Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://lokmat.news18.com
https://lokmat.news18.com/entertainment/in-tula-pahte-re-vikrant-saranja...
विक्या आत्महत्या करणारे म्हणे
विक्या आत्महत्या करणारे म्हणे.. तरी मला वाटलंच गच्चीवरून पोटात बाळ असलेल्या 'इशू ' issue (I mean it)ला विक्या ढकळणार नाही.. नियमानुसार ज्याची पापे जास्त तो मरतो..illogical असलं तरी
Submitted by मन्या ऽ on 18
Submitted by मन्या ऽ on 18 July, 2019 - 16:26 >>>>>
मी जरा रोखठोकच लिहीते.... खटकू शकते एखाद्याला... म्हणून रागावू नका म्हटले. आणि सगळ्यांना अहोजाहो ऑफीसची सवय आहे, रागाने सटकली तरच एकेरी हाकेवर येऊ शकते.
कारवी, मन्या सगळयाजणीन्ना ताईच म्हणते. अत्यन्त वाईट अनुभव आलाय मला. >>>> सुलू_८२, ताईचा त्रास नाही हो मला. ताई माई अक्का आत्या मावशी काहीही चालेल पण जी दी तै धन्यु धन्स नकोत -- माझ्यापुरते.
Submitted by फारएण्ड on 19 July, 2019 - 21:57 >>>> जोक छान आहे, माहीत नव्हता.
पण इथे नाही लागू पडत. तुम्हाला जोक इतरांपेक्षा छान / वेगळ्या कोनातून कळतो पण तुम्ही जोकपर्यंत १ दिवस लेट पोहोचता टाईम झोनमुळे.
बाकी या जोकचा पुढचा भाग असा ---
तो माणूस (गाढव भेटीच्या) दुसर्या दिवशी दुपारी जेवताना त्याला ठसका लागतो.
आतून पाणी घेऊन येणारी बायको म्हणते, अहो एकटेच काय हसताय ठसका लागेस्तोवर...?
तो म्हणतो, काही नाही गं, काल गाढव का हसले ते कळले मला....ये बस अशी, तुला पण सांगतो...काय गंमते....
तो माणूस तुपारे टीमचा माननीय सदस्य असतो. ( तुम्ही कोणाला सांगू नका हं )
आज दि एन्द अहे तु पा रे चा.
आज दि एन्द अहे तु पा रे चा.
केडयाने बाजीगरच्या डायलॉग्जची
केडयाने बाजीगरच्या डायलॉग्जची ( भन्गार) कॉपी केली तरीही सुभाने छान म्हटले. नाटकान्मध्ये काम केल्यामुळे लान्बलचक डायलॉग्ज बोलण्याची सवय आहे त्याला. इथेच गादा आणि त्याच्या स्पीचमध्ये फरक कळून येतो.
बाकी काही डायलॉग्ज पटले. उदा. गरीबाकडे पैसा येतच नाही. पैसा हा श्रीमन्ताकडेच जातो. विसने ईबाबान्ना २ रुपयान्वरुन झापल ते बरोबर होत. तसच सॉनयालाही दणके दयायला हवे होते विसने. सतत हे फेक ते फेक करत असते ती.
पण तरीही त्याच वाईट मार्गाने पैसे मिळवून गरीबी मिटवण्याच लॉजिक पटल नाही. अस जर झाल असत तर सगळे गरीब झटक्यात श्रीमन्त झाले असते.
विस ' माझ्याकडे बुद्धी आहे' म्हणतो ते मात्र कैच्याकै आहे. प्रॉपटी मिळवण्यासाठी इतकी वर्ष थाम्बला हा माणूस? आणि इतका पुचाट प्लॅन?
विक्रान्त काहीही करु शकतो, अगदी काहीही म्हणताना सुभाने वेडसर झाक दाखवली डोळयात ते परफेक्ट होत.
हो. because of vikrant this
हो. because of vikrant this serial has some acting in it. Isha is worst than a robot.
