Submitted by राजुल on 29 March, 2012 - 07:23
मला फ्रंट लोडिंग वॉशिंग मशिन घ्यायचे आहे. लवकरात लवकर.
कुठले सुचवाल?
मला आयएफ्बी आणि एल जी अशी दोन मशिन सुचवली आहेत. तरीही तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर मदत होईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुर्वी माझ्याकडे आयएफबी फ्रंट
पुर्वी माझ्याकडे आयएफबी फ्रंट लोड ऑटो होते. पण त्यात कपड्यांना काळे डाग यायचे. अनेक प्रयत्न करुन ते गेले नाही. मग मशीनच बदलले व व्हिडिओकॉन सेमी घेतले. ते आठ वर्ष व्यवस्थित वापरतो आहे. आता बायकोला परत ऑटो घ्यायचे आहे. घरात माणसे दोन. पाणी व प्रेशर दोन्ही व्यवस्थित उपलब्ध आहे. बजेट २०हजार. ते काळे ठिपके हे मोटरच्या ऑईल ग्रीस असतात असा नेटवर शोध लागला आहे. कोणते मशीन घ्यावे?
नवीन आयएफबी ची रेंज फार
नवीन आयएफबी ची रेंज फार चांगली आहे, असा रिव्ह्यू काही दिवसांपूर्वीच मिळालेला आहे. ते एकदा पाहा.
जुन्या वॉम ला २०००/- मिळाले तरी फार होतील. आजकाल होम अप्लायंसेस मध्ये जुने प्रॉडक्ट्स भंगारकिमतीला विकत घेतात (एक्सचेंज ऑफर). हा अनुभव मिक्सर ग्राईंडर आणि वॉम नवीन घेतांना आला आहे. तस्मात, जुन्या गोष्टी चालू अवस्थेत असतील तर न बदललेल्या उत्तम. काही विशिष्ट कारणं असतील तर गोष्ट निराळी...
मी आधी Haier कंपनीची Top Load
मी आधी Haier कंपनीची Top Load वापरत होतो, नंतर मार्च २०१६ मध्ये IFB Senorita Smart घेतली. ही Bluetooth enabled मशीन आहे. ज्यामध्ये आपल्या स्मार्टफोन मध्ये IFB Xpert हे app टाकून bluetooth द्वारे मशीनशी connect करून मशीन चालवता येते. बाकी सगळे चांगले आहे, मात्र मला त्यातील anti-crease हे feature अजिबात आवडले नाही. Anti-crease feature मध्ये spinning च्या वेळी आधी ड्रम उलट-सुलट असा ४०-५० वेळा (अक्षरशः ४०-५०! मोजले आहेत!!!) अत्यंत कमी वेगात फिरतो, आणि मग नंतर वेग घेतो. Spinning झाल्यावरदेखील पुन्हा हीच तऱ्हा!!! त्यामुळे spinning चा वेळ प्रचंड वाढतो. थोडक्यात सांगायचे तर spinning च्या वेळी मशीनच्या ड्रमने कमी वेळात वेग घेणे अपेक्षित आहे. आणि spinning झाल्यावर मशीन लगेच थांबून लगेच door unlock होणे अपेक्षित आहे.
Front Load वापरणाऱ्यापैकी anti-crease feature नसलेली मशीन कोणास माहित असल्यास सुचवावी. भविष्यात फायदा होईल.
(मला ऑफिसला घालायचे कपडे हाताने धुवून केवळ spinning साठी मशीनमध्ये घालायची सवय आहे. आधीच्या Haier top load मध्ये spinning जास्तीतजास्त ९ मिनिटे चालत असे, तिथे IFB Front Load 15 मिनिटे घेते.)
खरं तर हाताने कपडे धुवून फक्त
खरं तर हाताने कपडे धुवून फक्त ड्राय साठी मशीन वापरणाऱ्याना साधा टॉप लोड ड्रायर(ज्याला फिरवायाचा नॉब आणि जुन्या फॅशन चा टायमर असतो तो) ५००० च्या आत मिळतो तोही पुरेसा असावा ना?
कुतूहल : १५ मिनिटे घेतल्याने
कुतूहल : १५ मिनिटे घेतल्याने काय प्रॉब्लेम आहे?
त्या मशीनमध्ये १०० हून अधिक वॉशिंग प्रोग्राम्स उपलब्ध आहेत असं त्यांच्या साइटवर दिसलं. त्यात तो अँटि क्रीज न वापरणारा ऑप्शन आहे का हे पाहिलंत का?
IFB चेच नुसतेच ड्रायरही उपलब्ध आहेत.
