"महाराज, दास वार्ता घेऊन आला आहे."
"अनुमती आहे."
"महाराजांचा विजय असो. महाराज, तुमच्या अनुज पंडुंना द्वितीय पुत्र प्राप्त झाल्याची आनंदवार्ता आहे. ऐकण्यात आले आहे की वायुदेवांचा वरदहस्त आहे युवराजांच्या माथी."
'युवराज? आत्तापासून पंडुपुत्राने राजगादीवर अधिकार जमवायला सुरवात केली?' धृतराष्ट्राच्या मनात तिडिक गेली.
भीष्माचार्य आनंदाने उठून दासाजवळ आले. एक दागिना त्याच्या हातात ठेवत त्यांनी पंडुकडे काही राजभेट वस्तू पाठवून दिल्या. धृतराष्ट्र आता आतून जळू लागला. 'आपल्या अनुजाला दोन पुत्र प्राप्त झाले आणि आपण अजूनही नि:संतान? आता नाही! गांधारी, जर तू मला पुत्र देऊ शकत नसशील तर मी अन्य मार्गाने तो मिळवेन.'
त्याने राज्यसभेतून काढता पाय घेतला. त्याच्या अहंकारावर, स्वाभिमानावर एक खोल घाव लागला होता. वार करणारे हात गांधारीचे आहेत असे त्याला वाटतं होते. डोळ्यांवर पट्टी तिने आपला अपमान करायलाच बांधली होती, असेही त्याला वाटू लागले. 'या कृत्रिम अंध नारीला धडा शिकवायलाच हवा.' दासाला हाक मारत त्याने सोमरस मागवला. रागाच्या आणि नशेच्या भरात त्याने गांधारीच्या परिचारिकेला कक्षात येण्याची आज्ञा केली!
------
सुर्यदेवांचा अस्त झाला आणि वाऱ्याने वादळाचे रुप घेतले. कोल्हे बेसूर कोल्हेकुई करू लागले. कुत्रांचे अवेळी भुंकणे रडणे सुरु झाले. भली मोठ्ठी झाडे वाऱ्याच्या उद्वेगाने कोसळत होती. नगरवासी घाबरले होते.
"महामहीम, काहीतरी अशुभ घडण्याचे संकेत दिसताहेत."
"विदुर, काय म्हणायचे आहे तुला?'
"महामहीम, अभद्र शक्तीच्या आगमनाच्या वेळी निसर्ग विलाप करतो. एखादा दुरात्मा हस्तिनापुरात अवतरणार आहे, असे दिसते." तितक्यात धृतराष्ट्र दालनात आला.
भीष्मांना काहीतरी आठवले....
"महाराज, विदुर आपल्याला वेदव्यास ऋषींच्या आश्रमात जायला हवे."
"महामहीम? शुभ वार्ता आली आहे?" उत्कंठेने धृतराष्ट्राने विचारले.
"अजून नाही महाराज!"
चेहऱ्यावर निराशा घेऊन धृतराष्ट्र म्हणाला, "महामहीम, अशी वार्ता येईल असेही वाटत नाही आता. आणि आली तरी ती शुभ नसेल माझ्याकरता."
"असे का म्हणता महाराज? वेदव्यासऋषींवर विश्वास नाही तुमचा?"
"आहे विदुर. पण कैक पटीने जास्त अविश्वास गांधारीवर आहे. तिला जर मला पुत्र द्यायचे असते तर ते तिने केव्हाच दिले असते."
"महाराज.... महाराणींचा काय दोष यात?"
"का नाही विदुर? का नाही? माझा राज्याभिषेक न होण्याचे कारण जर माझे अंधत्व असू शकते तर माझ्या पुत्रांना राजगादी न मिळण्याचे कारण गांधारी का असू शकत नाही?" विदुर शांत राहिला.
"सर्वात आधी गर्भधारणा झाली होती ना महाराणींना विदुर? मग त्या मानाने का होईना माझ्या पुत्रांना मला न लाभलेले राज्याभिषेकाचे भाग्य लाभेल? आणि जर नाही, तर हा दोष गांधारीचा का नाही?"
