तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विसने उडी मारली ती बंगला प्रवेशद्वाराच्या जवळच. तिथे फरशी होती. तो टार रोडवर कसा पडला? >>> Lol अजून तो महाशेवट पाहायचा आहे. काल रात्रीपर्यंत इथे आलेला नव्हता.

काहीही असो पण ती मानबा अशीच एकदोन एपिसोडमध्ये बंद व्हावी. किती ती लांबण. तशीच ती तुझ्यात जीव रंगला.

शेवटी विक्रांतने आत्महत्या केली ना ( बहुधा माझी इशा आणि कौशिकी चक्रवर्ती बद्दलची पोस्ट पाहिलेली दिसत्येय! Proud )

अजून तो महाशेवट पाहायचा आहे. >>>>>>>
Happy बघा, बघा, अशी अजोड कलाकृती बनण्याच्या काळात आपण आहोत आणि याचि देही याचि डोळा बघू शकतोय यापरतं दुसरं भाग्य कुठलं?

नाटकात काम करत्ये - निम्म शिम्मा राक्षस >>>>>>
सौ राक्षस / चेटकीणीचा रोल का? नखं आणि आवाज एकदम फिट आहेत त्यासाठी.

नवीन Submitted by रावी on 22 July, 2019 - 12:31 >>>>>.
नका हो पुन्हा पुन्हा असं म्हणू, कौशिकी आरशात बघायला घाबरतील...

कारवी, व्यंकटेशस्तोत्रातल्या ओळी काय अहो! Lol
सात्त्विक संताप पोचतोय तुमचा.
एकंदरीत साधारणपणे हीच पातळी ठरून गेली आहे नाही का मराठी मालिकांची? कधी थोडं वर, कधी खाली. लॉजिक बिजीक काही शोधायचं नाही कथेत. अभिनेते त्यामानाने चांगलं काम करणारे असतात मात्र. नवीन नवीन असूनही चांगलं काम करतात काहीजण. मग नवीन नट-नट्यांसारखे चांगले नवीन कथा/संवादलेखक, नवीन दिग्दर्शक निर्माण होत नाहीत का?

माझी पोस्ट वाचून मारतील मला इथे, तरीही लिहिते.

विसच्या स्पीचला दिलेल फुटेज इथे सगळयान्ना खटकतय. पण मला ते तितकस खटकल नाही. सुभाच्या जागी नवीन कलाकार असता तरीही माझ हेच म्हणण असेल. मला कायदयाची माहिती नाही तरीही कोर्टात गुन्हेगारालाही बाजू माण्डण्याची सन्धी दिली जाते अस म्हणतात. केडयाने जरीही बाजीगरच्या डायलॉग्जची कॉपी केली अस म्हटल तरीही विसने त्याचा बॅकग्राउण्ड सान्गितला ते कुणाहीबाबतीत घडू शकत. विस ' तुम्ही भे़कड आहात सगळे' म्हणाला ते चुकीच नव्हत. जस त्याने ईबाबान्ना झापल तस घरातल्या सगळयान्ना, ईशा आणि राजनन्दिलाही त्याने आरसा दाखवायला हवा होता. हा, फक्त त्याच गरिबीतून सुटण्यासाठी वाईट मार्गाने पैसा मिळवण्याच समर्थन करण आणि त्याचा अ‍ॅटिटयूड ' मला बुध्दी आहे, माझ कुणीही वाकड करु शकत नाही' हे नाही आवडल. हे म्हणजे गिरे तो भी टान्ग उपर झाल.

विसने आत्महत्या करण हे त्याची नियती होती. वाईट कर्माच फळ होत. पण जरा हे वेगळ दाखवायला हव होत. म्हणजे अस दाखवायला हव होत की:

विसला पश्चाताप होतो. तो स्वतः हुन पोलिसान्ना शरण जाण्यासाठी तयार होतो. पण ईशा त्याला माफ करते आणि नव्याने सन्सार करु अस सान्गते. विस तिला गच्चीवर बोलावतो. बाकीच्यान्ना डाउट येतो. विस तिला गच्चीवर प्रेमाची कबुली देतो. ' पैशाच्या लोभापायी आपण काय काय गमावल, आपण सन्सार करण्याच्या लायकीचे नाही' म्हणतो. नन्तर तो आत्महत्या करतो.

