Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
20वर्षानी तिसरी मिळेल>> कारवी
20वर्षानी तिसरी मिळेल>> कारवी तै तुम्हाला तुपारे एवढी आवडली कि काय? अजुन चालु ठेवण्यासाठी केड्याला options देताय.
नवीन Submitted by मन्या ऽ on
नवीन Submitted by मन्या ऽ on 18 July, 2019 - 13:07 >>>>
माझे काय जातेय? आपण आपला टीव्ही बंद ठेवायचा... होऊ दे काहीही प्रसारित.
ता.क. ---
१. मला कारवी ऐवजी टवळे, थेरडे, चेटकीण म्हटल्यासही चालेल पण नावापुढे जी / दी / तै नको कृपया.
योग्य मराठी संबोधने काकूबाई टाईप वाटली तरी चालतील पण ती वापरावीत म्हणजे रूळतील.
२. धन्यवाद नाही दिले तरी चालतील पण धन्यु / धन्स नको कृपया
राग मानू नका मन्या ऽ.
@ कारवी राग कशाचा? चेटकीण
@ कारवी राग कशाचा? चेटकीण,टवळे नाही हो नाही जमणार. त्यापेक्षा मी नावानेच हाक मारते. आणि प्लीज अहो जाहो नका लावु.
अमा - Total blushing smiley
अमा - Total blushing smiley इथे दिली आहे असे समजा
असे लोक पाहिले आहेत...अगदी अव्यवहारी पण सरळ, भाबडे! >>> हो सहमत आहे. आणि इतके दिवस त्यांचे वागणे आणि बोलणे या सिरीज मधे उठून दिसायचे. कारण एखादा चाळीतील सर्वसामान्य, पापभीरू माणूस जसा वागेल तसेच ते होते. मी बहुधा आधीपण उल्लेख केला होता की या सिरीज मधल्य इतर गोंधळात ईबाबांचा रोल एकदम व्यवस्थित होता. पण असे लोकही आपल्या मुलांबद्दल कमालीचे जागरूक आणि प्रोटेक्टिव्ह असतात. नैसर्गिक इन्स्टिंक्ट बरोबर बाहेर येते. जेथे मुलांना धोका निर्माण होईल तेथे "बापा"च्या रोल मधे ते बरोबर जातात. किंबहुना ईशाच्या लग्नाला परवानगी देताना स्क्रिप्ट जरी बिनडोक असले तरी यांचे काम व संवाद चपखल होते. पाहिजे तेव्हा ठाम भूमिका घेतलेले दाखवले होते ते. इथे मात्र तसे वाटले नाही. जो माणूस केवळ वयाच्या फरकावर इतकी ठाम भूमिका घेउ शकतो तो मुलीच्या जीवाला धोका असताना इतका भोळसटपणा दाखवेल असे वाटत नाही. हे काल पाहताना मला समहाउ अजिबात कन्सिस्टंट वाटले नाही.
जो माणूस केवळ वयाच्या फरकावर
जो माणूस केवळ वयाच्या फरकावर इतकी ठाम भूमिका घेउ शकतो तो मुलीच्या जीवाला धोका असताना इतका भोळसटपणा दाखवेल असे वाटत नाही. हे काल पाहताना मला समहाउ अजिबात कन्सिस्टंट वाटले नाही.<>>>>>>>> +११
ईबाळाचे तळ्यात मळ्यात चालूच आहे का?
ईबाळाचे तळ्यात मळ्यात चालूच
ईबाळाचे तळ्यात मळ्यात चालूच आहे का?>>> कालपर्यंत तरी चालू होतं.
शेवटचा भाग कधी आहे? मालिका गुंडाळायची वेळ आली तरी काय दाखवायचं ठरत नाही हे कमाल !
हे काल पाहताना मला समहाउ अजिबात कन्सिस्टंट वाटले नाही. >>>> फारएण्ड, इतकी रंगेबिरंगी पिसं काढून झाल्यावर तुम्ही असं म्हणता?
कन्सिस्टंट वाली कॉमेण्ट फक्त
कन्सिस्टंट वाली कॉमेण्ट फक्त ईबाबांबद्दल. कारण त्यांचे कॅरेक्टर बर्यापैकी तसे होते बरेच भाग तरी. ट्विस्टपर्यंत मी पाहिले आहे नंतर मधे बरेच भाग बघितलेले नाहीत.