"महाराज, फक्त राजगादी मिळणे हेच ध्येय असते का जिवनाचे?" भीष्माचार्य म्हणाले.
"महामहीम, राजेपद सोडण्याचा निर्णय तुम्ही स्वतः घेतलात. स्वतंत्रपणे. पण स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या निर्णयाचे भार वेगवेगळे असतात महामहीम. माझे पुत्र जन्माला आले तरी कपाळी दासत्व घेऊन येतील. राजगादीवर बसलेल्या व्यक्तीच्या निर्णयाचे ओझे वाहत जगण्यात काय ध्येय असणार माझ्या पुत्रांच्या जिवनाचे?"
या अश्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे हेच दोघांना कळेना. धृतराष्ट्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. " शिवशंकरांनी वरदानरुपी शापच दिला गांधारीला. आणि गांधारी सुद्धा एक शापच आहे या अंध धृतराष्ट्राला मिळालेला." अगतिक झाल्यासारखा तो बोलत राहिला.
मोठमोठ्या घड्यांनी भरलेल्या त्या आंधारलेल्या गुफेत गांधारी बसून राहिली होती. हिंस्र प्राण्यांच्या आवाजाने ती थोडी बिचकली होती. हवेतल्या गारव्याने अंगावर शहारे आले होते.
'एकशे एक घडे! आपल्या गर्भाला विभागून भरलेला एक-एक घडा.... वेदव्यासऋषींनी वनऔषधी उगाळून, रस काढून, पिसून त्या घड्यांत अभिमंत्रित केले. म्हणाले, " गांधारी, या घड्यांमध्ये मी गर्भपोषक वातावरण तयार केलं आहे. शंभर पुत्र आणि एक कन्या या घड्यांतून जन्म घेतील." आज ऋषीमुनी नसते तर....? महामहीम भीष्माचार्यांनी हा मार्ग सुचवला नसता तर....? देवांनी दिलेल्या वरदानाचे काय झाले असते? माझ्या पुत्रांचे काय झाले असते? नाही... नाही, गांधारी, असे विचार देखील मनात आणू नकोस. कोणत्याही क्षणी आपले पुत्र जन्म घेतील.... आपले पुत्र.... !'
तितक्यात एक आवाज वनांतून येणाऱ्या भयाण आवाजांमध्ये मिसळला. "खाड...." गांधारीने घाबरून तिथल्या सेविकांना हाका दिल्या.
सेविका धावत आल्या आणि पाहिलं तर एक घडा फुटून त्यातून लहान पाऊल बाहेर आलं होत.
©मधुरा
मधुराजी लिहीत रहा. ingor them
मधुराजी लिहीत रहा. ingor them who wants down you.. keep writing....
महाभारत हे साहित्यच असं आहे,
महाभारत हे साहित्यच असं आहे, की हजारो दृष्टीकोनातून बघितलं, तरीही त्यातून काहीतरी नवीनच निष्पन्न होतं.
लिहीत रहा, विनाकारण नाउमेद हाऊ नका.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!
धन्यवाद अक्कु
धन्यवाद अक्कु
धन्यवाद महाश्वेता
मनापासून धन्यवाद! तुमच्या प्रतिक्रिया वाचून छान वाटले.
मी लिहित राहिन.
महाभारत सार्या भारताचे पाठ
महाभारत सार्या भारताचे पाठ आहे,म्हणुन काय कोणी महाभारत लागल्यावर डोळे झाकून नाही बसत! याउलट आवडते हे सर्वांना! श्रीक्रुष्ण वाणीची revision होते मनाला! keep writing! All the best!
दुर्योधन, भीष्म पितामह,
दुर्योधन, भीष्म पितामह, अश्वत्थामा, अंगराज कर्ण हेच माझे हिरो आहेत. हे माझं वैयक्तिक मत आहे. हे सांगितल्यावर
<<
दुर्योधन, भीष्म पितामह, अश्वत्थामा, अंगराज कर्ण हेच माझे हिरो आहेत. >>>> मग चैतन्य, मन घट्ट करा. तुमच्या हिरोज् ना माझे हिरोज् 'कही के नही छोडनेवाले!'
