत्रिनी नातलग जमलेले.
केक कापणे वगैरे प्रकार झाल्यानांतर चिंगी ने घोषणा केली.
मी आज सर्वाना रिटर्न गिफ्ट देनार आहे.माझ्याकडे असणारी खेळणी मी शेयर करणार.
बाबा तुम्हाला हि माझी कार . तुम्ही मला खर्या कार मधे फिरवता.
आई तुला हा छोटासा फ्रिज. तु मस्त मस्त खाऊ बनवते.
काकु तुम्हाला हि छोटी पर्स. शोपींग करायला.
काका तुमच्यासाठी ही बाहुली. तुम्ही आता हिच्याबरोबर खेळत जा, माझ्याशी नको. बघा ना मी तिचे कपडे काढुनच देतेय तुम्हाला.
त्याच रात्री :आई तु जसे सांगीतले तसेच बोलली मी - आता मला नक्की पिंक सायकल आणणार ना तु?
आणनार हो बाळ ,नककी !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणखी एक ट्विस्ट! छान आहे ही
आणखी एक ट्विस्ट! छान आहे ही पण.
ही पण छान आहे.
ही पण छान आहे.
:-O :-O
:-O :-O
Hee pan mast ahe
Hee pan mast ahe
आईने का सांगितले असे बोलायला.
आईने का सांगितले असे बोलायला. सगळ्यांना कळावे म्हणून का.
आईला घरातून /संपत्ती वगैरे
आईला घरातून /संपत्ती वगैरे तुन काकांचा पत्ता कट करायचा असेल,म्हणून बोलायला सांगितले असेल;खरेच काका तसे वागत असतील तर आई चार लोक जमून नंतर बोलू असा विचार करण्यापेक्षा तिला समजल्या क्षणी लगेचच बोलून टाकेल
कुठलीही आई ईतकी शांत रीअॅक्ट
कुठलीही आई ईतकी शांत रीअॅक्ट होईल असे निदान मला तरी वाटत नाही, म्हणजे जर तीला ते सगळ्यांसमोर आणायचे असेल तर. एकवेळ काही कारणास्तवे म्हणजे लोकलाजेस्तव बदनामी नको किंवा एखाद्या दबावाखाली असेल तर मग तेव्हा सुद्धा ती मुलीला सगळ्यांसमोर असे ऊघड बोलु देणार नाही. अर्थात हेमावैम
आई ह्या गोष्टीत अशी मुलीकरवी
आई ह्या गोष्टीत अशी मुलीकरवी वाढदिवसाच्या दिवशी वैगेरे रीअॅक्ट होणार नाही असं वाटलं.
हीपण गोष्ट कळेना का आता
हीपण गोष्ट कळेना का आता लोकांना!!
> आईला घरातून /संपत्ती वगैरे तुन काकांचा पत्ता कट करायचा असेल,म्हणून बोलायला सांगितले असेल;खरेच काका तसे वागत असतील तर >
'खरेच काका तसे वागत असतील तर' हे 'या' गोष्टीत महत्वाचे आहे.
त्या गोष्टीत काका खरंच वाईट आहेत आणि मुलगी स्वतःहून रिऍक्ट करतेय.
या गोष्टीत काका वाईट नाहीयत, आई वाईट आहे आणि मुलीचा उपयोग करून, काय बोलायचं ते तिला पढवून , काकाला बदनाम करतेय.
का? बरीच कारणं असू शकतात.
• आदूने लिहलंय तसं संपत्तीतून वाटा जर खरंच काका असतील तर. पण ते कुटुंबमित्रही असू शकतात.
• आईचे काकासोबत अफेअर असेल. ते बंद करायचं अस काका ठरवतो म्हणून बदला घ्यायला आई मुलीचा वापर करते.
• किंवा आईने काकाला सिड्यूस करायचा प्रयत्न केला होता आणि त्याने झिडकारले म्हणून बदला घ्यायचा.
• किंवा आईला काकू आवडते म्हणून काकांचा पत्ता कट करायचाय.
