युगांतर आरंभ अंताचा! भाग १६

Submitted by मी मधुरा on 31 July, 2019 - 03:09

हस्तिनापुर महाल.
पुर्वदिशेला सुर्यदेवांचे आगमन झाले तसे महालाच्या खिडकीतून किरणांनी कक्षेत प्रवेश केला. अंबिकेला वरच्या कक्षात जाण्याची आज्ञा राजमातांनी दिली आणि तिने कक्षात प्रवेश केला. तो कक्ष एका दिव्य प्रकाशाने व्यापलेला होता. तिव्र प्रकाश असह्य होऊन तिने डोळे गच्च मिटले.
सत्यवती आतुरतेने येरझाऱ्या घालत होती.
"माते" महर्षी व्यासांचा आवाज ऐकून सत्यवती त्यांच्या जवळ आली.
"पुत्र व्यास.... अंबिकेला....."
"पुत्र होईल, माते. परंतु...."
"परंतु काय?" सत्यवती मनातून घाबरली.
"तो अंध असेल."
सत्यवती हातपाय गळल्या सारखी व्यासांकडे बघत राहिली.
"मी दिव्यशक्तीला आवाहन केले होते, माते. त्या शक्तीपुढे तिने डोळे मिटून घेतले. तिच्या उदरात असणारा जीव, त्या क्षणाची तिचीच प्रतिमा असणार आहे."
सत्यवती स्वतःला सावरत म्हणाली, "व्यास, अंध व्यक्ती राजा नाही बनू शकत. हस्तिनापुरची राजगादी एका सुदृढ व्यक्तीच्याच हाती असायला हवी."
"परंतु माते, हा नियतीचे निर्णय आहे. तो बदलण्याचा प्रयत्न म्हणजे काळाचे चक्र उलट्या दिशेने फिरवण्याची व्यर्थ कल्पना आहे."
"व्यास, तू पुन्हा शक्तीला आवाहन कर.... अंबालिकेसाठी."
"जशी आपली आज्ञा!"
सत्यवतीने अंबालिकेला आज्ञा पठवली. तिने कक्षेत प्रवेश केला तेव्हा व्यासांच्या सभोवती तेजोवलय निर्माण झाले होते. अंबालिका घाबरली. अमानवी शक्ती! भितीने तिचे हातपाय गार पडले.
व्यासांनी खिन्न मनाने सत्यवतीला कळवले. होणाऱ्या पुत्राचे स्वास्थ्य ठिक राहणार नाही हे कळाल्यावर सत्यवती खिन्न झाली. व्यासांना पुन्हा आज्ञा देणे तिच्या जीवावर आले होते. पण हस्तिनापूरची राजगादी....!
"अजून एक संधी दे!... अंतिम संधी!"
अंबिकेला पुन्हा आज्ञा मिळाली.
" अंबालिके, तु जा. "
"तिथे काहीतरी भयंकर आहे. तो प्रकाश, ती प्रखरता..... मी नाही जाऊ शकत. मला भिती वाटते."
"हो? पण मग मी तुला दिलेल्या आज्ञेचे काय?"
"पण आज्ञा तर तुम्हाला मिळाली होती."
"ती च मी तुला दिली ना.... आता तुला ती पूर्ण कशी करायची ते तू ठरवं!"
"असे? मग तुम्ही ही आज्ञा एखाद्या दासीला का देत नाही?"
अंबिकेला ही कल्पना आवडली. लगेच त्याची अंमलबजावणी करत दासीला कक्षात जाण्याची आज्ञा दिली गेली. दासी कक्षात गेली. दिव्य शक्तीच्या तेजकिरणांमध्ये उजळून निघालेल्या व्यासांकडे पाहून तिने आदरपुर्वक नमस्कार केला.
"माते, होणारा पुत्र धर्म आणि न्याय जाणणारा असेल. ज्ञानी बनेल." व्यास सत्यवती च्या कक्षात प्रवेश करत म्हणाले आणि सत्यवतीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. व्यासांकडे बघून ती काही बोलणार, इतक्यात ते म्हणाले, " परंतु माते, त्या पुत्राची माता दासी असणार आहे."
"दासी?" सत्यवतीला मोठ्ठा धक्का बसला.
"हो माते! कक्षात मी दिव्य शक्तीचे आवाहन केले तेव्हा एका दासीने प्रवेश केला."
कोसळल्यासारखी ती आसनावर बसली. राण्यांचे पुत्र अंध, स्वास्थ्यहिन.... आणि दासीचा बुद्धीमान? काय लिहिले आहे हस्तिनापुरच्या राजगादीच्या नशिबी?
"परंतु माते, दासीला होणारा पुत्र हस्तिनापूरच्या राजगादीशी निष्ठावान राहील. न्यायबुद्धी, धर्माचरणात कोणी त्याच्याशी स्पर्धा करू शकणार नाही."
सत्यवती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती आसवं गाळत बसून राहिली. काही वेळ व्यासही शांत उभे राहिले.
"आज्ञा आहे, माते?" व्यासांनी हात जोडून निघण्याची परवानगी घेतली. सत्यवतीने दु:खी नजरेने त्यांच्याकडे पाहिले.
"तु तुझे योग साधनेचे पुण्य या राजघराण्याच्या पदरी अर्पण केलेस, व्यास! कसे आभार मानू तुझे?"
"माते, वृक्षाचे बिज कधी वृक्षाच्या सावलीकरता त्याचे आभार मानते का? आज्ञा असावी."
सत्यवतीने मान होकारार्थी हलवली.