Need a spoiler alert? Wink
कर्ण आणि दुर्योधनाला तर डायरेक्ट वरतीच पाठवणार आहेत. Wink Lol>> असा प्रतिसाद देणे आवडले नाही. माझ्या वैयक्तिक मताचा आदर केला गेला नाही.
धन्यवाद शिव !
धन्यवाद शिव !
मनापासून आभार!
चैतन्य, मी कोणाचाही अनादर
चैतन्य, मी कोणाचाही अनादर केला नाही. एकदा कृपया तटस्थपणे प्रतिसाद वाचा.
मधुरा ताई, तुला मेल केला आहे.
मधुरा ताई, तुला मेल केला आहे.
जर एकालाही वाचावंस वाटलं नाही
जर एकालाही वाचावंस वाटलं नाही तर बंद करेन. >> तुम्हाला जोवर लेखनातून सृजनाचा आनंद मिळतो आहे तोवर नक्की लिहा.
कोणी वाचतो नाही वाचतो तेवढे महत्वाचे नाही. फक्त हा विषय आणि त्यातले नाट्य ह्यात ना नावीन्य आहे ना सृजन ना कथा.
एक कथा लेखक म्हणून तुमच्या स्वतःकडून काय अपेक्षा आहेत मला माहित नाही... पण ह्याचे ऊत्तर नुसते "महाभारतावर काहीतरी लिहावे असे वाटते" असेल तर असे दिशाहीन 'काहीतरी' लिहून तुम्हाला समाधान मिळो ही सदिच्छा.
आणि हो आधी सांगायचे राहिले... भरीला घालणार्या भुरट्या वाचकांकडून सावधान... अर्थात कळेलच तुम्हाला हळू हळू अशा वाचकांचा पेशन्स किती कमी असतो.
पुढील लिखाणास शुभेच्छा.
हो मन्या, मेल वाचला. Thanks.
हो मन्या, मेल वाचला. Thanks.
भरीला घालणार्या फुकट्या
भरीला घालणार्या फुकट्या वाचकांकडून सावधान >> ''फुकटे वाचक'' ??? तुम्ही पैसे भरुन वाचतात?? आणि वाचत असाल तर चार पुस्तके घेवुन वाचा! -उगीच सल्ला
ओह माफ करा चुकीचा शब्द टाईप
ओह माफ करा चुकीचा शब्द टाईप झाला होता. दुरूस्ती केली आहे.
हाबभाऊ एखाद्याचे विमान उंच
हाबभाऊ एखाद्याचे विमान उंच उडायला लागले की बाकीचे सगळे लोक त्यांना मुंगी सारखे लहान दिसतात.
मधुराजी , अतिशय उत्तम चालली
मधुराजी , अतिशय उत्तम चालली आहे ही कथा...महाभारत सगळ्यांच माहिती आहे..पण प्रत्येकाला त्यातुन नवनवीन गोष्टी प्रत्येक वेळी नक्की मिळतात.... एकदा epic channel वरच धर्मक्षेत्र ही मालिका पण नक्की बघा....
हे सगळे भाग लिहिण्यासाठी खुप मेहनत लागते.आम्ही सगळे जण मनापासून नवीन भागाची वाट बघतो आहे. Negative comments कडे पण postively बघा पण त्यांना उत्तर द्यायच्या भानगडीत पडू नका.
मधुराजी , अतिशय उत्तम चालली
मधुराजी , अतिशय उत्तम चालली आहे ही कथा...महाभारत सगळ्यांच माहिती आहे..पण प्रत्येकाला त्यातुन नवनवीन गोष्टी प्रत्येक वेळी नक्की मिळतात.... एकदा epic channel वरची धर्मक्षेत्र ही मालिका पण नक्की बघा....
हे सगळे भाग लिहिण्यासाठी खुप मेहनत लागते.आम्ही सगळे जण मनापासून नवीन भागाची वाट बघतो आहे. Negative comments कडे पण postively बघा पण त्यांना उत्तर द्यायच्या भानगडीत पडू नका.