बाय द वे काल ईशा जयदीपला "माझी" मदत करा म्हंटली परत. हे मराठी मिस करत होतो इतके दिवस. त्यांनी आपल्यासोबत असे करायला नाही पाहिजे
अरे तुपारे मधला एकजण तिकडे
अरे तुपारे मधला एकजण तिकडे मानबा मधे राधिका मसाले शी कसलेतरी डील करायला आलाय. बहुधा चाळीतले पब्लिक दाखवले आहे त्यापैकी कोणतरी आहे. मला आधी वाटले दोन्ही कंपन्या डिस्ट्रिब्यूटर्स शेअर करत आहेत. पूर्वी साड्यांमधे ती सुगंध असलेली पाउचेस लोक ठेवत. आता मसाल्याची पाकिटे ठेवतील.
बाकी लीड कॅरेक्टरने भारावलेले भाषण करणे. बिझिनेस डील करायला आलेली पार्टी इम्प्रेस होउन जाणे. मग उपस्थितांनी "फार छान झाले प्रेझेण्टेशन" वगैरे करणे हे सगळीकडे कॉमन दिसते.
आणि इथे तुपारे च्या आधी मानबाची क्लिप दिसते तेथे इंग्लिश नाव "mazya navarachi bayko" नवराची बायको असे दाखवतात.
इकडे ईशाला काळजी पडली आहे.
इकडे ईशाला काळजी पडली आहे. बरेच खून केलेल्या आपल्या नवर्याला कारस्थान कळले तर तो आपला तिरस्कार करेल. आणि तिची आई म्हणते ते कसे शक्य आहे. त्याच्या गुन्ह्यांपुढे त्या तिरस्काराचे एवढे काय, हे कोणीतरी यांच्या डोक्यातील बटाटे बाजूला काढून त्यात भरवायची आवश्यकता आहे.
मायरा आत येते केबिन मधे तेव्हा विक्या बसला आहे. केबिन मधे अंधार आहे आणि सगळे इकडे तिकडे विखरून पडले आहे. मायराचा त्याला प्रश्न "सर तुम्ही अंधारात का बसला आहात?"
हे सगळे खुर्च्या, टेबल असे विखरून कोणी टाकले हे नक्की किती वेळाने मायरा विचारते बघत होतो. पण तिने विचारलेच नाही.
तिकडे हॅलोवीन रूम मधे एक मायक्रोफोन लावला असता तर सगळे पुरावे सहज मिळाले असते. तेथे जाउन विक्या म्हणतोय की त्याचा प्लॅन यशस्वी झालाय. काय? ईशा राजनंदिनी आहे हे सिद्ध होउन आईसाहेब तिच्यावर खूष होउन ती अर्धी मालमत्ता तिच्या नावावर करणार, आणि ती याला मिळणार? कशी? आणि ट्विस्टच्या नादी लागला नसता तरी मिळालीच असती ना?
आणि मुळात याला ती मिळू नये असा क्लॉज तेव्हा लागू होता आणि अजूनही असेल ना? नसेल कदाचित. तो आधीच्या एपिसोड मधे होता. त्या एपिसोडची संगती या एपिसोडमधे लावायची नसते.
आता ईशा विक्याला चहा आणून देत आहे. सर, काल झोप लागली ना नीट? अरे हे एकाच रूम मधे एकाच बेडवर झोपतात ना? (नाहीतर सध्याचा प्रॉब्लेम आलाच नसता ) की तेव्हा सीनचे शूटिंग सुरू नव्हते म्हणून रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर हे सगळे प्रश्न होल्ड करून ठेवले चहा सीनपर्यंत. पुन्हा सरांना बिलगून विश्वास, प्रेम वगैरे गिरणी सुरू. ईशा बहुधा एका खोलीत जे बोलते ते दुसर्या खोलीत गेल्यावर विसरते.