Sampla ka tupare aaj
Sampla ka tupare aaj
काय झालं शेवटी. मी नाही पाहू
काय झालं शेवटी. मी नाही पाहू शकले आज. काही तरी लॉजिक वापरलं का शेवटी तरी
त्या दोघांमधे गच्चीत जाऊन खूप
त्या दोघांमधे गच्चीत जाऊन खूप डायलॉग बाजी होते आणि मग सुभा गच्चीतून उडी मारतो. काही महिन्यांनी निमकर 12 कंपनी ना जेवणाचे डबे पुरवायचा व्यवसाय चालू करतात. आता ईशा निमकर चाळीत परत रहायला आली आहे.
तर
अख्ख्या सिरियल चं conclusion काय तर
दो रुपये भी बहुत बडी चीझ होती है बाबू...
(गच्चीतून आत्महत्या करणारी बाहुली)
अओ
धन्यवाद धनश्री.
बाकी शेवट वाचून :गच्चीतून आत्महत्या केलेल्या भावलीचे टक्क उघडे डोळे ::
तुपारे संपली. आता तेलारे सुरू
तुपारे संपली. आता तेलारे सुरू करता येईल.
इशाच्या बाळाचं काय झालं Btw?
इशाच्या बाळाचं काय झालं Btw? ती प्रेग्नन्ट नसते का?
फक्त 6 महिन्यात 11 कंपन्यांना डबे पोचवण्याची मजल दाखवली, बाळाचं काय झालं??
त्या बाबतीत ती जान्हवी च
त्या बाबतीत ती जान्हवी च रेकॉर्ड मोडू शकते.. 7-8 महिन्याची प्रेग्नंट दाखवली आहे आणि ऑर्डर च्या पोळ्या लाटत असते.. आणि डब्याचं contract मिळवायला जाताना सुद्धा बाबा निमकर आणि बाळ निमकर आजचं प्रेझेंटेशन छान झालं तर आपल्याला contract मिळेल हे discuss करतात.. शेवटपर्यंत यांची प्रेझेंटेशन ची हौस झालीच नाही पूर्ण..
"विक्याला प्रॉपर्टी हवी होती
"विक्याला प्रॉपर्टी हवी होती म्हणून हे सगळं केलं."
बहुधा बहुतांश प्रेक्षकवर्गापुढे त्यांना एक गोलमटोल कल्पना ठेवायची होती. विक्याला प्रॉपर्टी हवी होती. कंपनी ताब्यात हवी होती. म्हणून खून, विश्वासघात वगैरे केले.
कथेचे एपिसोड्स पाहिले तर त्या खुनांमधून, विश्वासघातांमधून प्रॉपर्टी त्याला कशी मिळणार होती याचा विचारच स्क्रिप्ट लिहीताना केलेला दिसला नाही. ढोबळपणे खुनशी लुक, व्हिलन म्युझिक, खून वगैरे गोष्टी आल्या की एका प्रेमकथेचा थ्रिलर तयार होतो अशी काहीतरी समजूत असावी. विक्या चांगला दाखवला होता तेव्हा त्याला साध्य असलेल्या, ऑलरेडी हातात असलेल्या गोष्टींपेक्षा काय वेगळे आणि जास्त या व्हिलनगिरीमुळे मिळणार होते याबद्दल कोठेही डीटेलिंग नव्हते.
"सरंजामे आणि कंपनीचा मी अनभिषिक्त सम्राट आहे" म्हणे. अरे हा काय नटसम्राट मधले स्वगत आहे असे समजला की काय . कंपनीची मालकी, त्यातील लोकांचे अधिकार याबद्दल ५% सुद्धा माहिती न काढता जे सुचेल ते ठोकून दिले आहे. ज्या कंपनीच्या बोर्डावर आईसाहेब आणि इतर बरेच लोक आहेत, जे याला कधीही तेथून हाकलू शकतात तेथील म्हणे हा सम्राट.
एक अट्टल गुन्हेगार तोंडाला येइल ते बडबडतोय आणि सज्जन माणसे मान खाली घालून उभी आहेत असे एक नवीनच चित्र या एपिसोड मधे दिसत आहे. प्रत्यक्षात इतके गुन्हे केलेल्या व्यक्तीला स्वतःचे भाषण करू देत बाकी सगळे शांतपणे ऐकत बसतील का. उगाच सुभा आहे म्हणून द्या फुटेज असला प्रकार दिसतो.
