सेक्रेड गेम्स बहुचर्चित मालिकेचा दुसरा सीझन काल पासून नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. त्याची चर्चा करण्या साठी धागा काढला आहे. आत्ताशी पहिला भाग अर्ध्यापेक्षा जास्त बघून झाला आहे. पण लगेच ग्रिप घेते कथा. गणेश गायतोंडे अॅक्षन मध्ये बघून खूप बरे वाटले कसमसे. कथेची व्याप्ती खूप वाढून मुंबई सोडून परदेशी गेली आहे. पहिल्या भागात मोंबासा मधील कथा आहे.
सैफ पक्षी सरताज एकदम टोन्ड व फिट दिसतो आहे सीरीअलचा हिरो तोच आहे त्यामुळे आब राखून आहे. नवाजुद्दीन आला की स्क्रीन खाउन टाकतो. बंटी, कांताबाई सर्वांना बघून खरे तर पुनःप्रत्ययाचा आनंद फेज मध्ये आहे. आत्ता तरी. ट्विटर, इन्स्टा ग्राम वर मीम्स चालू झाले आहेत.
इथे लिहू शकता येतील असे फारसे नाहीत. पण मकर संक्राति के दिन पैदा हुई थी..... बेस्ट.
झॉया पण दिसली. मराठी कलाकार खूप आहेत. ती यादव बाई पण मराठी नटी. खतर नाक असल्याची अॅक्ट्रिंग करते पण शोभत नाही.
रात्रीस खेळचाले भाग दोन मधील दत्ता भाउ पण कांबळे आहे का ? अमेय वाघ पण आहे म्हणे. बघू कधी येतो ते. ह्या सीझन चे बजेट १०० कोटी आहे असे वाचले. आजचा दिवस तर सेट आहे. तुम्ही कुठपरेन्त आलात? मी हा सीझ न बघेन मग सलग दोन सीझन परत बघेन वीकांताला.
जास्तीची हिंसा, हिंसक भाषा ह्याची आता सवय झाल्याने इतके विचित्र वाटत नाही.
सरताज मेघाशी बोलायला गच्चीवर येतो तो आमच्या येथिल रुणवाल ग्रीन्स वाला भाग आहे. पहिला सीझन पहिला भाग मध्ये पण मुलुंड मधील भकास पडलेला निर्मल मॉल इथे एका मारामारी कम पाठलागाचे शुटिन्ग आहे.
आता दुसरा भाग सुरू झाला आहे. बिंज वॉचिन्ग इज ऑन. अपुन तो फुलॉन देखेला है.
मी नेटफ्लिक्स चे सभासदत्व
मी नेटफ्लिक्स चे सभासदत्व घेतले आहे ऑफिशिअली बघत आहे. इथे भारतात फारच प्रसिद्धी चालू आहे. जालावरच. काल नेटफ्लिक्स . इन वाल्यांनीच आत्ता संध्याकाळी ५.३४ वाजता पहिल्या सीझन पासून चालू केलत तर १२ वाजता रात्री सीझन टू ला सीमलेसली कनेक्ट व्हाल असा
पर्चार केला होता. पण अगदी १२.०४ १२.०६ १२.०८ ला सीझ न लोड होत नाही म्हणू प्रेक्षक वैताग व्यक्त करत होते. नेटफ्लिक्स वाले आता चेक करा आता बघा असे समजावत होते.
चौथ्या भागात आहे सध्या ..
चौथ्या भागात आहे सध्या .. पंकज त्रिपाठी हिरा आहे हिरा
झाले बघून पुर्ण भाग..
झाले बघून पुर्ण भाग..
ज्या मुली आंबे चोरतात त्यांना
ज्या मुली आंबे चोरतात त्यांना आमरस बनवावा लागत नाही
१२.०८ ला सीझ न लोड होत नाही
१२.०८ ला सीझ न लोड होत नाही म्हणू प्रेक्षक वैताग व्यक्त करत होते.>>
१२:०१ पासून विनातक्रार चालू झाला सिजन. निंद को बलिदान देना था, सो दिया.
