हा त्रिवेणी/हायकू उपक्रम. यामध्ये आपणास इथे दिलेल्या विषयावर १ त्रिवेणी किवा १ हायकू दोन्ही, किवा दिन्ही पैकी एक सादर करायचे आहे.
त्रिवेणी-
त्रिवेणी या काव्यप्रकारात तीन ओळींची कविता असते. ज्यात पहिल्या दोन ओळी म्हणजे एक शेर असतो जो स्वतःमध्ये एक विषय घेऊन असतो. पण तिसरी ओळ त्या विषयाला एका स्पर्शिकेसारखी स्पर्श करते आणि त्याचा संपूर्ण विषय बदलून टाकते.
१. विषयाचा उल्लेख कोठेही करु शकता. उल्लेख तिसर्या ओळीत व्हावा असे काही नाही.
२. यासाठी मा.बो.आयडी प्रतिक सोमवंशी यांचा हा धागा पहा.
https://www.maayboli.com/node/70374
हायकू-
हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी. काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे.
१. विशिष्ट विषयावर १ हायकू रचायचा आहे, हायकू ३ ओळींचा असावा.
२. हायकू मुक्तछंद असतो, पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायकू आढळतात, तसेही चालेल.
३. पारंपारिक जपानी हायकू सतरा मात्रांचा (सतरा जपानी सिलॅबी) असतो. अर्वाचीन काळात हे बंधन पाळले जातेच असे नाही.
४. विषयाचा उल्लेख तिसर्या ओळीत व्हावा आणि पहिल्या दोन ओळींचा असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध त्या विषयाशी असायला हवा. जो तिसर्या ओळीत दिसला पाहिजे
५. हायकू बद्दल अधिक माहितीसाठी येथे एक लिंक दिली आहे.
http://www.wikihow.com/Write-a-Haiku-Poem
उदा.
त्रिवेणी आणि हायकूसाठी विषय - धरती
त्रिवेणी-
गडगडाट झाला चिंब धरती.
भरुन आले मेघ
मला दिसे गालावरी, तुझ्या आसवांची रांग.
हायकू-
हिरवी पाने अन रंगीबेरंगी फुले
सरीता गाते गोड गाणे
सजली धरती चैतन्याने.
ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:
१. हा उपक्रम गणेशोत्सवाचे दहा दिवस (दिनांक ०२ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०१९) चालेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार ०२ सप्टेंबरपासून दररोज सकाळी ११ वाजता (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाणवेळ) नव्या विषयाचा नवा धागा काढला जाईल. आणि त्यानंतरच्या २४ तासात त्या विषयावर हायकू आणि त्रिवेणी या उपक्रमात भाग घेणाऱ्यांनी प्रतिसादातच रचायचा आहे.
२४ तासांनंतर पहिला धागा वाचनासाठी खुला असेल.
२. हायकू आणि त्रिवेणीसाठी दोन दिवसांनी नवा विषय नव्या धाग्यात दिला जाईल.
३. एक आयडी एकाहून अधिक हायकू आणि त्रिवेणी रचू शकेल.
४. एका प्रतिसादा वेळी एकच हायकू किवा एकच त्रिवेणी द्यायची आहे.
५. भाग घेणाऱ्यांनी एका प्रतिसादा वेळी हायकू आणि त्रिवेणी दोन्ही किवा दोन्ही पैकी एक सादर करायचे आहे.
फक्त हायकू किवा फक्त त्रिवेणी देखील ग्राह्य धरली जाईल..
६. दोन्ही प्रकारांमध्ये स्व-रचीत रचना असावी.
७. वरील नियमांनुसार तयार न होणारी रचना, 'हायकू आणि त्रिवेणी' यामध्ये ग्राह्य धरली जाणार नाही.
उपक्रमाचा आजचा विषय पुढील प्रमाणे.
विषय १. स्वप्न- तर चला ईथे करूया 'स्वप्न' या विषयावर
हायकू आणि त्रिवेणी.
उपक्रमाच्या इतर विषयांसाठी कृपया पुढील प्रमाणे. लिंक पहा.
विषय २.https://www.maayboli.com/node/71308
विषय ३.https://www.maayboli.com/node/71309
विषय ४.https://www.maayboli.com/node/71310
विषय ५. https://www.maayboli.com/node/71311
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
! गणपती बाप्पा मोरया!
