मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

बहुतेक स्पर्धा मधेच सोडली आणि पैसे घेतले, तुम्ही स्वतः:ला ट्रॉफी चे दावेदार मानत नाही पैसे घेउन बाहेर पडता असं काहीसं फिलिंग असेल-- nahitari ti swatala davedar manat navhatiche he tine baher alyavar bolun pan dakhaval ki mala manatun vatatach hot tumhi doghach shevatache don candidate asal as.jar tila as kuthetari manat vatat hot tar accept karayala kahich harakat navhati

दीपक ठाकुरने बरोबर केलं, कोणीही श्रीसन्त - दीपिका सारखे २ स्पर्धक उरल्यावर हा विचार केला असता , तेही पैशाची गरज असताना.
त्याला २० लाख मिळाले आणि नंतर सलमानखानी सांगितलं कि तो खरच तिसर्या नंबरवर होता, वाइज डिसिजन !

Deepanjali barobar bolates.Nahitari Shivani ne "Veena finale madhe yeu naye mhanun" Jo abhutpurv atapita kela Ani winner chi 25 lakhachi amount 17 lakhavar anun thevli tich kami keleli cost veena la jar milali Asti tar shivaniche sagale prayatna dhulila milale aste.nidan tya karata tari veena ne game Cha ek part mhanun money bag accept karayala pahije hoti

मलाही वाटलं कि ऑफर १० लाख केल्यावर घ्यायला हवी होती वीणाने, तिला माहित होतं तिच्या जिंकायचे चान्सेस कमी आहेत ते.>> +१
इकडे तिच्या फॅन्सला पण माहिती होते की ती पहिल्या कमीत कमी दोनमध्ये येणार नाही. येथे स्पर्धकाने तेव्हा रिस्क घ्यायची जेव्हा तो पहिला नाही तरी दुसरा तरी येण्याची शक्यता असेल.. जसं गेल्या वेळेला पुष्कर आणि स्मिताने घेतली होती.

इकडे शिवचे चान्सेस जास्त होते आणि तो व वीणा एकाच ग्रुपमध्ये होते आणि नेहा वीणा पेक्षा वरचढ होती. त्यामुळे वीणाची धाव जास्तीत जास्त तिसर्या नंबरावर होती..कदाचित किशोरी पहिल्या तीन नंबरची दावेदारी होती म्हणजे तिने सर्व हेलकावे खाल्ले होते..ती सर्वाची बोलत होती...

बहुतेक स्पर्धा मधेच सोडली आणि पैसे घेतले, तुम्ही स्वतः:ला ट्रॉफी चे दावेदार मानत नाही पैसे घेउन बाहेर पडता असं काहीसं फिलिंग असेल >>> करेक्ट. स्वत:वर विश्वास ठेऊन वीणा खेळलीय. तिने स्पर्धा पैसे घेऊन सोडता कामा नये असं मला तरी वाटत होत. ती म्हणाली ना पैसे कमावता येतात पण voters नी votes दिली आहेत, त्यांचा रिस्पेक्ट करते. कुठेतरी दुसरी येऊही शकते असंही वाटत असेल की.

एनीवे मला आवडलं ते, दुसऱ्याला आवडावे असं नाही. मी इमोशनल विचार जास्त करणारी वाटते मला कधी कधी, practical विचार करण्यापेक्षा.

nahitari ti swatala davedar manat navhatiche he tine baher alyavar bolun pan dakhaval ki >>> मला वाटत होतं तुम्ही दोघे असणार हे कदाचित सर्व शिव नेहा करत होते म्हणून असणार, ती ठामपणे नाही म्हणाली की तुम्ही दोघेच असणार असं वाटत होते.

तिला जर कुठेतरी वाटलं असेल आपण असूही शकतो तर तिचे फार चुकीचं नव्हतं. नेहा आणि तिच्यात votes मध्ये फार अंतर नसणार, नेहा निसटत्या मताने पुढे असेल.

इकडे तिच्या फॅन्सला पण माहिती होते की ती पहिल्या कमीत कमी दोनमध्ये येणार नाही. >>> येऊही शकते पण आणणार नाहीत कदाचित असं वाटत होतं मला. कारण channel hint देत असते त्यानुसार शिव नेहा ची नावे पुढे येत होती.

आता बाहेर आल्यावर सगळ्यांनाच reallity लक्षात येईल आपण किती लोकप्रिय होतो आपल्याला किती शिव्या होत्या आणि नेहाला तर कळेल की आपण जेमतेम दुसऱ्या आलो आहोत.

