Submitted by mi manasi on 20 June, 2019 - 14:05
धागा उडवण्याची विंनंती कोणत्या प्रसंगी करायची असते?
कशी करायची?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धागा उडवण्याची विंनंती कोणत्या प्रसंगी करायची असते?
कशी करायची?
बांधण्याची माहिती आहे.
बांधण्याची माहिती आहे.
पण उडवण्याची विनंती ऐकली नाही अजून.
प्रसंग काय सांगून येतो होय!
प्रसंग काय सांगून येतो होय!
कग्नात आणि वडाला बांधतात....
लग्नात आणि वडाला बांधतात....
उडवायचं म्हणजे
असेल पण प्रथा कुठे कुठे !
होय ना ! सुज्ञास सांगणे नलगे
होय ना ! सुज्ञास सांगणे नलगे ...
कृपया मदतीची अपेक्षा आहे...
कृपया मदतीची अपेक्षा आहे...
तुमच्या धाग्याची लिंक अडमीन
तुमच्या धाग्याची लिंक अडमीन च्या विचारपूस मध्ये टाकून, योग्य कारण देऊन उडवण्याची विनंती करू शकतात. याउपर त्यांची मर्जी!!!
धन्यवाद,महाश्वेता ...
धन्यवाद,महाश्वेता ... तसदीबद्धल आभारी आहे
धागा बांधायच्या आधी विचार
धागा बांधायच्या आधी विचार करुन बांधायचा... म्हणजे उडवण्यासाठी विनंती करण्याची वेळच येणार नाही.
अॅडमीन साहेबांना विनंती केल्यावर त्यांना योग्य वाटल्यास टोकाच्या परिस्थितीत ते धागा बंद करतात, किंवा कधी केवळ पुढच्या प्रतिसादासाठी बांध घालतात...
सर्वात शेवटचा पण हमखास यशस्वी उपाय म्हणजे अनुभव संपन्न मायबोलीकर आहेत त्यांना धाग्यावर चर्चेसाठी आमंत्रण द्यायचे.
उदय... आपल्या प्रेमळ
उदय... आपल्या प्रेमळ सल्ल्यासाठी आभार.
बांधताना विचार करुन बांधायचा हे बरोबरच आहे पण मी नवीन आहे. काय काय होऊ शकतं याची कल्पना नाही.
अश्या प्रकारे 'चर्चेत' येऊ शकतो याची 'कानोकानी' खबर नव्हती...... .
धागा बांधतांना काय काय लक्षात घ्यावं हे सविस्तर सांगितलंत आभारी राहीन. ... लोभ असावा.
<< पण मी नवीन आहे. >>
<< पण मी नवीन आहे. >>
------ नवीन आहात... मायबोलीवर मनापासुन स्वागत...
धागाकर्त्याला edit मधे जाऊन संपुर्ण लेख/ काव्य मिटवता येते... आणि लेखाच्या ठिकाणी केवळ "." ठेवायचा. अर्थात प्रतिसाद तिथेच रहातात. अॅडमीन साहेबांकडे दोन्ही (धागा + प्रतिसात) मिटवण्याचे सामर्थ्य आहे पण ते प्रसन्न व्हायला हवेत.
उदय...खूप आभार... लोभ असावा.
उदय...खूप आभार... लोभ असावा.
तीस दि्स उलटल्यावर एडीट बटण
तीस दि्स उलटल्यावर एडीट बटण बंद होतं.
---------
नको असलेल्या धाग्यात एक दुरुस्ती प्रतिसाद लगेच टाका.
१) धाग्यातील "----- ~~~~" हा मजकूर काढायचा आहे./
२) पूर्ण धागाच चुकीच्या माहितीवर आधारित होता/
३) धाग्यातल्या काही उल्लेखांना संबंधित व्यक्तींंकडून आक्षेप आला आहे तरी विरोधी प्रतिसाद टाळावेत वगैरे.
प्रतिसादात जाऊन कोणत्याही id
प्रतिसादात जाऊन कोणत्याही id च्या नावाने ठणाणा गजर करा,
मनमोकळ्या शिव्या द्या
तुमचा id उडेल,
मग हाच काय कोणताच धागा तुम्हाला दिसणार नाही
तसदीबद्दल क्षमस्व असं म्हणतात
तसदीबद्दल क्षमस्व असं म्हणतात. तसदीबद्दल आभार ???????
सगळ्या वात्रट प्रतिसादात भर म्हणून मग मी पण. बाकी मूळ प्रश्नाला प्रामाणिक उत्तरं आली आहेतच.
कोणत्या प्रसंगी म्हणजे??
कोणत्या प्रसंगी म्हणजे??
दोन धागे झाले असतील तर
धाग्याव्र वाह्यात प्रतिसाद आले आणि त्याचा त्रास होत असेल तर
वैगेरे बर्याच प्रसंगी.
ते विंनंती मधे विं वरचा अनुस्वार काढाल का?
धागा फक्त मकर संक्रांतीला
धागा फक्त मकर संक्रांतीला उड़ेल
वि सु - येताना आपापले पतंग सोबत आणावेत.
माझ्या प्रश्नाला प्रतिसाद
माझ्या प्रश्नाला प्रतिसाद देण्यासाठी आपला अमुल्य वेळ खर्च करण्याची तसदी घेतल्याबद्धल मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे.... मीरा आता बरोबर आहे ना? (जरा अर्धवट लिहिलं होतं ).....NET connection नसल्याने उत्तर द्यायला उशीर झाला म्हणून क्षमस्व .
Srd ...सविस्तर उत्तर दिल्याबद्धल मी आपली खुप खुप आभारी आहे...... मी माझी एक, कविता लेखनाचा धागा आणि वाहते पान अशी दोन्ही ठिकाणी टाकली होती. नवीन असल्याने माहित नव्हतं . तुमच्या प्रामाणिक उत्तरामुळे ज्ञानात भर पडली. धन्यवाद.
सिम्बा ... आपला अनुभव share केल्याबद्धल धन्यवाद.... म्हणजे असं असतं हेही कळलं... मला इथे येऊन दोनच आठवडे झालेत ना?
मीरा ... असा वात्रटपणा चालेल. म्हणजे आता लिहितांना काळजी घेईन ना?... धन्यवाद.
सस्मित ..... प्रामाणिक उत्तराबद्धल धन्यवाद.
वीक्ष्य... इथल्या सगळ्या मित्रांच्या सहकार्यामुळे धागा उडवण्यात थोडं यश मिळालंय.... तत्पूर्वी माझा पतंग आकाशात होता. आता धागा उडवल्यावर कुठे असेल माहित नाही.
संक्रातीला नवीन उडवेन म्हणते .... धागा नाही पतंग ...
सगळ्यांचे आभार. असाच लोभ असावा ही विनंती
धागा नाही पतंग
धागा नाही पतंग
धागा उडवणे : वेमांचे काम
धागा उडवणे : वेमांचे काम
धागा विणणे: होतकरू माबोकरांचे काम
धागा उसवणे: (अगदी घट्ट विणला नसेल तर) माबोकारांचा हातखंडा.
उसवणे = भरकटवणे
उसवणे = भरकटवणे
मायबोलीकरांच्या सगळ्या "कला"
मायबोलीकरांच्या सगळ्या "कला" कलाकलाने जाणून घेईन म्हणतेय ....