युगांतर - आरंभ अंताचा! भाग ७

Submitted by मी मधुरा on 22 July, 2019 - 02:07

नगरातील कोळ्यांच्या वस्तीत आनंदोत्सव चालला होता. जाळ्यात अडकलेल्या विशाल माश्यामुळे सर्वजण खुश होते. आपल्या राजाला हा मासा भेट देउन त्यांची खुशामत करावी म्हणून माश्यासह मासेमार राजमहालात आले. महाराज सुधन्वा च्या समोर माश्याला कापण्याचा कार्यक्रम सुरु झाला. कापताना मासेमाराला काहीतरी विचित्र जाणवले..... त्याने कडेच्या बाजूने छेदत मासा कापला. सगळे अचंबित. आत दोन मानवी बालके होती. माश्याच्या पोटी! एक पुत्र आणि एक पुत्री. पण कोणाची? माश्याची? ऱाजा आणि प्रजा स्तब्ध.
भानावर येत राजाला प्रश्न पडला. आता काय करायचे ? या चमत्कारिक जन्मलेल्या बालकांना पहायला सारी नगरी जमली.
राज्याला वारस हवाच होता. 'मत्स्यराज' म्हणून राजाने मुलाचा युवराज म्हणून स्विकार केला. मुलीच्या अंगाला मात्र माश्यांचा तिव्र दुर्गंध येत होता. असे दुर्गंधी फुल राजवंश वेलीचे ? नाही. 'मत्स्यगंधा' नाव घोषित करून राजाने मासेमाऱ्यांपैकी एकाला, निषादला मुलगी हातात दिली, "आज पासून ही तुझी कन्या!"

हस्तिनापूर ! नदीवर बांधलेला बाणांचा बांध! शंतनूने त्या अद्वितीय कौशल्याकडे पाहत ते तोडण्याकरिता बाण धनुष्यावर लावत प्रत्यंचा ताणली. तितक्यात समोरून एक बाण आला आणि बांध तुटून नदीचे पाणी पुन्हा वाहू लागले. शंतनूने पाहिले. हातात धनुष्य घेऊन एक तरुण उभा होता. आणि.... सोबत गंगाही! शंतनूला स्वप्नवत भासत होते. त्याने गंगेकडे धाव घेतली. "गंगा.... किती वर्षांनी पाहतो आहे तुला! चला माझ्या सोबत. हस्तिनापुरही महाराणीच्या प्रतीक्षेत आहे गेली १५ वर्षे!" तरुणाने संवाद ऐकून भांबावल्यागत दोघांकडे पाहिले.
"महाराज...."
" काही बोलू नका महाराणी. शिघ्रता करा. महालातला एकटेपणा.... खुप सहन केलाय मी!"
" त्याचेच निराकरण घेउन आले आहे मी. " तरुणाकडे बघत गंगा म्हणाली.
श्वेत वस्त्रातल्या गौरवर्णी तरुणाकडे शंतनू ने बघितले.
" हा आपला पुत्र, गंगे? "
जन्मल्यावर एकदाच हातात घेतलेला, हस्तिनापुरचा युवराज, शंतनूचा आठवा पुत्र! डोळ्यांत त्याचे रुप साठवत शंतनूने तरुणाला आलिंगन दिले.
" देवव्रत, हे तुझे पिताश्री! " गंगेने परिचय करून दिला. देवव्रतने शंतनूला चरणस्पर्श केला. 'देवव्रत' युवराजाचे नाव शंतनूने उच्चारत त्याच्या मस्तकावर आशिर्वादाचा हात ठेवला.
" तुम्ही तो बाणांचा बांध पाहिलात राजन्? देवव्रतच्याच कौशल्याचा एक नमूना! हर एक शस्त्रास्त्र तो तरबेज रित्या चलवतो. वशिष्ठ ऋषी, परशुराम यांच्या कडून त्यानी विविध विद्या ग्रहण केल्या आहेत. मी तुम्हाला देलेला शब्द पूर्ण केला राजन्!" शंतनू देवव्रत कडे अभिमानाने पाहू लागला.
गंगा देवव्रत कडे बघत उद्गारली, " तु ज्या सिद्धी, ज्ञान हस्तगत केले आहेस, ते आता तुला तुझ्या पिताश्रींसोबत हस्तिनापुरचे राज्य सांभाळण्याकरिता मदत करतील. तु वारस आहेस त्या राजगादीचा. आता तु इथेच रहायचे आहेस. तुझ्या पित्यांसोबत!"
गंगा जायला नदीच्या दिशेने वळली.
" गंगे.... वचन मोडण्याची शिक्षा अजून नाही संपली का?"
" मी तुम्हाला दिलेल्या वचन पूर्ती साठी आले होते राजन्! मी मृत्यूलोकीच्या शापातून मुक्त झाले आहे. तुम्हीच वचन मोडून मला मुक्ती दिलीत. आता भावनांच्या पाशात जखडू नये. "
गंगा नदीच्या प्रवाहात चालत अदृश्य झाली.

©मधुरा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

च्रप्स, सुधन्वाने पाठवलेला पर्णकोष.... यमुनेत पडला.... शापित अप्सरेने ग्रहण केला..... अस्वस्थता, भरलेपणा वाढत गेले... नउ महिन्यां पर्यंत. कोळ्यांनी तिला पकडून कापले. शापित अप्सरा अद्रिका आणि सुधन्वा राजा यांची कन्या.... मत्स्यगंधेची जन्म कथा आहे ही. Happy