Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57
तुला पाहते रे..
शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..
आओ ना फिर
उडाओ ना फिर
हा धागा , पिसं काढणार्यांना समर्पित!!!
पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!
ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Submitted by फारएण्ड on 16
Submitted by फारएण्ड on 16 July, 2019 - 21:36 >>>>>
असेच दिसते नाही.... त्यांनी खुला पवित्रा घेतलाय तसा. लेकीला सांगितलेय, आधी झाले ते झाले, तुझ्यावर प्रेम करतात ना, मग 'पोटातले' बाळ + वर्तमान + भविष्य + तुमचे संसारसुख याचा विचार कर. मागच्या जन्माचा, रानंचा नको !! काय तत्वनिष्ठ माणसे हो....
ती मेषपात्र मुंडी हलवते. प्लॅनचा इस्कोट. बाळाच्या न्यूजचा वापर करून चाल खेळता आली नाही शुंभीला.
सांगायचे सरळ विसला, फार खूष होऊ नका, तुमचे नाहीये.... पण तुमच्या नाकावर टिच्चून तुमच्या घरात आणणार आहे मी आणि आणायचा हवेतून जमिनीवर .... किंवा
सांगायचे --- काय तो आनंद मनवून घ्या..... एका खुन्याचे बाळ मी जगात येऊ देणार नाही. तो जर दाखवतोय तितका भावनिकरीत्या अडकला असेल बाळात तर दाती तृण धरून शरण आणायचा कुटुंबासमोर. घ्यायचे कन्फेशन.
पण नाही.... सत्रावेळा फक्त पोटात बाळ.... पोटात बाळ.... अरे, सगळ्यांचीच पोटात असतात.
कोणाचे बाळ किचनमध्ये खुंटीला टांगलेले नसते चक्क्याच्या गाठोड्यासारखे.......
तो सायकलवाला बाबा दातारांचे सालेसाहेब / व्याही असावेत.
म्हणाला असेल, ' पावणं / दाजी एव्हढा पैका नासून शिरेल बनवलीत. त आम्हाला द्या की एक चानस मुखडा दावायला' मग उरलेल्या चंगूमंगू एपिसोडात प्रत्येकी एकदा दाखवून हौस भागवतायत बहुतेक.
आईसाहेबांचे गडद हिरवे पोलके हरवले, क्रीम साडीवर क्रीम बुट्टी + हिरवे पोलके + हिरवी माळ असायची. आता साडी पोलके दोन्ही क्रीम कलर. मंदाचा पगार कापायला हवा.
कोणाचे बाळ किचनमध्ये खुंटीला
कोणाचे बाळ किचनमध्ये खुंटीला टांगलेले नसते चक्क्याच्या गाठोड्यासारखे.......>>>>>>>>>>>>>> फु टलेच हसून
उरलेल्या चंगूमंगू एपिसोडात
उरलेल्या चंगूमंगू एपिसोडात प्रत्येकी एकदा दाखवून हौस भागवतायत बहुतेक. >>>
बाय द वे हे बदलाकांड कधीपासून सुरू आहे? गेल्या महिन्या दीड महिन्यातलेच आहे का? की एका बाजूला बदला घेण्याची तयारी करत असताना ईशा तिकडे पत्नीव्रताचेही पालन करत होती?
कंपनीचा शेवटचा सीन येउन किती एपिसोड झाले? शेवटचा उल्लेख येउन किती?
फारएण्ड आणि कारवी>>>> अशक्य
फारएण्ड आणि कारवी>>>> अशक्य हसवताय..
बर्याच गॅपनंतर परत धमाल आणताय.. लगे रहो..
तो विस मधे गायब नाही का झाला
तो विस मधे गायब नाही का झाला होता जेव्हा सगळ्यांना सगळं कळलं (लंडन वारी) तो जाण्याच्या आधी पत्नीव्रताचे पालन केले असेल तिने
तो विस मधे गायब नाही का झाला
तो विस मधे गायब नाही का झाला होता जेव्हा सगळ्यांना सगळं कळलं (लंडन वारी) तो जाण्याच्या आधी पत्नीव्रताचे पालन केले असेल तिने >>>> तिथी काय होती?? चुकूनही अष्टमी नको रे बाबा.. infinite लूप मधे अत्याचार चालू राहील.
