झटपट चॉकलेट आप्पे by Namrata's CookBook : ११

Submitted by Namokar on 19 July, 2019 - 08:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

chcolate appe2.jpg
१ वाटी मैदा (१०० ग्रॅ. )
१/२ वाटी पिठी साखर (५० ग्रॅ)
पाव वाटी चॉकलेट पावडर (२५ ग्रॅ) / चॉकलेट सिरप
१/२ वाटी दही
१/२ वाटी बटर / तुप
१/४ चमचा बेकिंग पावडर
१/४ चमचा बेकिंग सोडा
१/४ चमचा चॉकलेट ईसेन्स / व्हॅनिला ईसेन्स
दूध (१००मिली)
up2.png

क्रमवार पाककृती: 

कृती :
१.एका भांड्यात बटर /तुप ,दही घेउन एकत्र करुन घ्या
२. आता त्यामध्ये मैदा ,पिठी साखर ,चॉकलेट पावडर एकत्र करुन घ्या
up3.png
३. चॉकलेट ईसेन्स /व्हॅनिला ईसेन्स ,बेकिंग सोडा,बेकिंग पावडर घाला आणि लागेलतसे दूध घालून एकत्र करुन २ मिनीटे छान फेटून घ्या
up4.jpg
४. तयार मिश्रण ५मि. तसेच ठेवा
५.आता आप्पे पात्राला बटर/तुप /तेल लावा
up5.png
६.आता तयार केलेले मिश्रण आप्पे पात्रात घालावे
up6.png
७. बारीक गॅसवरच ३ ते ४ मिनीटे आप्पेपात्र झाकून ठेवावे
८. त्यानंतर आप्पे दुसर्या बाजूने ३ ते ४ मिनीटे गरम करुन घ्यावे
up9.png
९. चॉकलेट आप्पे तयार आहेत
Chocolate appe1 (1).jpg

अधिक टिपा: 

पाककृतीचा पूर्ण व्हिडिओ :
https://www.youtube.com/watch?v=v4FqcyrYYnI

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आप्पे आणि चॉकलेट हे कॉम्बिनेशन ऐकूनच बिग नो!
गाठीशी रेडिमिक्स चॉकलेट इडलीचा अनुभव असल्यानेच!

ज्या घरात लहान मुलं आहेत त्यांना घरातल्या पिल्लांना एखादवेळेस सरप्राईज आयटेम खायला द्यायला छान आहे, पण सिम्ब म्हणाले तसं एकुणात अय्यो पापम प्रकार आहे. आणि मग पाप करायचेच असेल तर वॉफल्स करून खायला हरकत नाही. Happy

छान दिसतायत.
>>
आप्पे आणि चॉकलेट हे कॉम्बिनेशन ऐकूनच बिग नो!
गाठीशी रेडिमिक्स चॉकलेट इडलीचा अनुभव असल्यानेच!>>

आप्पे नाही , पॅनकेक पफ्फ्स! छान होतात. ही रेसीपी थोडी बदलली तर गिल्टीही नाही वाटणार.
आमच्या कडे लहान मुलं पाहुणी आली की मी चॉकलेट वाफल्स करते किंवा चॉकलेट चिप्स पॅनकेक पफ्स. उन्हाळ्यात मोठा ओवन तापवण्यापेक्षा मफिन्स ऐवजी पॅनकेक पफ्फ्स करायला बरे पडतात.

पॅनकेक पफ्फ्स ... येस्स. आप्पे इज सो डाउन मार्केट. Proud
बाकी यात अनहेल्दी वाटत असेल तर दोन अंडी फेटून घाला. दही/ तूप नाही घातलंत तरी चालेल.
पॅनकेक्स, वाफल्स, कपकेक, मफिन ... इतकंच हे अनहेल्दी आहे.... थोडक्यात सांगायचं तर फार अनहेल्दी नाही. Biggrin
वरुन पावडर शुगर भुरभुरवली की आणखी छान दिसतील.