सोळा आण्याच्या गोष्टी - मिलन -हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 8 September, 2019 - 07:30

दोघांनी ठरवल्याप्रमाणं घनदाट येड्याबाभळी पसरलेल्या पांदीत आलो होतो. हवा असलेला एकांत आज आम्हाला तृप्त करणार होता. समाज पण निष्ठुर असतो, प्रेमाचं नातं नेहेमीच नाकारतो. आज मात्र आम्हाला मिलनापासून रोखणारं कुणीही नव्हतं. कमालीचा एक्साइटेड मी, तिची आतुरतेनं वाट बघत होतो.

अचानक पाठीमागून ती पुढे आली. मदमस्त यौवना ! डोळ्यांत नशिलेपण होतं. तिच्या सुगंधानं वेडापिसा, घायाळ झालेलो मी; अनावर उर्मीनं तिला बाहूपाशांत आवळलं आणि तुटून पडलो. तिही प्रतीसाद देऊ लागली. ओठांनी ताल धरला. प्रेमवर्षाव होऊ लागला. मी रंगलेलो असतानाच तिनं गुलाबी ओठांच्या पाकळ्या अलग केल्या अन् मुखाद्वारे बाहेर आलेला सुळा लख्खकन् चमकला. भितीनं गर्भगळीत माझ्या कानांवर गडगडाटी शब्द आदळले, "संगीच्या बापानं पाठवलंय मला !"

_हाडळीचा आशिक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chhan

Proud

अजून ट्विस्ट द्यायचा ,
त्याचेही दोन सुळे चमकले , तू येणार हे माहीत होते , मीही हैवान आहे , संगीचा मित्र नव्हे , वगैरे