Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37
स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.
त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो ७ सेकंदवाल्या विडीओत बंदूक
तो ७ सेकंदवाल्या विडीओत बंदूक घेऊन दुकानात शिरतो तो खोटी दाढीवाला काव्या निखिल च्या ऑफिसमधलाच होता ना?.. काल पण येऊन सांगून गेला तो की मी काही केलेलं नाहीये. किती वाईट अॅक्टिंग आहे त्याची. त्याचा कंठमणी फारच हलतो
हो हो तोच होता
हो हो तोच होता
काव्याची आई किंवा विश्वासचे बाबा यांनीही पेरलेला माणूस असू शकतो वरद चव्हाण किंवा निखिल फॅमिलीने, विधीच्या सुरक्षेसाठी, किंवा स्वतः काव्याने.
अमृता मस्त करतेय acting.
वरद चव्हाण म्हणजे 100 days
वरद चव्हाण म्हणजे 100 days मधला छोटारेंचा assistant ना ??
काय झालं २ दिवस? नेटवर अपलोडच
काय झालं २ दिवस? नेटवर अपलोडच झाला नाहीये ११ जुलै नंतरचा एपि.
शुक्रवार ते रविवार नसतं अंजली
शुक्रवार ते रविवार नसतं अंजली. आज टाकतील आजचा भाग.
ओह ओके.
ओह ओके.
वरद चव्हाण म्हणजे 100 days
वरद चव्हाण म्हणजे 100 days मधला छोटारेंचा assistant ना ?? >>> हो. त्याआधी तो रुंजीमध्ये होता, हिरोचा चुलत भाऊ तेव्हा त्याच्या आईचा रोल माझ्या भाचीने केलेला.
हि सेरिअल लव्कर सम्प्नार.
हि सेरिअल लव्कर सम्प्नार. amruta has been selected as participant in kahtron ke khiladi which is starting from august.
संपणार असेल कारण trp नाहीये.
संपणार असेल कारण trp नाहीये. त्यामुळे आता चार दिवस असते. तसंही फार दाखवायला काही उरले नाही. विश्वासचं खरं रूप समोर येणार आणि विधी निखील एकत्र येणार असं असेल.
नवीन वळण आलय. विश्वासच्या
नवीन वळण आलय. विश्वासच्या सान्गण्यावरुन काव्या प्रेन्गण्ट असल्याच खोटच निखिल आणि विधिला सान्गते. विधिचा त्यावर विश्वास बसत नाही आणि ती निखिलची बाजू घेते. आबा माईसाठी हे प्रकरण सम्पेपर्यन्त निखिलच्या घरी राहायला जाते. विश्वासच्या प्लॅनप्रमाणे, काव्या निखिलला तिच्या घरी बोलावते आणि आत्ताच आपण दोघ पुण्याला कायमचे निघून जाऊ, नाहीतरी विधीचा जीव सात सेकन्दात जाऊ शकतो, अशी धमकी देते निखिलला. तो तिचा गळा दाबायला जातो, त्यान्च्यात झटापट होते. दोघे बेशुध्द होतात. विश्वासने निखिलला गायब केल असेल ते दाखवल नाही , पण तो काव्यावर निखिलच्या खुनाचा आरोप करतो, त्याला शोधून न आणल्यास जेलमध्ये पाठवण्याची धमकी देतो. तो निखिलच्या फोनवरुन , निखिल आणि राहुल काव्याच्या विरोधात पुरावे ( सेण्ड ऑफ पार्टी) शोधण्यासाठी पुण्याला गेलेत असा एसेमेस विधिला पाठवतो. तो सेण्ड ऑफ पार्टीचा प्लॅन काव्यानेच केलेला असतो, पण त्या पार्टीत असे काहीही झालेले नसते आणि हे विश्वासलाच माहितीये. त्या विडीओवरुन तो काव्याला ब्लॅकमेल करतो.
