देवराई - ३

Submitted by हरिहर. on 19 August, 2019 - 03:05

विहंगम देवराई - २

रोज सकाळी मी साधारण पाच किलोमिटर चालतो. त्यातले तिन किलोमिटर मी मजेत चालतो व शेवटचे दोन किलोमिटर अक्षरशः शरीर ढकलत पार करतो. पण देवराईत शिरलो की किती चाल होते ते समजतच नाही. अॅप कधी सहा किमी दाखवते तर कधी सात. दोन तास अगदी दोन मिनिटांसारखे निघून जातात. मात्र पायाखाली पहात चालायचे म्हटले की तासाला विस फुट इतकी चाल मंदावते. गवताच्या इवल्या इवल्या पानांखाली एक विश्व सुखेनैव नांदत असते. येथे अव्याहतपणे धावपळ सुरु असते. या पानांखाली कोण घर बांधत असतो, कोण शिकार करत असतो तर कुणी शिकार होत असतो, कुणाचे प्रीयाराधन चाललेले असते तर कुणी मध, पराग वगैरे गोळा करण्यात गुंग असते. प्रत्येकजण कशात ना कशात मग्न असतो. हे सगळे पाहीले की थक्क व्हायला होतं. या गवताखाली यांचे विश्व बहरत असते तर तृणपात्यांवर सकाळी सकाळी दवबिंदूचा असा काही नजारा असतो की विचारु नका. एखाद्या जवाहीऱ्याच्याही दुकानात इतक्या नजाकतीने मांडलेले हिरे नसतील एवढी दौलत येथे पाना पानांवर विखुरलेली असते. प्रत्येक पान अगदी हिरेजडीत झालेले असते. त्यामुळे येथे पाऊल टाकायला मला नेहमीच भिती वाटते. इतर वेळी झपझप चालत असताना आपल्या पावलांखाली किती जणाचे जीव, कष्ट चिरडले जात असतील असे वाटून जाते. “उन्हे होश तक ना आया, मेरी लुट गयी जवानी” काहीसा असाच प्रकार होत असावा. आपण टाकलेली दोन चार पावले या कृमी किटकांना अगदी मातीत मिळवत असतील आणि त्याची आपल्याला जाणीवही होत नसेल. मी जेवढे जास्त बारकाईने या जगाकडे पाहीले तेवढे मी काळजीपुर्वक पाऊल टाकायला लागलो. या लहानग्यांचे हे लहानसे विश्व पाहीले की मला एक शेर आठवतो. अगदी समर्पक अशा ओळी आहेत.

रख कदम फूंक-फूंक कर नादान
जर्रे-जर्रे में जान है प्यारे।

(Camera: Canon EOS 60D, Nikon Coolpix P900, Sony PJ410)

या भागातील किटकांची आणि फुलपाखरांची नावे मला माहीत नाहीत. त्यामुळे जाणकारांनी नावे सांगावीत.
हे कवडी फुलपाखरु
प्रचि: १
१ कवडी.jpg
प्रचि: २
१कवडी.jpg
प्लेन टायगर
प्रचि: ३
२ प्लेन टायगर.jpg
हे नेहमी दिसते पण नाव माहीत नाही.
प्रचि: ४
३ फुलपाखरु.jpg
नाव माहीत नाही.
प्रचि: ५
४फुलपाखरु.jpg
प्रचि: ६
५ फुलपाखरु.jpg
यातील एका फुलपाखराला सोंड नाहीए.
प्रचि: ७
६ फुलपाखरु.jpg
हे फुलपाखरु जमीनीवर जास्त वावरताना पाहीले आहे.
प्रचि: ८
७ फुलपाखरु.jpg
प्रचि: ९
७फुलपाखरू.JPG
हे काही चतूर. अजुनही वेगळ्या रंगाचे व आकाराचे आहेत. फोटो मिळाला की येथे देईन.
प्रचि: १०
८ चतुर.jpg
.
प्रचि: ११

प्रचि: १२
९ लाल चतुर.jpg
गुलाबी चतूर. शशांकदांनी याचे नामकरण व्हॅलेंटाईन चतूर असे केले आहे. Happy
प्रचि: १३
१० चतुर.jpg
प्रचि: १४
११ चतुर.jpg
प्रचि: १५
१३ चतुर.jpg
हा नाकतोडा आकाराने गव्हाच्या दाण्यायेवढा आहे.
प्रचि: १६
१४ नाकतोडा.jpg
प्रचि: १७
१५ नाकतोडा.JPG
हा डास आहे का?
प्रचि: १८
१६ डास.jpg
प्रचि: १९
१७ किडा.png
मोळी किडा
प्रचि: २० अ
१८ मोळी किडा.JPG
हे किड्याचे घर आहे की शिकारीसाठी जाळे आहे ते माहीत नाही. गवताच्या पानाच्या आधाराने गवताच्या मुख्य काडीच्या भोवती हे गोळा केलेले आहे. आकार एक सेंटीमिटर असेल.
प्रचि: २० ब

प्रचि: २१
१९ किडा.JPG
प्रचि: २२

.