चुकूनही अष्टमी नको रे बाबा >>
चुकूनही अष्टमी नको रे बाबा >>
कारवी
कारवी
आला आला विक्या कंपनीत आला.
आला आला विक्या कंपनीत आला. गुढ्या तोरणे उभारली असतील कंपनीत. परांजपे, वाडकर मॅडम व इतर सर्व अधिकारी वर्ग ईशाच्या चकल्यांची वाट पाहात त्यावेळेस जसे दारासमोर उभे होते तसे उभे असतील. झेण्डे दिसत नाही याचा पत्ता झेण्डेचा कथेत पुन्हा काही कारणाने संबंध येइपर्यंत कोणालाही लागणार नाही. पण यांनी ते वातावरण दाखवलेच नाही. विक्याला ऑफिसमधे येउन एकटे बसायचे आहे, तर दोन पर्याय आहेतः
१. संध्याकाळी/रात्री सगळे गेल्यानंतर जायचे. किंवा लॅपटॉप कडेच बघत बसायचे असेल तर तोच घरी घेउन जायचा
२. नेहमीच्या वेळेस सूट वगैरे घालून ऑफिसमधे यायचे. मायराने मे आय कम इन विचारल्यावर ये ये मायरा म्हणायचे आणि मग तिला मला थोडा वेळ एकट्याला देशील का म्हणून कटवायचे. म्हणजे जरा घरगुती ड्रामा ऑफिसमधे होतो.
आता इथे काय दाखवले असेल त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. मायरा पुन्हा ओपन एन्डेड रोल मधे दिसत आहे ऑफिसमधे. म्हणे केबिन आवरून ठेवणार होती आधी सांगितले असते तर. सर काही लागले तर सांगा. कोण असले डॉयलॉग मारतात ऑफिसमधे? फॅमिली ड्रामा तसाच्या तसा प्लॅण्ट करत आहेत ऑफिस सेटिंग मधे.
ही ईशा किती प्राथमिक लेव्हलचा अभिनय करते? मला हे बाळ हवंय म्हणताना पोटावर हात ठेवून म्हणते. म्हणजे ते केले नसते तर लोकांना प्रश्न पडला असता की ही कोणत्या बाळाबद्दल म्हणत आहे.
आणि तिला काळजी कसली, तर सरांना यांचे कारस्थान कळाले "आणि राग आला तर?". ज्याने किमान दोन खून केले आहेत, कदाचित तीन. त्याचे कारनामे उघडकीस आणण्याचे प्रयत्न त्याला समजले. तर त्याला राग येइल म्हणून यांना काळजी?
कारवी, अशक्य भन्नाट लिहिले
कारवी, अशक्य भन्नाट लिहिले आहे
कारवी आणि फारएंड >>
कारवी आणि फारएंड >>
कोणाचे बाळ किचनमध्ये खुंटीला टांगलेले नसते चक्क्याच्या गाठोड्यासारखे,आईसाहेबांचे गडद हिरवे पोलके हरवले, Sad क्रीम साडीवर क्रीम बुट्टी + हिरवे पोलके + हिरवी माळ असायची. आता साडी पोलके दोन्ही क्रीम कलर. मंदाचा पगार कापायला हवा.>>:D
kairee >> चुकूनही अष्टमी नको रे बाबा.. infinite लूप मधे अत्याचार चालू राहील >
मला हे बाळ हवंय म्हणताना पोटावर हात ठेवून म्हणते. म्हणजे ते केले नसते तर लोकांना प्रश्न पडला असता की ही कोणत्या बाळाबद्दल म्हणत आहे>>
बऱ्याच दिवसांनी हसून हसून मेले मी ..
He he murder by vikya tally
He he murder by vikya tally as on date.
Dadasaheb
Rajnandini1
Jalinder
Zende
Rajesh
Wife
Child boy with ball
7 khoon maaf ase title have.
शिरपुरकर पण
शिरपुरकर पण
धन्यवाद सगळ्यांना. कित्येक
धन्यवाद सगळ्यांना. कित्येक दिवसांनी परवा पाहिले, जागताना टाईमपास म्हणून.
वाटले होते शेवटाला तरी सुधारतील. हत्ती गेला गाढवपणाचा, शेपूट तरी गोंडेदार असेल.... पण नाही तसेच वात आणतायत !!
