Submitted by अज्ञातवासी on 7 September, 2019 - 04:25
"बघ ना, ठिकठिकाणी डाग पडलेत, बाकी तू मात्र तसाच आहेस हं. काहीही बदल नाही."
"अग माझं काही गेलं म्हणायला आधी ते असावं लागतं. मला आल्याचा आनंद नव्हता, गेलं तरी दुःख नाही."
"नको ना, तू मला हवा आहेस, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत,
तो हसला!"
"तरीही तू वरच्या थरावर होतीस आणि मी सगळ्यात खालच्या..."
"सोड रे, बघ, परिस्थितीने आपल्याला सारखच बनवलं."
तेवढ्यात एका पोराने दोन्ही मुर्त्या उचलल्या
दोघांचाही जीव पिटवळत होता... पुन्हा भेट होणार की नाही?
रसरशीत भट्टी तापली होती...
"एकमेकात सामावून जाऊ,"
दोघे म्हणाले...
आणि काही क्षणात दोन्ही विरघळून गेले...
★★★★★
दुसऱ्याच दिवशी कपाटाच्या सगळ्यात वरच्या स्तरावर अर्धनारीनटेश्वराची हसरी मूर्ती विराजत होती!!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाऊंसर गेली. कुनीतरी समजवाल
बाऊंसर गेली. कुनीतरी समजवाल का??
@Akku>> धातूच्या २जुन्या
@Akku320>> धातूच्या २जुन्या मुर्तींपासून एक नवीन मुर्ती तयार झाली.
Great ...
Great ...
चांगलीय कथा.
चांगलीय कथा.
> "तरीही तू वरच्या थरावर होतीस आणि मी सगळ्यात खालच्या..." > म्हणजे कोणाच्या मुर्त्या असतील बरे?
कालीमातेची मुर्ती?? Wow!!
कालीमातेची मुर्ती होती का??
Wow!!
धन्यवाद श्रद्धाताई. परत वाचली
धन्यवाद श्रद्धाताई. परत वाचली मग समजली.
अज्ञा, फारच सुंदर!
अज्ञा, फारच सुंदर!
अक्षरशः एखादी क्लासिक गोष्ट वाचल्याची फिलिंग येतेय, समथिंग सो टची, सो युनिक!
सुंदर....
तरीही तू वरच्या थरावर होतीस
तरीही तू वरच्या थरावर होतीस आणि मी सगळ्यात खालच्या > म्हणजे..?
मस्त
मस्त
खरेच , खूप वेगळी गोष्ट
खरेच , खूप वेगळी गोष्ट
किती सुंदर!
किती सुंदर!
प्रेम करता करता एकरूप होऊन जाणं....
माझ्यासाठी तर हीच विनर!!!
छान आहे.
छान आहे.
आजीच्या दोन पितळी पातेल्यांची
आजीच्या दोन पितळी पातेल्यांची मागच्या दिवाळीत एक सुंदर मूर्ती बनवून घेतली, त्यामुळे ही कथा एका वाचण्यात पटकन कळली आणि जास्तच भावली सुद्धा.
> "तरीही तू वरच्या थरावर
> "तरीही तू वरच्या थरावर होतीस आणि मी सगळ्यात खालच्या..." > म्हणजे कोणाच्या मुर्त्या असतील बरे?
∆ याचं उत्तर कळलं आहे का कोणाला? की ते महत्वाचं नाहीय?
कालीमातेची मुर्ती ... बहुतेक
कालीमातेची मुर्ती ... बहुतेक असावी
राधाकृष्ण?!
राधाकृष्ण?!
मस्त आहे.
मस्त आहे.
अर्धनारीनटेश्वराची
अर्धनारीनटेश्वराची
मलाही वरचा थर/खालचा थर कळले
मलाही वरचा थर/खालचा थर कळले नाही. पण बाकी अर्धनारीनटेश्वर संकल्पना आवडली.