मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

खरं की काय, मला नाही दिसलं youtube वर.

गणपतीबाप्पा मोरया.

शिव जिंकला असेल तर, न ओळखता पहिल्या आठवड्यापासून त्याला सपोर्ट केला आणि तो जास्तच आवडत गेला ह्याचं सार्थक झालं.

माझे आवडते 2 मागच्यावर्षी पण एक आणि तीन नं वर होते आणि यावेळी पण.

थोडी चुटपुट एवढीच की शिव वीणा शेवटी हवे होते मनातून.

एनिवे शिवसाठी very happy. परत एकदा गणपतीबाप्पा मोरया.

धन्यवाद bb शिव डीझर्व्हिंग होताच आणि आमच्या जनमताचा तुम्ही आदर केलात. आज भरून पावले शिवमुळे, मी, इतके दिवस बघितलं, इथे लिहिलं काहींना आवडलं त्यांना धन्यवाद तर काहीजण इरिटेट झाले त्यांना sorry.

>>Only good thing about this season is finally a deserving winner<< +१
मस्त जर्नी होती शिवची. एक चावण्याचा इंसिडंस सोडला तर अगदि फ्लॉलेस. नो बडी शुड कंप्लेन ऑर बी एन्वियस...

Only For Neha

"Loosing is better which makes you humble than winning which makes you arrogant"

कुठल्या पाच जणांची complaint करायची म्हणत होते ते सुरवातीला?
>>पाच जण म्हणजे टॉप 6मधले किशोरी ताई सोडून उरलेले 5जण धनुडी.

चला छान झाले. शिव फॅन्स ना कॉन्ग्रॅट्स! लोकांचा प्रचंड सपोर्ट होताच शिव ला. सो डिझर्विंग प्लेयर जिंकला !

आरोह माधवशी बोलताना ' मी दुसर्या ग्रुपशी बोलायला गेलो तर ती पझेसिव होते. बोलत नाही माझ्याशी' म्हणाला. कुणाबद्दल होत ते? शिवानीबद्दल? >>>नाही सुलू तो वीणा बद्दल बोलत होत की तिच्या ग्रुप मधले म्हणजे शिव केळकर जर दुसर्यान शी बोलायला गेले तर वीणा पझेसीव होते.

जर पराग चा प्रसंग घडला नसता तर नेहा ही विनर झाली असती.
मला शिव आवडत होता पण वीणा अजिबात नव्हती आवडत. नेहा ला लाईट बंद करायला मिळाले ते चांगले झाले.

नसती आली नेहा, परागने विरूद्ध प्रचार केला नसता तरीही.

बऱ्याच जणांना ती आधीपासूनच आवडत नव्हती, त्यात मीही एक होते. तिला votes मिळत नव्हती एवढी, तिच्यासाठी फिल्म industry तल्या बऱ्याच जणांनी अपील करूनही ती कधी 2 कधी 3 कधी 4 होती. वीणा आणि शिवानीने तिला जाम टफ दिली, विणाने जास्त.

शीवमागे तर सामान्य लोकांपासून हिंदी इंडस्ट्री पाठीमागे होती, दुसरं कोणी voting मध्ये त्याच्या जवळपास पण पोचणार नव्हतंच.

शिवला पुढच्यावर्षी पाठवा हिंदीत पहिल्यापासून, आता मधेच wild card एन्ट्री नको प्लिज. लगेच सुरू होतंय ना, त्यांचे स्पर्धक ठरलेत.

वीणामुळे शिवचा गेम बिघडतो, तो हरणार हे म्हणणाऱ्या घरातल्या आजी माजी सर्वांना आज चांगलं उत्तर मिळालं. अगदी चपराक, खरंतर.

एनिवे घरातून बाहेर पडलेली लोकं तुम्हाला फिनालेला नेऊ शकतात, जिंकवून देऊ शकत नाहीत, त्यासाठी पब्लिक matter करते हे सिद्ध झालं, ही समाधानकारक गोष्ट.

म मां ना लंडनचा उल्लेख करायला फार आवडतो, पुष्कीसारखा.

पुष्कर सु न ध्या न चा co-anchor आहे स्पृहाबरोबर, प्रोमोज दाखवतायेत.

शिव वीणा परफॉर्मन्स फार गोड, अगदी cute झाला. म मांनी पण कौतुक केलं. हिनाने बसवला, वीणाने तिला क्रेडिट दिलं.

शिवानी बाहेर पडली वीणाआधी, जबरी खुश मी. वीणा आत असेल शिवानी बाहेर बऱ्याच जणांनी सांगितलं अगदी बिचुकले यांनीही.

शिवानी अजूनही जळतेय शिव वीणावर, म मां नी शिवचे गाल लाल दिसतायेत, blush होतोय म्हटल्यावर लगेच आई आता त्याचे गाल लाल करणार म्हणाली, कित्ती ग बाई जळू तू शिव वीणावर.

