दु:ख कशाला?
दु:ख कशाला? घडून गेले प्रक्तनात जे घडावयाचे
जीवनात का ठरवुन जमते कधी कुणाला हसावयाचे?
हातावरचे पोट भराया वर्तमान मी जगतो आहे
खुशीत असतो मला न आहे स्वप्न उद्याचे बघावयाचे
जिवापाड मी जपले होते पंखाखाली सर्व पिलांना
ठीक म्हणाले ! जरी ठरवले दूर तयांनी उडावयाचे
आचमनाला अजून भ्यावा समुद्र का? हे मला न कळले
आज अगस्ती विसरुन गेला केशव माधव म्हणावयाचे
अर्थ धोरणे चुकली नव्हती खास आखली होती त्यांनी
श्रीमंतांना मलिदा आणी आम जनांना लुटावयाचे
शेतकर्यांचा निधी हरवला, शोध घ्यावया लवाद बसले
अहवालाला विलंब, तोवर फाशी घेवुन मरावयाचे
सावित्रीचा पत्ता नाही सत्त्यवानही कुठे दिसेना
कर्मकाण्ड का करती सारे वटवृक्षाला पुजावयाचे?
काळी करनी, काळी पात्रे, काळी शाई, मला कळेना
इतिहासाच्या पानावरती शुभ्र कसे मी लिहावयाचे?
सर्व मुलांनी "निशिकांता"ची अंत्यक्रियाही झटपट केली
संपत्तीचे वाटे त्यांना लगेच होते करावयाचे.
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
छान.
छान.
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
सुंदर
सुंदर
इतिहासाच्या पानावरती शुभ्र
इतिहासाच्या पानावरती शुभ्र कसे मी लिहावयाचे? ..........
पुन्हा जन्माला यावे हिज सदीच्छा
छान व अप्रतिम