मायरा आत येते केबिन मधे
मायरा आत येते केबिन मधे तेव्हा विक्या बसला आहे. केबिन मधे अंधार आहे आणि सगळे इकडे तिकडे विखरून पडले आहे. मायराचा त्याला प्रश्न "सर तुम्ही अंधारात का बसला आहात?" >>> हा भाग मी बघितला नाही बहुतेक. किंवा बघीतला पण विसरले
काल बाळ पुर्ण वेळ भाषण देत होती. मी ते सगळ पुढे ढकलल. भाषणाच्या शेवटी अचानक दिवे लागले आणि घरातली सगळी मंडळी तिथे हजर झाली. पण मुद्दलात दिवे लागायला तिथे अंधार नव्हताच.
काल बाळ पुर्ण वेळ भाषण देत
काल बाळ पुर्ण वेळ भाषण देत होती. मी ते सगळ पुढे ढकलल. भाषणाच्या शेवटी अचानक दिवे लागले आणि घरातली सगळी मंडळी तिथे हजर झाली. पण मुद्दलात दिवे लागायला तिथे अंधार नव्हताच. >>>> बहुतेक आता विस जीव देईल किंवा भितीने पळून जाईल.
रानंचा तो गुलाबी ड्रेस इतकी किमान २०-२२ वर्षे जसाच्या तसा राहिला, नाही म्हणायला आटला त्यामुळे ईबाळाला लूज नाही झाला, मापात बसला. काल तर घर पूर्ण वेगळं घेतलं होतं , सरंजामे महालाची शान कुठेही दिसली नाही.
आता ते ओम शांती ओम सिनेमा
आता ते ओम शांती ओम सिनेमा मोडमध्ये जाताहेत असं वाटून राह्यलंय. झुंबर असणं वगैरे सुद्धा कॉपी केलंय
काल दिवे (अंधार नसूनही) लागले तेव्हा पुरतं वास्तुशास्त्र सिनेमा मोड असावा..
पण मुद्दलात दिवे लागायला तिथे
पण मुद्दलात दिवे लागायला तिथे अंधार नव्हताच.>> हो मला पण ते काय कळलं नाही .. अचानक सगळे प्रकटले तिथे आणि सोन्या मात्र नव्हती फक्त जादू होता ..
काल पहिल्यांदा इशा ची हैरस्टाईल केली होती चक्क (लग्न सोडल्यास पहिल्यांदा )!! मालिकेचं बजेट वाढवलं वाटतंय !! त्यातून ६ हेअर पीनं खरेदी केल्या आणि इकडून ३ तिकडून ३ लावायला इशा ला दिल्या !! बाकी कालच भाषण अर्थातच ऐकलं नाही फाफॉ केलं
कसला भंपक भाग होता कालचा.
कसला भंपक भाग होता कालचा. सुभा नी राजनंदीनीला मारुन टाकलं म्हणल्या म्हणल्यादिवे लागले पट्कन.
सरंजामेंकडे होम अॉटोमेशनय बहुतेक
ओम शांती ओम केला ह्यांनी तर!
ओम शांती ओम केला ह्यांनी तर!
विक्या चा कबुलीजबाब किमान रेकॉर्ड करून ठेवला असेल पुरावा म्हणून अशी अपेक्षा करावी का?
ईशा पेक्षा किमान दीड इंच उंच असलेल्या रान चा ड्रेस इशा ला बरोबर बसलेला पाहून तर माझे डोळे भरून आले
ईशा पेक्षा किमान दीड इंच उंच
ईशा पेक्षा किमान दीड इंच उंच असलेल्या रान चा ड्रेस इशा ला बरोबर बसलेला पाहून तर माझे डोळे भरून आले>> अगं तेच वाढवलेल्या बजेट मध्ये एक साडीच्या पिनांचं पाकीट पण दिलं .. ड्रेस ला इशा ने आतून सगळीकडून पिना लावून ड्रेस अल्टर केला अन घातला
आता मला बहुतेक मार मिळणार !!
ते भाषण मी पण ऐकलं भक्ती
ते भाषण मी पण ऐकलं भक्ती बर्वे सारख्या बेजोड किंवा कोणी ही ट्रेन्ड नटीने ह्या स्वगतात काय बहार आ णली असती पण हिचा ठाणे करी अॅक्सेंट व रेंज काही अगला स्टेशन विक्रोली च्या पुढे गेली नाही. हताश हताश संपवा हे.