अजुन एक पुन्हा एकदा प्रुव्ह झालं कि निगेटिव पर्सनॅलिटीज कितीही चॅनलच्या लाडक्या असल्या, बर्यापैकी सपोर्ट असला तरी जिंकत नाहीत.
त्या बीबी अवॉर्ड नाइटमधे गंमत म्हणून जरी असली तरी एकाही निगेटिव नॉमिनेशनमधे शिव नव्हता, याउलट नेहा होती !
‘उचलली जिभ लावली टाळ्याला’ नॉमिनेशनमधे तर नेहा प्रॉपर व्हिलन दिसत होती अनेकांवर उगीच ओरडताना, भयानक कर्कश्श !

शिवच्या आईला स्टेजवर बोलाऊन खूप एम्बॅरस केलं म मांनी. त्या खुश नव्हत्या, जबरदस्ती लग्न, विहिणबाई etc काय ते. शिव आईला घाबरतो असं दाखवलं त्याने, पण त्याला करायचं तेच केलं त्याने खुणेने.

शिवने उजवा हात वीणासाठी आणि डावा केळकर, वैशालीसाठी दिला. वीणा काळजी करू नकोस बघ तू आहेस माझ्याबरोबर लाईट्स बंद करताना, हा हात तुझा असं म्हणाला, so sweet.

किशोरीला पण अवार्ड भेटलं. मला वाटलंच होतं की popular choice शिव झाला तरी critics choice ताई असायला हव्यात. ते झालं.

नेहाचा पुष्कर जोग करुन टाकला जे ती डिझर्व करते !

Yessssssss शिव जिंकला ! बरं झालं. म्हंजे इथेच वाचून कळलं, टिव्ही बघायला मिळाला नाहीये अजिबात आणि उद्या पण अजिबात नाही, उद्या तर माबोवर पण यायला मिळणार नाही.
आता बिबॉ संपल्यानंतर रिकामपण येणार आहे आधी सतत माबोवर येउन कोणी काय लिहीलय काय झाले, हे चेक करायचे.

कुठल्या पाच जणांची complaint करायची म्हणत होते ते सुरवातीला?
>>पाच जण म्हणजे टॉप 6मधले किशोरी ताई सोडून उरलेले 5जण धनुडी.>>>>>>> थँक्यू अमुपरी मी सगळ्यांच्या कमेंट्स मिस करणार

धनुडी tv वर अजून डिक्लेअर व्ह्यायचाय विनर, लाव पटकन tv.

फायनली शिवानी आणि वीणामध्ये पण विणाच जिंकली कारण तिचा शिव जिंकला, ती एकदा म्हणालेली घरात ट्रॉफी आपल्या दोघांपैकीच एकाला मिळणार असं मनापासून वाटतं मला.

डोळे भरून आले शिव जिंकला ते बघताना, त्याच्या साठी त्याची विनी किती महत्वाची आहे हेही त्याने सगळ्यांसमोर दाखवलं, आईला स्पष्ट सांगितलं, तिला बहीण मानणार नाही, ती विनी.

आता बिबॉ संपल्यानंतर रिकामपण येणार आहे आधी सतत माबोवर येउन कोणी काय लिहीलय काय झाले, हे चेक करायचे. >>> अगदी खरं यार
शिव जिंकला काय?? सुमडीत पेढा खाऊन गेला तो, नेहा जास्त deserving होती, पण negativity मुळे मागे पडली ती, नाहीतर प्लेयर सॉलिड होती ती !!

शिवने उजवा हात वीणासाठी आणि डावा केळकर, वैशालीसाठी दिला. वीणा काळजी करू नकोस बघ तू आहेस माझ्याबरोबर लाईट्स बंद करताना, हा हात तुझा असं म्हणाला, so sweet>>
हे मागच्या वेळी मेघा पण बोलली होती शरा आणी सई साठी लाईट बंद करताना.

वीणामुळे शिवचा गेम बिघडतो, तो हरणार हे म्हणणाऱ्या घरातल्या आजी माजी सर्वांना आज चांगलं उत्तर मिळालं.+11111gharatalya amhi saglyanni aksharshaha Talya vajavalya shiv winner declare zalyavar

शिवची आई कधी आली होती स्टेजवर ते नाही बघितलं मी. किशोरी पाच नंबर आणि शिवानी चार, का का का पण. अजिबात नाही पटलं. काहींच्या घरचांना बोलायला दिलं काहींच्या नाही. शेवट उरकल्यासारखा वाटला.

