मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

च्रप्स आणि Mmmmm इथे तुम्ही स्वतःच बिग बॉस सुरु करु नका. नो पर्सनल अ‍ॅटेक्स प्लीज! अन्जू तु लिही! Happy

बिच्चारा केळया, जाता जाता दणके खाऊन गेला. पण त्याला तोच जबाबदार होता.

नेहमीप्रमाणेच हलक्याश्या कानपिचक्यांवर शिवानी निसटली.. >>>>>> अगदी अगदी. शिवानी किती खोट बोलली यार! नेहा तिला टशन देत होती एकटक बघून म्हणे. ममाने नेहाची बाजू घेतलीच नाही.

हीना ने चुक तर केली पेस्ट्री नीट न बघता फ्रीज मध्ये आणी नंतर उगीच कैमरा समोर स्पष्टीकरण देत होती मी इथे कुणाशी भांडायला आले नाही मैत्री करायला आले तिला वाटते की किशोरी ताई नी मुद्दामून तिला तिची पेस्ट्री नाही दाखवली. >>>>>>>>> नैतर काय. ती पेस्ट्री तिने बिचुकलेसाठी ठेवली होती. धन्य!

बाकी काल जरा सगळ्यांचेच ड्रेसेस नेहमीपेक्षा बरे होते.. >>>>>>>>> ++++++++१११११११११

केळ्या आणि किशोरीताईंवर जरा जरी आरोप झाले तरी त्यांची पहिली रिॲक्शन कायम "कोण मी? काहीही काय?" अशीच असते.. >>>>>>> आधी किशोरीताई चान्गल्या वागत होत्या. कोणाविषयीही वाईट बोलायच्या नाहीत. हल्ली त्याही गेम खेळू लागल्या आहेत.

कालच एडिटिन्ग गण्डल होत का? मांजरेकर हिनाला तुझ्यावर आता स्पेशल बॉम्ब फुटणार आहे असे म्हणाले आणि नन्तर ब्रेक घेतला. वाटल ब्रेकनन्तर पेस्ट्री प्रकरणाविषयी बोलणार असतील. पण ब्रेकनन्तर डायरेक्ट रविवारचा टास्क ( गुन्हेगार कोण) दाखवून शो सम्पवला. Uhoh

पण सिझन का आपटला आहे . मागच्या सिझन पेक्षा हा जास्त चागला आहे कि. मागच्या वेळी आधीच जाणवले होते मेधा विनर आहे.
या सिझन ला विनर कोण असेल अजून काळात नाही आहे. खूप अनप्रेडिक्टेबल आहे.

मी टीवी वर नाही बघत पण आज बिग बॉस रात्री 8वाजता आहे.
कालच एडिटिन्ग गण्डल होत का? >>>>>नेहमी च गंडले असते ते. ते शीव वीणा चे रुठना मनाना का चाललेले ते ही कळले नाही.
वीणा सारखी नाकाला विक्स का लावत असते?
बिचुकले बाथरुम शैम्पू नी साफ करत होते. विणा सांगत होती ते भांडी हँडवॉश ने धूतात म्हणूनच त्याना किचन ची ड्यूटी देत नसतील.

आपल्याला कोणी कसलंही काम सांगू नये म्हणून बिचुक ले असं करत असतील Lol
शिवच्या वीणाचे रुसवे काढण्याचा कंटाळा आला. तो सगळ्यांसमोर तिला काहीतरी बोलला, ते तिला आवडलं नाही. मग ते मजाक मध्ये होतं, असं सांगत बसला. ती ओके ओके म्हणत होती तरी दळतच होता. तो एकदम सॉफ्ट अवाज लावतो, त्यात काय बोलतो ते अजिबात कळत नाही. त्यामुळे हा प्रकारही फा फॉ करायच्या लायकीचा आहे.

डायनिंग टेबलवर आता सगळ्यांसोबत जेवायला बसतात, पण मध्येच शिवने वीणाला भरवलेलं दिसलं. आणि हे अगदी सहज चाललेलं.
फक्र मांडीवर डोकं ठेवून झोपणं प्रकार दिसला नाही.

बिचुकले बोलताना दिसले की मी फाफॉ करतो, त्यामुळे लवकर बघून संपतं Lol

एकंदरित सगळेच कंटाळवाणे आहेत. आरोह सध्या नवा म्हणून वेगळा वाटतो.

अभिजीत केळकर गेला असेल तर पुष्कळ समीकरणं बदलतील.

रद्दी देताना नाटकाच्या जाहिरातीत आरोहचा फोटो दिसला. व्हाय सो गंभीर.