काल रात्री सगळे बघायचे होते,
काल रात्री सगळे एपिसोड बघायचे होते, पण शेवटचे दोन एपिसोड राहिले आहेत.
१. नवीन, छान खूप शिव्या आहेत, लहान मुलांना आवडतील, त्यावर नवीन मिम्स येतीलच
२. बऱ्याच गोष्टींवर भाष्य करायचा प्रयत्न केला आहे, गायतोंडेच्या बेस्ट फ्रेंडची लस्ट स्टोरी पण आहे, ज्याचा मूळ कथानकाशी काही संबंध नाही, त्यामुळे मधूनच कथानक भरकटतं.
३. साईड कॅरॅक्टरच्या मुलाच्या का भावाचं किडनपिंग होतं, मग त्यांचं लिंच किल्लिंग होतं, स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांनी धर्माचा केलेला वापर दाखवला आहे. तिथे लेखन प्रभावी झालं आहे, पण हा भाग सहज नाही तर ओढून ताणून दाखवला आहे, कथानक परमाणू हल्ल्याच्या भोवती फिरत असताना, हे कुठून मधूनच आलं? असं वाटून गेलं. तिथे कथानक भरकटतं, असं बऱ्याच वेळा होतं, सेन्स ऑफ अर्जन्सी त्यामुळे जाणवत नाहीत.
४. लहान मुलांना कसं अधर्माच्या मार्गावर लावून, काहीही करून घेतात, येडं करतात, ती सद्य परिस्थीती आहे, तिथे लेखन प्रभावी झालं आहे. ड्रग्ज घेतल्यावर होणारे परिणाम, तिथे जो कॅमेराचा वापर केला आहे, तो भाग अप्रतिम आहे, ती दृश्य फार छान जमली आहेत, कॅमेरावर्क उत्तम आहे, पहिल्या भागात, सरताजचा चेस सिक्वेन्स, तो पूर्ण भाग एका शॉट मध्ये चित्रित केला आहे ते भारी आहे.
५. या सिरीज मध्ये होम मिनिस्टरला तर पार येड्यातच काढलं आहे, मूर्ख बावळट दाखवला आहे, ते काही पटत नाही. काही सवांद छान आहेत, पण बरेचसे सवांद शिव्यांमध्येच हरवतात, ते आपल्या पर्यंत पोहचतच नाहीत. राम गोपाल वर्मा वरून एक पात्र आहे, ते बघायला मजा येते, तो भाग तेवढा विनोदी आहे. बाकी धक्कादायक प्लॉट ट्विस्ट अजून तरी आलेला नाही.
दुसऱ्या सीजनचे ३ भाग काल बघून
दुसऱ्या सीजनचे ३ भाग काल बघून झाले, पण पहिल्यापेक्षा दुसऱ्याने निराशा झाली. स्टोरीलाइन उगीचच इथेतिथे भटकते असे वाटले सारखे.
अजून पहिला नाही पाहिलेल्यांनी
अजून पहिला नाही पाहिलेल्यांनी सांगा की कथा दुसऱ्या सिझन मध्ये संपतेय का? की परत नेक्स्ट सिझन ची सोय केली आहे? पहिल्या सिझनमध्ये पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात का?
मी पाचव्या भागात आहे. पहिल्या
मी पाचव्या भागात आहे. पहिल्या सीझनचा एजि नेस पक्षी धार थोडी कमी झाल्यासारखी वाट्ते. तेव्हा प्रत्येक ट्विस्ट ला एक शॉक व्हॅल्यु होती. आता हे लोक असेच वागणार हे थोडे समजू लागले आहे. जमीला म्हणजेच झॉया ना? क्रोए शिआच्या आश्रमाची बिल्डिंग भारी आहे. ओशो च्या रजनीश पुरम ची आठवण येते. बागवान. वैल्ड वैल्ड कंट्रीवाला.
माझ्या इथे सबटा य टल्स २० ३० सेकंद पुढे चालली आहेत त्यामुळे काय होणार ते आधेच कळत आहे. आता काय करावे?!
बलिदान देना होगा म्हण्जे मास किलिंग ऑफ पीपल का? जिनोसाइड?