आता शिव विणा काय करत असतील आपापल्या घरी, असं वाटतय. त्या दोघांचं सगळं छान होउ दे असं वाटतय >>> हो गं, आमेन.

बाहेर पडल्यावर आपण यावर फार विचार करायचा नाही, त्यांचं आयुष्य ते बघतील असं ठरवलं तरी मनात येतंच हे. बाकी शिव जिंकला तिथे वीणा जिंकली, सगळे शिवला वीणाबद्दल विचारतात Lol

त्यामुळे नेहा शिवानीपेक्षा विनीचं नाव जास्त येतंय आणि मिडीयाला पण त्यात इंटरेस्ट जास्त आहे.

किशोरी बाहेर यायच्या आधी तिच्या नवर्‍याशी आणि मुलाशी थोडंसं बोलले होते. >>> अच्छा, thank u भरत.

Mi veena chi fan ahe ani tine money bag nakaran mala swatala nahi patal.voters cha respect mhanje kay asat?ti spardha khelayala ali ahe ani paise kamvayla.bar ticha voters na mahiti hot.neha Ani shiv tichapeksha strong ahet.tyamule tyanna vait vatayacha prash yet nahi.any way he Maz mat.tuz mat ani maz mat vegal ahe hech khar

Ulat baher yeun tine Shivani la bolun dakhavayala pahije hot.mi nomination madhe yav mhanun evadha atapita kelas Ani winner chi price money 25 lakhs Varun 17 lakhavar anlis.tari shevati varche 8 lakhs mi kamavale ki nahi?changala chance ghalavala veena ne shivanila bolayacha

सुजा, पॉइंट है. टॉप थ्री मध्ये ती प्रेक्षकांच्या कौलावरच पोचली होती. टॉप थी वाल्यांनाच मनी बॅगची ऑफर असते हे जुन्या प्रेक्षकांना तर माहीत होतंच.

हो सुजा, मला माहितेय. Actually माझ्यापेक्षापण तू जास्त वीणाची fan आहेस. मी पहिली शिवची मग वीणाची अशी होते.

Ulat baher yeun tine Shivani la bolun dakhavayala pahije hot.mi nomination madhe yav mhanun evadha atapita kelas Ani winner chi price money 25 lakhs Varun 17 lakhavar anlis. >>> हो हे तिने बिनधास्त बोलायला हवं होतं.

पण समहाऊ मला अजूनही तिने नाही घेतली हे बरं झालं, हेच वाटतंय.

काल शिवानी गेली तो सीन मी परत बघितला, बऱ्याच जणांनी वीणाला कौल दिला, ती आत असेल असा त्यात बाप्पा, सुरेखाताई, रुपालीही होते. बिचुकलेने दिला ते बघून वीणा स्वत:च सरप्राईजड. पण जास्त कौल वीणाला मिळाला हे बघितल्यावर शिवानीचा चेहेरा सॉलिड पडला आणि रिझल्ट तसाच आला.

वीणाच्या आईने मात्र मनाची तयारी केलेली, आत्ता ती बाहेर आली तरी चालेल. शिवानीने एवढं आत बाहेर करून, तिला negative दाखवूनही तिची आई, ती top २ मध्ये येईल विचार करत होती.

विनाने मनी बँग ऑफर न स्विकारण्यामागे हे पण असू शकतं न की तिला वाटलं असेल की, पहिल्या तीनात आहे म्हणजे विनींग चान्स आहे, तिला बाहेरचं काही माहीत असने शक्य नव्हते आणि ५०-५० शक्यता असताना कुणीही ही संधी नक्कीच सोडणार नाही. पैसा मिळविता येईल,संधी सोडल्याची खंत नाही राहणार तिला.

दुसर्‍या नंबरला काय रक्कम असते?

काहीच प्राईज मनी नसतो काय दोन आणि तीनला?
जर काहीच नसेल मिळणार तर रक्कम घेणे उत्तम.

छान फोटो कपकेक >>> हो क्युट आहेत.

विनाने मनी बँग ऑफर न स्विकारण्यामागे हे पण असू शकतं न की तिला वाटलं असेल की, पहिल्या तीनात आहे म्हणजे विनींग चान्स आहे, तिला बाहेरचं काही माहीत असने शक्य नव्हते आणि ५०-५० शक्यता असताना कुणीही ही संधी नक्कीच सोडणार नाही. पैसा मिळविता येईल,संधी सोडल्याची खंत नाही राहणार तिला. >>> याच्याशी सहमत.

