Submitted by स्वप्ना_राज on 6 September, 2019 - 08:17
‘पोचलात?’
‘निघालोच नसतो तर बरं झालं असतं सुम्या. नकटीच्या लग्नाला कमी विघ्नं आली असतील. आधी टायर पंक्चरला. मग वायपर्स चालेनात. आता अवी तापाने फणफणलाय. आणि इथे बंगल्यावर....हॅलो सुम्या...हॅलो...ऐकतोयस ना?’
‘अतुल, केअरटेकर गायब आहे ना? आणि इलेक्ट्रिसिटीसुध्दा?’
‘तुला कसं कळलं? आम्हाला निघाल्यापासनं रेंजच नाहीये’
‘आत्ताच्या आता निघा तिथून.’
‘सुम्या, भंकस नकोय.’
‘I am being serious. निघा तिथून. ह्या क्षणी. तुमच्या जीवाला धोका आहे.’
‘अरे पण....एक मिनिट....कोणीतरी दार वाजवतंय. केअरटेकर असेल’
‘अतुल, दरवाजा उघडू नकोस’ सुमित जीवाच्या आकांताने ओरडला.
त्याच्या लॅपटॉपवरच्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये कर्सर शेवटच्या ओळीवर थांबला होता.
शब्दसंख्या: 90.
शीर्षक: सोळा आण्याच्या गोष्टी – सनी व्हिला – सुमित_आर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला कळली की नाही हे कळेना
मला कळली की नाही हे कळेना
शब्दमर्यादेने घात झालाय बहुतेक, कथा अजून थोडी फुलवली की बहार येईल.
मस्त.
मस्त.
सुमीत लॅपटॉप वर कथा लिहितोय तसे प्रसंग अतुल बरोबर घडत आहे.
म्हणुन सुमीत ने 90 शब्दांवर कथा थांबवली आहे. म्हणजे 100 शब्द पूर्ण झाल्यावर काय होईल ते आपण ठरवायचे.
हाब यांच्या प्रतिसादामुळे
हाब यांच्या प्रतिसादामुळे कळली. धन्यवाद हाब !
मस्तच!
लेखकांवर १०० शब्दांचं बंधन
लेखकांवर १०० शब्दांचं बंधन घातल्याबद्दल प्रोटेस्ट म्हणून की
शब्दमर्यादा घातल्यावर लेखकाना येणारं फ्रस्ट्रेशन, वाचकांकडे ट्रान्सफर करायचं म्हणून?
कारण काहीही असो चापलुसी आवडली
सुमीत लॅपटॉप वर कथा लिहितोय
सुमीत लॅपटॉप वर कथा लिहितोय तसे प्रसंग अतुल बरोबर घडत आहे. हे कळलं पण सुमित त्या नव्वद मधेच पुढचा दु:खद शेवट लिहून बसलाय का?
बहुतेक म्हणून " ‘अतुल, दरवाजा उघडू नकोस’ सुमित जीवाच्या आकांताने ओरडला " हे वाक्य,
नाहीतर उरलेल्या दहा शब्दात धोका टाळून सुखांत करणे शक्यच आहे की
शब्द संख्या १०० असती तर मात्र सुमितचे ओरडणे एकदम बरोबर ठरेल.
लेखकांवर १०० शब्दांचं बंधन
लेखकांवर १०० शब्दांचं बंधन घातल्याबद्दल प्रोटेस्ट म्हणून की

शब्दमर्यादा घातल्यावर लेखकाना येणारं फ्रस्ट्रेशन, वाचकांकडे ट्रान्सफर करायचं म्हणून? >>कथालेखनासाठी शब्दसंख्येचं बंधन हा कधीच ईश्यू नसतो.
एक अप्रतिम कथा सांगायला फक्त सहा शब्द पुरेसे आहेत हे
अॅकॅडेमिकलीएंपिरिकल एविडंसने प्रुव्ड आहे.माहिती हवी असल्यास तुमच्या धाग्यावर ह्याबद्दल बोलू शकतो.
लिहून बसलाय का? >> सुमीत
लिहून बसलाय का? >> सुमीत मायबोली गणेशोत्सोवासाठी (भय) शशक लिहित आहे. ९० (१०० ही असू शकतात) शब्द लिहून झाले आहेत आणि अतुलचा (सुमीतचा मित्र जो कुठेतरी ट्रीप ला गेला आहे आणि आडजागेच्या घरात ऊतरला आहे जिथे त्यांची व्यवस्था लावण्यासाठी (पन ईंटेंडेड) एक केअर टेकर असणे अपेक्षित आहे) फोन आला.
)
अतुलला प्रवासात ज्या अडचणी आल्या त्या सुमीत जी कथा लिहित आहे त्यात तंतोतंत लिहिल्यासारख्या येत आहेत. म्हणून दार वाजलं तेव्हा सुमीत अतुलला ते ऊघडू नको म्हणून सांगत आहे. कारण सुमीतच्या कथेत बहुधा केअर टेकर तिथल्या पेट्र्न्सना मारत असावा. (टेक्सास चेनसॉ मॅसॅकर
आता ९० शब्दांवर कथा थांबली म्हणजे एक तर सुमीतने आपल्या मित्राबरोबर पुढचे वाईट होऊ नये म्हणून शेवटचे वाक्य खोडले किंवा सुमीतला समहाऊ आपल्याला कथेची प्रेरणा कशी मिळते आहे ह्याची जाणीव झाली आहे.