यादव बाईचे काम करणारी नटी कोण
यादव बाईचे काम करणारी नटी कोण आहे? ती गली बॉय मध्ये हिरोची आई होती. परवा चला हवा येउद्या सेलि ब्रिटी पॅ टर्न मध्ये आई बरोबर आली होती व अतिशय वाइट भसाड्या आवाजात एक गाणे म्हटले होते माय लेकी एकदम इरिटेटिन्ग वा टतात. अॅज अॅक्ट्रेसेस. एकच पद्धतीचे काम सर्वत्र.
दत्ता भाउ बघून मस्त वाट्ते आहे पण. प्रवचने खूपच आहेत. गायतोंडेची आध्यात्मिक प्रगती फारच भारी चालली आहे. कल्की नेहमीचाच रोल.
यादव बाईचे काम करणारी नटी कोण
यादव बाईचे काम करणारी नटी कोण आहे? >>>>> अमृता सुभाष, तिची आई ज्योती सुभाष.
Next season cha wait karav
.
श्रद्धे तुला दंडवत!
श्रद्धे तुला दंडवत!
मी आताच पाचवा भाग संपवला, आणि पहिल्यांदा काहीतरी स्पेशल फिलिंग आली. नाहीतर आतापर्यंत सर्व सिजन सपक वाटत चालला होता.
सगळ्यात महत्वाची गोष्ट. मिसिंग काटेकर!!!!
अतिशय वाइट भसाड्या आवाजात एक
अतिशय वाइट भसाड्या आवाजात एक गाणे म्हटले होते माय लेकी एकदम इरिटेटिन्ग >>>> =))
=))))
दुसरा भाग बघतोय. अजिबात
दुसरा भाग बघतोय. अजिबात इंटरेस्टींग वाटत नाहीये.
बघतोय. दुसरा चालू केलाय.
बघतोय. दुसरा चालू केलाय.
अमृता सुभाष बद्द्लचं अमांच्या मताशी अगदी सहमत. एकाच टोन मध्ये सदैव काम. तिचा आवजही हाय पिच कर्णकर्कश्श्य आहे म्हणून कानात न जाता डायरेक्ट डोक्यातच जातो.
ज्योती सुभाष (यात नाहीयेत) मात्र फार्फार आवडतात. अत्यंत नैसर्गिक, संयत मच्युअर अभिनय. सेन्स ऑफ ह्युमर आणि प्रसन्न वावर असतो एकदम.
काटेकरची बायको नेहा शितोळे आहे हा साक्षात्कार काल झाला. तिला आता नावडून घेतलं पाहिजे
मी कालपासून पहिला भाग पुन्हा
मी कालपासून पहिला भाग पुन्हा पाहायला घेतला. सध्या पहिल्या सिजन चा ८ वा भाग चालू आहे. इन कंटिन्युएशन दुसरा भागही सुरू करेन.
पहिला सीज़न उडत उडत बघितलेला,
पहिला सीज़न उडत उडत बघितलेला, म्हणजे नवर्याने बघायला घेतले की मी 10 मिनिटात झोपून. आता दुसरा सीज़न मन लावून बघत्ये. दोन भाग झाले बघून. झोपायला १ वाजला रात्रीचा, आज सकाळी एकद ७:३० जाग आली, मधून मधून गायतोंडे सारखे बोटीवर आहोत अशी स्वप्ने पडत होती. ऑफीस मधे यायला १०:३० झाले (रोज ७ वाजता येते!). सेक्रेड गेम्स साठी काय काय करायला लागताय .
सर्वात पहिला प्रश्न पडला - गायतोंडे ला पहिल्या सीज़न मधे मारले होते ना मग परत जिवंत कसा झाला? पण नवर्यासमोर आती द्यान पाजळले नाही. मग हळूहळू समजले की दोन समांतर कथा आहेत - १९९४ आणि २०१९ मधल्या.