खरंच अमा.....तिला जबरदस्त
खरंच अमा.....तिला जबरदस्त संधी होती त्या स्वगतात स्वतःला सिद्ध करण्याची ..पण तिने माती खाल्ली! चिरक्या, खरखरीत आवाजात.. सांग ना विक्रांत... मी तर तुला पूर्ण बिझीनेस नावाने करुन दिला होता...अजून काय द्यायला हवं होतं...? सर्व कळूनही पुन्हा पळून जाण्याची एक संधीही दिली होती...का नाही तू तुझं तोंड काळं केलंस त्याच वेळी...सांग ना...मला उत्तर हवंय, .." असे काहीतरी सवंग डायलॉग्ज होते. तिने ते सर्व फूटेज वाया घालवलं....!!!
ती मधेच एखादा शब्द मोठ्याने
ती मधेच एखादा शब्द मोठ्याने बोलते, आवाजात चढ उतार तेवढाच काय तो, बाकी हॉटेलातला वेटर कसा निरसपणे मेनु वाचून दाखवेल तशी डायलॉग डिल्हिवरी. अगदीच असह्य आहे, ती सोनिया सुद्धा बोलताना भाव दाखवते चिडल्याचे वगैरे, ही म्हणजे आयुष्यात रस उरलेला नाहीये आता काही हा अप्रोच.
अगदी. चिरक्या आवाजात मला
अगदी. चिरक्या आवाजात मला उत्तर हवंय विक्रांत असं म्हणत होती. विक्रांत तर तिच्या चेहर्याकडेही बघत नाही. तिचा भावनाशुन्य अभिनय बघणं सहन होत नसेल त्याला.
प्रचंड पैसा टाकून वडिलांनी
प्रचंड पैसा टाकून वडिलांनी लेकीची अभिनयाची हौस पुरवलेली दिसते.
तिला वेबसाईटवर series मिळाली
तिला वेब series मिळाली असं ऐकलंय
काम देणारांनी तुपारे पाहिली
काम देणारांनी तुपारे पाहिली नसेल.
अगं पण सस्मित ताई, त्या माठ
अगं पण सस्मित ताई, त्या माठ गायत्री ला तरी पाहिले असेल न काम देताना, का तिथेही बाबांनी वशिला लावला काय माहीत
रच्याकने गादा चा चाहता वर्ग आहे म्हणे अस्तित्वात!!!
ईबाळाचे तळ्यात मळ्यात चालूच
ईबाळाचे तळ्यात मळ्यात चालूच आहे का? >>>>>>>> मला तर विसच तळयात मळयात खेळतोय अस वाटतय. एका क्षणाला माझ ईशावर प्रेम आहे, तिच्या पोटात माझ बाळ आहे, मी तिला काहीही करणार नाही, मी तिला माफ करेन वै वै बोलतो, तर दुसर्या क्षणाला मी विलासच्या मृत्यूचा बदला घेईन, कोणाकोणाला सोडणार नाही म्हणतो. नक्की चाललय तरी काय हयाच? दर सेकन्दाला विसच कॅरेक्टर चेन्ज करतोय केडया.
ईशा बहुधा एका खोलीत जे बोलते ते दुसर्या खोलीत गेल्यावर विसरते. >>>>>>>> सेम अबाउट विस
तिकडे हॅलोवीन रूम मधे एक मायक्रोफोन लावला असता तर सगळे पुरावे सहज मिळाले असते. तेथे जाउन विक्या म्हणतोय की त्याचा प्लॅन यशस्वी झालाय. काय? ईशा राजनंदिनी आहे हे सिद्ध होउन आईसाहेब तिच्यावर खूष होउन ती अर्धी मालमत्ता तिच्या नावावर करणार, आणि ती याला मिळणार? कशी? आणि ट्विस्टच्या नादी लागला नसता तरी मिळालीच असती ना? >>>>>>>>> आत्ता ह्याला तो प्लॅन आठवला? मला वाटल बाळाच्या नादात विसरुन गेला की काय? ते मुलीला राजनन्दिनी नाव ठेवणे हा त्याच्या प्लॅनचाच भाग असावा का? म्हणजे आसा ज्यूनियर नन्दूच्या नावे प्रॉपर्टी करणार. मुलगी १८ वर्षापर्यन्त होईपर्यन्त विस प्रॉपर्टीचा केअरटेकर व्ह्याचा निर्णय घेणार. नन्तर हळूच ती प्रॉपर्टी स्वतः च्या नावे करणार.