पूर्वी धर्मयुद्धात जसे संध्याकाळ झाली की लढणारे लोक तंबूत परतत व विचारविमर्श वगैरे करत. तसेच विक्याचे भाषण झाल्यावर तो निघून गेला तिकडे हॅलोवीन रूम मधे. आणि बाकीचे आपापल्या रूम्स मधे जाउन चर्चा करत आहेत. विक्याच्या गुन्ह्यांची? त्याला पोलिसात नाही तरी किमान घरातून बाहेर काढण्याची? ते असले काहीतरी बोलत असतील असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही सिरीयल नीट पाहिलीच नाहीये कधी.
त्यांची चर्चा सुरू आहे की reincarnation वगैरे गोष्टींवर माझा आत्तापर्यंत कसा विश्वास नव्हता वगैरे. यांच्याच घरातील लोकांचे खून पाडलेला परका माणूस बिनदिक्कत पणे घरात फिरतोय आणि हे पुनर्जन्मावर गप्पा मारत बसलेत.
जयदीपः "...पण आता तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस ना?"
सॉन्या: "अरे पण ईशा, राजनंदिनी?"
इथे जयदीपचे सौम्य हास्य. मला वाटले हा म्हणतोय आता "बडे बडे घरोंमे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है"
या मालिकेतील प्रत्येक एपिसोड मधे किमान १०-१५ वेळा कोणाचातरी कोणावर्/कशावरतरी विश्वास असतो. विक्याचा तर त्याच्या बुद्धीवरही आहे. आपला नसला तरी.
राजनंदिनीला न्याय मिळाला म्हणे. आईसाहेब, जयदीपलाही. कसा? विक्याने कबुली फक्त यांच्यासमोर दिली. तुमच्याकडे पुरावे नाहीत. काय करायचे आहे ते करा म्हणतो तेथेच घरात आरामात आहे. आणि कबुली कमी आणि त्यात वल्गनाच जास्त होत्या. यातून नक्की कसा न्याय मिळाला ते ईशालाच माहीत.
"इथे ईशाच्या जीवाला धोका आहे"! आला परत तो धोका. मालिका लाइनीवर आली म्हणजे. ईपालकांनी गेल्या ५-६ भागांत कपडे बदलले का? मला लक्षात नाही. त्यांना जमिनीवर एखादी लाइन मारून ही लाइन क्रॉस करायची नाही सांगितल्यासारखे त्या घराच्या एकाच ठराविक भागात ते किती एपिसोड्स अडकले आहेत माहीत नाही.
"मला पळून जायचे नाहीये. यावेळेस जर कोणी पळून जाणार असेलच तर ते विक्रांत सरंजामे असतील" - म्हणजे अजूनही विक्याला पळून जाउ द्यायची तयारी आहे यांची.
शेवटचा सीन तर "दीवार" पुलाखाली शशी अमिताभ "जब एक मुजरिम बोलेगा, तो एक पुलिस अफसर सुनेगा" च्या वळणावर गेलेत.
अजून वेगवेगळ्या रूम्स मधे चर्चा सुरू आहे. पोलिसांना वगैरे कोणीही बोलावलेले नाही.
आत एकदम गच्चीवर बोलावले आहे? गच्ची कोठून आली? की इथेही कथालेखन सुरू असताना रावसाहेबांसारखे कोणीतरी "एक तेवढं गच्ची बसतंय का बघा" सांगायला आले?
एकूण संवाद व त्यातले लॉजिक आणि बाकी प्रसंगांशी त्यांची संगती पाहता कथेतील काही प्रसंग सिरीयल मधे आले किंवा नाही आले तरी बाकी संवाद तसेच रेटून नेतात असे दिसते. ती सरदारजींच्या जोकप्रमाणे - दोन सरदारजी रस्त्यावर काम करत असतात - एकजण खड्डा पाडतो. दुसरा तीच माती परत आत भरून तो बुजवतो. बराच वेळ पाहून लोक त्यांना विचारतात हे काय चाल्ले आहे? तेव्हा ते सांगतात की आज तिसरा जण आला नाही. तो रोपे लावतो या खड्ड्यात. पण आम्ही आमचे काम सुरूच ठेवत आहोत.
