सोळा आण्याच्या गोष्टी - 'प्रवाह' - रागिणी

Submitted by न्यासा on 10 September, 2019 - 00:23

आज पुन्हा एकदा मी वाहवत चालले आहे... ना एका ठरावीक ध्येयाकडे ना दिशाहीन... पण वाहते आहे हे निश्चित !

नदीच्या प्रवाही वाटा ज्या क्षणाला एकमेकात गुंफतात त्या मिलनाला महत्व असते. अमितची माझी भेटसुद्धा अशीच प्रितीच्या संगमावरची. वर्षपूर्ती साजरी करण्यास दोघे मनाशी गुजगोष्टी बोलत भूतकाळाच्या खडकावरती सैलावलो होतो. ओठांतून मागे परतणार्‍या बिचार्‍या शब्दांची गंमत पाहत मुककाव्य मनात उसळतानाच चांदणे फिटुन धूसर वाटाही मोकळ्या झाल्या. पूर्णाकृती चंद्रही ठिबकला पाण्यावरती... अन् असेच काही क्षण नि:शब्दाच्या गाठी जुळवत बैसता स्वप्नतरंग एक तरल प्रसवले त्या डोहाकाठी ... !!

आणाभाका होऊन उद्या पुन्हा भेटायचे नक्की झाले पण तो कधी आलाच नाही... अखंड प्रवाह बनण्यापेक्षा त्याने क्षणभंगुर प्रपाताचा मार्ग स्विकारला !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद बिपिन.
कधी कधी आठवणींचे तरंग मनात काहूर माजवतात अन् ज्या गोष्टी कसोशिने विसरायला पाहते नेमक्या त्याच भावना भरतीच्या लाटेगत मनाच्या किनाऱ्यावर आपटत राहिल्याने व्यक्त व्हायला भाग पाडतात.

आवडली कथा

काही आठवणी आयुष्यभर पुरतात, सो विसरायची गरज काय? अन अशा आठवणी विसरणे शक्यही नसते. व्यक्त देखील योग्य वेळी अन योग्य व्यक्ती कडेच होणे गरजेचे असते, नाहीतर त्याचा गैरफायदा घेणारे समाजात कमी नाहीयेत