@फारएण्ड -- मी नेहमी नाही बघत.... त्यामुळे पत्नीव्रताधर्मपालनाचा, बदलाकांड कालावधीचा काही क्ल्यू नाही.
सुलूं_८२च्या पोस्ट वाचा त्यात मिळेल बहुतेक.
मधे एकदा साडी नेसून, ओले केस विसच्या तोंडावर आपटून ऑफीसला जाऊ नका जाऊ नका करीत होती. एकंदर अभिनयाचा विचका. बोहारणीसारखी साडी बघून मी बंद केले. तेव्हा पुढे काही झाले असेल. पण मला नाही वाट्त काही झाले असेल. शिजणार्या शेपूच्या वासाने धुंद नाही होत माणूस तिथे जुई, सायलीच हवी.
ई श्या चा अभिनय शेरलॉक होम्सलाही नाही सापडायचा शोधून. आपण तर पामरं....
परवा समोरासमोर बसून बोलताना विसने केसात हात फिरवला तर बयेने आपणहूनच टाळके झुकवले, तयारीत असल्यासारखे मग त्याला कपळावर किस द्यावाच लागला. देव अक्कल वाटताना कुठल्या लायानीत उभी होती कोण जाणे !!
सध्या आपल्या जे सिन्स दाखवतायत ते आधीच शूट करुन झाले आहेत. सिरियल ऑलरेडी सम्पली आहे. >>>>>
सुलू.... कुठला सीन कधी घेतलाय कोण जाणे. मी अगदी आताचेच २-३ एपिसोड बघितले. त्यात निमकरांच्या घरात सीन चालू आहे आणि कॅलेंडर मार्चमध्ये आहे अजून. सीन मार्चमधला की कॅलेंडरचे पान नाही बदलले कोण जाणे.
आपला संकलक काय वकूबाचा आहे माहीत असताना का उलटे सुलटे सीन शूट करतात? जोडतही नाहीत नीट. उदा --
१. गोंधळी गात होते, ईशा अजून खाली यायची होती आणि ईशाची ओटी ऑलरेडी देवीच्या पायाशी होती. जांभळा खण, नारळ, २०००रू इत्यादि क्लोजप शॉटमध्ये दिसले. मग ती खाली आली ओटी भरली तेव्हा ती जागा रिकामी होती.
२. तिचा मळवट भरला तेव्हा कपड्यांवर कुंकू सांडले. झटकले तरी पुसट डाग दिसायला हवेत. पुढच्या सीनला कपडे साफसूफ. जोगवा बाईला थोडा अबीर-बुक्का पण द्यायला हवा होता ई श्या च्या गालाला लावायला.
३. जेव्हा ईशा कपडे कपाटात ठेवते तेव्हा ४ ड्रेस गठ्ठ्यात होते. मग ती खोलीतून गेल्यावर कपाट किंचीत उघडून पुस्तक पडते तेव्हा एकच केशरी ड्रेस दिसतो. बाकी गायब.
४. विसला टेबलावर दासांचे पेन दिसून संशय येतो तेव्हा तिथे शाळाभेट (नामदेव माळी) आणि स्टोरीज ऑफ विक्रमादित्य पुस्तके पडलेली दिसतात.... काय संबंध?
५. विसला संशय यायची भीती असताना मायरा आपण हे केलं ते कळलं असेल का? आपण ते केलं ते कळलं असेल का? असा पाढा का वाचते? त्याने ओव्हरहिअर केलं तर.... हे मनात येत नाही का? व्हीपी इतकी निर्बुद्ध?
६. विसला किडनॅप केला तेव्हा मॉनिटरींग यंत्रणेसकट नव्हता केला. अशी जिवावरची बिकट परिस्थिती असताना मॉनिटर विलग करतात पेशंटपासून? ज्या दारातून त्याला बाहेर काढला ते त्यांच्या बंगल्याचे प्रवेशद्वार नव्हते. ऑफीस बिल्डींग सारखा दरवाजा होता. त्यावर नो स्मोकींग नो स्पिटींग पाट्या होत्या.
७. झेंडेला गोळी डाव्या हाताने मारली. उजवा हात जखमी. नेम कसा लागला सरावाचा हात नसताना? की विस सव्यसाची आहे.
बस आता.... मी दमले....
ही सिरियल पहात नाही; कधीतरी
ही सिरियल पहात नाही; कधीतरी प्रोमो पहाते. इशा जरा कौशिकी चक्रवर्ती सारखी वाटते मला दिसायला .
