Submitted by क्षास on 10 July, 2019 - 05:53
ती
काळ्या-कुट्ट अंधारात धडपडत,
कोरड्या, शुष्क पडलेल्या जाणीवा,
संवेदना पायांखाली तुडवत....
सुजलेल्या खोल डोळ्यांत डोकावून बघत
एकामागून एक अर्थहीन प्रश्नांचे दगड भिरकावून
उठवते तरंग डोळ्यांच्या कडांपर्यंत.....
तिच्या आजूबाजूला गर्दी जमली की
धूसर होतात एकाकीपणाची भयाण चित्रं
आणि विरून जातो
नीरस, पोकळ गप्पांमध्ये आतला
छळणारा आवाज.....
काहीवेळाने
आसपासची माणसं हा हा म्हणता पसरून जातात...
मृगजळाची नशा ओसरून जाते...
ती पुन्हा काळ्या-कुट्ट अंधारात हरवून जाते...
बघता बघता नाहीशी होते..
व्यापून टाकतो अपराधीभाव
तिचं किंचितसं उरलेलं अस्तित्व,
शून्य होऊन जाते..
ती.. 'जगण्याची उमेद'
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविता सुंदर आहे पण नकारात्मक
कविता सुंदर आहे पण नकारात्मक आहे.
नेमक्या शब्दात भावना मांडल्या
नेमक्या शब्दात भावना मांडल्या आहेत. कविता आवडली..
सुरेख रचना
सुरेख रचना
धन्यवाद
धन्यवाद