धनुडी tv वर अजून डिक्लेअर व्ह्यायचाय विनर, लाव पटकन tv.>>>>> नाही गं अन्जू ,मी जावे कडे होते अत्ता आलोय घरी. गणपती आले न, टिव्ही चा ट पण उच्चारता आला नाही, कामं पण होती. ते लोक सिरीयल पण बघत नाहीत आणि मी तिला सांगू जरा वाईच टिव्ही लाव बिबॉ बघायचय !धरणी दुभंगली असती! Lol
पण बाप्पा पावलेला आहे शिव जिंकलस मित्रा!!! मला हे अवधुत गुप्ततेच्या स्टाईल मधे म्हणायचय पण आजकाल मित्रा म्हंटलं कि अनुश्री दिक्षित च आठवते. Uhoh

म मां शिवला एक पिक्चर देणार आहेत, ऐतिहासिक आहे, सात मावळे आणि त्यातला एक मावळा शिव. बहुतेक वेडात मराठे वीर दौडले सात, ह्यावर असेल तो चित्रपट. नेहाला आपल्या एका पिक्चरमधे गाणं लिहायची संधी देणार आहेत.

ते लोक सिरीयल पण बघत नाहीत आणि मी तिला सांगू जरा वाईच टिव्ही लाव बिबॉ बघायचय !धरणी दुभंगली असती! Lol >>> Lol

पण बाप्पा पावलेला आहे शिव जिंकलस मित्रा!!! >>> अगदी अगदी.

आजकाल मित्रा म्हंटलं कि अनुश्री दिक्षित च आठवते. >>> ही कोण.

वीणा ग्रेसफुली बाहेर पडली, बाहेर आल्यावर तिने सांगितलं नेहा शिवला की मला तुम्हीच दोघे top २ असणार वाटत होतं. तरी तिने पैसे घेतले नाहीत. पब्लिक votes चा आदर केला, अर्थात तिघांपैकी कोणीही नाही घेतले, सर्वांनीच केला. मागच्यावर्षी स्मितानेही केलेला आणि पुष्कर मेघानेही.

शिवानीचा जाम पचका झाला, मनी bag पर्यंत पोचलीच नाही. मला वाटतं मैत्रेयी म्हणाल्या होत्या इथे की तिला मनी bag पर्यंत नेतील असं वाटत नाही, करेक्ट होतं त्यांचं.

मागील वर्षी बिग बॉस मायबोली या संकेतस्थळावर तसेच रोज न चुकता voot वर बघितलं होतं. यावर्षी माञ मायबोली या संकेतस्थळावरच वाचून आनंद घेतला. शिव जिंकला याचा मनापासून आनंद झाला.
मिस करणार तुम्हां सर्वांना.

रनर अपला एक ट्रोफी पण देत नाहीत? हा कसला हेमटेपणा बिबॉचा? १०० दिवसांचा खेळ म्हणवतात तर सगळ्या खेळात उपविजेत्याला ट्रॉफी देतात हे यांना कुणीतरी शिकवलं पाहिजे.

शिवचं आणि नेहाचं अभिनंदन!

मांजरेकरांना प्रोफेशनल बनण्याचा क्लास लावायची गरज आहे. एका खेळाचा ग्रँड फिनाले आहे तर लव्ह स्टोरी कसली प्रमोट करतात? वीणा तीन नं. असूनही तिच्या पेरेंटना स्टेजवर बोलावून बातचित आणि दोन नं च्या कुणाशीही साधं बोलणं देखील नाही? खूपच पार्शल आणि अनप्रोफेशनल वागले ममां आणि बिबॉ.

शिवच्या घरच्यांनी वीणा या विषयावर बोलायचं टाळलं. अक्षरशः अवाक्षर नाही. ममांना खरंच खूप मध्यस्थी करुन लग्न लावावं लागणार असं दिसतय. Proud

I am a strong supporter of Neha. Sorry that she did not win!

Veena was in last three ONLY because of her love story with Shiv otherwise she would have got evicted long time ago for her arrogance.
Shiv won ONLY because he got votes from hindi siders even though they did not even watch the show.

Yes, he was a strong player but as a house mate I think he was a loser. Not mixing with any one other than Veena. Not doing any house chores. Not participating in any out of game activities......

Anyways, congratulations to him!

दोन नं च्या कुणाशीही साधं बोलणं देखील नाही? >>> नचिकेतशी बोललेच नाही का अजिबात, मला तो फार आवडलेला. मला वाटलं माझं missed, voot वर बघेन.

ती लवस्टोरी आधी म मां नीच तर promote केली आणि नंतर शिव्या देत बसले. तेच तर आम्ही काही जण लिहित होतो. स्टेजवर त्या दोघींना बोलावलं ते आवडलं नाही मला. वीणाची आईपण फार खुश दिसली नाही, ती म्हणाली पुढे जाऊन काही ठरलं तर सांगू तुम्हाला. शिवची आई तर खूप नाराज होती. तो जरा अतिआगाऊपणा होता म मां चा.

Pages