आता गुगलणं आलं
आता गुगलणं आलं
रावी, नाही हं. ती (कौशिकी)
रावी, नाही हं. ती (कौशिकी) सुंदर आहे.
>>इशा जरा कौशिकी चक्रवर्ती
>>इशा जरा कौशिकी चक्रवर्ती सारखी वाटते मला दिसायला .<< नाही हो नाही.... कौशिकि जितकी मधुर गाते तीतकीच ती सुन्दर दिसते
@फारएण्ड -- मी नेहमी नाही बघत
@फारएण्ड -- मी नेहमी नाही बघत.... त्यामुळे पत्नीव्रताधर्मपालनाचा, बदलाकांड कालावधीचा काही क्ल्यू नाही.
सुलूं_८२च्या पोस्ट वाचा त्यात मिळेल बहुतेक. >>>>>>>>> ? बदलाकाण्ड तर नन्दूचा फ्लॅशबॅक सम्पल्यानन्तर सुरु झाल. पत्नीव्रताधर्मपालनाबद्दल मलाही काही माहित नाही.
मधे एकदा साडी नेसून, ओले केस विसच्या तोंडावर आपटून ऑफीसला जाऊ नका जाऊ नका करीत होती. एकंदर अभिनयाचा विचका. बोहारणीसारखी साडी बघून मी बंद केले. तेव्हा पुढे काही झाले असेल. पण मला नाही वाट्त काही झाले असेल. >>>>>>>>> तुमचा अन्दाज खरा ठरला कारवी. काहीही झाले नाही, फक्त तिचे केस सिड्क्टिवपणे खेचून कपाळाचा पापा घेतला आणि गेला ऑफिसात.
१. गोंधळी गात होते, ईशा अजून खाली यायची होती आणि ईशाची ओटी ऑलरेडी देवीच्या पायाशी होती. जांभळा खण, नारळ, २०००रू इत्यादि क्लोजप शॉटमध्ये दिसले. मग ती खाली आली ओटी भरली तेव्हा ती जागा रिकामी होती. >>>>>>>>> भारी निरिक्षण कारवी
म्हणे केबिन आवरून ठेवणार होती आधी सांगितले असते तर. सर काही लागले तर सांगा. >>>>>>>> आता मायरा प्यून सुद्दा झाली का?
आणि तिला काळजी कसली, तर सरांना यांचे कारस्थान कळाले "आणि राग आला तर?". >>>>>>>>>>>> मग काय हळदीकुन्कू घालणार आहे का सर तिच?
कोणाचे बाळ किचनमध्ये खुंटीला टांगलेले नसते चक्क्याच्या गाठोड्यासारखे,आईसाहेबांचे गडद हिरवे पोलके हरवले, Sad क्रीम साडीवर क्रीम बुट्टी + हिरवे पोलके + हिरवी माळ असायची. आता साडी पोलके दोन्ही क्रीम कलर. मंदाचा पगार कापायला हवा.>> >>>>>>>>>
एकीकडे विस ईशाने विश्वासघात केला तरीही मी तिला माफ करेन, कारण माझ तिच्यावर प्रेम आहे म्हणतो, तर दुसरीकडे निमकरान्कडून खर काय ते कळल्यावर चिडतो. जर त्याला पश्चाताप झाला असता, तर त्याने पुन्हा खोटी कहाणी रचून निमकरान्ना सान्गितली नसती. ईशाला जे दिसल आहे ते सगळ फिल्मी आहे अस म्हणाला नसता. नक्की काय आहे ह्याच्या मनात?
राजनन्दिच्या फोटोशी इमोशनल बोलताना आणि निमकरान्शी बोलताना बॅकग्राउण्ड मात्र खलनायक विसच वाजत होत. अस का?