पण मुद्दलात दिवे लागायला तिथे अंधार नव्हताच. >>>>>>> अगदी अगदी आणि इथे तिथे बाकीचे लोक दिसत नव्हते काळोखात. खोली रिकामी दिसत होती. मग अचानक सगळे कसे काय प्रकटले?
ईशा पेक्षा किमान दीड इंच उंच असलेल्या रान चा ड्रेस इशा ला बरोबर बसलेला पाहून तर माझे डोळे भरून आले >>>>>>>>>>
अरे तुपारे मधला एकजण तिकडे मानबा मधे राधिका मसाले शी कसलेतरी डील करायला आलाय >>>>>>> हे बघितलय. पटेलभाई आहे तो.
कन्सिस्टंट वाली कॉमेण्ट फक्त ईबाबांबद्दल. कारण त्यांचे कॅरेक्टर बर्यापैकी तसे होते बरेच भाग तरी >>>>>>>>>>> ++++++++++++++ पण एका सीनमध्ये पुष्पाने कडवट बोलल्यावर त्यान्च दारु पिऊन येण मात्र पटल नाही. कॅरेक्टरला धरुन नव्हते ते. कारण ईबाबान्ना कुठलच व्यसन दाखवल नव्हत.
१. मला कारवी ऐवजी टवळे, थेरडे, चेटकीण म्हटल्यासही चालेल पण नावापुढे जी / दी / तै नको कृपया. >>>>>>> कारवी, मन्या सगळयाजणीन्ना ताईच म्हणते. अत्यन्त वाईट अनुभव आलाय मला.
सुभा चा निळ्या शर्ट मध्यील रानं रूम मधील संवाद. व लगेच यलो शर्ट मध्ये बेडरूम मध्ये बेड वर बसून लँपटॉप बघत चहा पिणे, बाय को शी बोलणे व तिला मिठीत घेउन तिचे रडवे वदन बघोनी तिला आधार देणे व लगेच स्लाय हसणे हे एकदमच. >>>>>>> अमा, हि स्तुति होती का सुभाची?
मला तर वाटते विक्याची गंमत करायला यांनी अनेक रहस्यकथांची पुस्तके तेथे सहज सापडतील अशी ठेवून त्याला गोंधळात टाकावे. >>>>>>> उलट ती रहस्यकथांची पुस्तके तोच वाचत सुटेल. त्याच्या सो कॉल्ड प्लॅनसाठी आयडियाज त्याला मिळायला नको का.
अंधेरा कायम रहे असं lecture देतोय विस >>>>>>> नैतर काय. हे बर आहे विसच. एकतर सर्वान्ना अन्धारात ठेवायच आणि नन्तर अन्धारात बसलेल्या माणसावर विश्वास ठेवू नये म्हणायच.
झुंबर असणं वगैरे सुद्धा कॉपी केलंय >>>>>> मला वाटते ते झुंबर डोक्यावर पडून विस मरेल. देवीने न्याय केला अस दाखवतील. तसही पिन्कीमावशीने हिण्ट दिली होती झुम्बर डोक्यावर पडण्याची.
आजचं विस स्वगत म्हणजे बाजीगर
आजचं विस स्वगत म्हणजे बाजीगर च्या क्लायमॅक्स ची केड्या आवृत्ती होती.. (अन्याय वगैरे गाळून) पण संवाद म्हणजे अररारा.. सुबोध भावे चं एवढं अवमूल्यन कुण्या लेखकाने केलं नसेल..
सोन्या चा अभिनय छान होता.
सुभा नी राजनंदीनीला मारुन
सुभा नी राजनंदीनीला मारुन टाकलं म्हणल्या म्हणल्यादिवे लागले पट्कन.
सरंजामेंकडे होम अॉटोमेशनय बहुतेक >>> लोल हो तसेच वाटले काल पाहताना.
आजचं विस स्वगत म्हणजे बाजीगर च्या क्लायमॅक्स ची केड्या आवृत्ती होती >>> पुढचा भागही आला का? की हा होम ऑटोमेशन वालाच लेटेस्ट आहे?
