१ वाटी मैदा (१०० ग्रॅ. )
१/२ वाटी पिठी साखर (५० ग्रॅ)
पाव वाटी चॉकलेट पावडर (२५ ग्रॅ) / चॉकलेट सिरप
१/२ वाटी दही
१/२ वाटी बटर / तुप
१/४ चमचा बेकिंग पावडर
१/४ चमचा बेकिंग सोडा
१/४ चमचा चॉकलेट ईसेन्स / व्हॅनिला ईसेन्स
दूध (१००मिली)
कृती :
१.एका भांड्यात बटर /तुप ,दही घेउन एकत्र करुन घ्या
२. आता त्यामध्ये मैदा ,पिठी साखर ,चॉकलेट पावडर एकत्र करुन घ्या
३. चॉकलेट ईसेन्स /व्हॅनिला ईसेन्स ,बेकिंग सोडा,बेकिंग पावडर घाला आणि लागेलतसे दूध घालून एकत्र करुन २ मिनीटे छान फेटून घ्या
४. तयार मिश्रण ५मि. तसेच ठेवा
५.आता आप्पे पात्राला बटर/तुप /तेल लावा
६.आता तयार केलेले मिश्रण आप्पे पात्रात घालावे
७. बारीक गॅसवरच ३ ते ४ मिनीटे आप्पेपात्र झाकून ठेवावे
८. त्यानंतर आप्पे दुसर्या बाजूने ३ ते ४ मिनीटे गरम करुन घ्यावे
९. चॉकलेट आप्पे तयार आहेत
पाककृतीचा पूर्ण व्हिडिओ :
https://www.youtube.com/watch?v=v4FqcyrYYnI
हे दिसतंय छान, चव सुद्धा
हे दिसतंय छान, चव सुद्धा मस्तच असेल,
पण साहित्य वाचून उगाच गिल्टी वाटतंय
आप्पे आणि चॉकलेट हे
आप्पे आणि चॉकलेट हे कॉम्बिनेशन ऐकूनच बिग नो!
गाठीशी रेडिमिक्स चॉकलेट इडलीचा अनुभव असल्यानेच!
ज्या घरात लहान मुलं आहेत
ज्या घरात लहान मुलं आहेत त्यांना घरातल्या पिल्लांना एखादवेळेस सरप्राईज आयटेम खायला द्यायला छान आहे, पण सिम्ब म्हणाले तसं एकुणात अय्यो पापम प्रकार आहे. आणि मग पाप करायचेच असेल तर वॉफल्स करून खायला हरकत नाही.
आप्पे आणि चॉकलेट हे
आप्पे आणि चॉकलेट हे कॉम्बिनेशन ऐकूनच बिग नो!>>>>> +१.
वाफल्स अला अप्पा
वाफल्स अला अप्पा
खरंच छान आणि नेहमी पेक्षा
खरंच छान आणि नेहमी पेक्षा काही तरी वेगळी रेसिपी आहे.
फोटो तर यम्मी.
आरे देवा... फिरून पुन्हा
आरे देवा... फिरून पुन्हा भोपळे चौक! आली का आप्प्यांची रेस्पी पुन्हा!
छान दिसतायत.
छान दिसतायत.
>>
आप्पे आणि चॉकलेट हे कॉम्बिनेशन ऐकूनच बिग नो!
गाठीशी रेडिमिक्स चॉकलेट इडलीचा अनुभव असल्यानेच!>>
आप्पे नाही , पॅनकेक पफ्फ्स! छान होतात. ही रेसीपी थोडी बदलली तर गिल्टीही नाही वाटणार.
आमच्या कडे लहान मुलं पाहुणी आली की मी चॉकलेट वाफल्स करते किंवा चॉकलेट चिप्स पॅनकेक पफ्स. उन्हाळ्यात मोठा ओवन तापवण्यापेक्षा मफिन्स ऐवजी पॅनकेक पफ्फ्स करायला बरे पडतात.
पॅनकेक पफ्फ्स ... येस्स.
पॅनकेक पफ्फ्स ... येस्स. आप्पे इज सो डाउन मार्केट.

बाकी यात अनहेल्दी वाटत असेल तर दोन अंडी फेटून घाला. दही/ तूप नाही घातलंत तरी चालेल.
पॅनकेक्स, वाफल्स, कपकेक, मफिन ... इतकंच हे अनहेल्दी आहे.... थोडक्यात सांगायचं तर फार अनहेल्दी नाही.
वरुन पावडर शुगर भुरभुरवली की आणखी छान दिसतील.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/38475?page=43 >>>> आमची रिक्षा