Submitted by कोहंसोहं१० on 4 September, 2019 - 17:32
पाटीलसाहेबांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला निष्प्राण देह, बाजूला अर्धवट नशेत बसलेला साहेबांचा मुलगा अन वर्गमित्र रमेश, त्याच्या हातातली पिस्तूल, कोपऱ्यात विमनस्क बसलेली त्याची गर्भवती पत्नी लीना हे दृश्य पाहून इन्स्पेक्टर विजयच्या डोळ्यातही अश्रू तरळले. पिस्तूल, दारूची बाटली, घराची कागदपत्रे, रमेशच्या हाताचे ठसे त्याने गोळा करून तपासासाठी पाठवले. घर नावावर करावे यासाठी रोज रात्री दारू पिऊन रमेशची पाटीलसाहेबांशी भांडणे होत हे माहित असूनही रमेश खून करेल हे विजयला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. अधिक चौकशीसाठी विजयने रमेशच्या खोलीची झडती घेतली आणि मिळालेला मेडिकल रिपोर्ट पाहून डोळे विस्फारले.....
"होय मीच केला खून....नपुंसक रमेशमुळे घराण्याला वारस मिळावा म्हणून पाटीलसाहेबांनी केलेल्या बलात्काराचा बदला म्हणून..." चौकशीअंती लीना उत्तरली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे!
बापरे!
बापरे!
बापरे!
हम्म!
हम्म!
छान
छान
भारी! मस्त जमलीये.
भारी! मस्त जमलीये.
पण खून करायचा तर बलात्कारानंतर लगेचच न करता एवढे दिवस (गर्भवती आहे हे कळण्याइतकं पोट दिसत आहे असं मी गृहीत धरत आहे) का थांबली असेल ती? जर रमेशला बलात्काराबद्दल आत्ता कळलं आणि त्याने खून केला तर समजण्यासारखे आहे.
अरेरे
जमलीये. पण वावे शी सहमत.
जमलीये. पण वावे शी सहमत.
बापरे!
बापरे!
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
वावे, रमेशलाही त्याची नपुंसकता जगापासून लपवायची असल्यामुळे त्याचीही पाटीलसाहेबांच्या कृतीला नाईलाजाने का होईना संमती होती त्यामुळे लीनाला दोघांचाही सूड उगवायचा होता. त्यामुळे ती योग्य संधीसाठी थांबून राहिली आणि तशी वेळ येताच रमेशच्या दारूडेपणाचा फायदा घेत पाटलांचा खून केला आणि हुशारीने रमेशवर त्याचा आळ टाकला.
छान!
छान!
Submitted by कोहंसोहं१० on 5
Submitted by कोहंसोहं१० on 5 September, 2019 - 21:15>>
हे स्पष्टीकरण नक्कीच पटण्यासारखं आहे.
सुरेख धक्कातंत्र
सुरेख धक्कातंत्र
(No subject)
चांगली कथा.
चांगली कथा.
बाप रे
बाप रे