Submitted by दत्तात्रय साळुंके on 28 June, 2019 - 03:08
वारी
पांडूरंग ध्यानी पांडूरंग मनी
निघाली वारी वैराग्य लेऊनी
तुटे ऐहिकाचे मजबूत बंध
मुखी गोड नाम हरीचे मरंद
कंटक जळाले वादळ पळाले
वाटेवर विठूच्या देहभान गळाले
भूकही निमाली तहान शमली
टाळ निनादे अंतरी विठूमाऊली
नुरे गुणदोष अतंरी प्रदोष
जपा तपा विना भेटे श्रीकृष्ण
मन स्थिरावले चित्तही पावन
नाचे आनंदे अवघे त्रिभुवन
विठू होय सखा विठू होय बंधू
सोयरा तो पाठीराखा तया वंदू
मागणे ना काही मन तृप्त होई
ऐसे वारी सुख वैकुठीही नाही
© दत्तात्रय साळुंके
२७-०६-२०१९
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप छान सर...
खुप छान सर...
सुंदर! _/\_
सुंदर! _/\_
पांडुरंग हरी, वासुदेव हरी
पांडुरंग हरी, वासुदेव हरी
सुंदर. तीर्थ विठ्ठल क्षेत्र
सुंदर. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
वाह , भक्तीमय
वाह , भक्तीमय
सुंदर ..........क्षमली.......
सुंदर ..........क्षमली.......... ऐवजी शमली करा
मरंद.... म्हणजे काय
डॉ. विक्रांत अनेक धन्यवाद,
डॉ. विक्रांत अनेक धन्यवाद,
दुरुस्ती केली.
मरंद = मध
वो मकरंद होता है.
वो मकरंद होता है.
मकरंद आणि मरंद समानार्थी आहेत
मकरंद आणि मरंद समानार्थी आहेत.
क्षमस्व.माहीत नव्हते.
क्षमस्व.माहीत नव्हते.
@ अजय,मन्याS, शशांक,प्राचीन
@ अजय,मन्याS, शशांक,प्राचीन,राजेंद्र देवी, डॉ. विक्रांत,खान९९
आपणा सर्वांचे अनेक धन्यवाद...