Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 24 April, 2019 - 06:37
स्टार प्रवाह वर भव्य दिव्य स्टारकास्ट असलेली 'जिवलगा' मालिका नुकतीच (२२ एप्रिल) पासून सुरु झाली आहे. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, आणि मधुरा ( आडनाव आठवत नाहीये आत्ता, पण गुलाबजाम चित्रपटात सिद्धार्थ ची प्रेयसी दाखवली होती ती ) असे नावाजलेले कलाकार आहेत.
त्यांच्यापेक्षा सतीश राजवाडे मुळे ही मालिका पाहण्याची उत्सुकता आहे, कारण मालिकेची संकल्पना त्याची आहे,
तर उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शन केले आहे. विषय पण तसा बोल्ड दिसतोय थोडा.. विवाहबाह्य संबंध ( नवऱ्याला माहीत असते, असं )...
त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा..
अजून कोणी पाहतं का ही मालिका???
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्व जो व्हिलन म्हणून मस्त
स्व जो व्हिलन म्हणून मस्त वाटतो आणि दाढी पण मस्त, आधी कृत्रिम वाटायचा, गोड गोड.
तो विधीच्या प्रेमात पडलाय. स्वतः घडवतो सर्व आणि लिहितोही. काव्याचा खून केला असेल असं वाटतं.
विधीला सगळेच बोलतात आणि जबरदस्ती patch up करायला लावतील, इमोशनल blackmail करून.
मलाही वाटतंय की विश्वासला
मलाही वाटतंय की विश्वासला विधी आवडते. तिची सासू काय बोलली ते ऐकलं नाही मी काल. निखिलचे बाबा बिचारे सुखाने घरात बसू शकत नाहित. सारखे कपडे बदलून धावत असतात अरेस्ट वरांट मागितलं तर तो पोलिस काय व्हिडिओ दाखवतो मोबाईलमध्ये. एकंदरीत निखिल बुळ्या आहे. आधीपण तीन महिने पूर्ण करायला ऑफिसला जातो. ऑफर लेटरमध्ये काहीतरी लिहिले असेल ना. ते काही नै, काव्या म्हणाली, चालला ऑफिसला. काव्या म्हणाली, गेला पार्टीला.
आज मी खुप दिवसांनी एक सीन
आज मी खुप दिवसांनी एक सीन बघितला आणि काय चालुये तेच कळलंच नाही.
स्व जो विचित्र का वागत होता विधीच्या घरी असताना?
बुद्धीबळ प्रकरण काय होत?
आणि विधीची आई विधीला तु चुकतेय अस का बोलली?
पोलिस प्रकरण? ते काय होत?
स्वजो आवडतोय. पोलिस निखिलला
स्वजो आवडतोय. पोलिस निखिलला नेत असताना स्वजो विधीकडे एकटक बघत असतो तेवढ्यात ती त्याच्याकडे बघते तर लगेच त्याच्या चेहेर्यावरचे भाव बदलतात. मस्त दाखवलेय हे त्याने.
आता विधीची सासू नॉर्मल सासुसारखी वागायला लागली आहे
वेळ बदलली वाटतं मालिकेची. एक
वेळ बदलली वाटतं मालिकेची. एक टप्पा आऊट चालू आहे आत्ता.
स्व जो व्हिलन म्हणून मस्त
स्व जो व्हिलन म्हणून मस्त वाटतो आणि दाढी पण मस्त, आधी कृत्रिम वाटायचा, गोड गोड.स्वजो आवडतोय. पोलिस निखिलला नेत असताना स्वजो विधीकडे एकटक बघत असतो तेवढ्यात ती त्याच्याकडे बघते तर लगेच त्याच्या चेहेर्यावरचे भाव बदलतात. मस्त दाखवलेय हे त्याने. >>>>>>>>> +++++++++११११११११११
विधीला सगळेच बोलतात आणि जबरदस्ती patch up करायला लावतील, इमोशनल blackmail करून. >>>>>>>>>> नैतर काय. शेवटी काय हॅप्पी एण्डिन्ग करायचय आहे ना त्यान्ना सिरियलचा.