हो यावेळी नक्कीच मेकप - हेअरस्टाइलिस्ट तरी बिबॉ तर्फे पाठवले असावे. एकदम सडन इम्प्रूवमेन्ट होती Happy
शिवानी च्या ड्रेस चा रंग खूप आवडला मला. किशोरीची साडी, नेहाचा लूक पण छान.
काल अभिजीत ला भरपूर धुतलं. बिचुकले ला काही फार बोलले असे वाटले नाही. जे बोलले ते त्याने धूळ झटकावी तसे उडवून लावले.
किशोरी विरुद्ध वीणा / नेहा वादात मला किशोरीची अर्ग्युमेन्ट्स अ‍ॅज युजवल फार लेम वाटली.

हो, नक्कीच सलमान खान येणार म्हणून प्रोफेशनल मेकप हेअर , स्टायलिंग करून दिलं होतं काँटेस्ट्न्ट्सना.
काल केळ्याला सोललं तसं पण शिवानीपुढे आवाज घशात , फक्तं हिनावर ओरडताना वरची पट्टी , बाकी गुळ्मुळीत बडबड मांजरेकरची अख्खा एपिसोड.
त्या आधी तेच ते शिव वीणाचं रुसणं , मग गळ्यात घळे, मांडीवर येणे , आता फक्तं मागच्या सिझनच्या राजेश रेशम सारख आज पासून आम्ही एका बेडवर झोपणार अनाउन्स करायचं बाकी आहे, तशीही ती रात्री अपरात्रीही शिवला गाढ झोपेतून उठवून मिठ्या मारायला येते ही क्लिप झालीच आहे व्हायरल, कोणीतरी वुट वरून ट्विटरवर टाकली होती.
Btw बापरे, आजचा शो चं टिझर पाहिलं, बिचुकलेची ओळख करून दिली मांजरेकरची आणि त्याला नाचताना पाहून सलमान म्हणे ‘इसे यहांसे निकालके सीधा बिबॉ हिन्दीमे डालो ! Uhoh
बिचुकले खरच हिन्दीत गेला तर नवल वाटणार नाही, हिन्दीचे सिझन्स पाहिले नाहीत पण जे स्वामी ओम बद्दल ऐकलय/वाचलय, बिचुकलेत दुसरा स्वामी ओम बनायची कुवत नक्कीच आहे.

हिन्दी बीबी त बिचुकले गेला तर कळेल त्याला गेम काय असतो ते इथे नुसता टाईमपास करत असतो. पण हिन्दी मध्ये यावेळे पासुन कॉमनर नाहियेत.

आज केतकी माटेगावकरने गायलेल्या गाण्याची चाल खूप ओळखीची वाटतेय..
शब्द आठवत नाहीयेत

BB मराठी च्या 2ऱ्या सीझनमध्ये सगळ्या स्पर्धकांनी आपापली स्ट्रगल स्टोरी सांगितली होती ना, तो कोणता एपिसोड होता (नंबर) सांगाल का कोणी??
मी सुरुवातीपासून पाहिलं नाहीये हे BB, सो माहीत नाही नक्की...

Btw आजचं केळकरचं जाणं शॉकिंग होतं,किशोरी जायला हव्या होत्या आज खरंतर.. केळकर गेल्यामुळे गेममधली मजा कमी झाली यार..

मीनाक्षी सुरुवातिच्या 3आठवड्यात असणार तो एपिसोड कारण शिवानि त्या वेळी घरात होती. किशोरी जायला हवी होती पण केळकर ला बाहेर सपोर्ट नव्हता .

Thank you अमुपरी..
हो, ते तर आहेच... किशोरी यांना खूप सपोर्ट आहे सोमीवर... पण केळकर जास्त चांगला आणि डोकेबाज खेळाडू होता...

टॉप टू मध्ये कोण असेल यावर फक्त अ.के.बद्दल सगळ्यांचं एकमत होतं.
ज्या आठवड्यात त्याचं वागणं घसरलं नेमकं तेव्हाच तो नॉमिनेट झाला होता.

उद्यापण बिचुकलेवर फोकस Angry

BB मराठी च्या 2ऱ्या सीझनमध्ये सगळ्या स्पर्धकांनी आपापली स्ट्रगल स्टोरी सांगितली होती ना, तो कोणता एपिसोड होता (नंबर) सांगाल का कोणी?? >>>>
शीव आणी शिवानि यांची स्ट्रगल स्टोरी त्यांच्या इंस्टाग्राम पेज वर आहे. 30मे 31मे 1जून या एपिसोड मध्ये असेल असले तर .
नाहितर म अनसीन अनदेखा मध्ये असेल 1जून ते 6जून मधल्याचेक करावे लागेल.

