Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37
स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.
त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी बघितला hotstar वर, सेकंड
मी बघितला hotstar वर, सेकंड पार्ट येऊ शकतो याचा, इन्स्पेक्टर विश्वासचा खास frnd असतो, दोघे मिळालेले आहेत. मस्त केला एंड, संदिग्ध.
Second season येणार वाटतं.
Second season येणार वाटतं.
Second season येणार वाटतं. >
Second season येणार वाटतं. >>>>>>>> असच वाटतय.
अग्निहोत्र २ ही येणार आहे म्हणे.
अग्निहोत्र 2 मध्ये सिद्धार्थ
अग्निहोत्र 2 मध्ये सिद्धार्थ मृणमयी जोडी हवी परत. शरद पोंक्षे असणार आहेत असं वाचलं.
पण काव्याला पोचवली बहुतेक वर
पण काव्याला पोचवली बहुतेक वर कारण इन्स्पेक्टरने सुरक्षित स्थळी हलवलं ना
आता स्वप्नीलला वेळ असेल तेव्हा, मधुरा आणि तो लीड घेऊन सेकंड पार्ट येईल, निखिल तोच किंवा दुसरा असू शकतो.
अग्निहोत्र २ ही येणार आहे
अग्निहोत्र २ ही येणार आहे म्हणे. >>>> मला त्या आधी सिझन 1 चे सगळे भाग बघायचे आहेत. हॉट स्टारवर फक्त 66 भाग दिसतात (against 460+ total episodes)
मी एका कंटाळवाण्या रविवारी संध्याकाळी सहज 2-3 भाग पाहिले आणि मला सिरियल प्रचंड आवडली. 66वा भाग पाहिल्यावर कळलं की तेवढेच भाग दिसताहेत. बाकी युट्यूबवर किंवा इतर कुठेही available नाहीत. आता उरलेले भाग बघण्यासाठी मी फार अस्वस्थ झाले आहे. असं मला कोणत्याही मराठी सिरियलसाठी होईल असं वाटलं नव्हतं
अगदी अगदी. 4-5 वर्षापूर्वी
अगदी अगदी. 4-5 वर्षापूर्वी तूनळी वर 100+ भाग होते. मी ध्यास लागल्या सारखे बघून काढले होते. किती किती सुंदर सीरियल. मी बघितले तेव्हा मुक्ता बर्वे ची एंट्री होते. त्याच्यानंतर काहीच सापडले नाही तूनळी वर. अग्निहोत्र परत चालू होत असेल तर स्टार ला विनंती की आधीची सीरियल अपलोड करा.
मीरा हो ना, एवढ्या चांगल्या
मीरा, मोसा हो ना, एवढ्या चांगल्या सिरीयलचे भाग गायब केले, चॅनेल ने hotstar वर सगळेच ठेवायला हवे होते.
कुठे वाचली बातमी अग्निहोत्र
कुठे वाचली बातमी अग्निहोत्र बद्दल?
मी वाचलं कुठेतरी, आठवत नाही,
मी वाचलं कुठेतरी, आठवत नाही, शरद पोंक्षे यांच्या मुलाखतीत बहुतेक, का tv वर त्यांची मुलाखत बघितली तेव्हा समजलं, exactlly आठवत नाहीये.
ओह..धन्यवाद अन्जू.. पोन्क्षे
ओह..धन्यवाद अन्जू.. पोन्क्षे सध्या कैंसर मधून बाहेर आले आहेत.. त्यांची मुलाखत बघितली नाटकात काम करणार आहेत
कुठे वाचली बातमी अग्निहोत्र
कुठे वाचली बातमी अग्निहोत्र बद्दल? >>>>>> मी म. टा. मध्ये वाचली.
अग्निहोत्रच्या लास्ट एपिसोडला
अग्निहोत्रच्या लास्ट एपिसोडला निळ्याला त्याच्या कझिनचं पत्र येतं असं दाखवलं होतं. तेव्हाच दुसऱ्या सीझनची शक्यता वाटली होती पण आता १० वर्षांनी खरंच परत येतोय का हा शो?
Meanwhile राजवाडेंनी MPM ची तिसऱ्या भागात जी माती केली ते पाहून ते आता अग्निहोत्रची पण वाट लावतील अशी भीती वाटते.