अनेक संवाद पाहून तसेच वाटते.
फारएण्डजींचा सात्विक संताप
फारएण्डजींचा सात्विक संताप नीट पोचतोय..
भावना पोहोचल्या.... कोकम सरबत
भावना पोहोचल्या.... कोकम सरबत / खस सिरप घालून थंड दूध घ्या आणि शेवटचा पागल--शिरोमणी--एपिसोड पचवायला सिद्ध व्हा.
वय विसरायला लावणारी प्रेमकथा
वय विसरायला लावणारी प्रेमकथा पासून कसली बिन्डोक वळणं घेउन कुठे संपवली.. कशाचा कशाला पत्ता नाही..
सिरीयसली लाॅजिक, कंटिन्युइटी, संवाद, काही अपवाद सोडून अभिनय, काॅमनसेन्स... सगळीकडेच माती खाल्ली.
खरचं सुभा कसा काय नादी लागला या सिरीयलच्या?
इशाला एक बहीण होती तिचं काय?
इशाला एक बहीण होती तिचं काय?
धनश्री?? इशा7-8 महिन्यांची
धनश्री?? इशा7-8 महिन्यांची प्रेग्नन्ट कधी दाखवली? मला काहीच फरक दिसला नाही तिच्यामध्ये... Did I miss anything???
सिरीयसली लाॅजिक, कंटिन्युइटी,
सिरीयसली लाॅजिक, कंटिन्युइटी, संवाद, काही अपवाद सोडून अभिनय, काॅमनसेन्स... सगळीकडेच माती खाल्ली. >>>>
प्रेमाला लॉजिक नसतं असं बिझनेस टायकून विसराव म्हणाले नं काल, kairee, शेवटच्या एपिसोडात.... आधी सांगितले असते तर..... लोक भिंग, सर्च लाईट घेऊन लॉजिक शोधत राहिले नस्ते.
ईश्याचे स्वगत ज्यांनी पूर्ण ऐकले ते धन्य. मला उत्तर हवंय हे वाक्य सचिन तेंडुलकरच्या टोनमध्ये / आवाजात असते तरीही एकवेळ विसने घाबरून उत्तर दिले असते. ईशाचा टोन, संवादफेक.... !!??!!
एकदा वाटले, रा नं १ च्या आवाजात संवाद हवे होते. ईश्याच्या माध्यमातून ती बोलतेय असे....
पण तिथेही आनंदच म्हणा.....शि तु ने असा लाडेलाडे टोन वापरला असता की बस --
गजा, गडे आलेय ना मी परत... खास जाब विचारायला.... दे की जाब... असं काय रे करतोस..... किती रे छळशील मला प्रेमवेडीला.... वगैरे टाईप.
हो केले मी खून, करा तुमच्याच्याने काय होतंय ते --- यात रानं, दासा यांना न्याय कसा मिळाला?
सगळे मुंडी हलवतात, कृतज्ञता व्यक्त करतात...नंदीबैलसुद्धा ठाम उभा राहिला असता, नॉट डन रा नं १+२ म्हणत.
गजा रा नं १ ला मी अनाथश्रमात वाढलो, झगडत, कष्टत स्वतःचे स्वतः सगळे केले सांगतो.
आता तत्वनिष्ठ शिक्षक तात आणि हिवतापाने मेलेली माय कुठून पैदा केली?
जो अनाथ आहे, वा पालक मेलेत त्याला दासा-आसात ते दिसले व त्याने जिद्दीने सचोटीने त्यांचा प्रेम विश्वास जिंकून सरंजामे साम्राज्यात मान मिळवला असेही होऊ शकले अस्ते.
आयत्या बिळात नागोबा + विश्वासघातकी + गुन्हेगार आणि वरून बुद्धीमत्तेची मिजास? ही बुद्धी की कुटीलपणा?
शेवटी गच्चीत, विसनेही ओठाचा मुरड कानवला केला. प्रेमाच्या व्याख्येचे दळण घालून झाल्यावर.....वाण नाही पण गुण लागतो तो असा !!
बाकी सुमारपणा, चुकांचा सुकाळ यात शेवटपर्यंत कसूर केली नाही तुपारे टीमने.