शेवटी मरताना सुद्दा त्याने अटिटयूड दाखवला. पण त्याने आत्महत्या करण हार्टब्रेकिन्ग होत.

कण्टिन्यूटीची आणखी एक चूक :

ईशा सरन्जामे हाउस सोडताना तिच्या गळयात मन्गळसुत्र असत.

बर नवरा गेल्याच काही दु: ख तर असाव ना हिला, त्याची आठवण तरी काढावी निदान एकदा. पण नाही , मॅडम काही झालच नाही अस वागत होत्या. निमकर, आसा, जयदीप, सॉनया, सर्जेराव त्यातलेच. अरे, ज्याच्या जीवावर तुम्ही जगत होता त्याला एका झटक्यात विसरता तुम्ही?

डबे पुरवण हे एकच काम दिसला का निमकरान्ना? पुन्हा हे लोक चाळीतच आले? ईशाला पुन्हा नव्या ' गजा पाटलाला' जन्माला आणायच आहे का? बन्गला सोडला ते ठिक आहे, निदान विसचे फ्लॅटस आहे ना, राहाव की फ्लॅटमध्ये आईवडिलान्सोबत आणि बाळासोबत? राजनन्दिनी साडीची हेड म्हणून जॉब कन्टिन्यू करावा. पण नाही, भिकेचे डोहाळे लागले आहेत निमकरान्ना. डब्यान्च्या धन्द्यासाठी सुद्दा प्रेझेण्टेशन दयाव लागत हे पहिल्यान्दाच ऐकतेय.

विसचा प्रॉपर्टी मिळवण्याचा प्लॅन पटण्यासारखा लिहिला असता. लेखक आणि दिग्दर्शक, चान्गले असते, अभिनय कळणारी नायिका असती तर ही नक्कीच चान्गली आणि वेगळी सिरियल झाली असती.

गादा सोडून सगळयान्चीच कामे छान झाली होती.

सिरियलची टॅगलाईन ' सत्य विसरायला लावणार प्रेम' अस असायला हव होत.

पुढच्या वेळी सुभाकडून चान्गल्या प्रोजेक्टची अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट टु हिम! Happy

विसचा प्रॉपर्टी मिळवण्याचा प्लॅन पटण्यासारखा लिहिला असता. लेखक आणि दिग्दर्शक, चान्गले असते, अभिनय कळणारी नायिका असती तर ही नक्कीच चान्गली आणि वेगळी सिरियल झाली असती.>>>>>>

अहो मग या मालिकेचे राहिले काय? टोटल नवी मालिकाच झाली की ही Lol

अशी अजोड कलाकृती बनण्याच्या काळात आपण आहोत आणि याचि देही याचि डोळा बघू शकतोय यापरतं दुसरं भाग्य कुठलं? >>> हो ना. ते मधे म्हणत ना लोक की आपली पिढी पुढच्या पिढीला अभिमानाने सांगेल की सचिन तेंडुलकरला आम्ही प्रत्यक्ष खेळताना पाहिले आहे. ते एकवेळ नाही सांगणार पण तुपारे पाहिली आणि त्या अभूतपूर्व ट्विस्टचे आम्ही साक्षीदार होतो हे नक्की सांगू. तो काळाच्या पुढे असलेला ट्विस्ट आपल्याला समजला नाही. तो पुढे कधीतरी समजेल तेव्हा ती पिढी आपल्याला जाब विचारेल.

सडाफटिंग वर वरती आलेच आहे. विक्याला सडाफटिंग हा सड्याचा एक प्रकार वाटतोय. सडाफटिंग करणारा म्हणे.