Btw आजचं केळकरचं जाणं शॉकिंग होतं,किशोरी जायला हव्या होत्या आज खरंतर.. केळकर गेल्यामुळे गेममधली मजा कमी झाली यार..>> अगदी हेच लिहायला आले होते. तो काही फार उत्तम कंटेस्टंट होता असे बिलकुल नाही पण गेम मध्ये मजा नक्की आणायचा. टास्क चांगले समरसून खेळायचा. मे त्याच्या reaction खूप मिस करेन.
किशोरी ताई आधी आवडायच्या पण आता बिलकुल नाही आवडत.

पराग ने त्याच्या इंस्टाग्राम पेज वर लिहले होते 3rd wicket थँक्यू माय सपोर्टरअसे. आणी त्याच्या यूट्यूब चन्नेल वर केळ्याची( banana use करुन )रेसिपी टाकली आहे.

एग्झॅक्ट्ली पराग हा अत्यंत कोत्या मनोवृत्तिचा , सायको, मेन्टली अँड फिजिकली अनफिट , क्रिमिनल इ. सगळं काही आहे.
बिबॉ त्याच ऑबसेशन होतं पण तो कुठल्याही प्रकारे या गेमसाठी अजिबात फिट नाही !
अजुन एका पोस्टवर त्याने लिहिलय कि तिसरी विकेट पडली, माझ्या फॉलॉवर्सने हे करून दाखवल, आज अख्खी बाटली खाली करणार’ Uhoh
आय मिन सिरीयस्स्ली?
पूर्ण क्रेडीट आरोहचं आहे, तू गेममधे होतास तेंव्हा जमलं का तुला केळ्याला नॉमिनेट करून बाहेर काढणं किंवा साधं एखादा टास्क नीट खेळणं रडीचा डाव न करता? ,
खरच जे कोणी त्याचे सपोर्टर्स आहेत त्यांना आत्मपरिक्षणाची गरज आहे.
लिहावंच म्हणतेय त्याच्या पेजवर.

वीकेंडची फलश्रुती - केळ्या गेला! ( एकदाचा ! )

घरातील नवीन समीकरणे कशी असतील? यावर माझा अंदाज ---

शिवानीला हीना आवडत नाही आणि हीनाला आरोहवर विश्वास नाही. हीनानी नॉमीनेट केलं म्हणून किशोरीचा हीनावर राग आहे.
गेल्या काही दिवसात नेहा आणि वीणाची छान केमिस्ट्री जुळून आली आहे.
आरोह शिवानी बरोबर कंफर्टेबल असतो असं दिसलं आणि शिवानी किशोरी बरोबर.

आरोह - शिवानी - किशोरी

नेहा - वीणा - हीना

शिव थोडा थोडा सगळीकडे

बिचुकले असूनही कुठेच नाहीत! - खायला काळ आणि बिबॉच्या घराला भार Proud

च्रप्स आणि Mmmmm इथे तुम्ही स्वतःच बिग बॉस सुरु करु नका.
>>> हो- मी ओव्हर रियाक्ट केले असे मला वाटत आहे. मी Mmmmmm यांची माफी मागतो !

केतकीचं गाणं मस्त होतं.
---
शिवानी बिचुकलेंना म्हणाली, सॉरी म्हणाल्याने तुम्ही लहान होणार आहात का? Lol
---
नव्या मालिकेचे प्रोमोज दाखवताहेत. स्वामिनी.. पेशवाईवर आहे. स्वामी माधवरावांवर होती म्हणजे ही रमाबाईंवर असावी.
वार्‍यावर पदर उडत धावण्याचा देवदास-पारो स्टाइल सीन आहे.

सलमान भाईजान म्हणून काहीच्या काही हाइप केलेला एपिसोड अति बोअर निघाला. सलमान अत्यन्त अनइंटरेस्टेड दिसत होता. ममां आणि तो दोघेही एकेमेकासोबत अवघडल्यासारखे बोलत वागत होते. ममां काहीही ओढून ताणून त्यांच्या मैत्रीच्या कथा सांगत होते आणि सलमान ला ते आठवतही नसावे असा त्याचा चेहरा होता. मधेच टोटली आउट ऑफ काँटेक्स्ट प्रश्न, उत्तरं. Uhoh आवरा! Uhoh असे पूर्ण वेळ वाटत होते !!
सर्व कॉन्टेस्टन्ट्स अगदी किशोरीसारखे सिनियर म्हणवणारे लोक पण आपला नाच सलमान ला दाखवण्यात अति उत्सुक होते.
त्यातल्या त्यात इंटरेस्टिंग फक्त केळ्याच्या बिदाईचा सीन होता.
छ्या ! फारच बोअर झाले आज.