तो वरद चव्हाण इन्स्पेक्टर आहे
तो वरद चव्हाण इन्स्पेक्टर आहे. निखीलला आधी उचलून नेलं खोटेपणा करून ज्याने, त्याच्या हाताखालच्या हवालदाराने तक्रार केली त्यामुळे ह्या सर्वाची चौकशी करायला नवीन इन्स्पेक्टर आलाय.
अम्रुता खानविलकरने मालिका
अम्रुता खानविलकरने मालिका सोडली आहे,तसा मेसेज इंन्स्टावर टाकला आहे.नवीन कोण तिची जागा घेणार हे नाही माहित.
हांई ये क्या हुई?
हांई ये क्या हुई?
आता ती कशाला करेल, सर्व फोकस
आता ती कशाला करेल, सर्व फोकस विधी आणि विश्वासवर आहे, तिला काही रोल उरलाच नाही आणि तिथे reallity शो मध्ये आमंत्रण आलं तर तिथे गेलेलं बरं, असा विचार केला असावा.
पण तसही जुलै अखेरिस मालिका
पण तसही जुलै अखेरिस मालिका संपणारच आहे ना?
वरद चव्हाणच पोलिसाच
वरद चव्हाणच पोलिसाच कॅरेक्टर नाही आवडल. जयकान्त (असच काहीतरी नाव आहे त्या पोलिसाच ) पहिल्यान्दा केकशॉपमध्ये आला तेव्हा शुद्द मराठी भाषेत बोलत होता. पण नन्तरच्या एपिसोडमध्ये त्याला अचानक ग्रामीण भाषेत बोलताना दाखवलय!
जयकान्तची बायकान्शी विनाकारण असभ्य बोलतो. सुटे पैसे देण्याच्या भाण्डणात तो श्वेताला 'अवदसा' अस काहीतरी म्हणाला. विधीशीही अरेरावीने बोलतो.
जर लेडी पोलिस दाखवली असती आणि ती पुरुषान्शी असभ्य भाषेत बोलताना दाखवली असती तर सोमिवर तिच्या कॅरेक्टरला शिव्या पडल्या असत्या.
विधी राधाक्का मोडमध्ये गेली आहे. विश्वास पण टिपिकल पुरुषासारख वागतोय. काव्याला ' मी परत येईपर्यन्त घर सजवून ठेव, स्वयमपाक बनवून ठेव' म्हणतोय.
नेक्स्ट विक मध्ये सिरीयल
नेक्स्ट विक मध्ये सिरीयल संपेल अशी चिन्हं आहेत. विधीच्या लक्षात आलं विश्वास सर्व करतोय अर्थात काव्याने जे सांगितलं त्यावरून, घडलेला प्रकार सांगितला की दोघे बेशुद्ध होतात मग विश्वास तिला घेऊन येतो.
सगळे बहुतेक एक plan करतात, विश्वासला निखीलच्या घरी राहायला लाऊन, काव्या पोलिसांना घेऊन विश्वास जिथून सर्व ऑपरेट करतो तिथे घेऊन जाते.
हि सेरिअल लव्कर सम्प्नार. >>>
हि सेरिअल लव्कर सम्प्नार. >>>>>स्टारच्या मालिका बऱ्या लवकर संपत आहेत. हल्लीच त्या जानूच्या भावाची रोहन गुजरची एक मालिका बंद झाली.
तशीही ही मालिका कमी एपिसोडचीच
तशीही ही मालिका कमी एपिसोडचीच होणार होती बहुतेक कारण स्वप्नील, अमृता आणि सिद्धार्थ तसे बिझी कलाकार पण trp नसल्याने अजून लवकर आटोपती घेत असतील. जीवही थोडाच होता जिवलगा स्टोरीत.
विधी शांत डोक्याने एक एक
विधी शांत डोक्याने एक एक मार्ग शोधताना दाखवली आहे ते आवडलं. स्वप्नील सायकोपणा डोळ्यांतून चांगला दाखवतो.