शिव आणि नेहाचे contract नव्हते.

शिव व नेहा विजयाचे दावेदार असल्याने त्यांनी मनी बँग ऑफर स्वीकारली नाही

वीणाचे channel बरोबर "Contract" होते म्हणून तिने मनी बँग ऑफर स्वीकारली नाही

ओके असेल तसंही. म्हणजे channel ची आहे हे माहिती आहे आणि तिला पैसेही तिथे राहायचे ह्या दोघांपेक्षा जास्त मिळायचे असंही वाचलं कुठेतरी मागे. त्यामुळे ती इतके दिवस राहून मालामाल झाली असेल.

आता ते पैसे किती कोणाला मिळतात आठवड्याला, ते खरं का खोटं ते माहिती नाही पण त्यानुसार तिने बारा ते पंधरा लाख कमावले बहुतेक. चांगलं आहे, काही महिने काम मिळालं नाही तरी आरामात राहू शकते. मिळेल काम म्हणा पण तरीही.

फायनल आज बघितली, परफॉएमेन्स स्किप केले काही काही, सुरेखा ताइचा बघितला, त्या लाइव्हली आहेत खुप, फार शिकलेल्या नसुन कस आणी काय बोलाव हे कळत त्याना
फायनलिस्ट मधे नेहा चा ड्रेस चान्गला होता, शिवानीचा एकदम बेकार काहितरी होता, वीणाचा ठिक होता, ती खुश दिसत होती आहे त्या पोझिशिनमधे
नेहा हसताना रडयासारखि दिसत होती, मिक्स इमोशन असणे अगदी स्वभाविक आहे.
शिवानी आणि वीणा मधे मेजॉरिटॉ स्पर्धक वीणाच नाव घेत होते तर तिकिट तु फिनाले चॅनेल द्वारे फिक्स केल गेल होत ज्या योगे शिव साठी पब्लिकने वोट कराव हे क्लियर कळत होत.
एव्ही दाखवल्यापासुनच शिवानीच विमान धाडकन जमिनिवर आपटवल होत त्यामुळे तिला आतुन कळुन चुकल असाव की चॅनेलने तिचा पुरेपुर उपयोग करुन घेतला ती जिन्कण्याची सुतराम शक्य्ता नाही.
बिचकुले च्या बाबतित काय बोलणार आधिच मर्कट त्यात मद्य प्याला अशी सगळि अवस्था, कितीही सन्धी मिळाल्या तरी त्याच्या चिखलच करायचा अस ज्याने ठरवलय त्याला काय बोलणार
फायनलला सुद्धा त्याला ममानी डोस पाजले म्हणजे हा सिझन किती यशस्वी म्हणावा नक्की?
शिवची आइ अगदी साधी आहे त्यामुळे त्या सारख बहिण मान ची टेप वाजवत राहिल्या, त्या सगळ्यात सुद्धा शिवानी सतत प्रॉम्प्ट करत होती.ते सगळ टिझिन्ग अतिशय ऑकवर्ड वाटत होत.
तिसर्‍या पोझिशन वर येवुन सुद्ध वीणा मात्र खुश दिसत होती, शिव जिन्कला तेव्हा शिवानी आरतिला वाजवतो तशा टाळ्या वाजवत होती.
शिव गेम खेळला असेल बरा पण त्याच इग्लिश अगदिच सुमार असाव, ममानी त्याला तु ब्लश करतोयस म्हटल तर त्याला काहीही कळल नाही.
.

शिव गेम खेळला असेल बरा पण त्याच इग्लिश अगदिच सुमार असाव, ममानी त्याला तु ब्लश करतोयस म्हटल तर त्याला काहीही कळल नाही.>>>>>>>>मला नाही वाटत, कधीकधी सगळ्या गोंगाट आणि excitement मध्ये नीट ऐकू आलं नसेल. त्याला आधी पुष्कर चं नाव पण नीट ऐकू आलं नव्हतं त्याने ह्या दोघींना विचारलं कोण येतय आत, (कोणीच पुष्कर चं नाव ओळखू शकले नव्हतं, स्मिता मेघा वाटले आधी त्यांना)
ब्लश हा नक्कीच माहिती असेल त्याला. अशिक्षित नाहीये तो आणि इनफ स्मार्ट आहे

शिव आणि नेहाचे contract नव्हते. वीणाचे channel बरोबर "Contract" होते म्हणून तिने मनी बँग ऑफर स्वीकारली नाही>> ?
अस कसं... लिगल टर्म्स तर सगळ्यांबरोबर असणार... आणि वीणाला पर्याय होता म्हणूनच त्यांनी तिला मनी ऑफर केली असणार ना...