हे काही कोळी आहेत.
प्रचि: २३
२१ कोळी.jpg
प्रचि: २४
२३ कोळी.jpg
प्रचि: २५
२२ कोळी.jpg
प्रचि: २६
२५ कोळी.jpg
हे या कोळ्याचे डोळे आहेत का?
प्रचि: २७
२६ कोळी.jpg
हा जरा वेगळा आणि खुप छोटा कोळी आहे.
प्रचि: २८
२७ कोळी.jpg
प्रचि: २९
२८ कोळी.jpg
दबा धरुन बसलेला कोळी.
प्रचि: ३०
२९ कोळि.jpg
प्रचि: ३१
२९ कोळी.jpg
बोरीच्या कोवळ्या पालवीत विश्रांती घेत असलेला कोळी.
हा रंगाने जरा वेगळा असलेला कोळी.
प्रचि: ३२
२९ कोळी।.jpg
प्रचि: ३३
२९।कोळी.jpg
हा कोळी कॅमेऱ्यात येणे जरा अवघड होते. खुपच लहान आकार आहे याचा.
प्रचि: ३४
२९।कोळी।.jpg
सुरवंट.
प्रचि: ३५
३० सुरवंट.jpg
प्रचि: ३६
३० सुरवंटा.jpg
काही माशा.
प्रचि: ३७
३२ माशी.jpg
प्रचि: ३८
३३ माशी.jpg
प्रचि: ३९
३४ माशी_0.jpg
प्रचि: ४०
३५ काळी माशी.jpg
प्रचि: ४१
३६ हिरवी माशी.jpg
गोगलगायी
प्रचि: ४२
३७ गोगलगाय.JPG
प्रचि: ४३
३७ किडा.jpg
काही लेडी बिटल. शशांकदांनी याचेही नामकरण केले आहे. बाई पिटंल. Lol
प्रचि: ४४
३८ बिटल.jpg
प्रचि: ४५
४० बिटल.jpg
प्रचि: ४६
३९ बिटल.jpg
प्रचि: ४७
४२ बिटल.jpg
प्रचि: ४८
४३ बिटल.JPG
प्रचि: ४९
४५ बिटल.jpg
आणि हा आहे देवराईचा जवाहीरखाना. देवराईवर रोज अशी हिऱ्या मोत्यांची पखरण होते.
प्रचि: ५०
४६ मोती.jpg
प्रचि: ५१
४७ मोती.jpg
प्रचि: ५२
४८ मोती.jpg
प्रचि: ५३
४९ मोती.jpg
प्रचि: ५४
2019-08-19 12.25.51.jpg
प्रचि: ५५
५० मोती.jpg
प्रचि: ५६
५१ मोती.jpg
प्रचि: ५७
५२ मोती.jpg
प्रचि: ५८
५३ मोती.jpg
प्रचि: ५९
५४ मोती.jpg
प्रचि: ६०
५५ मोती.jpg
प्रचि: ६१
५६ मोती.JPG
जागा अत्यंत कमी असल्याने मी फोटोंची साईज आणि क्वालीटी बरीचशी कमी केली आहे. 7 MB चा फोटो मी 40KB इतका लहान करुन येथे टाकला आहे. जर फोटो व्यवस्थित दिसत नसतील मी सगळे फोटो रिप्लेस करेनच. तोवर हेच चालवून घ्या ही विनंती. Happy
वरील कोळी आणि फुलपाखरांची नावे समजली तर नक्की सांगा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त
दोन नंबरच टायगर फुलपाखरु मस्त दिसतय.

मस्त मस्त!
गुलाबी चतुर, कोळ्याचे डोळे आणि निळी माशी फार आवडले.

जेवढं प्रभावी तुम्ही लिहिता तेवढीच सुंदर तुम्ही फोटोग्राफी करता. जबरदस्त आले आहेत फोटो.
इवलुश्या किड्या पाखरांचे फोटो, पण अंगावरची एकेक रेष अन कणभर डोळेसुद्धा स्पष्ट दिसताहेत. तुमचा कॅमेरा जबरदस्त आहे आणि अर्थात अंगचे स्किल्स पण. त्या किड्या पाखरांनीसुद्धा चांगलं सहकार्य केले आहे, मस्त पोझेस दिल्या आहेत ( हा सगळ्यात अवघड भाग)

शशांक यांनी दिलेली दोन्ही नावं मस्त Lol

मस्त धागा आणि सर्व फोटो सुरेख ..

