रैना

Submitted by अजिंक्यराव पाटील on 19 August, 2019 - 05:00

खिडकी समोर माझी rocking chair, उघड्या खिडकीतून salone च्या पंपातून निघणाऱ्या हलक्या फवाऱ्यागत आत येणारा पाऊस, आणि मोबाईलच्या एफएम वर वाजणारं गाणं...
बीती हुई बतीयां कोई दोहराए
भुले हुए नामों से कोई तो बुलाये
चांद की बिंदी वाली, बिंदी वाली रतीया
जागी हुई अंखियो में रात ना आई रैना....

का, कुणास ठाऊक, पण ही रात संपूच नये असं वाटतं.. आणि ही रात त्रास पण देतीय, आणि हा पाऊस वैऱ्यासारखा भासतोय. कारण; कारण हा पाऊस आठवण करून देतो, पाऊस म्हणतो की तू हरवलं आहेस काहीतरी. त्याच्या या आरोपासरशी आठवतं, की कपाटाच्या एका आतल्या खणात काही गुलाबी पत्रं आहेत. म्हणजे गुलाबी कागदावरली नव्हे, गुलाबी भावनांची पत्रं..
गिचमीड अक्षरातली, पांढऱ्या कागदावर काळ्या फाउंटन पेनाने लिहिलेली गुलाबी पत्रं.
वाटतं की उठून वाचावीत. कपाटावर नजर पडते खरी, पण पाय काही उठत नाही. तेच पाय आरामात खिडकीवर ठेवून, दोन्ही हात डोक्यामागे बांधून मी बसते शून्यात नजर लावून. अजाणताच हाताचा अंगठा, कानामागे, केसांच्या थोडं खाली जाऊन थांबतो, आणि तीच वेडी लहर पूर्ण अंगात दौडून जाते, जी तू तिथे ओठ टेकवल्यावर अधीर करायची..
काळ्या ढगांसारख्या तुझ्या सावळ्या खांद्याचा तो धुंद गंध वेचून, नाहणाऱ्या जमिनीगत गंधाळणारी मी.. सतारीवर छेडलेल्या तारेगत थरारून जाणारी मी, आणि तेव्हा लवकर सरणारी आणि म्हणूनही शत्रू वाटणारी, ही रात..

एक इच्छा होती तेव्हा, की या गाण्यासोबत तुझी आठवण कधीच यायला नको.. पण आलीच बघ.
युग आते हैं, और युग जाये
छोटी छोटी यादो के पल नहीं जाये
झूठ से काली लागे, लागे काली रतीया
रुठी हुई अंखियो ने लाख मनाई रैना...

आता मनसोक्त बरसल्याशिवाय ही रात जाणार नाहीच.

-राव पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अमर ९९,
जागी हुई अंखियो में रात ना आई रैना....
या ओळीचा कळलेला अर्थ असा की, माझ्या जाग्याच असलेल्या डोळ्यांत रात्री रात्र (झोप) आली नाही.

जालावरच्या जवळपास सगळ्या हॉरर कथात साम्य जाणवते, कारण त्या धारप शैलीत असतात तसंच ही कुठल्या प्रसिद्ध लेखकाची पद्धत, शैली वगैरे आहे का?
हा लेख, अजय चव्हाणचा लेख, अजोचा लेख...

म्हैसूर मुक्कामी अजोंच्या लिखाणामुळे हे गाणं ऐकत होतो, नेमकं त्यावेळी माझ्या घरासमोर राहणारी एक मुलगी असाच निर्विकारपणे पाऊस पाहत असताना ही काय विचार करत असावी असा विचार मनात येऊन मी हे काल्पनिक काहीतरी लिहिलं.
अजोंचं चितनात्मक आहे, अजय चव्हाण यांनी लिहिली ती कथा आहे (2 शब्दांमुळे स्पष्ट झालं, नाहीतर ते पण ललित म्हणून खपलं असतं), आणि मी लिहिलंय ते उगाच काहीतरी कॅटेगरी!
शैली म्हणाल तर खास काही नाही, पण दाद यांनी गानभुली म्हणून लेखमालिका लिहिलेली, तेव्हापासून मलादेखील तसं काहीतरी लिहावं वाटत होतं, हे एक लिहिलं आणि हा आपला पिंड नाही हे ओळखून मी ते शेवटचं ठरवलं!

हॉरर कथा सगळ्या चांगल्या तुम्ही आधीच वाचून बघून झाल्या आहेत.त्यामुळे आता कोणत्याही कथेत ठराविक 4-5 प्लॉट रिपीट होतात असे वाटेल.ब्रॅम स्टॉकर ने ड्रॅकुला लिहिल्यावर त्या धर्तीच्या असंख्य कथा, असंख्य चित्रपट येऊन गेले.
लहानपणी किल्ले का रहस्य पाहताना, झी हॉरर शो, आहट, होनी अनहोनी,ईव्हील डेड पाहताना आपल्याला खरीखुरी भीती वाटायची, एक नवं काहीतरी पाहिलं वाचलं असं वाटायचं.कारण त्या वेळी आता आपल्याला जसा टीव्ही, युट्युब, नेटफलिक्स,प्राईम,किंडल, अनेक मराठी साईट, व्हॉटसप पोस्ट, फेसबुक पोस्ट असा माहितीचा टनावारी ढिगारा खाऊ घातला जातो तो नव्हता ☺️
एखादे साहित्य प्रेरित/सिमीलर टू अदर प्लॉट असले तरी त्याची मजा कमी होणार नाही.पूर्ण माशी टू माशी कॉपी पेस्ट असेल तर मात्र मजा येणार नाही.
(||लेक्चर समाप्त ||)

अजिंक्य,
अच्छा. गुड!

अनु,
खरंतर मी यातलं काहीही वाचलं, बघितलं नाहीय - धारप, ड्रॅकुला, किल्ले का रहस्य, झी हॉरर शो, आहट, होनी अनहोनी, ईव्हील डेड वगैरे :D. पण मुद्दा कळाला.

अय्यो
हे सगळं पाहिलं नाही..अरे देवा ☺️☺️जा बघून ये.
मूळ मुद्दा हा की टू मच कंटेंट.जसे आपण चवीने शनी रवी संध्याकाळी दूरदर्शन वर लागणारे मराठी हिंदी पिक्चर पाहायचो, कारण तेव्हा पिक्चर घरी बसून बघण्याची ती एकच संधी होती.
आता निरनिराळ्या चॅनल वर हिट नॉन हिट सर्व पिक्चर चा रतीब चालू असतो आणि आपण काहीच बघत नाही.

काल परत हॉरर मराठी कथाबद्दल विचार करत होते आणि मिपावरची प्रियाली आठवली. आता तिने सगळ्या कथा उडवल्या आहेत, पण 'गबाळ्या' बेस्ट होती. अघोरी साधू-प्रथा-बळी न वापरूनदेखील हॉरर कथा लिहता येतात (की यायच्या त्या काळी?) हे तिच्या कथा वाचून कळायचं. माबोवर काय ट्रेंड होता ८-१० वर्षांपुर्वी?