त्यांना बहुतेक असं म्हणायचं असेल, वीणा चॅनेलची त्यामुळे bb बरोबर channelशी वेगळे contract असावं. बाकी सगळ्यांचे endemol शी असेल म्हणजे production कंपनी पण वीणाचे तिथे आणि channel शी असेल. वाचताना मला असं वाटलं.

ब्लश हा नक्कीच माहिती असेल त्याला. अशिक्षित नाहीये तो आणि इनफ स्मार्ट आहे >>> इंजिनियर आहे ना. तो शब्द त्याला लक्षात यायच्या आत, शिवानी पचकली ना, आई गाल लाल करणार वगैरे. ती तर काय प्रेक्षकांनी बाहेरचा रस्ता दाखवला तरी शिव वीणावर जळायचं थांबेना.

त्यांना बहुतेक असं म्हणायचं असेल, वीणा चॅनेलची त्यामुळे bb बरोबर channelशी वेगळे contract असावं. बाकी सगळ्यांचे endemol शी असेल म्हणजे production कंपनी पण वीणाचे तिथे आणि channel शी असेल. वाचताना मला असं वाटलं.
>>>
बरोबर मला हेच म्हणायच आहे

शिव होता live, अर्थात तेव्हा मी नाही बघितले पण आत्ता बघतेय. त्याला त्याच्याबरोबर top २ ला वीणा हवी होती. नेहा चांगली player पण वीणाचा गेम आणि task मधला विचार आणि लेवल त्याला जास्त आवडायची असं म्हणाला. माझी आई निवळतेय वीणाबाबत, ती होईल तयार म्हणाला. मस्त एकदम निरागसपणे बोलत होता. पूर्ण नाही बघितला interview.

लोकमतच्या पूजा बोरकरने जिंकल्यानंतर शिवशी संवाद साधला त्यात ती म्हणाली आहे की शिवानीने शिवच्या आईचा फोन नं. घेतला आहे आणि ती आता त्यांना बरंच काही तिखट मीठ लावून सांगणार का? तेंव्हा शिव म्हणाला, 'हो ती मीठ मसाला लावून नक्कीच सांगेल. घरच्यांना समजावणं मला कठीण आहे आणि आता शिवानीमुळे दुप्पट कठीण होईल.' अतिशय वाईट व्यक्ति आहे शिवानी... खरंतर वीणा शिव साठी life partner म्हणुन योग्य आहे असं मला पण नाही वाटत. त्याला वीणा पेक्षा खूप चांगली आणि प्रेमळ मुलगी मिळू शकते.. पण शिवानीचं overall वागणं किती विचित्र आहे.. खरंतर शिवच्या घरच्यांनी तिची चांगली जिरवली पाहिजे.. पण ती खूप साधी आणि गोड माणसं आहेत..
रच्याकने शिव माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीचा चुलत भाऊ आहे.. तो जिंकला त्या दिवशी कळलं मला..

रच्याकने शिव माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीचा चुलत भाऊ आहे.. तो जिंकला त्या दिवशी कळलं मला.. >>> अरे वा मस्त.

शिवानी भोचकपेक्षा क्रूर वाटायला लागली आहे. ते बघतील ना त्यांचे. बाहेर पडल्यावर तुला काय करायचं आहे, आत छळत होतीस तेवढे बास नव्हतं का. ती तर शिवला आलतू फालतू समजत होती, सोने लागलं आहे का त्याला मग आता का.

शिव आज वीणा केळकर वैशाली सर्वाना भेटणार. सात तारखेला तो वीणाला घेऊन अमरावतीला जाणार, आठला त्याचा बड्डे तिथे आणि नऊला मुंबईत होणार आहे. पब्लिक प्रश्न विचारत होते त्यांची उत्तरे देत होता, तेव्हा समजलं हे.

त्याला तसं सर्वांशी मैत्री ठेवायला आवडेल पण जास्त जवळचे अर्थात विनी, केळकर, वैशालीताई आणि हीना. हीना वीणा कडे बाप्पाला गेली होती तो व्हिडीओ बघितला.

. ते बघतील ना त्यांचे. बाहेर पडल्यावर तुला काय करायचं आहे, आत छळत होतीस तेवढे बास नव्हतं का. ती तर शिवला आलतू फालतू समजत होती, सोने लागलं आहे का त्याला मग आता का.>>हे कधी झालं?

Pages