निखिलचे बाबा बिचारे सुखाने घरात बसू शकत नाहित. सारखे कपडे बदलून धावत असतात >>>>>>>>
आता फक्त सोम ते गुरू असेल ही
आता फक्त सोम ते गुरू असेल ही सिरीयल.
किती वाजता लागते पण. साडेआठला
किती वाजता लागते पण. साडेआठला लागत नाही आता.
साडेआठच वेळ आहे, पण शुक्रवारी
साडेआठच वेळ आहे, पण शुक्रवारी आणि शनिवारी नसणार आता, एक टप्पा आऊट असेल त्यावेळी.
मी मात्र रात्री साडेबाराला बघते किंवा सकाळी साडेसहा. हे नाही जमलं तर hotstar वर बघते.
म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी
म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी लागणारच नाही की दुसऱ्या वेळी लागणार आहे. शनिवारी मी दिवसा वाट बघत होते रिपिटची तर गुरुवारचाच रिपीट दाखवत होते, म्हणजे शुक्रवार-शनिवार लागणारच नाही बहुतेक.
नसेल शुक्र शनी, असंच वाटतंय.
नसेल शुक्र शनी, असंच वाटतंय.
ह्या मालिकेचा विषय हा विबास
ह्या मालिकेचा विषय हा विबास चा च आहे .
तसा हा विषय खूप खोल आहे .
ह्याचे मुख्य दोन भाग होतात विवाह बाह्य संबंध कसे निर्माण होतात त्याला कोणती भावनिक,आर्थिक,सामाजिक परिस्थिती जबाबदार असते ते दाखवणे .
आणि दुसऱ्या भागात असे संबंध सुरू झाल्या नंतर दोन्ही कुटुंब वर होणारा परिणाम हे दाखवायला हवे होते .
पण ह्या मालिकेत
सुरवातीला ल च वीबास दाखवले आहे कसलीच पार्श्व. भूमी न दाखवता .
त्या मुळे आता विषय पुढे सरकणे खूप अवघड आहे .
लवकरच बंद करण्या शिवाय पर्याय नाही
राजेशच्या मताशी सहमत.
राजेशच्या मताशी सहमत. दुसर्या भागात तर चक्क सस्पेन्स थ्रीलर करुन टाकली सिरियल ज्याची काहीच गरज नव्हती. ते विश्वासच विधीसाठी Obsessive असण, त्याच मनोरुग्ण असण उगीचच घुसडल्यासारख वाटत. काव्याला सुद्दा उगाचच व्हिलन केलय.
आहे काव्या जिवंत. मला वाटलं
आहे काव्या जिवंत. मला वाटलं विश्वासने पोचवलं तिला.
आता असा डाउट येतोय की
आता असा डाउट येतोय की निखिल आणि विधीला एकत्र आणण्यासाठी विश्वास आणि काव्या एकत्र येऊन डाव खेळतायेत.
अस नसेल तर ती दुसरी अट पटत नाही. विधिला घटस्फोट न देताही हिच्याशी रिलेशनशिप मेण्टेन करायचे? अग बाई, विधि देतेय ना डिवोर्स, मग येईल की तुझ्याकडे कायमचा परत. तुझाच फायदा आहे त्यात. हिला त्यान्चा घटस्फोट का नकोय?
आता असा डाउट येतोय की निखिल
आता असा डाउट येतोय की निखिल आणि विधीला एकत्र आणण्यासाठी विश्वास आणि काव्या एकत्र येऊन डाव खेळतायेत. >>> लवकर संपणार असेल तर असं करतीलही नाहीतर आहेच लांबलचक काहीतरी.
एकदम रिअल विचार केला तर विवाह
एकदम रिअल विचार केला तर विवाह बाह्य संबंधाचा शेवट निदान भारतात तरी गोड होवू शकत नाही .
गोड शेवट दाखवणे म्हणजे टीआरपी अजुन कमी करून घेणे .
म्हणजे serial समाप्तीचा काळ अजुन कमी करणे
आता असा डाउट येतोय की निखिल
आता असा डाउट येतोय की निखिल आणि विधीला एकत्र आणण्यासाठी विश्वास आणि काव्या एकत्र येऊन डाव खेळतायेत.>>> +१ विश्वासने काव्याला माफ केले तसेच विधीने निखिलला करावे त्यासाठी हे सर्व चालू असेल.