Btw आजचं केळकरचं जाणं शॉकिंग होतं,किशोरी जायला हव्या होत्या आज खरंतर.. केळकर गेल्यामुळे गेममधली मजा कमी झाली यार..+११११
त्या बिचुकलेला लाथ घालून हाकला आधी थर्ड क्लास माणूस..!!

काल जेव्हा मांजरेकर सलमानची ओळख सदस्यांशी करत होची, तेव्हा हिनाची ओळख करून देताना "ही थोडीशी" असे म्हणाले आणि एकदम विषय बदलला. त्यांना "ही थोडीशी मलाइका अरोरा सारखी दिसते" असे म्हणायचे होते बहूतेक. पण तिने अरबाज खानशी काडीमोड घेऊन अर्जून कपुर बरोबर जुळवल्याने सध्या सलमान आणि फॅमिली तिच्याशी बोलत नाहीत. ते एकदम मांजरेकरांच्या लक्षात आले असावे...

खास सलमान येणार म्हणून एपिसोड बघितला.

वर मैत्रेयीने लिहिलंय तसं सलमान अगदीच बोअर झाला होता. त्याला काही रस नव्हता.
परागने थर्ड विकेट वगैरे लिहिलं असेल तर अगदीच स्टुपीडिटी आहे.
किशोरीची साडी सुंदर होती, तिला तो रंग अगदी खुलून दिसत होता.
केळकर गेल्याचं तो स्वतः , शिव आणि किशोरी सोडून कोणाला फारसं वाईट वाटलं नाही. शिव रडत होता तेही जरा फेक वाटत होतं. बाकी सगळे निवांत होते. आरोह तर अगदीच डबल ढोलकी, त्याला घालवून मग रडण्याचं नाटक कशाला. नेहा अगदी कूल होती, तिला आनंद झाला असणारच कारण मोठी थ्रेट गेली. आता आरोह आणि शिव फायनलपर्यंत फिक्स कारण दोन तरी पुरुष ठेवायला लागतील ना त्यांना.
बिचुकलेना काढतील.

नेहाशी पंगा घेतलेले सगळे एकेक करून गेले. वैशाली पराग प्रकरणात नेहासोबत होती. पण नंतर नेहाशी दुरावली आणि बाहेर गेली. माधव नेहाला बोलल्यावर बाहेर गेला. केळकर नेहाशी ओपनली पंगा घेऊन बाहेर गेला. नेहाला बिग बॉस घाबरत असावं कारण परागने माझ्यावर हात उचलला पण बाऊन्सर लगेच आले नाहीत, माझ्या सुरक्षेची काळजी घेतली नव्हती असा आरोप ती करू शकते.
नव्या सिरियलीचा प्रोमो बघून कपाळावर आठ्या पडल्या. Another mediocre historic serial. काही नवीन किंवा ओरिजिनल विचारच नाही. :जांभया देणारी बाहुली:

सलमान येणार एकुन हा ईपिसोड पाहिला. अतिशय फालतु वाटला. बिबॉ बघत नाहि ह्याच समाधान वाटलं.
तो बिचुकले कोणाला कसा काय आवडु शकतो हा प्रश्णच आहे. आधी बर्‍याच लोकांना आवडला हे सुद्धा कोडेच आहे. इतका अस्वच्छ, अजागळ माणूस आणि वाणी...
सगळे अगदी बेक्कार आहेत. केळकर चक्क खोटं बोलुन हिरा चड्डीत लपवला म्हणे एकुन विचित्रच वाटले. अजिबात स्पोर्टमनशिप नाही, सचोटी नाही ; कपट करून जिंकणे कसे काय योग्य?
हिना एकदमच सँपल आहे वाटते. केळकरच्या नादाने किशोरी पण कुसकट वागली वाटतं..
कोणी विन्नर कॉलीटी नाहिये.

कालचा भाग नाही पाहिला ते एकंदरीत बरच झाल,इथल्या पोस्टवरून कळतय.
पण मग सलमानला आणलच कशाला?
केळकरला स्पेशल पॉवर दिली का?त्याला नॉमिनेट करण्याची पॉवर देतील बिबॉस.

Pages