आपापल्या खोलीत सगळे निरर्थक चर्चा करताना कॅमेरा डगाडगा हलत होता. होडीत बसून शूटींग केल्यासारखा.
आपल्याला सीन घ्यायला किती जागा आहे हे पाहून घ्यावे .....पण नाही....
आधी बोलत बोलत, बॉल डान्स करत स्विमिंग पूलच्या एका टोकावरून दुसर्याला गेले.
झेंडे मरणावर आश्चर्य व्यक्त करून झाल्यावर, तिथूनच पुढचा बॉल डान्स करायला हवा ना?
लोकेशन रिसेट मारून पुन्हा स्विमिंग पूलच्या पहिल्या टोकाशी आणि मग प्री-उडी बॉल डान्स सुरू....
विसने उडी मारली ती बंगला प्रवेशद्वाराच्या जवळच. तिथे फरशी होती. तो टार रोडवर कसा पडला?
जेमतेम १५-२० फुटावरून उडी मारून माणूस असा डोके फुटून मरेल? फारतर बरगड्या मोडतील, नाकाच्या हाडाची प्लास्टीक सर्जरी होईल.
चंद्र बिचार्यांनी मेहनत करून गोलाचा कोर केला पण तोही चुकला. पूर्ण चंद्रानंतरच्या चतुर्थीला कोर नसते.
दुसर्या दिवशी सकाळी ईश्याचे प्रस्थान?? विसने देहदान केले होते का?
त्यांच्या लग्नाचे कळले तेव्हा मीडियावाले आले होते. विस मेल्यावर कुत्रही फिरकलं नाही बाईट घ्यायला?
निमकरांना ११ कंपन्यांची डबा ऑर्डर? की ११ लोकांची? मुदलात तेव्हढेही डबे नव्हते टेबलावर.
धड मळून न घेता कडा फुटलेल्या दडदडीत कणकेच्या गोळ्याची चपाती? विकली जाते? कोण घेईल?
ईश्या केलेल्या / तयार चपात्या शेकवत होती. आणि त्या कडक झालेल्या श्री निमकर डब्यात भरत होते.
अशा दर्जाचा डबा माऊथ पब्लिसिटीने प्रसिद्ध होतो?
सगळे डबे भरून बंद केलेत आणि ईशा चपात्या आण अजून......कशाला त्या? गल्लीतल्या गायी कुत्र्यांना घालायला?
उभ्याने चपात्या करताना, कपडे पोटाकडे सुक्या पिठाने माखतात. अॅप्रन नसेल तर.
केस मोकळे सोडून, झगमगीत ड्रेस घालून घरच्याही १०-१५ चपात्या करवत नाहीत... उकडते.
१०-१२ डब्यांच्या / कंपन्यांच्या चपात्या पार्टीवेअर घालून? अक्कल चुलीत घातली का?
ईश्याच्या पोटात फोम भरला की सातवा महिना?
या स्टेजला बायका पोटाच्या वजनाने कमरेवरचे शरीर थोडे मागे झुकवून चालतात, हालचाली जडावतात.
ही बया तशीच चालतेय, सहज गिरक्या घेऊन वळतेय.
सेटवर सगळे बॅचलर आहेत? कोणीच पाहिलेले / अनुभवलेले नाही?
डब्यांवर २ रूचा स्टीकर ? डबेवाले पर्मनंट रंगाने खुणा करतात.
xxx xx xxxxxxx xxxxxx xxxxxx xxxxx xxxxxx xxx xxxxxx xxx xxxxx xxxx xxxx ---> ∞
खतरनाक कमेंट्स, या सिरियसली
खतरनाक कमेंट्स, या सिरियसली सुबोध भावे पर्यंत पोचल्या पाहिजेत
कारवी, अगदी योग्य मुद्दे
कारवी, अगदी योग्य मुद्दे
100 % सहमत...
सगळ्यात हास्यास्पद प्रकार
सगळ्यात हास्यास्पद प्रकार लहान मुलं गोष्ट सांगितल्यावर मोठ्यानं and the moral of the story is सांगतात तसं इथं दोन रुपये चा डायलॉग मालिका संपल्यावर फळकवला
अरारारा
कारवी कारवी किती तो त्रागा!