विधीच्या सासूचे मात्र तेच ते दु:खी क्लोज-अप्स...
मराठी मालिकांमध्ये पात्रांना प्रसंगानुरूप मेक-अप करत नाहीत... एक काय तो लुक ठरवतात... पात्रं कायम त्याच लुकमध्ये वावरतात. काव्या रात्री उशीरा विधीच्या घरी येते, तेव्हाही दोघींच्या आय-शॅडोज, मेक-अप, हेअरस्टाईल अशी की आता उठून ऑफिसला निघतील. त्याआधी संध्याकाळपासून विधी किती ठिकाणी काय काय करताना दाखवली आहे; एकूण परिस्थितीमुळे आलेला डिस्ट्रेस, दिवसभराची धावपळ रात्रीच्या प्रसंगात तिच्या अवतारावरून दिसतही नाही.
काव्याच्या इअररिंग्जही तशाच
विधीच्या सासूचे मात्र तेच ते
विधीच्या सासूचे मात्र तेच ते दु:खी क्लोज-अप्स.. >>> तिचं एकदाच शूटिंग करुन ठेवलं असेल. मग तोच सेम दु:खी चेहरा अधुन मधुन दाखवतात. कारण बाकी तसही काही काम नाहीये तिला.
काय घडतंय सध्या... मागच्या
काय घडतंय सध्या... मागच्या आठवड्ञात आणि कालचे मिसले.
विश्वासवर संशय आलाय विधीला,
विश्वासवर संशय आलाय विधीला, काव्याच्या सांगण्यामुळे. त्याला कॉफीतून झोपेच्या गोळ्या देऊन झोपवून ठेवलं आहे. मंगळवारचा बघितला नाही मी.
Btw जिवलगा ह्या आठवड्यात
Btw जिवलगा ह्या आठवड्यात संपतेय. त्यामुळे विधीचा plans success झाला असेल.
ओह अच्छा
ओह अच्छा
फक्त विधी हवी म्हणून
फक्त विधी हवी म्हणून विश्वासचा हा सगळा प्लॅन होता का? म्हणजे स्वतःच्या बायकोला विधीच्या नवर्यासोबत अफेअर करायला लावणे वगैरे? अधले मधले एपि बघितल्यामुळे कन्सेप्ट्स काही clear होईनात.
नाही, अफेअर आधीच होतं काव्या
नाही, अफेअर आधीच होतं काव्या निखिलचं, काव्याला समजून घेतलं, वेळ दिला पण ती निखिलमधेच गुंतून राहिली आणि नंतर तो विधीला भेटल्यावर ती आवडली त्याला, मग पुढे प्लॅन केला. आज शेवटचा भाग होता, बघितला नाहीये, उद्या hotstar वर बघेन.
आज शेवटचा भाग होता, >>> ओह
आज शेवटचा भाग होता, >>> ओह ! इतक्या लगेच? शेवट थोडा घाईत गुंडाळल्यासारखा वाटतो. पण तरीही मला सिरियल आवडली. झी मराठीच्या फालतू सिरियल्स सारखं पकवल नाही. आणि घाई केली तरी सगळ्या छोट्या मोठया मिस्ट्रीज उत्तरं देऊन बंद केल्या. ऑफिस स्टाफ का मदत करतो इ इ प्रेक्षकांना समजतं. झी वर अर्ध्या मिस्ट्रीज लेखक विसरून जातो.
अर्थात इथे पण एक चूक झालीच की उदय टिकेकरने विश्वासच्या मानसिक आजाराबद्दल सांगितले त्यावर आबांनी काहीच ऍक्शन घेतली नाही, रादर ते तो प्रसंग विसरलेच आहेत. टिकेकर पण abruptly गायब झाले
काव्याची आई पण गायब
काव्याची आई पण गायब
आज शेवटचा भाग होता, बघितला
आज शेवटचा भाग होता, बघितला नाहीये, >>> हो का? मी पण नाही बघितला.
Pages