भारतातही नुसते ड्रायरसुद्धा असतात हे यानिमित्ताने कळलं.
खरं तर हाताने कपडे धुवून फक्त
खरं तर हाताने कपडे धुवून फक्त ड्राय साठी मशीन वापरणाऱ्याना साधा टॉप लोड ड्रायर(ज्याला फिरवायाचा नॉब आणि जुन्या फॅशन चा टायमर असतो तो) ५००० च्या आत मिळतो तोही पुरेसा असावा ना?>>>> मी फक्त ऑफिसचे कपडे (त्यातही केवळ शर्ट्स) हाताने धुतो, ट्राऊजर्स, रोजच्या वापराचे इतर कपडे, चादरी-पडदे हे सगळे मशीनमध्येच!!!
कुतूहल : १५ मिनिटे घेतल्याने काय प्रॉब्लेम आहे?>>>> मी मुंबईकर आहे आणि मुंबईकराला प्रत्येक मिनिट महत्वाचे असते!!!
त्या मशीनमध्ये १०० हून अधिक वॉशिंग प्रोग्राम्स उपलब्ध आहेत असं त्यांच्या साइटवर दिसलं. त्यात तो अँटि क्रीज न वापरणारा ऑप्शन आहे का हे पाहिलंत का?>>>> त्यांच्या app मधून मशीन सेट करताना 'time saver' मोड सुरु केला तर अँटि क्रीज बंद होते, पण फक्त spin करताना 'time saver' सुरु करण्याची सोय त्या app मध्ये नाही!!!
माझ्याकडे LG (DirectDrive)
माझ्याकडे LG (DirectDrive) front load आहे. चार वर्षे झालीत. दोनदा उंदराने पाईप चावल्यामुळे फक्त खर्च करायला लागला. बाकी काहीच प्राॅब्लेम नाहीये.
विक्षिप्त_मुलगा, तुम्ही म्हणताय तशी मोजकेच कपडे म्हणजे शर्ट आणि टाॅप किंवा नाजूक कपडे हाताने धुवून मशीनमध्ये वाळवायची मलाही सवय आहे. याला स्पीन टाईम अॅडजस्ट करता येतो. 8, 10, आणि 13 मिनीटांचा स्पीन टाईम येतो.
इतर कपड्यांसाठीसुद्धा (धुण्यासाठी) वेगवेगळे वाॅशिंग प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. पाणी गरम वगैरे होऊन कपडे व्यवस्थित स्वच्छ धुतले जातात.
(इतर मशीनबद्दल मला काहीच माहिती नाही. त्यामुळे हेच फिचर इतर मशीनमध्ये असतील तर कल्पना नाही. )
६.५ कि. - ७.० कि. टॉप लोड
६.५ कि. - ७.० कि. टॉप लोड फुल ऑटोमॅटीक - कुठलं मशीन सुचवाल लोकहो ?
आम्ही आमची जुनी LG ची देऊन 8
आम्ही आमची जुनी LG ची देऊन 8 कि. ची लोऍड ची घेतली . एक वर्ष होत आले, मस्त आहे
टॉप लोड ??
टॉप लोड ??
हो
हो
टॉप लोड पेक्षा फ्रंट लोड पाहा
टॉप लोड पेक्षा फ्रंट लोड पाहा असं मी सुचवेन. कपडे अपेक्षेपेक्षा नक्कीच जास्त चांगले धुतले जातात.
पाणी बर्यापैकी कमी लागतं (टॉप लोड एक सायकल १५० लिटर अंदाजे वापरतं अन फ्रंट लोड ला पूर्ण सायकल ला ५० लिटर पेक्षा कमी पाणी लागतं.)
स्पिन आरपिएम टॉपलोड पेक्षा नेहेमी जास्त असतात सो नंतर कपडे वाळायचा वेळही कमी लागतो. हे महत्त्वाचे +.
मायनस म्हणजे एका ठिकाणी फिक्स करायला लागते आणि टॅप-वॉटरच लागतं.
साबणपावडर ही फ्रंट लोड स्पेसिफिक वापरायला लागते (काही विशेष नाही - ही म्हणजे हाय एफिशिअन्सी पावडर/ लिक्विड असतं जे कमी पाण्यातही लवकर विरघळतं.