--- अग्निहोत्र SPOILERS --
मला निळ्या आणि सईच्या स्टोरीत काही रस नाही पण महादेवचं भाडेकरू बाईशी लग्न होईल का/ लिव्ह इन रिलेशन असेल का/ मंजुळाचं त्या पोलीस (डीसीपी असतो का तो?) सोबत जुळेल का - हे बघायला आवडेल. फिल्मी स्टाईल धक्का द्यायला चिन्मय मांडलेकर जिवंत असतो असं दाखवा. त्याची स्टोरी सर्वात tragic होती. आणि हो, केशव रिसबुड (कर्नल निंबाळकरचा खरा बाप) जिवंत असतो की मरतो, त्याचं पुढे काय होतं ते पण दाखवा. मोरया कोण असतो याच्या गेसमध्ये संशयित लोकांच्या यादीत केशव पण होता.
---एन्ड ऑफ स्पॉयलर ---//
चिन्मय मांडलेकर ची स्टोरी काय
चिन्मय मांडलेकर ची स्टोरी काय होती? आठवत नाही.
नवीन अग्निहोत्र सुरू
नवीन अग्निहोत्र सुरू होण्यापूर्वी आधीचे सगळे भाग परत बघायचे आहेत, बरेच संदर्भ आठवत नाहीयेत आता.. Hotstar वाल्यांनी सगळे भाग अपलोड केले पाहिजेत पण , फक्त 66 आहेत सध्या
झेलम,
झेलम,
तो उषाचा नवरा असतो जो ट्रायबल्ससाठी काम करत असतो पण ते गैरसमजातून त्याला मारून टाकतात. उषा वेडी होते व चिन्मयचा मित्र आणि मित्राची बायको उषा-चिन्मयच्या मुलीला दत्तक घेतात जी पुढे स्पृहा जोशी दाखवली आहे.
कोणी थोडी स्टोरी सांगेल का
कोणी थोडी स्टोरी सांगेल का अग्निहोत्र ची? मी hotstar वर थोडे भाग बघितले आहेत पण जेव्हा कळल की सगळे भाग नाही आहेत तेव्हा आवरत घेतलं
.उगीच जिवाला घोर
आठवलं. धन्यवाद सनव.
आठवलं. धन्यवाद सनव.
स्टोरी अशी सांगणं कठीण कारण
स्टोरी अशी सांगणं कठीण कारण खूप complicated आहे.
पण एक कुटूंब- ज्यात भावंड आहेत, एक आश्रित मुलगा आहे, काही सिक्रेटस आहेत. प्रत्येक व्यक्ती कुटुंबापासून दुरावत जाते.पण एक सिक्रेट आहे, एक गुप्त दार उघडण्यासाठी, एक कोडं unlock करण्यासाठी नील हा पुढच्या पिढीतील मुलगा प्रयत्न करू लागतो. एकेक करत दुरावलेल्या कुटूंबियांना शोधून काढतो. फायनली ते कोडं सोडवतो व अनेक रहस्ये समोर येतात. ही मुख्य स्टोरी आहे. यात मग प्रत्येक भावंडाचा स्वभाव, कुटूंब, बॅक स्टोरी, रिलेशन्स हेही सर्व आहे. पण सिक्रेटकडे वाटचाल हा थ्रेड कायम राहतो.
हो..म्हणजे काही भाग बघुन कळल
हो..म्हणजे काही भाग बघुन कळल की नाशिक च्या वाड्यात जे देवघर असत तिथे कोणीतरी येउन पुजा करुन जात... ती कशी आणि कोण करत.. विक्रम गोखले कोन असतो जो जखमी अवस्थेत वाड्याच्या मागे सापडतो.. एवढं जरी कळल तरी पूरे सध्या.. बाकी मृण्मयी आणि सिध्दार्थ ची स्टोरी खूप मस्त होती..आता.ते जुन्या मोबाइल वरुन सूर झालेली गोष्ट बघायला मस्त वाटत..ते जूने फ़ोन आणि कपड्यांच्या स्टाइल बघुन मला माझे कॉलेज चे दिवस आठवले..
किती पटापट टेक्नोलॉजी बदलली गेल्या 8 10 वर्षात
चांदेकरची नवी मालिका सुरू
चांदेकरची नवी मालिका सुरू झाली आहे. कोणी पाहताय का? अगदीच हिंदी सिरीयल पासून प्रेरणा घेतलेली वाटते आहे.
मला चांदेकर फार आवडत असला तरी
मला चांदेकर फार आवडत असला तरी त्या दोन्ही नायिका फार काही भावल्या नाहीत (प्रोमोज बघितले) म्हणून एकही एपिसोड बघितला नाही. रांगोळे बाई अजिबात आवडत नाहीत, बाबासाहेब आंबेडकर मधे काम चांगलं केलेलं मात्र. काही एपिसोड्स बघितलेले.
Pages