शब्दधन कथा स्पर्धा (मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.)

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

shabda dhan.jpg
---
या वर्षीच्या गणेशोत्सवात तीन कथालेखन स्पर्धा विषय आहेत.

१) चंद्र अर्धा राहिला.
अवकाशातील काल्पनिक घटनेवर कल्पनाविस्तार करून कथा लिहायची आहे.
दुवा: https://www.maayboli.com/node/71285

२) हास्य लहरी
विनोदी कथा लेखन स्पर्धा.
विषयाचे व शब्दाचे कोणतेही बंधन नाही.
दुवा: https://www.maayboli.com/node/71288

३) सोळा आण्याच्या गोष्टी.
शतशब्द कथा स्पर्धा.
दुवा: https://www.maayboli.com/node/71287

प्रत्येक स्पर्धेविषयी विस्तृत माहिती व नियम त्या धाग्यांवर मिळतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक,
गझल स्पर्धेचा दुवा गणेशोत्सवाच्या पानावर आता दिसत आहे. तो उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
पण दुव्यावर टिचकी मारल्यास पान हरवल्याचा संदेश मिळतो आहे. तुमच्या लेखनात देखील त्या स्पर्धेचे पान दिसत नाहीये, कृपया जरा काय प्रॉब्लेम आहे बघता का?
दुसरीकडे कुठे विचारावे ते न समजल्याने इथे विचारत आहे.

संयोजक,
गझलेच्या स्पर्धेचा दुवा चालत नाहीये, त्याचे काहीतरी करा ना?
दुवा चालत नाहीये तोवर निदान गझलेच्या धाग्याची लिंक देऊ शकता का?

परीक्षक मंडळ ,
माबोच्या साऱ्या गणेशोत्सव उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा !

फक्त एक शंका - शंभर शब्दात रहस्य कथा लिहिणे अवघड आहे ; तरी शंभर शब्दांचा नियम हा अगदी काटेकोरपणे लावला जाणार आहे का ?
हे स्पष्ट केले तर साऱ्याच लेखकांना ते बरे पडेल .

पुन्हा एकदा आभार आणि शुभेच्छा .

शशक स्पर्धा असल्याने शब्दमर्यादा बंधन कारक आहे.

शशक मध्ये आनंदी, दुःखी, प्रेम,भय अश्या कोणत्याही प्रकारची कथा चालेल. पण त्या मध्ये काहीतरी रहस्य आणि उकल असली पाहिजे.

संयोजक,
अहो तुम्हाला माझे वरचे दोन प्रतिसाद दिसले नाहीत का?
गझल स्पर्धेचा दुवा काम करत नाही हे तुमच्या निदर्शनास आणून देऊन दीड दिवस होऊन गेला.
दुवा काम करत नाही तर स्पर्धेच्या माहिती अभावी आम्ही स्पर्धक भाग कसे घेणार आणि मग स्पर्धा कशी पूर्ण होणार?
तो दुवा दुरुस्त करा हो लवकर.

खरच की. मी गझलांची वाट पहात होतो. त्या पानावर क्लिक केल्यावर हे पान सापडत नाही असा मेसेज येतो आहे.

शाली,
मला वाटते संयोजक मंडळातले सदस्य एकमेकांचे जुने लेखन खोदून त्यांची प्रशंसा करण्यात गुंग असल्याने त्यांना
स्पर्धेचे दुवे चालत नाहीत,
स्पर्धकांनी स्पर्धेविषयी शंका विचारल्या आहेत,
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तत्परतेने स्पर्धकांच्या शंकांचे निराकारण होणे जरूरी आहे

वगैरे शुल्लक बाबींकडे लक्ष द्यायला वेळ होत नसावा.