अजुन एक म्हणजे सायकल सुरू असतांना मध्येच कपडे अॅड करता येत नाहीत आणि सायकल संपल्याशिवाय दरवाजाही लॉक्ड राहातो. (अर्थात पॉवर बंद केली किंवा सायकल मध्येच थांबवली तर २/३ मिनिटात उघडतोही. पण मग पुन्हा पूर्ण सायकल चालवतं मशीन. आता काही नवीन मॉडेल्स मध्ये पहिल्या वॉश सायकलला कपडे अॅड करायची सोय आहे. )
मी मागच्या वर्षी आयएफबी चं फ्रंट लोड मशीन घेतलं आहे (आधी एलजी चं सेमी ऑटो होतं) आणि टॉप लोड च्या आणि या नवीन मशीन चा फरक पाहाता फ्रंट लोडच सुचवेन.
हो, फ्रंट लोड घ्यावे. पाणी
हो, फ्रंट लोड घ्यावे. पाणी कमी लागते, साबण कमी लागते. बाकी भारतात, खास काही गोष्टी कराव्या लागत असतील तर ते योकुने लिहिले आहे.
धन्यवाद VB,योकु, सुनिधी,
धन्यवाद VB,योकु, सुनिधी,
आमची ही तिसरी की चौथी मशिन
आमची ही तिसरी की चौथी मशिन आहे, पण सगळ्याच टॉप लोड अन फुल अॅटोमॅटीक . पाण्याचा असा काही प्रॉब्लेम नाही अन कमी पाणी आम्हालाच आवडत नाही, तसेच वापरायला देखिल खुप सोपी असते, कपडेही स्वच्छ होतात, गरज असेल तर अॅटो ड्रायर पण आहे कपडे सुकवायला म्हणुन नेहमीच टॉप लोड अन फुल अॅटोमॅटीक ला प्रीफरन्स असतो
(No subject)
मी वर टॉप लोड अन फुल अ
मी वर टॉप लोड अन फुल अॅटोमॅटीक मशीन मला का आवडते ते असेच सहज लिहीले आहे, नाहीतर असे वाटायला नको कि योकुंनी फ्रंट चांगली लिहीली म्हणुन मी टॉपलोड कशी चांगली अशा वादाकरता लिहीली.
शेवटी प्रत्येकाची आवड अन गरज वेग़ळी असते
मला पण top load वॉशिंग मशिन
मला पण top load वॉशिंग मशिन आवडतं, मशीन लावल्यावर पण extra kapde टाकता येणं हा फायदा मुख्य आहे. विचित्र पोझिशन मध्ये उभं राहावं लागतं नाही, कपडे load- unload करायला.
विचित्र पोझिशन मध्ये उभं
विचित्र पोझिशन मध्ये उभं राहावं लागतं नाही, कपडे load- unload करायला.>>>
मी 6 महिन्यांपूर्वी IFB ची
मी 6 महिन्यांपूर्वी IFB ची front load machine घेतली. आधी मलाही top load च आवडायची. पण ही machine घेताना योकू यांनी मांडलेले मुद्दे you ट्यूब वर बघितले होते आणि म्हणून front load prefer केली आणि खूप छान आहे. आणि एकदा कपडे टाकल्यावर उघडता येत नाही असे काही नाही... 1 min लागतो पण उघडता येते.
आणि टॅप-वॉटरच लागतं.>>
आणि टॅप-वॉटरच लागतं.>>
योकु, साबणाच्या ट्रे मधून पाणी टाकता येतं नळाला पाणी नसेल तर. अर्थात धाडकन बादली रिकामी केली असं करता येत नाही पण बऱ्यापैकी वेगात टाकता येतं.
विचित्र पोझिशन मध्ये उभं
विचित्र पोझिशन मध्ये उभं राहावं लागतं नाही, कपडे load- unload करायला
>>
यावर उपाय म्हणून आपल्याला उभे राहून कपडे टाकता येतील, झाकण उघडता येईल अशा उंचीवर वॉ.म. बसवले तर?
आमचे 15 वर्ष जुने टॉप लोड LG
आमचे 15 वर्ष जुने टॉप लोड LG मागच्या आठवड्यात दोन घुर्र करून बंद पडायला लागले.मग माणूस बोलावला तो म्हणाला दाराचे मॅग्नेट हरवलेय.यावर मग घरी 'तुम्ही लोक कसे दणदणा वॉशिंग मशीन ची झाकणे आपटता' यावर चर्चा सत्र झाले.मग ते मॅग्नेट खाली पडलेले मिळाले ते बसवून मशीन चालू केले.पण रिस्क नको म्हणून ते बाय बॅक करून LG front load विकत घेतले.