भारी आहेत एकेक स्पर्धा!!!!
भारी आहेत एकेक स्पर्धा!!!!
त्रिवेणी
त्रिवेणी
मनात रुजतात
डोळ्यात दिसतात
स्वप्ने खरंच जगायला शिकवतात.....
हायकू
रंगीत स्वप्ने अन लोभस स्वप्ने,
पण कधीकधी मात्र
डोळे ओलावतात हीच स्वप्ने
स्वप्ने बघावीत, त्यात रमावे
स्वप्ने बघावीत, त्यात रमावे ही
साकारावीत जमतील तेव्हढी, जमतील तशी
पण एखादे स्वप्न ठेवावेच अपूर्ण, जगण्याला कारण म्हणून!
स्वप्नांचा हिंदोळा, तेच
हायकू-
स्वप्नांचा हिंदोळा, तेच स्वप्न लोचनी
दिवा स्वनात रमावे असे ,
दिसे तेच स्वप्न, कधी झोपेतूनी !
आभा, स्वरुन - छान रचना.
आभा, स्वरुप - छान रचना.
रंगीत स्वप्नं झाली धूसर
रंगीत स्वप्नं झाली धूसर
जेव्हा पावसाने आणला महापूर
न हरता पुन्हा ऊभे राहिलो, केला अडसर दूर..
स्वप्न साकार झाले,
स्वप्न साकार झाले,
मन भरुन पावले.
परत नविन स्वप्न पाहू लागले..
मना एकची छंद
मना एकची छंद
पाहू स्वप्ने बेधुंद
विहरु जगात स्वच्छंद..
हायकू
हायकू
स्वप्न लोचनी,
जिद्द पंखी माळली....
घेते भरारी!
------------
स्वप्न की सत्य?
जिथे जिथे पाहतो
दिसतेस तू!
----------------
नशा चढली
कवेत आले तारे
स्वप्नांचे वारे!
स्वप्न
स्वप्न
असेच पहा
जे झोपूही नाही देणार!
स्वप्नांचा बांधून झुला उंच
स्वप्नांचा बांधून झुला उंच उंच जावे
ताऱ्यांसह आकाश सारे हाताला लागावे
चिंब भिजुनि मन माझे चांदणवर्खी व्हावे
स्वप्न पडले
स्वप्न पडले
मग यत्न घडले
नाव जाहले
(हे बहुतेक हायकूच्या नियमात बसेल)
जमलं की स्वरूप!
जमलं की स्वरूप!
सगळ्यांनीच छान केल्यात,
सगळ्यांनीच छान केल्यात, आवडल्या.
रणरणती दुपार निष्पर्ण
रणरणती दुपार निष्पर्ण एसीच्या वार्याचा झोत
चकाकते स्नो फ्लेक्स वाढवताहेत ढिगार्यांची उंची
छे! मनासारखी स्वप्नंही पडत नाहीत हल्ली!
स्वप्न ते मनात बीजरुपी रुजते
स्वप्न ते मनात बीजरुपी रुजते
जीवनात येताना एकेक पाऊलं मोजते
अस्तित्वात मात्र खुप किंमत मोजावी लागते
ताऱ्यांचा एखादा झुला दे मजला
ताऱ्यांचा एखादा झुला दे मजला
चंद्राच्या भूमीवर बंधू दे बंगला
सगळं मिळेल, फक्त तुझ्या कुशीतच हवंय मला!
माझ्या मनात तु
माझ्या मनात तु
माझ्या श्वासात तु
माझ्या स्वप्नातही तुच तु
नशा चढली
नशा चढली
कवेत आले तारे
स्वप्नांचे वारे! >>>> छान!
त्रिवेणी:
त्रिवेणी:
जुळलेली मने, नाते गुण्यागोविंदाचे
जगात शांती, भरते आनंदाचे
होईल का कधी खरे, हे स्वप्न विधात्याचे?
हायकू:
हायकू:
जुनी असतात, नवी असतात
तुझी, माझी सगळ्यांची असतात
पण पूर्णापेक्षा अपूर्ण स्वप्नंच जास्त असतात
हायकू
हायकू
मी माझ सुख
ओंजळ भरलेली
स्वप्नी राहिली
हायकू
हायकू
रमते स्वप्नी
मी बागेत फुलांच्या
जगी उद्याच्या