प्रेमाच्या व्याख्येशिवाय अशा सिरीजचा एण्ड कसा शक्य आहे? प्रेम् म्हणजे काळजी, अश्रू, राग, लोभ आणि काय काय. बहुधा प्रेम सोडून सर्व काही.

ईशाच्या एका स्पर्शाने तो म्हणे आमूलाग्र बदलला. तिच्या प्रेमाने वगैरे वगैरे. मग पुन्हा गजागिरी का सुरू केली? का हिंदी पिक्चर मधे तसे ज्या अपघाताने याद्दाश्त जाते तोच अपघात परत झाला की ती परत येते, तसे ईशाच्या तशाच एका स्पर्शाने विक्याचा परत गजा झाला?

मधल्या काळात कर्जत नगरपालिकेने या घरातील परिसराचे डांबरीकरण केले असावे नगरसेवक निधीतून. गच्चीवरून नक्की कोण पडेल त्याप्रमाणे सवडीने प्रतिक्रिया देउ असा विचार करून गच्चीनाट्य सुरू असताना बाकी सगळे लोक आपापल्या खोल्यांमधे पुनर्जन्म वगैरे वर चर्चा करत बसले असावे असे दिसते. जरा वर काय चालले आहे ते बघू, पोलिस कसे अजून आले नाहीत? जराही कुतूहल नाही. ते बंगल्याभोवती सिक्युरिटी वाले कोठे गेले - कोणत्याही वेळी कोणाच्या तरी जीवाला धोका असतोच त्यामुळे ते लोकही सतत असत तेथे? ते कसे गायब?

ईशा परत का गेली ते अगम्यच आहे. कंपनीत थोडेफार तरी काम करू शकत होती ना? आता तर डायरेक्ट मालकीण किंवा कमीत कमी बोर्डावर तरी असली असती.

"प्रेम ही अशी गोष्ट आहे ईशा, की ज्याला काही लॉजिक नाही" - विक्या. सत्यवचन. ही सिरीज पाहणार्‍या कोणालाही हे वेगळे सांगायची गरज नाही.

चला आता सासुबाईंच्या लग्नाला. भरा बॅगा. पहिल्या भागातच सोहम्या चम्याच्या लग्नाची सनई वाजू लागली आहे. तेजस्श्री प्रधानचा गोड व हसरा अभिनय करू शक णारा चेहरा बघून जबरी वाट् ले. खरे खुरे अ‍ॅक्टर्स काय मजा आणतात अर्ध्या तासात. निवेदिता टिपिकल आई आहे पोरा चे नको ति तके लाड कर णारी, तिचे बाबा म्हातारे पण मस्त काम करतायत. व गिरिश ओक ओल्डर बायकांचा हिरो. अर्धा एपिसोड होणार्‍या साबांना इथेबसा तिथे बसा लग्नाला पाने किती वगैरेतच गेला.

पहिल्या भेटीत काही सेकंदात डायरेक्ट लग्नासाठी येणारा खर्च , वगैरे पार डोक्यावरून पाणी. एक-दोन महिन्यांत मालिका संपेल की काय असे वाटलं .

आणि कितीही गृहिणी असली तरी या वयाच्या वुड बी सासूबाईंना लग्नाच्या बजेटबाबत नवीन पिढीकडून माहिती घ्यावी लागेल असे वाटत नाही.
तेजश्री निवेदिताला सरळ गुंडाळताना दाखवलीय कैच्याकै

फारेंड-- Happy गजागिरी असा शब्द तुम्ही मराठीला बहाल केलात की!

खरंच घरचे लोक कसे काय इतके शांत बसू शकतात यांची चर्चा चालली असताना?
आपल्या कडे मुलीला अशी वर पाठवली असती का एकटीला?
बाय द वे , इशाच्या बाळाचं आडनाव काय लावेल ती..? निमकर, सरंजामे की पाटील?
Happy

मला तर निमकरांच्या घरातले ते जेवणाचे ६ डबे सेम-टु-सेम तु.मा.ब्रे. मधल्या राण्यांच्या पोळीभाजी केंद्रातलेच वाटले (त्यांच्याकडेही ६ च गिर्‍हाईक होते.. कधी दाखवले नाहीत पण ६ डबे असायचेच..!) निदान झीम वाल्यांनी डबे तरी नवीन घ्यायचे होते..!