कपडे बरे निघतात.पाणी कमी लागते.पण वेळ जास्त (किमान 1 तास) लागत असल्याने पाण्याचा वाचलेला खर्च विजेत जात असेल असे वाटले.दर महिन्याला ड्रम एका विशिष्ठ पावडर ने स्वच्छ करायचा असे सांगितले आहे.सध्या तरी नव्याची नवलाई म्हणून मशीन बसवायला आलेल्या कडे कंपनी च्या 2 मशीन क्लिनिंग पावडर घेतल्या आहेत ड्रम साठी.टॉप लोड ची आठवण येतेच.
वॉशिंग पावडर एरियल फ्रंट लोड वापरतो.ती अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त टाकल्यास घरभर साबणाचा फेस होईल असे सांगितले आहे.
<ती अर्ध्या चमच्यापेक्षा
<ती अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त टाकल्यास घरभर साबणाचा फेस होईल असे सांगितले आहे.>
मला यात एका तुफान लोकप्रिय लेखाचं पोटेन्शल दिसतंय. घ्या मनावर.
दर महिन्याला ड्रम एका विशिष्ठ
दर महिन्याला ड्रम एका विशिष्ठ पावडर ने स्वच्छ करायचा असे सांगितले आहे. --- हे एकदा कॉल centre ला फोन करुन चेक करा. माझ्या मशीन manual मध्ये असाकाही उल्लेख नव्हता म्हणून मी पावडर विकत घेतली नाही. नंतर कालांतराने कपड्यांना lint यायला लागल्यावर फोन केला त्यांनी मला लिंबू रस- व्हेनेगर असा cleaning फॉर्म्युला वापरून मशीन eco-tub-clean button वापरून एक cycle करा सांगितले. मशीन एकदम चकाचक.
एक लिंबू रस आणि व्हिनेगर ची बाटली वॉशिंग मशीनजवळ ठेवलीय, गरज पडली की मशीन clean करायला.
तसेच मशीनच्या आत हे lint-dirt collector असते ते removable असेल तर बाहेर काढून धुवून परत बसवायचं. Fixed असेल तर माहीत नाही कसे स्वच्छ करायचे.
ओह विचारून बघते
ओह विचारून बघते
तशी पण मी दर महिन्याला आठवणीने ड्रम स्वच्छ करणार म्हणजे डोंबल/उजेड.
पण हे लिंबू व्हिनेगर चं ठीक आहे.
एकदा कॉल सेंटर ला विचारते.
तुफान लोकप्रिय लेखाचं
तुफान लोकप्रिय लेखाचं पोटेन्शल दिसतंय. घ्या मनावर. +११
लिक्वीड डीटर्जन्ट ट्राय करा, फ्र्न्ट लोड ला, छान निघतात कपडे, खासकरुन बेडशीट्स
आप्ल्या त्या डी मार्ट मध्ये भरपुर व्हरायटी सवलतींसह उपलब्ध आहे
Lol मला यात एका तुफान
Lol मला यात एका तुफान लोकप्रिय लेखाचं पोटेन्शल दिसतंय. घ्या मनावर.>>मला पण पूर्ण प्रतिक्रिया वाचून तसंच वाटले
फ्रंट लोड मध्ये IFB चे चांगले
फ्रंट लोड मध्ये IFB चे चांगले की LG चे?
IFB या क्षेत्रात जुने आहे.पण
IFB या क्षेत्रात जुने आहे.पण एलजी ला इंडियन मार्केट जास्त चांगले कळते आणि मेंटेनन्स सपोर्ट चांगला आहे असा आमचा अंधविश्वास आहे.त्यामुळे आम्ही सर्व वस्तू एलजी च्या घेतो.
लोकांचे आय एफबी आणि सीमेन्स चे अनुभव चांगले आहेत.
हायर चे मशीन एकांकडे नवे सारखे बंद पडायला लागले म्हणून माणूस बोलावला तर त्याने दमट हवेत बाथरूम जवळ मशीन ठेवू नका असे सांगितले.व्यवस्थित पॅसेज मध्ये बाथरूम बाहेर ठेवलेले मशिन.मशीन ला पॅसिव्ह स्मोकिंग सारखा पॅसिव्ह ह्युमीडिटी चा त्रास झाला असावा.(तरी या बाबाने इतर घरात ओपन ड्राय बाल्कनी मध्ये हवा वादळ पाऊस खात ठेवलेली मशिने पाहिली नसावी.) बहुतेक परदेशातल्या सारखी कोरडी ठक्क सेलर्स आणि त्यात मशीन अपेक्षित असावे.
अर्थात यावरून पूर्ण हायर ब्रँड बद्दल वाईट मत बनवणे योग्य नाही.अजून काही केसेस तपासाव्या लागतील.
Pages