अंधेरा कायम रहे असं lecture
अंधेरा कायम रहे असं lecture देतोय विस.. झेंडे ढगात हे नक्की समजलं आज.. इशा हा धागा वाचते बहुतेक.. जाब विचारणार आहे म्हणे
हत्ती गेला गाढवपणाचा, शेपूट
हत्ती गेला गाढवपणाचा, शेपूट तरी गोंडेदार असेल... >>>
विसला टेबलावर दासांचे पेन दिसून संशय येतो तेव्हा तिथे शाळाभेट (नामदेव माळी) आणि स्टोरीज ऑफ विक्रमादित्य पुस्तके पडलेली दिसतात.... काय संबंध? >> शाळाभेट दिसले होते मला. दुसरे दिसले नाही. पण तो शाळाभेट कडेही संशयाने पाहतो. त्याचा काही संबंध आहे का? मला तर वाटते विक्याची गंमत करायला यांनी अनेक रहस्यकथांची पुस्तके तेथे सहज सापडतील अशी ठेवून त्याला गोंधळात टाकावे.
अर्थात प्रत्येक पुस्तकाकडे विक्या दोन मिनीट निरखून पाहात आहे व मागे ते व्हिलन म्युझिक वाजत आहे हे आपल्याला सहन करावे लागेल.
बहुतेक सगळे सीन्स रँडम शूट
बहुतेक सगळे सीन्स रँडम शूट करुन ठेवले आहेत, ते कोणत्याही ऑर्डरने दाखवत आहेत त्यामुळे नक्की ईबाळाला बदला घ्यायचा आहे का ? विसचं ईबाळावर खरं प्रेम आहे का नाटक ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुढच्या ३ दिवसात दर सीनगणिक वेगळी मिळणार आहेत ह्याची तयारी ठेवा
दिवसात दर सीनगणिक वेगळी
दिवसात दर सीनगणिक वेगळी मिळणार आहेत ह्याची तयारी ठेवा >>> हो तसेच दिसते.
"विक्रांत त वरून ताकभात ओळखतात" - आईसाहेब. हे ऐकल्यावर मग "वि" वरून आणि "क्रां" वरून काय ओळखतात असा प्रश्न पडला.
त्याने ओव्हरहिअर केलं तर >>> टोटली. कोणीही कोणत्याही रूम मधे नॉर्मल आवाजात "सरांना कसलाही संशय आलेला दिसत नाही" वगैरे बोलत असतात. सिक्रेट फोन कॉल वर बोलताना जी माहिती बोलून दाखवण्याची गरज नाही ती पुन्हा रिपीट करतात. याच सिरीज मधे लोकांनी आडून ऐकण्याचे, मायक्रोफोन्स बसवण्याचे उद्योग याच लोकांनी पूर्वी केले असले तरी आता हे लोक बोलताना तसे काही केले जाइल याची अजिबांत शंका यांना नाही.
"चला तुमचा कंटाळा घालवण्याचा उपाय आहे माझ्याकडे" - विक्या टू निमकर. मला वाटले आता डान्स बार मधे वगैरे नेतोय की काय. पण बरोबर आहे. सरंजामे कंपनीचे ऑफिस हा त्यापेक्षा करमणूकप्रधान कार्यक्रमांचा अड्डा आहे.
तेथील निमकरांचे संवाद या सिरीज मधले आत्तापर्यंतचे सर्वात बिनडोक संवाद असतील.
काल केबिन ठिकठाक असताना मी
काल केबिन ठिकठाक असताना मी आवरून ठेवलं असतं म्हणणारी मायरा, अस्ताव्यस्त केबिन बघून काय घाबरली, आता मला आवरायला लागेल असा विचार आला असेल
नॉट डन मायरा ! (टॉक टॉक टॉक)
सर्व पोस्ट सुपर फार एंड.
सर्व पोस्ट सुपर फार एंड. जीवनाच्या दगडात मध्येच सोन्याची एक व्हेन लक्ख चमकून जावी तसे तुझे लेखन अस्ते. एखाद्याच प्रति सादाने पूर्ण दिवस मजेत जातो अगदी.
मी कालचा भाग पाहिला परंतू इशाला बदला घ्यायचा आहे कि नाही. ह्या बद्दल आता गोंधळ झाला आहे माझा. बर सुभा खाली बसून दु:ख करताना दाखवला. झेंड्याला गमावल्याचे दु:ख व मायरा येते आणि दिवा लाव ते व स स करून परत जाते. ती खोली आता खरेच आ व र ण्याजोगी झाली आहे. सुभाचे दु:ख व्यक्त करायचा क्षीण प्रयत्न.