धन्यवाद छोटी.
धन्यवाद छोटी.
epic channel वरच धर्मक्षेत्र ही मालिका पण नक्की बघा....>>हो बघेन. Hotstar वर असेल ना?
Negative comments कडे पण postively बघा पण त्यांना उत्तर द्यायच्या भानगडीत पडू नका.>> बरोबर आहे.
मी महाभारत पहिले किंवा
मी महाभारत पहिले किंवा वाचलेले नाहीय .मला तरी खूप छान गोष्ट्टी कळतायत हि मालिका वाचून. लिहत राहा.
धन्यवाद च्रप्स!
धन्यवाद च्रप्स!
.>>हो बघेन. Hotstar वर असेल
.>>हो बघेन. Hotstar वर असेल ना?
नाही स्टारच channel नाही आहे ते....epic on म्हणून app आणि channel पण आहे
https://youtu.be/kvA1H-CAu4s कृष्ण preview आहे...मी app च subscription घेतलं होतं तेव्हा just to watch this serial.
महाभारत हे साहित्यच असं आहे,
महाभारत हे साहित्यच असं आहे, की हजारो दृष्टीकोनातून बघितलं, तरीही त्यातून काहीतरी नवीनच निष्पन्न होतं.
लिहीत रहा, विनाकारण नाउमेद हाऊ नका.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!
Submitted by महाश्वेता on 8 August, 2019 -
>> अगदी सत्य सांगितलेत बघा महाश्वेता आपण. महाभारत हा हिंदू मनुष्याचा अत्यंत जवळचा विषय आहे. त्यातील पात्रं त्याला जवळची, आदराची आहेत. तुम्ही म्हणता तसे प्रत्येकाला त्याच्या दृष्टिकोनातून वेगळं आकलन, आनंद होतो.
मला जे आवडेल ते इतरांना आवडेलच असे नाही.
छोटी, concept मस्त आहे त्या
छोटी, concept मस्त आहे त्या मालिकेचा.
स्टार प्लस वरची महाभारतही छान आहे.
अतिशय सुरेख मांडणी केली आहे
अतिशय सुरेख मांडणी केली आहे त्या serial मध्ये... नक्की बघावी अशी serial आहे ती... शकुनी आणि कृष्ण एपिसोड एकदम अप्रतिम झाले आहेत..
स्टार plus वरचं मला आवडले होतं... त्यात कृष्ण द्रौपदी ला समजावतो की हे युद्ध का गरजेचं आहे तो एपिसोड मला खुप आवडला होता...माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला तिथे मिळाली होती... आता तुमच्या लिखाणातून काहीतरी अजून नवीन कळेल
अतिशय सुरेख मांडणी केली आहे
अतिशय सुरेख मांडणी केली आहे त्या serial मध्ये... नक्की बघावी अशी serial आहे ती... शकुनी आणि कृष्ण एपिसोड एकदम अप्रतिम झाले आहेत..
स्टार plus वरचं मला आवडले होतं... त्यात कृष्ण द्रौपदी ला समजावतो की हे युद्ध का गरजेचं आहे तो एपिसोड मला खुप आवडला होता...माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला तिथे मिळाली होती... आता तुमच्या लिखाणातून काहीतरी अजून नवीन कळेल
हो छोटी ! अगदी मस्त !
हो छोटी ! अगदी मस्त !
स्टार प्लस वरचा ही शकुनी एकदम भारी काम करत होता अभिनयाच.
कर्ण चांगला योद्धा होता पण
कर्ण चांगला योद्धा होता पण शापित होता .
मधुरा तु खुप छान कथा लिहितेय
मधुरा तु खुप छान कथा लिहितेय .
तूझ्या लिखाणातून महाभारता चा काळ खरोखर आपल्या समोर चालु आहे की काय असा फील येतोय तूझी कथा वाचताना .
Very Nice
मनापासून धन्यवाद अशोक
मनापासून धन्यवाद अशोक
Please keep reading and expressing in comments , what you feel about the story.
Pages