जबरी टर्न. स्वप्नील सायको
जबरी टर्न. स्वप्नील सायको व्हिलन झालाय. त्याला निखील विधी एकत्र यायला नको आहेत आणि काव्या उलट त्यांना एकत्र आणायला बघतेय तर त्याने काव्याला मारण्याची धमकी दिलीय.
काव्याला कधी उपरती झाली?
काव्याला कधी उपरती झाली?
उपरती झाली म्हणजे नवऱ्याने
उपरती झाली म्हणजे नवऱ्याने नजरकैदेत ठेवलं आहे जवळजवळ आणि तो काय plan करून सांगतोय, ते जाऊन बोलतेय पण विधी एक चांगली मुलगी आहे तिला विश्वासने त्रास देऊ नये असं तिला वाटतंय म्हणून तिने एक वाक्य आपलं मिक्स केलं की, विधी ला div द्यायचा नाही, तिला घरी आण etc. असं कालचा एपिसोड बघून वाटलं. किंवा विधी घरी यावी म्हणून विश्वासच्या नकळत plan केला.
आता विश्वास भडकला आहे आणि विधी निखील एक होऊ नयेत म्हणून तिला अजून एक खोटं बोलायला सांगतोय जे ती आज येऊन सांगेल निखीलच्या घरी.
तो torcher करतोय खूप तिला.
बापरे एवढ्या घडामोडी झाल्या
बापरे एवढ्या घडामोडी झाल्या मी तर तो विधी आणी निखिल सेल्फी काढतात तिथपर्यंत बघितले होते.
विश्वास च्या मनात काहितरी वेगळे चालू आहे याची शंका आली होती.
पण असे काय असेल असे वाटले नव्हते.
काल दाखवलं. तो एपिसोड मी आज
काल दाखवलं. तो एपिसोड मी आज बघितला. दोन दिवसांचे बघा.
काव्याला कधी उपरती झाली? >>>
काव्याला कधी उपरती झाली? >>>>>>>> तिच्या आईने समजावल तेव्हा झाली असेल उपरती.
पण काव्यासारखी डॅशिन्ग मुलगी विश्वासचा डॉमिनन्स सहन करते हेच मुळी पटत नाहीये. तो तिच्या आईलाही ऑर्डर सोडतो!
तसही काव्यालाच तिच्यावर अधिकार गाजवणारा नवरा हवा होता ना, भोग म्हणाव आता!
नविन एण्ट्री झाली आहे सिरियलमध्ये. विजय चव्हाणच्या मुलाची ( नाव नाही माहीत ह्याच, लेक माझी लाडकी मध्ये सुद्दा हा होता)
वरद चव्हाण.
वरद चव्हाण.
मागे एका सिरीयलमध्ये माझ्या भाचीचा मुलगा होता तो.
धन्स अन्जू
धन्स अन्जू
उपरती झाली म्हणजे नवऱ्याने
उपरती झाली म्हणजे नवऱ्याने नजरकैदेत ठेवलं आहे ...>ओके.. बघेन आता.
पण काव्यासारखी डॅशिन्ग मुलगी विश्वासचा डॉमिनन्स सहन करते हेच मुळी पटत नाहीये. >> होना. निखिल पुढे कशी मारक्या म्हशी सारखी असायची आणि आता विश्वास पुढे ग गाय!
स्वप्निल काम चांगलं करतोय
स्वप्निल काम चांगलं करतोय पहिल्यांदाच.
स्वप्निल काम चांगलं करतोय
स्वप्निल काम चांगलं करतोय पहिल्यांदाच. >>> त्याला व्हिलनचा रोल सुट होतोय. चॉकलेट हिरो, गोड गोड डोक्यात जातो आणि दाढी छान दिसतेय.
एरवी निखिलला धमकी देताना
एरवी निखिलला धमकी देताना काव्या विजयी हास्य देते. काल मात्र तिच हसण केविलवाण वाटत होत. अमृताने ते परफेक्ट दाखवल.
वरद चव्हाण पोलिस असावा. आबान्नी किव्वा विनोदने पाठवला असणार. केक शॉपमधल बोलण एका कोपर्यात बसून ऐकत होता.
Pages