फुलपाखराची ‘पोस्टमन’ गिरी
एकदा एक फुलपाखरू
भिरभिरत गेले फुलाकडे
म्हणाले मला हवंय
गोड गोड मध
फुल म्हणाले,
आत्ताच येऊन गेला शिंजीर,
फुलटोचा आणि इतर पक्षी....
दिले त्यांना मध
पण सवय त्या सर्व जणांची
घेऊन जातात माझी
डाक परागकणांची
पोचवितात माझ्या मैत्रिणीकडे !
करशील का तू हे काम माझे
फुलपाखरू म्हणाले
मी आहे इवलासा जीव
वाहू किती ओझे
अरे ने, जसे जमेल तुला तसे
इवल्याशा फुलपाखराने
दोस्ती केली फुलाशी
हस्तांदोलन केले
चाटून घेतला स्वाद मधाचा
जमेल तशी डाक परागकणांची
उचलून ते उडून गेले
फुलाची मैत्रीण खुदकन हसली
स्वीकारून परागकणांची भेट
फुलपाखराला दिली भरभरून
गोडगोड मधाची ‘रिटर्न गिफ्ट’
लागली चटक फुलपाखराला
करतो ‘पोस्टमन’गिरी आयुष्यभर
लुटतो आनंद मधुर मधाचा
मिळवतो सहवास सुंदर फुलांचा
आनंदी त्याचे जीवन जगणे
बागडणे भिरभिरणे
परागकण नेणे-आणणे !
डॉ. राजू कसंबे
(दि. १ मार्च २०१५)
छान.
छान.
छान कविता संग्रह होईन तुमच्या सगळ्या कवितांचा.
महोदय, तुमच्या कवितेवर थोडं
महोदय, तुमच्या कवितेवर थोडं पाणी फिरवतोय, माफ करा.
पण, "डॉक्टर" हे शास्त्रीय बिरुद मिरवताना किमान असल्या कविता लिहिताना 'बालगीत' सदरात लिहाव्या ही नम्र विनंती.
फुलाची "मैत्रिण"??? तुम्हाला हे हास्यास्पद वाटत नाही का? मला ६-७वीत पुंकेसर, स्त्रीकेसर अन परागण व भिन्नलिंगी पुनरुत्पादन याबद्दल शाळेत धडे होते. सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी.
बघा बुवा!
मस्तच!
मस्तच!
आ. रा. रा. साठी :
धन्यवाद !!