Submitted by रोहितकुलकर्णी on 24 June, 2019 - 12:25
बोलण्याने त्रास होतो?
की अबोला खास होतो?
लाट वाळू सोडताना
हुंदक्यांचा भास होतो
चालतो मी थांबतो मी
सावल्यांना फास होतो
छप्पराला पिंपळाचा
तापला सहवास होतो
पारदर्शी वागले की
आरसा मागास होतो
वासनेला शोषताना
निश्चयाचा डास होतो
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर. शेवटच्या ओळींचा अर्थ
सुंदर. शेवटच्या ओळींचा अर्थ समजावून सांगाल काय.
CHANGALI AAHE, FAKT SHEVATCHI
CHANGALI AAHE, FAKT SHEVATCHI OL KHATAKLI...