तुपारे कोणाच्या मूळ कथेवर होती? कथेचे नाव काय? कोणाला माहिती असेल तर सांगा.
मिळाली तर वाचायला हवी. मूळ कथेचे नेमके कसे कडबोळे केले / करतात बघण्यासाठी.

@ सस्मित --- सहज कुतूहल म्हणून विचारतेय .... तुमच्या नियमित ज्ये ना प्रेक्षकांचे काय उत्स्फूर्त मत / प्रतिक्रिया आली शेवटावर?

Submitted by शशिकांत सातपुते on 23 July, 2019 - 14:20 >>>
निळू फुलेंच्या पाटलाच्या वहाणेवरचा धुळीचा कणही गजापेक्षा बेरकी असेल.

अगदी आवड्लाय शेवट. अर्थात सुरुवातीपासुन सगळंच आवडत होतं म्हणल्यावर शेवटही आवडणारच Happy
विक्रांतने उडी मारलेलीही आवडलीये.
फक्त ईषा रडलेली दाखवली नाही तेवढच चुकीचं वाटतंय Lol

तुपारे कोणाच्या मूळ कथेवर होती?>>तुपारेच्याच
>> ते पुस्तक ईशा कडे असेल आता. आसांनी रानंला भेट दिले होते.

तुपारेची आवडलेली फक्त एकच गोष्ट ही की ह्या मालिकेचं titleसाँग.काय गायलय यार आर्या आंबेकरनी.त्यानेतरी मालिकेला रंगत आली आणि शेवटाला सुध्दा.

विसचा प्रॉपर्टी मिळवण्याचा प्लॅन पटण्यासारखा लिहिला असता. लेखक आणि दिग्दर्शक, चान्गले असते, अभिनय कळणारी नायिका असती तर ही नक्कीच चान्गली आणि वेगळी सिरियल झाली असती.>>>>>>अहो मग या मालिकेचे राहिले काय? टोटल नवी मालिकाच झाली की ही >>>>>>>>> Lol या नव्या मालिकेचे दिग्दर्शक , लेखक अस्मादिक आहेत.

ईशा परत का गेली ते अगम्यच आहे. कंपनीत थोडेफार तरी काम करू शकत होती ना? आता तर डायरेक्ट मालकीण किंवा कमीत कमी बोर्डावर तरी असली असती. >>>>>>>>>> अगदी अगदी
मायराचं काय झालं..? >>>>>>> तिचा स्पेशल डबा तयार करत होते निमकर.

मला आवडला शेवट. जर विसला माफ करुन ईशा पुन्हा नव्याने त्याच्याशी सन्सार करते अस दाखवल असत तर पटल नसत.

ह्या मालिकेचं titleसाँग.काय गायलय यार आर्या आंबेकरनी.त्यानेतरी मालिकेला रंगत आली आणि शेवटाला सुध्दा. >>>>>>>>>>>> +++++++++१११११११ विसच्या आत्महत्येनन्तर वाजलेल गाण अन्गावर काटा आणणार होत. त्यावेळी तिचा आवाज देवकी पण्डितसारखा भासला. आर्या आंबेकरला पुढच्या करियरसाठी शुभेच्छा!!! Happy

तुपारे कोणाच्या मूळ कथेवर होती? कथेचे नाव काय? कोणाला माहिती असेल तर सांगा. >>>>>>>> कारवी, शेखर ढवळीकर ह्यान्च्या कथेवर आधारित होती.

मायराचं काय झालं..? >>>>>>> तिचा स्पेशल डबा तयार करत होते निमकर.>> म्हणाजे मायरा मेली नाहीच..? मला वाटलं तिला हिरो मिळाला नाही म्हणजे ती पण टपकली असेल..

Pages