सुभा चा निळ्या शर्ट मध्यील रानं रूम मधील संवाद. व लगेच यलो शर्ट मध्ये बेडरूम मध्ये बेड वर बसून लँपटॉप बघत चहा पिणे, बाय को शी बोलणे व तिला मिठीत घेउन तिचे रडवे वदन बघोनी तिला आधार देणे व लगेच स्लाय हसणे हे एकदमच.
आसा एकदम पोलीस कडे जायला निघतात. तेव्हा स्टेचु ऑफ लिमिटेशन संपली असेल काय दासा रानं मर्डरची असा मला प्रश्न पडला.
हाउ ऑन अर्थ आर दे सो कँजुअल अबाउट किलिन्ग एनिवन.
बरे परत पिस्तुलाच्या शॉटचा सीन होता. ह्याचा आवाज झाला असेल. माझ्याकडे कुत्रा भुंकला तरी कंप्लेंट करणारे शेजारी आहेत. पण इथे काय?
व तो समोरचा रक्तपात होउन मेला असेल. तर त्याला डिस्पोज ऑफ कोण करणार? चिकन दोन दिवस बाहेर राहिले तरी त्या वासाने असह्य होते. इथे तर आख्हा झेंडे आहे.
काही विल्हेवाट वगैरे? गादाचे बाबा? तुम्ही खरेच बिझनेसमन आहात?! आय मीन हाउ कुड यू पे फॉर दिस नॉन्सेन्स.
एक वाक्य खरेच मस्त होते काल. सुभा म्ह णतो आपण एखाद्याला अंधारात ठेवतो तेव्हा तो अंधारात काय करतो तेही आपल्याला दिसत नाही.
व्हिच इज गुड अॅक्चुअली पण इतर स्टुपिडीटीत वाहून गेले अस्ले रत्न.
तेथील निमकरांचे संवाद या
तेथील निमकरांचे संवाद या सिरीज मधले आत्तापर्यंतचे सर्वात बिनडोक संवाद असतील.
हे नाही पटले.. म्हणजे निमकर बाबा विशेषतः हे अगदीच साधे सरळ आहेत. ते विक्रांत च्या भपक्यानेच आधी पूर्ण पणे दबून गेलेले आहेत. त्यात ईशाचं इरॅटीक वागणं! सॉन्या पुन्हा वेगळंच सांगते! त्यामुळे ते गोंधळल्या सारखे झाले.....व त्यांनी विक्रांतलाच सगळं सरळपणे सांगून विचारलं..की हे खरं आहे का......
असे लोक पाहिले आहेत...अगदी अव्यवहारी पण सरळ, भाबडे!
अगदी अव्यवहारी पण सरळ, भाबडे!
अगदी अव्यवहारी पण सरळ, भाबडे! >>> निमकर सरळ आणि भाबडे नाही मठ्ठ आणि बावळट वाटतात.
असे लोक पाहिले आहेत...अगदी
असे लोक पाहिले आहेत...अगदी अव्यवहारी पण सरळ, भाबडे! >>>>> हो पण असं विचारल्यावर आपल्या जीवाला धोका आहे हे बेसिक तर कळत असेल ना !! आडून माहीती काढणे वेगळं आणि असं डायरेक्ट विचारणं मूर्खपणा.
विस आत्महत्या करुन निरोप
विस आत्महत्या करुन निरोप घेणार असे ऐकले.
ईबाळ + रानं मुळे सहनशीलता संपली की काय?
जाउ दे झालं.... इतके २९०+
जाउ दे झालं.... इतके २९०+ ज्यांनी कोणी बघितलेत त्यांनी उरलेले २-५ ही बघा सहनशक्ती एकवटून..... मग सुटलात.
विस आत्महत्या करुन निरोप घेणार असे ऐकले. >>> कशाला ते... हिलाही मारायची... २० वर्षांनी तिसरी मिळेल.. तोपर्यंत रिटायर पण होईल मग आरामात संसार करायचा. ६०:२० वय गुणोत्तरात जमेल तितका.
बाकीचे ठोंबे काही हालचाल करणार नाहीत. माझ्याकडे गन आहे त्यात गोळ्या पण आहेत माहितीये ना विचारले की सगळे गपगुमान बसतील. कसा का असेना कमवून आणतोय ना करोडोत मग आपले काम झाले म्हणत.
Submitted by रावी on 17 July, 2019 - 17:06 >>>>
भीषोण ओपोमॉन रावी... कौशिकींना ही तुलना सहन करायची शक्ती लाभो.
Pages