फारएण्ड आजच्या भागात विसने
फारएण्ड- आजच्या भागात विसने गरीबी किती वाईट असते वगैरे बडबडत गजा पाटील च्या महत्वाकांक्षी योजनेची पार्श्वभूमी सांगितली.
आजच्या भागानंतर बाई वाड्यावर येण्याऐवजी गच्चीवर जाणार. फिदी :
इतक्या पोस्टी एका दिवसात....
इतक्या पोस्टी एका दिवसात.... !!
फारएण्ड तुम्ही काय ६ बॉल मध्ये १० रन हव्यात अशा थाटाची मॅच बघितल्यासारखे शेवटचा शिमगा बघताय ?
काय उजेड घालणार नाहीत..... आणि अंधारात काय करतायत कळणारही नाही
झी५ वर येतो रात्री उशीरा -- भारतीय वेळेप्रमाणे -- त्याच दिवसाचा एपिसोड
बघितला आता कालच्या भागातला ड्रेस....
रा नं २ चा ड्रेस ...... रा नं १ " सारखा " आहे.......रा नं १ चा नव्हे.
रा नं १ चा -- गुलाबी रंग -- आत अस्तर आणि वर पॉलिस्टर टाईप प्रिंटेड कापड + जरी / जरदोसी / टिकली वर्कवाला होता + पांढरे पाय, फिकी गुलाबी ओढणी, चप्पल
रा नं २ चा -- राणी कलर कॉटन + पांढरे लखनवी भरतकाम + पांढरे पाय, ओढणी, अंगठा वादीवाली काळी चप्पल, सोनेरी हिल्सवाली नाही
समोर ढळढळीत फोटो आहे त्याच ड्रेसचा, ती तिथूनच उचलते.....
याना काय वाटते स्मृतिभ्रंश झालेले किंवा मोतीबिंदू पडलेले लोकच तुपारे बघतात?
स्वगत ऐकण्या सारखे नसणारच यात दुमत नाही
विसने नरडे दाबून धरायला पाहिजे होते पुन्हा..... मागच्या जन्मीचे कमी झाले का तुला? पुन्हा पकवतेयस? म्हणत.....
बरोबर कळली असती पुनर्जन्मातली मजा !!
सगळे आजूबाजूला आहेत, लाईट लागल्यावर / मदतीला येणार म्हणून टिवटिव.....
आता सगळे मिळून पिटतील विसला आणि ईशा त्याला कव्हर करीत गाईल ---
कोई पत्थर से ना मारो मेरे दीवाने को...
हुस्न हाजिर है मधले हुस्न कुठेय तेव्हढे मात्र विचारू नका बुवा
आजच्या भागात विसने गरीबी किती
आजच्या भागात विसने गरीबी किती वाईट असते वगैरे बडबडत गजा पाटील च्या महत्वाकांक्षी योजनेची पार्श्वभूमी सांगितली. >>> ओह. म्हणजे उपस्थितांनी खून नाहीतर काय करेल बिचारा असे म्हणत माना डोलवाव्यात अशी अपेक्षा आहे का सिरीयलवाल्यांची?
विसने नरडे दाबून धरायला पाहिजे होते पुन्हा..... मागच्या जन्मीचे कमी झाले का तुला? पुन्हा पकवतेयस? म्हणत..... >>>
फारएण्ड तुम्ही काय ६ बॉल मध्ये १० रन हव्यात अशा थाटाची मॅच बघितल्यासारखे शेवटचा शिमगा बघताय ? >>> हो ना त्या झू मधल्या गाढवाच्या जोक सारखे मी तुम्हा लोकांच्या एक एपिसोड मागे अशी अवस्था होती. ती कॅच अप करत होतो.
ईबाबा डॅशिंग झाले एकदम. कर्जतच्या घरात डायरेक्ट किचन मधे चहा घ्यायला निघाले होते पुष्पाने बखोट धरून परत आणेपर्यंत. हे कधी तिकडे स्वतःच्या घरात त्या किचनपर्यंत घुसले होते का
* झू मधे एकदा कोणीतरी जोक सांगते. सर्व प्राणी हसतात. फक्त गाढव गप्प असते. दुसर्या दिवशी तो माणूस पुन्हा जातो तर फक्त गाढव हसत असते. त्याला लेट करंट लागला - असा तो जोक आहे.
Pages