बिरडी, ही गणपती बाप्पाच्या नैवैद्यच्या लिस्टमध्ये आमच्या घरात आजीच्या काळी तिसऱ्या दिवशी ठरलेला पदार्थ होता. पहिल्या दिवशी उकड़ीचे मोदक, दुसऱ्या दिवशी नारळाच्या दुधातील
हळदीच पान घालून बनवलेली तांदूळाची खीर , पण तिसऱ्या दिवशीच्या नैवेद्यामध्ये इंस्टंट गुलाबजामने घरात प्रवेश केला आणि हा पदार्थ विस्मरणात गेला होता पण ह्या वर्षी तिसऱ्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्याचा मान पुन्हा मिळवला आणि गुलाबजामला चौथा दिवस दिला.
साहीत्य:
१. तांदूळाच पीठ - 1 वाटी ( ह्यासाठी 1 किलो तांदूळ धुवून सावलीत सुकवून दळून आणावेत)
२. धणे - 1 टी स्पून
३. जीरे - 1 टी स्पून
४. बड़ीशेप - १ टी स्पून
५. किसलेल गूळ - पाव वाटी
६. हळद - १/४ टी स्पून
७. मीठ - १/४ टी स्पून
कृती:
धणे, जीरे आणि बड़ीशेप कोरडी भाजुन घेऊन थोड खड़बडीत कुटुन घ्यावी.
किसलेल्या गूळात पाव वाटी पाणी, हळद घालून गूळ वितळवून घ्यावे. त्यात धणे, जीरे बड़ीशेप घालुन तांदूळाच पीठ घालून त्या पीठाचा मऊ गोळा बनवुन घ्या. पीठ जास्त घट्ट किंवा खुप सैल ही नको. हे पीठ एका पातेल्यात 3-4 तास झाकुन ठेवा.
चार तासांनी पीठ पुन्हा मळून घेऊन त्याचे लिंबा एवढे गोळे बनवून घ्या. ह्या छोट्या गोळ्याची 1 इंच लांब जाड्सर वळकटी करून त्याची दोन्ही टोक जोडून गोल रींग तयार करा. वळकटी मधल्या बोटावर गोलाकार ठेवून रींग बनवतात म्हणजे सगळ्या बिरडया एक सारख्या होतात.
अश्या सगळ्यां गोळ्यांच्या रींग तयार करून घ्या.
कढईंत तेल तापवुन घ्या आणि गॅसची ज्योत मंद ठेवा. ही बिरडी तेलात सोडून तळून घ्या.
बिरडीचा नैवेद्य
वेगळीच पाककृती आहे. छान
वेगळीच पाककृती आहे. छान दिसतेय बिरडी.
अगदी गोलगरगरीत आकार दिलाय.
असे शेंगोळे करतात ,
असे शेंगोळे करतात , बेंदराला मातीचे बैल आणतात , त्याच्या शिंगात घालतात
माझी आई पण करते बिरडी
माझी आई पण करते बिरडी नैवेद्याला. बहुदा धने जिरे शिवाय. आकार ही खूप छोटा असतो. Mini donut सारखा
पुढच्या वेली असे करून पाहीन
मस्त पदार्थ वाटतो आहे. एकदा
मस्त पदार्थ वाटतो आहे. एकदा करून बघेनच. गुड टू सी यू आरती. बक्षिस मिळ व.
छान दिसताहेत बिरडी .
छान दिसताहेत बिरडी .
धन्यवाद शाली दा, blackcat,
धन्यवाद शाली दा, blackcat, मेघा, अमा, रावी.
अमा, खुप छान वाटले तुमचा प्रतिसाद वाचुन.
मेघा, बिरडीचा आकार छोटाच असतो, पीठाची वळकटी मधल्या बोटा वर ठेवून रींग बनवतात म्हणजे सगळ्या बिरडी एक सारख्या आकाराच्या होतात. गणपतीच्या नैवेद्याची गडबड असल्याने दोघा तिघानी बिरडी बनवली आहेत, त्यामूळे आकार ही थोडे वेगवेगळे आहेत.
मस्त आहे कृती. करुन पहाणार
मस्त आहे कृती. करुन पहाणार आणि खाणार..
मस्त आहे कृती. बिरडी
मस्त आहे कृती. बिरडी पहिल्यांदा ऐकली व पाहिली. नक्कीच करून पाहीन.
मस्त कृती आहे. रेडीमेड पीठ
मस्त कृती आहे. रेडीमेड पीठ वापरले तर चालेल का?
किसलेल्या गूळात पाव वाटी पाणी, हळद घालून गूळ वितळवून >>> वितळायचा म्हणजे गरम करायचा का ? का विरघळायचा म्हणायच आहे?
मस्तच आरती. पहिल्यांदा ऐकला
मस्तच आरती. पहिल्यांदा ऐकला हा पदार्थ.
फार फार छान आणि वेगळी पाककृती
फार फार छान आणि वेगळी पाककृती
धन्यवाद अनघा, साधनाताई,
धन्यवाद अनघा, साधनाताई, चैत्रगंधा, वैनी, urmilas
चैत्रगंधा, गूळ पाण्यात विरघळून घ्यायचा आहे, गरम नाही करायचा.
रेडीमेड पीठ वापरून बघा, चवीत कदाचित फरक पडेल.
सुंदर. तोंपासू.
सुंदर. तोंपासू.
किती दिवस टिकू शकतो हा पदार्थ
किती दिवस टिकू शकतो हा पदार्थ?
अमर १९ , आदू धन्यवाद. बिरडी
अमर १९ , आदू धन्यवाद. बिरडी दोन दिवस टिकतात.
वा! वा छान दिसत आहे बिरडी.
वा! वा छान दिसत आहे बिरडी. करून पाहायला हरकत नाही.
मस्त! फोटो झक्कास.
मस्त! फोटो झक्कास.
कौतुक वाटतं तुझं. Keep it up!
मस्त दितायेत बिरडी..
मस्त दितायेत बिरडी..
जयश्री, चिन्नू, मन्या 5
जयश्री, चिन्नू, मन्या 5 धन्यवाद.