आता ९० शब्दांवर कथा थांबली
आता ९० शब्दांवर कथा थांबली म्हणजे एक तर सुमीतने आपल्य अमित्राबरोबर पुढचे वाईट होऊ नये म्हणून शेवटचे वाक्य खोडले किंवा सुमीतला समहाऊ आपल्याला कथेची प्रेरणा कशी मिळते आहे ह्याची जाणीव झाली आहे.
मेक्स सेन्स
हाब, पटण्यासारखे आहे.
हाब, पटण्यासारखे आहे.
जबरी!!
जबरी!!
> Submitted by हायझेनबर्ग on
> Submitted by हायझेनबर्ग on 6 September, 2019 - 18:53 > पटलं. हे किल्लीच्या कथेतल्या “माझ्या लिखाणातील घटना प्रत्यक्षात खरोखर घडतात.“ म्हणणाऱ्या लेखकासारखं झालं.
सहा शब्दांच्या कथाबद्दल माहित आहे. माबो , ऐसी दोन्हीवर धागे आहेत.
===
गोष्ट आवडली स्वप्ना.
भारी! मस्तच! आवडली.
भारी! मस्तच! आवडली.
हायझेनबर्ग, अगदी बरोबर. फक्त
हायझेनबर्ग, अगदी बरोबर. फक्त एव्हढंच की ९० शब्द लिहिल्यावर उरलेल्या १० शब्दांत कथेतला नियोजित ट्विस्ट कसा बसवायचा ते न कळल्याने सुमितने लिहिणं थांबवलं होतं. तेव्हढ्यात अतुल आणि इतर मित्रांसोबत जे आपण लिहिलंय तेच घडलंय ते त्याला समजलं. पण त्याने जेव्हढी कथा लिहिली आहे तेव्हढ्याने त्यांच्या जीवाला अपाय होऊ शकतो. म्हणून शेवटच्या दहा शब्दांत त्यांचा जीव वाचवता यावा ह्या धडपडीतून तो अतुलला दार उघडू नकोस असं सांगतो. स्पष्टीकरण दिल्याबद्दल तुमचे आभार!
अॅमी, चापलुसी करायचा काही बेत नव्हता
मला शशकचा फॉर्मॅट आवडतो. पूर्ण कथा लिहून झाल्यावर ती १०० शब्दांत बसवताना नको असलेले शब्द काढून टाकायला कसरत करावी लागते खरी. पण त्यातून आपण किती अनावश्यक शब्द लेखनात घातलेत तेही कळतं.
हर्पेन, वावे, साधना, जव्हेरगंज, सस्मित धन्यवाद
मला खरंच तो फार स्मार्ट टेक
मला खरंच तो फार स्मार्ट टेक वाटला, म्हणजे 'तुम्ही माझ्यावर बंधन घालायचा प्रयत्न केलात तर मी तुमच्या डोक्यात गोंधळ घालून ठेवेन (I will mess up with your head)". लेखक वाचकासोबत असा खेळ खेळू शकतो
९० शब्द लिहून झाल्यावर अतुलचा
९० शब्द लिहून झाल्यावर अतुलचा जीव वाचवण्यासाठी पुढचे १० शब्द सुमितने लिहिले नाहीत ही कल्पनाच मला भारी वाटली. जियो स्वप्ना!
मस्त
मस्त
मस्त फिरवलीये कथा
मस्त फिरवलीये कथा
अमेझिंग! आवडलीच!
अमेझिंग! आवडलीच!
९० शब्द लिहून झाल्यावर अतुलचा
९० शब्द लिहून झाल्यावर अतुलचा जीव वाचवण्यासाठी पुढचे १० शब्द सुमितने लिहिले नाहीत ही कल्पनाच मला भारी वाटली. >>>>>>+१
काय शशक आल्यात हे पुन्हा जाऊन
काय शशक आल्यात हे पुन्हा जाऊन न पहाता ज्या ठळक आठवत आहेत व कथेतल्या भावना काहीही अडथळा न येता थेट मनात पोचल्या त्या >> नो बॅरीयर्स, कावळे, भिती, लिस्ट, डॉ. यादव, बोकलत लाट व चेटकीण , बाहुलीची खिडकी.
बाकी वर प्रतिसादात आलेल्या काहीकाही समजायला सहज नव्हत्या म्हणुन विस्मरण झाले. पुन्हा वाचते.
सॉरी, लिस्ट लगेच समजली नव्हती पण आशय कळल्यावर खुप आवडली होती.
सुनिधी,
सुनिधी,
हा वरचा प्रतिसाद चुकून दिलाय का या धाग्यावर
सुरेख आहे गं कथा. उकल
सुरेख आहे गं कथा. उकल वाचल्यावर कळली व्यवस्थित.
मला ही प्रवेशिका जास्त आवडली
मला ही प्रवेशिका जास्त आवडली नजरेपेक्षा
अर्र.... अॅमी, हो. हा इथे
अर्र.... अॅमी, हो. हा इथे नव्हता द्यायचा. कमाल आहे, कुठे लिहायचा होता ते आठवेना.
पण बहुतेक कुठेतरी लोकांनी आपापल्या आवडलेल्या लिहिल्या होत्या तिथे हवा होता.
मायबोली गणेशोत्सव २०१९ -
भन्नाट
भन्नाट