कारवी कारवी किती तो त्रागा! असं त्रागा करून का, गादा चांगला अभिनय करणार आहे? ती जे काही करते/बोलते त्यालाच अभिनय/ संवादफेक म्हणतात्,यावर तुपारेच्या युनिटची गाढ श्रद्धा असावी.
कंपन्यांच्या चपात्या
कंपन्यांच्या चपात्या पार्टीवेअर घालून>> हो ना आणि वैधव्य आलेल्याच्या ग्रीफच्या काही ही खुणा नाहीत.
नवीन Submitted by अमा on 21
नवीन Submitted by अमा on 21 July, 2019 - 18:03 >>>> ग्रीफ गच्चीत दाखवला ना, एकदा ओरडून, गालावर हात ठेवून, संपला खाली उतरेपर्यंत, बेताचा स्टॉक असेल. यूसलेस.
नवीन Submitted by कुरुडी on 21 July, 2019 - 16:36 >>>>
त्यातही चुका होत्या. बडी // चिज // बाबु. हिंदीत ड खाली टिंब असते. आणि आवाज कोणाचा तर विसचा.
आदल्या दिवशीच निमकरांना लागट बोलला होता ना २रू वाल्या मूल्यावरून?
त्याचाच आवाज? निमकरांचा का नाही ?
विस अभिनेत्याचे नाणे चलनी आहे म्हणून? त्यालाही कळू नये? हे आपण बोलता काम नये....
नवीन Submitted by आशुचँप on 21 July, 2019 - 15:41 >>>
तो जुना जाणता आहे. त्याला मुदलात हे कळायला हवे. लोकांनी सांगायची गरजच पडू नये.
काल संवाद काय बोलावा तर ---- माझ्यासारख्या सडाफटिंग करणार्या माणसावर तिने प्रेम केले.
सडाफटिंग करणार्या असा शब्दप्रयोग आहे मराठीत? लिहीणारा एक गाढव... बोलणारा तर सुधरून घेऊ शकतो. पाट्याच टाकायच्या? का बाबा?
घाणेकरांचा रोल करूनही आपल्याला मोठे करणार्या प्रेक्षकांना अति - गृहीत धरू नये हे शिकू नये एखाद्याने?
मी आधी लिहीले नव्हते. त्याला बघून डोळ्यात बदाम येणार्यांना कशाला दुखवा. चालू दे सुशेगाद काय ते.
धन्यवाद मीनाक्षी.
देवकी मी त्रागा नाही करते. जे सामान्य माणसाला धडधडीत जाणवते, ते या लोकांना महिनोनमहिने खटकत नाही याचे आश्चर्य वाटते. ईश्याला केव्हाच स्क्रॅप केलीये.
आणि तुपारे टीमसाठी, व्यंकटेश स्तोत्रातल्या या ओळी, सप्रेम भेट ----
अठरा भार वनस्पतीची लेखणी // समुद्र भरला मषीकरूनि //
तुमचे अवगुण लिहीता धरणी // तरी लिहीले न जाती //
सीरियलच्या अपराधांच्या राशी l
सीरियलच्या अपराधांच्या राशी l भेदून गेल्या गगनासी l दयावंता हृषिकेशी l करुणा कैसी तुज न ये ll
हो , ते माझ्यासारख्या सदफटींग
हो , ते माझ्यासारख्या सदफटींग माणसाला असं हवं होतं, मलाही खटकलं..
सुबोध भावे च्या आयुष्यतली ही ( मालिका) एकमेव चूक ठरू दे, ही प्रार्थना, त्याच्याकडून चांगल्या आणि उत्तम(च) कामाची अपेक्षा आहे..
सगळ्यात शेवटी जी श्रेयनामावली
सगळ्यात शेवटी जी श्रेयनामावली फोटोसकट दाखवली, त्यात झेंडे नव्हते का? की मी मिसलं ते?
सगळ्यात शेवटी जी श्रेयनामावली
सगळ्यात शेवटी जी श्रेयनामावली फोटोसकट दाखवली, त्यात झेंडे नव्हते का? की मी मिसलं ते? >>>नव्हते.. मला पण दिसले नाही.
Pages