#युगांतर_आरंभ_अंताचा

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही प्रत्येक भागात सुरुवातीला मागच्या आणि शेवटी पुढच्या भागाची लिन्क टाकाल का ?
वाचताना सलगता राहील . आणि सापडायला सोपे होईल .
कधी कधी बरेच दिवसानी ईकडे आल्यावर , शेवटचा भाग कुठला वाचला ते क्रमांकावरून शोढणं कठीण जातय.

स्वस्तीजी,
फेबुच्या लिंक्स आहेत. त्या देत आहे.
मायबोली च्या लिंक्स मायबोलीच्या ॲप वर शोधता येतात का? असतील तर कृपया मला लिंक कॉपीपेस्ट कशी करता येते हे सांगावे.

फेबूवर प्रायव्हसी पब्लिक असल्याने आरामात लॉग इन न करताही वाचता येईल.

लिंक्स
1 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2536580073068020&id=10000148...
2 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2539196086139752&id=10000148...
3 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2540685042657523&id=10000148...
4 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2542474512478576&id=10000148...
5 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2544387885620572&id=10000148...
6 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2546135612112466&id=10000148...
7 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2547638721962155&id=10000148...
8 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2549775055081855&id=10000148...
9 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2551591478233546&id=10000148...
10 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2553495921376435&id=10000148...
11 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2555300414529319&id=10000148...
12 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2557010621024965&id=10000148...
13 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2558755217517172&id=10000148...
14 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2560193317373362&id=10000148...
15 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2562009027191791&id=10000148...

धन्यवाद प्रितमजी. Happy

Correct अक्की. Happy कर्ण कुंतीचा कानिन पुत्र आहे.
'विदुर' दासीचा पुत्र आहे.

धृतराष्ट्र व पांडू हे पौनर्भव पुत्र आहेत.

Correct स्वस्ती जी.

तुम्ही ब्राऊजर वरून लिंक कॉपी केलीत का? ॲपवरून दिसत नाही लिंक कारण!

तुम्ही ब्राऊजर वरून लिंक कॉपी केलीत का? ॲपवरून दिसत नाही लिंक कारण! >>> हो! अच्छा

कृपया, ते "जी" नका लावू हो! . नुसतं स्वस्ति म्हटलं तरी चालेलं .
उगाचच वयस्कर झाल्यासरखं वाटतं.

बर Happy

तुम्ही प्रत्येक भागात सुरुवातीला मागच्या आणि शेवटी पुढच्या भागाची लिन्क टाकाल का ?
वाचताना सलगता राहील . आणि सापडायला सोपे होईल .
कधी कधी बरेच दिवसानी ईकडे आल्यावर , शेवटचा भाग कुठला वाचला ते क्रमांकावरून शोढणं कठीण जातय.>>+१११
हो मी शेवटी त्यांच्या प्रोफाइल मध्ये जाऊन लेखन मध्ये जाऊन वाचले सलग ..

सग्गळे भाग आवडले खूप छान लिहिले आहे .. मधे मधे भैरपांच्या पर्व ची आठवण होत होती. संपलं का लिहून ? या भागाच्या शेवटी क्रमश: नाहीये म्हणून विचारलं

धन्यवाद अंजलीजी, धन्यवाद सुपुजी.

नविन भाग आत्ताच टाकलेला आहे. ॲप वरून लिंक मिळत नाहीये. मी ब्राऊजर वरून लॉग इन केले की एक धागा काढून त्यात सर्व लिंक्स टाकेन. Happy