बिग बॉस मधली नेहा शितोळे दिसली. बिग बॉस मधे जायच्या आधी शूटिंग संपवले असेल कारण ती बिचुकले सारखी आत बाहेर नाही आली. सर्वांची आक्टिंग अगदी भारी - एक ती अमृता सुभाष सोडली तर. खरा तर किती वाव होता रॉ एजेंट ची भूमिका. अगदी माती केल्ये तिने.
आसामी ब्राह्मस्मि चा अर्थ काय बरे?
तो आश्रम काय छान आहे!! असे एक घर पाहिजे ना राहायला? ते घरचे प्रवेशद्वार मंडल काढलेले - अत्युच्च!
पहिला सिजन खूप अंगावर आलेला,
पहिला सिजन खूप अंगावर आलेला, थोडे अस्वस्थ आणि अप्रशस्त वाटायचे बघताना. खूप रॉ सीन्स होते. दुसरा सिजन अजुन तरी असा अंगावर आला नाहीये.
सरताज ची बायको करणारी अभिनेत्री बदलली का? ही खूप खप्पड वाटते आणि त्यात ते फिलर केलेले ओठ बघवत नाहीत.
असामी ला कशाला ओढताय??
असामी ला कशाला ओढताय??
अहम (म चा पाय मोडा.. त्या बंटी सारखा) ब्रहमास्मि... म्हणजे मी (मी तुम्ही ... सगळे चराचर) ब्रह्म.. म्हणजे इश्वर आहोत. यात अद्वैत भाव आहे. सगळी सृष्टी एकाच तत्त्वाची आहे.
गायतोंडेच्या भाषेत एव्हरी थिंग ब्रेक्स डाऊन इन टू सेम स्ट्युपिड शिट अँड वुई आर मेड अप ऑफ सेम फXXX शिट. यू मी ऑर गॉड!
हाहा अमितव
हाहा अमितव
झालं बघून, शेवट चांगला केला
झालं बघून, शेवट चांगला केला आहे, पण तिसरा सिजन काढू येऊ नये, काही गरज नाहीये
अरेच्च्या, इथे स्पॉयलर अलौड
अरेच्च्या, इथे स्पॉयलर अलौड आहे, तेहि पहिल्याच दिवसात? गाइज, कर्ब योर एंथुझियाझ्म...
(No subject)
ते सर्व अहं ब्रम्हासमी
ते सर्व अहं ब्रम्हासमी म्हणतात. काय हे. अहं ब्रम्हास्मि आहे.
पहिल्या सिझन मध्ये हिंदू आणि
पहिल्या सिझन मध्ये हिंदू आणि ब्राम्हणांवर चिखलफेक होती असा मला भास झाला. त्यामुळे मी दुसरा सिझन बघायचा नाही असं ठरवलं होतं. तसं दुसऱ्या सीझनमध्ये पण आहे का? का खरं किंवा unbiased दाखवलंय?
अमृता सुभाष च्या रोल बद्दल
अमृता सुभाष च्या रोल बद्दल अनुमोदन
कितीही करारी रोल द्या, ती गरीब, परिस्थितीने गांजलेली अशीच वाटते
आवाजात हुकूमत वगैरे प्रकारचं नाहीत
एकाच फ्लॅट टोन मध्ये बोलत जाते बाई
मला तर शिसारीच आली त्यांचे
मला तर शिसारीच आली त्यांचे दृश्य बघताना...
गणेश गायतोंडेची इनर जर्नी दाखवली आहे ती एकदम करेक्ट दाखवली आहे. लहानपणचे सल दु:खे मनातून कधीच जात नाहीत.
मला तर शिसारीच आली त्यांचे
मला तर शिसारीच आली त्यांचे दृश्य बघताना...
गणेश गायतोंडेची इनर जर्नी दाखवली आहे ती एकदम करेक्ट दाखवली आहे. लहानपणचे सल दु:खे मनातून कधीच जात नाहीत.
मला तर शिसारीच आली त्यांचे
मला तर शिसारीच आली त्यांचे दृश्य बघताना...
गणेश गायतोंडेची इनर जर्नी दाखवली आहे ती एकदम करेक्ट दाखवली आहे. लहानपणचे सल दु:खे मनातून कधीच जात नाहीत.
Pages