किंवा आईला काकू आवडते म्हणून
किंवा आईला काकू आवडते म्हणून काकांचा पत्ता कट करायचाय.>>>>>हे भारिये
VB शी सहमत
VB शी सहमत
असंही असू शकतं की आई अगतिक
असंही असू शकतं की आई अगतिक आहे.
कळूनही नाही बोलू शकत.
काका मोठे बंधू असतील, कर्ते असतील, कुटूंबव्यवस्था प्रतिगामी असेल...
पण लेकीसाठी जीव तिळ तिळ तुटतो...
मग स्वतःला नाही बोलता येत तर हा मार्ग..
मुलीला लालूच दाखवणं नाही पटत पण नाईलाजाने... कारण मुलगीही अजाण आहे आणि सायकलच्या आशेने बोलेल... हा आईचा तिला शक्य असलेला मार्ग...
> पाचव्या वाढ़दिवसला सर्व
> पाचव्या वाढ़दिवसला सर्व मित्र मैत्रिनी नातलग बोलावणे
केक कापणे
आलेल्या सर्वाना रिटर्न गिफ्ट
खर्या कार मधे फिरवणारे बाबा
फ्रिजमधले पदार्थ वापरून मस्त मस्त खाऊ बनवणारी आई
(सतत?) शोपींग करणारी काकू
मुलीला पिंक सायकलचे अमिष दाखवू शकणारी आई >
ही सगळी उच्चमध्यम वर्गची गोष्ट आहे त्यात
अगतिक आई
कळूनही नाही बोलू शकत
काका मोठे बंधू, कर्ते
कुटूंबव्यवस्था प्रतिगामी
वगैरे जवळपास अशक्य आहे.
हायवे सिनेमामध्ये आलिया भटने बहुतेक तिच्या आईला सांगितले असते की काका मोलेस्ट करतोय. पण आई तिला गप बसवते कारण आईला आपली उच्चवर्गातली राहणी सोडायची नसते. पूर्ण स्वार्थी विचार, शून्य आगतिकता! (मलातरी असे आठवतेय. सिनेमा बघून बरेच दिवस झाले त्यामुळे चूभूद्याघ्या)
===
जर त्या आणि या दोन्ही गोष्टीत काका खरंच वाईट आहेत, दोन्हीतला फरक फक्त हा की
• मुलगी स्वतःहून रिऍक्ट करतेय की
• अगतिक आईच्या, लालूच दाखवून पढवलेल्या पण स्मार्ट पद्धतीने रिऍक्ट करतेय
हा असेल तर शिर्षकातल्या 'अल्टरनेट एंडिंग'ला फारसा अर्थ नाही.
त्याऐवजी
• त्या गोष्टीत काका खरंच वाईट असणे आणि
• या गोष्टीत काका वाईट नसणे, आई वाईट असणे
हे 'जास्त अल्टरनेट' होईल.
>>>ही सगळी उच्चमध्यम वर्गची
.
निरुंशी सहमत… आईने
निरुंशी सहमत… आईने सांगितल्यास कदाचित कुणीच विश्वास ठेवणार नाही… ऊच्चमध्यमवर्गीयांत डिनायलचा शहामृगी अवतार असू शकतो. असं सख्खा काका काही करेल का म्हणून तिलाच झापले जाणे शक्य आहे… मुलीला जे होतेय ते तिच्यावर अन्याय आहे हेच कळत नसेल म्हणून आईने हा मार्ग वापरला.
जर त्या आणि या दोन्ही गोष्टीत
जर त्या आणि या दोन्ही गोष्टीत काका खरंच वाईट आहेत, दोन्हीतला फरक फक्त हा की
• मुलगी स्वतःहून रिऍक्ट करतेय की
• अगतिक आईच्या, लालूच दाखवून पढवलेल्या पण स्मार्ट पद्धतीने रिऍक्ट करतेय
हा असेल तर शिर्षकातल्या 'अल्टरनेट एंडिंग'ला फारसा अर्थ नाही.