IMG-20190819-WA0004.jpg

आज सकाळी जॉगिंगच्या वेळी एका झाडावर हे इवलेसे फूलपाखरू दिसले. मोबाईलनेच शूट केल्याने क्लिअरिटी फार नाही आलीय पण तरीही नाव ओळखता आले तर कृपया जाणकारांनी मदत करावी.
डॉ.राजू ह्यांच्या लेखामुळे हल्ली फुलपाखराकड़े बघायचे वेड लागले आहे Wink शालिंमुळे त्यात अजुन भर पडणार आता !

अप्रतिम. प्रत्यक्ष पाहिल्या सारखे वाटले. >>>> +9999

शाली, तुझ्या सूक्ष्म निरिक्षणाचे केवळ कौतुक आहे...
किती विविध किटक, झाडे, पाने, फुले !! या सगळ्यांचा अभ्यास करणार्‍यांना सलाम आहे माझा ..

केवळ सुंदर फोटोग्राफी आहे तुझी... ___/\___

तिन्ही भाग छान आहेत. देवराईजवळ घर मिळणे म्हणजे भाग्यच आहे.
प्लेन टाईगर नंतरचे ते जेझेबेल. इतके सुंदर आहे की नाव लक्षात राहिले. त्यानंतरचे दोन ही बटरफ्लाय fb पेजवर बघितले आहेत पण नाव लक्षात नाही.
राखाडी रंगाचा आणि valentine नंतरचा पिवळा-निळा चतुर खूप सुंदर आहेत. सगळ्या किड्यामकोड्यांचे आणि पानावरच्या मोत्यांचे फोटो सुरेख आहेत. खरेच कुठला कॅमेरा वापरलाय? प्लीज बोलू नका माझ्या iphone वर काढले. :-o

शालीदा अतिशय सुंदर फोटो. अप्रतीम.
मी ते तीसर्या फोटो मध्ये असणारे फुल झाड शोधते. नाव सापडत नाही.

मी ते तीसर्या फोटो मध्ये असणारे फुल झाड शोधते. नाव सापडत नाही.

नवीन Submitted by 'सिद्धि' on 19 August, 2019 - 04:51

ते टणटणी (lantana) आहे.

प्रचि ४: common jezebel
प्रचि ८: lemon pansy
जाणकारांनी कन्फर्म करावे.

एकदम झ्याक फोटू, जबरदस्त डिटेलिंग अन कंपोझिशन!!
(आता एकडाव तरी तुमच्या देवाला यावं लागतंय अस वाटायला लागलंय)

मस्त फोटो सगळे.

>>>>मी ते तीसर्या फोटो मध्ये असणारे फुल झाड शोधते. नाव सापडत नाही.
नवीन Submitted by 'सिद्धि' on 19 August, 2019 - 04:51
ते टणटणी (lantana) आहे.>>>>> आम्ही त्याला घाणेरीची फुलं म्हणतो. खुप वेगवेगळ्या रंगात असतात . पण वास चांगला येत नाही.

शालीदा, जागतिक छायाचित्रण दिनाचं औचित्य साधून देवराईतील हे अनोखं विश्व उलगडून दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद.
फोटो बाबत मी काय बोलू. अप्रतिमच

मला किडे-कीटक वगैरेंची भीती वाटते. तरी तुमचा लेख म्हणून सारं बळ एकवटून फोटो पाहिले. एक सलाम तुम्हाला... हे एव्हढे छोटे जीव लक्षपूर्वक पाहता म्हणुन. आणि एक सलाम असले भन्नाट फोटो काढू देणार्या तुमच्या केमेर्याला. रच्याकने, फोटोजवर वॉटरमार्क का नाही टाकलात?

प्रचि ४८, ४९ हा झायगोग्रामा बिटल आहे बहुतेक. परदेशातून भारतात आणल्याचं वाचलं आहे. गाजर गवत (कॉंग्रेस गवत) खातो. येथील पर्यावरणात चांगलाच रूळलेला दिसतोय.

vt220,धनुडी- tnx
फुलांवर थोड सर्चींग चाललय... त्यासाठी मराठी नाव पाहिजे होत.

सगळ्यांचे धन्यवाद!

सिध्दि टणटणीला हिंदीत रायमुनीया म्हणतात. एकाच झाडावर विविधरंगी फुले येतात तसेच प्रत्येक रंगाचेही झाड असते. फोटो सापडले तर डकवेन येथे.

वर्षा नावे बरोबर आहेत. यांची मराठी नावे आंजावर मिळाली आहेत. धागा संपादित करुन नावे लिहिन.

फोटोजवर वॉटरमार्क का नाही टाकलात?>>> कंटाळा!

अमर मला मित्राने याचे नाव कॅलिग्राफा सांगितले होते. कॉंग्रेस गवतावरच आढळला मला. खुप आहेत.

साधनाताई तुला माहित आहे, बायकोची कृपा म्हणून हे फोटो आणि आयडीदेखील आहे. Lol

सर्वांचे पुन्हा एकदा खुप आभार. असे उत्साही प्रतिसाद असले की फोटो काढायला उत्साह येतो. Happy

Pages