त्याऐवजी
• त्या गोष्टीत काका खरंच वाईट असणे आणि
• या गोष्टीत काका वाईट नसणे, आई वाईट असणे
हे 'जास्त अल्टरनेट' होईल. >>>>>> +१
खरंतर ही एक साधी सरळ कथा आहे.
खरंतर ही एक साधी सरळ कथा आहे. एवढ्या विश्लेश्णाची गरज नाही. (असं मला वाटतंय )
काका काहीतरी खेळ खेळतो असं (कपडे काढुन वैगेरे) मुलीने आईला सांगितलंय आणि आईने पिंक सायकल देईन असं आमिष दाखवुन तिला मुद्दाम सगळ्यांसमोर (म्हणून पार्टीत जेव्हा सगळे एकत्र जमलेत) ते बोलायला लावलंय. कदाचित तिने जाब विचारला असता किंवा सगळ्यांना सांगितलं असतं तर तिला खोटी ठरवली असती तिच्यावर विश्वास ठेवला गेला नसता असं काही कारण असावं. म्हणून तिने मुलीला ३-४ वाक्य बोलायला लावुन ते वदवुन घेतलंय सगळ्यांसमोर.
(असं मला वाटतंय )
सस्मित, तुझ्या प्रतिसादाशी
सस्मित, तुझ्या प्रतिसादाशी सहमत. मी पण असाच सोपा विचार केला.
कटप्पा,
कटप्पा,
आता तुम्हीच सांगा 'अल्टरनेट एंडिंग' का लिहलंय ते
मीही सोपाच विचार केला. पण ५
मीही सोपाच विचार केला. पण ५ वर्षांची मुलगी (तिच्या वयाचा निरागसपणा पाहता) पढवून इतके बोलेल हे मला पटलं नाही. तिने शेवटी सर्वांसमोरच आईला सायकल देण्याची आठवण करून देण्याची शक्यता जास्त
पण एक कथा म्हणून जमली आहे.
धन्यवाद वाचकहो. चिंगीची आई
धन्यवाद वाचकहो. चिंगीची आई खलनायक आहे. तिने मुद्दाम हा खेळ रचला आहे. चिंगी फक्त एक बाहुली आहे तिच्या इशार्यावर नाचनारी.
कारणे बरीच असू शकतात.
फेक मी टू.
हां हेच म्हणत होते 'मीपण'!!
हां हेच म्हणत होते 'मीपण'!!
लोल अँमी .....
लोल अँमी .....
>>शेवटी सर्वांसमोरच आईला
>>शेवटी सर्वांसमोरच आईला सायकल देण्याची आठवण करून देण्याची शक्यता जास्त Happy>> हाहाहा अगदी अगदी.
.
पण कथाकल्पना भारीये.
डेंजर दिसते आई.
डेंजर दिसते आई.
कथा चांगलीये..
कथा चांगलीये..
मेबी आईने आपल्या मुलीबाबतीत जे झालंय ते आपल्याच नात्यातल्या इतर इतर मुलींबाबतीत होऊ नये ह्या उद्देशानं केलेलं असु शकत..
कटप्पा
कटप्पा
मूळ जी गोष्ट आहे तिच्या साठी माझा सलाम आहे तुम्हाला !
बिपिनसाहेब - मनापासुन धन्यवाद
बिपिनसाहेब - मनापासुन धन्यवाद. गोष्टिची कल्पना माझी नाही - मला एका शोर्ट फिल्म वरुन सुचली होती.
मी त्याचा हकदार नाही आहे.
माफ करा पण गोष्ट रिएलिस्टिक
माफ करा पण गोष्ट रिएलिस्टिक नाही वाटली.
चाईल्ड अब्युज हा खूप सेन्सिटिव्ह आनि गंभीर विषय आहे.
सनव सहमत आहे . प्रतिसाद
सनव सहमत आहे . प्रतिसाद दिल्याबद्धल धन्यवाद .